भावनांच्या भरात निर्णय घेण्याअगोदर भावनांना समजून भावनिक सजगता वाढविण्यासाठी -भावनांच्या जगात -श्रृती पानसे | Bhavananchya Jagat -Shruti Panse

भावना म्‍हणजे काय? त्‍यांचा उगम कुठे होतो? भावनांचे प्रमाण का व कसे वाढते? भावनांचे शास्‍त्रशुद्ध पद्धतीने नियमन कसे करावे? शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, यूवावर्ग आणि पालकांसाठी शिक्षक व जिज्ञासू लोकांसाठी भावनिक सजगता वाढविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करणारे पुस्तक

भावनिक सजगता वाढविण्यासाठी
भावनांच्या जगात

श्रृती पानसे 

पुस्‍तक परिचय मराठी

Bhavananchya Jagat

भावनांच्या भरात निर्णय घेण्याअगोदर भावनांना समजून भावनिक सजगता वाढविण्यासाठी
भावनांच्या जगात

भावनांच्‍या भरात लहान मुलं काहीही करू शकतात, असं म्‍हणतात.  पण शहाण्‍यासुरत्‍या मोठ्या माणसांच्‍या हातूनही भावनांच्‍या भरात लहान मोठ्या चुका होतच असतात. रागाच्‍या भरात, मोहामुळे, प्रलोभन लक्षात न आल्‍यामुळे, अहंभावनेमुळे किंवा न्‍यूनगंडामुळे माणसं वागायला चुकतात. 
 
असे सतत घडले तर त्‍या व्‍यक्‍तीला आजूबाजूची माणसं दूर ठेवायला लागतात.  चिडक्‍या किंवा गोंधळलेल्‍या व्‍यक्‍तीवर सहसा मोठ्या जबाबदा-या टाकताना घरचे किंवा बाहेरचेही थोडे साशंकच असतात.  अहंकारी माणसं मर्यादित यश मिळवतात आणि जरी ती यशस्‍वी झाली तरी ती अखेरीस एकटी, एकाकी राहण्‍याचा धोका असतो. थोडक्‍यात माणसाच्‍या विवेकबुद्धीवर भावनांचा अतीतीव्रतेचा पडता पडतो, तेव्‍हा, यशस्‍वीतेचे मानसिक शिखर गाठणे दुरापास्‍त होते. 
 
भावनांच्‍या प्रवाहात वाहून जाण्‍याची सवय असेल तर आयुष्‍यात खूप मोठ्या धोक्‍यांना निमंत्रण मिळू शकते.  भावनांना नियंत्रणात ठेवून त्‍यांना बुद्धीच्‍या साहाय्याने, हुशारीने हाताळल्‍यास आपल्‍याला हव्‍या त्‍या पद्धतीने भावनांचे नियमन करता येते. भावना म्‍हणजे काय? त्‍यांचा उगम कुठे होतो? भावनांचे प्रमाण का व कसे वाढते? भावनांचे शास्‍त्रशुद्ध पद्धतीने नियमन कसे करावे? अशा विविध विषयांवर, प्रश्‍नांवर केलेले हे भाष्‍य हे या पुस्‍तकाचे वैशिष्‍ट्य आहे.
 
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, यूवावर्ग आणि पालकांसाठी शिक्षक व जिज्ञासू लोकांसाठी भावनिक सजगता वाढविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन भावनांच्या जगात या पुस्तकात केलेलं आहे. 

माणसाच्या सर्व कृती व विचारांवर भावनांचे आवरण असते. एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर आधी भावना पुढे सरसावतात. प्रबळ अशा या भावनांना थोडं मागे सारलं तरच बुद्धी नीट काम करू लागते. 
 
मेंदूच्या लिम्बिक सिस्टीममध्ये असलेल्या या सकारात्मक व नकारात्मक भावनांना कसं हाताळावं, हे शिकून घ्यावं लागतं. भावना सर्वांमध्ये असतात, पण त्यांना योग्य रीतीने हाताळण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता मात्र आपल्याला शिकून घ्यावी लागते. 
 
आपली मुले आपलेच अनुकरण करीत असल्याने प्रत्येक पालकाने भावनिक बुद्धिमत्ता शिकून घेण्याची व भावनांचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. भावनिकदृष्ट्या सजग राहण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन करणारे पुस्तक.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive