Ikigai for Teens -किशोरवयीन, नवतरूणांसाठी ईकिगाई- पुस्तक परिचय मराठी
जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा
इकिगाई असतोच. या
पुस्तकामुळे आपल्याप्रमाणेच नवतरूणांनाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.
नवतरूणांसाठी ईकिगाई
पुस्तक परिचय मराठी
Ikigai For Teens: Finding Your Reason For Being
जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक Act of staying Young.. while growing Old जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच.
या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे.
या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल. शारीरिक स्वास्थ्यासाठी 80 टक्क्यांचं रहस्य. उत्साही शरीर, उत्साही मन. तणावाचा फायदा घेण्याची कला. स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम. लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.
आपल्या आयुष्याचे व जगण्याचे नेमके कारण काय, ध्येय, उद्देश काय याची तोंडओळख जर नवतरूणांना योग्य वेळी झाली तर निश्चितच ते पुढील आयुष्य क्षणही वाया न घालवता आनंदाने व्यतित करतील, आपल्या आयुष्याला एक योग्य अर्थ देऊ शकतील, जीवन सार्थक बनवतील.
ईकिगाई सारखी पुस्तकं सर्वसाधारणपणे धार्मिक पुस्तक असल्याचं वाटेल परंतू प्रत्यक्षात या पुस्तकामध्ये असा कोणताही धार्मिक संदेश दिलेला नाही. त्यामुळे एकांगी पुस्तक असल्याचा ठपका कोणीही ठेवणार नाही.
एका धर्माची किंवा पंथाची विचारसरणी यात नसून ही पुस्तक तर प्रत्येक मनुष्याच्या त्याला मिळालेल्या एकमेव आयुष्याचे ध्येय, उद्देश, कारण काय आहे, हे जाणून त्यानुसार आपले जीवन जगण्याचे मार्गदर्शन यात केलेले आहे.
स्वतःचा शोध घेण्यासाठी जंगलात किंवा हिमालयातच जावून बसावे लागेल असे बोध या पुस्तकातून दिलेले नाही, तर, सर्वसाधारण जीवन जगत असतानाच आपण आपल्या जीवनाचा ध्येय, कारण शोधू शकतो, मिळवू शकतो त्यानुसार जर दैनंदिन जीवन जगलोत तर नक्कीच दीर्घायू, स्वस्थ, आनंदी जीवन कोणीही जगू शकतो.
आपण दररोज सकाळी उठण्याचे प्रयोजन, कारण काय? हे सहज-सोप्या भाषेत समजावलेलं आहे. किशोरवयीन, नवयुवकांना, तरूणांना या पुस्तकाद्वारे त्यांना त्यांच्या जीवनाचा ध्येय, उद्देश, कारण व मार्ग मिळू शकतो, त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत हे पुस्तक करतं.
आपल्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना शालेय जीवनातूनच जीवनाविषयीचे धडे गिरविल्यास नक्कीच जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बनेल आणि सकारात्मक दृष्टीने ते सृष्टीकडे, मणुष्य जीवनाकडे बघतील. स्वतःचा शोध घेतल्यावर त्यांना स्वतःच्या असण्याचे कारण त्यांना कळेल व ते दीर्घ, आनंदी, निरोगी, स्वस्थ व अर्थपूर्ण जीवन बनवतील व जगतील.
टिप्पण्या