रावण -राजा राक्षसांचा - शरद तांदळे | RAVAN -Raja Rakshasancha by Sharad Tandale
रावण
राजा राक्षसांचा
शरद तांदळे
![]() |
RAVAN -Raja Rakshasancha by Sharad Tandale |
आसमंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय-नीतीमत्ता आदी गुणांनी संपन्न समुचयांचे संबंधित बरोबर घेऊन स्व-अस्तित्व सिद्ध करून बुद्धिच्या जोरावर एल्गार करत स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा आहे मी.
हजारो वर्षापासून जाळत आलात तरी संपलो नाही. आजवर कथा, साहित्य, पुस्तकं यांतून मी बोललो नाही, त्यामुळेच तुम्हाला कधी समजलो नाही. दुर्गुणी, अवगुणी म्हणून मला हिनवले गेले. बुद्धिबळ, वीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, कित्येक कथा, शिवतांडव स्तोत्र, यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रूंदावल्या.
दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून मी राक्षस संस्कृतीचा पाया रचला. तसेच दर्शनशास्त्र, व्यापारशास्त्र, राज्यशास्त्र, आयुर्वेद, इत्यादींसारख्या अनेक विषयांत पांडित्य मिळवूनही मला खलनायक ठरवून माझी कायम उपेक्षाच केली गेली. अवहेलनेच्या फे-यांत गुरफटलेल्या माझ्या आयुष्याचं सारं वाईट विशेषणांची बरसात करत मांडलं गेलं.
हजारो वर्षापासून माझ्या दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो, विध्वंस हा कधीच चांगला नसतो हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यांसाठी रक्तचंदन कपाळी लावावं लागतं आणि वेळ पडली तर तत्वांसाठी मरावं आणि मारावंही लागतं.
माझ्या आयुष्यात पडलेल्या अघटित घटना, आलेली अनपेक्षित वादळं... त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर लंकाधिपती झालो. इतर राजांसारखी मी एकट्याने सुखं उपभोगली नाहीत. माझी जनता सोन्याच्या घरात राहत होती. हजारो वर्षांपासून अनुत्तरीत असलेल्या माझ्या वैयक्तिक आयुष्याचा, माझ्या अंगभूत व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेतला का कधी?
माझं आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तृत्ववाने भरलेलं आहे. स्वतःच्या बळावर सर्व देवांना मी पराभूत केलं. मला न जाणता माझी प्रतिमा जाळणा-या लोकांच्या अज्ञानाची कीव येते. सीतेचे अपहरण केल्याचा मला दोष देता, पण मी तिची विटंबना केली नाही, हे का विसरता?
वाचा आणि ठरवा... मी खरोखरच खलनायक होतो, की स्वसामर्थ्यांवर झालेला महानायक...!
💯👍👌
उत्तर द्याहटवाहा पुस्तक कस मिळेल
उत्तर द्याहटवाTrue ahe love books in biography saluted.....
उत्तर द्याहटवारावण सर्वात मोठा महादेव भक्त असून तो तो एक छान माणूस होता
उत्तर द्याहटवाई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवाभेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.