पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त मुलांचे मराठी पुस्तकांचे वाचन -मोहन जोशी

 

पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त
मुलांचे मराठी पुस्तकांचे वाचन 
 
मोहन जोशी 
 

 
मुले वाचत नाहीत, असा कांगावा करयापेक्षा पालकांनी स्‍वतःतच डोकावून पाहावे.  
  • आपण स्‍वतः किती वाचतो... मुलांना एखादे मराठी मासिक आणून देतो का? 
  • दरमहा किंवा अधून-मधून त्‍याला पुस्‍तकाच्‍या दुकानात- पुस्‍तक प्रदर्शनात नेऊन त्‍याच्‍या आवडीचे एखादे तरी पुस्‍तक घेऊन देतो का
  • मुलगा अभ्‍यासाव्‍यतिरिक्‍त काय काय वाचतो
आज मुलांना शाळा आणि क्‍लासेस यात इतके गुरफटून टाकले आहे की, दप्‍तर खाद्यावरून टाकल्‍यावर हमालाचे ओझे उतरविल्‍याप्रमाणे 'हुश्‍शss' म्‍हणत तो कोमेजललेला जीव निपचित बसून राहतो.  त्‍याची अशी स्थिती करण्‍यास आपण पालकच जबाबदार आहोत.  आपल्‍या अपेक्षांचे ओझे मुलांच्‍या पाठीवर लादणे कितपत योग्‍य आहे, याचा पालकांनीच विचार करावा.
  
''वि‍.वि.चिपळूणकरांचे उद्गार इथे महत्‍वाचे वाटतात,
'त्‍यांचे त्‍यांना उमलू द्या... त्‍यांचे त्‍यांना फुलू द्या..!"
 
पण लक्षात कोण घेतो
 
परिस्थिती हाताबाहेर जाण्‍यापूर्वी तरी पालकांनी मुलांचा मराठीचचा पाया पक्‍का होईल याकडे लक्ष द्यावे.  स्‍वतः चांगले वाचावे, त्‍याला चांगले वाचायला द्यावे.  काय वाचले यावर चर्चा करावी.  प्रसंगी मुलाला लिहिते करावे.  छोटेसे वाचनालय तयार करायला मदत करावी.  मित्र-मित्रांत पुस्‍तकांची देव-घेव करायचे मार्गदर्शन करावे.  प्रश्‍नांचा गुंता घरापासून असा सोडवीत जा. 

Mulanche Marathi Pustakanche Vachan : Pathyapustakanvyatirikta 

मुलांचे मराठी पुस्तकांचे वाचन : पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त (शोध-समीक्षा)


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive