प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन -विवेक बिंद्रा | Prabhavi niyojan Aani Veleche Vyavasthapan by Vivek Bindra

आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडत प्रत्येकालाच झळाळत्या यशाची वाट दाखवणारं पुस्तक प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन Effective Planning And Time Management

प्रभावी नियोजन आणि
वेळेचे व्यवस्थापन
विवेक बिंद्रा 

मराठी अनुवाद
प्रणय कुलकर्णी

वेळ, काळ, मानवनिर्मित अशी संकल्‍पना ज्‍यामुळे जगाला, आपल्‍याला सर्वांना एक ध्‍येय मिळवून दिले. निदान भटक्‍या रानटी अवस्‍थेमध्‍येही आपल्‍याला उपयोग कसा होत होता याचा अंदाजच लावलेला बरा. कारण तेंव्‍हा घड्याळ तर नव्‍हतेच परंतू सूर्य-चंद्र, ऋतू, दिवस-रात्र यांमुळे शिकार करायला आणि शिकार होण्‍यापासून जीव वाचवण्‍यात नक्‍कीच कालगणनेचे महत्‍व आहे.  

विषय भरकटतय असे वाटेल परंतू, तेव्‍हांही आपल्‍याजवळ चोवीस तासच होते आणि आजही तेवढेच आहेत, हजारो-लोखो वर्षांच्‍या उत्‍क्रांतीमध्‍ये आपल्‍यामध्‍ये आज पाहत आहोत तो नक्‍कीच बदल झालेला आहे.  

जगामध्‍ये आपल्‍या सर्वांना 24 तासच मिळतात, परंतू त्‍या चोवीस तासांचा नेमका उपयोग करून कोणी मजदूर गरिबच राहतो तर कोणी मोठ्या कंपनीचा मालक बनतो, पैसा-संपत्‍ती कमावतो, यशस्‍वी होतो.  याचे कारण निश्चितच आपल्‍याला मिळणा-या वेळेचा उपयोग, सदुपयोग कसा केंव्‍हा किती आणि कशासाठी करायचा याचे नियोजन मात्र दोघांपैकी कोणाला जमते त्‍यालाच यशाचे फळ मिळते.  

विवेक बिंद्रा यांना आज आंतरजालावरील जवळपास प्रत्‍येक नेटकरी ओळखतोच, त्‍यांनी नव्‍या युगाच्‍या नाड्या बरोबर ओळखल्‍या आणि पाहा ते आज यशस्‍वी झालेले आहे. याउपर ते इतरांनाही आपल्‍याप्रमाणे यशस्‍वी कसे व्‍हावे यावर मार्गदर्शन अगदी मोफत करत असतात.  परंतू वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे कितीजण त्‍याचा उपयोग, सदुपयोग करून घेतात हा प्रश्‍नच आहे. 

तरी ज्‍यांना आपल्‍या मर्यादित आयुष्‍याची कल्‍पना आहे आणि आयुष्‍यात काही करून जाण्‍याची महत्‍वाकांक्षा, इच्‍छा आहे त्‍यांनी नक्‍कीच हे पुस्‍तक वाचावे, आयुष्‍य खूप मोठे आहे परंतू मर्यादित वेळेची  आणि अनिश्चिततेची सरहद्द त्‍याला आहे. त्‍यामुळे अतिवचार करून वेळ वाया घालवण्‍यापेक्षा, इतर अनावश्‍यक गोष्‍टींना महत्‍व देण्‍यापेक्षा, आहे त्‍याच वेळेत आपल्‍या आयुष्‍यात मनासारखे जगून, यशस्‍वी होता येते.  तुम्‍हाला जोड मात्र नियोजनाची द्यावीस लागेल याला अपवाद, पर्याय नाहीच नाही.

👉या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ? 
  • कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत कसं करावं ? 
  • अतिरिक्त ताणतणाव कमी करुन वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं ? 
  • प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ? 
  • वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ? 
  • ’सर्वांत मोठी पाच उद्दिष्ट’ आणि ’सर्वांत लहान पाच उद्दिष्टं’ म्हणजे नेमकं काय ? 
  • स्वतःच्या ध्येयापासून न भरकटण्यासाठी या संकल्पनांचा वापर कसा करावा? 
  • कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपल्या दैनंदिन कामांचा आणि पर्यायानं आयुष्यातील उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा ?
  • यशाकडे आत्मविश्वासानं वाटचाल करण्यासाठी उत्तम आणि प्रभावी वेळापत्रक कसं बनवावं?

Prabhavi niyojan Aani Veleche Vyavasthapan
Marathi Translation of the book
Effective Planning and Time Management

 
इतर संबंधितः 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive