पैशांविषयी बोलू काही -मोनिका हालन | (Paishanvishayi Bolu Kahi) Let's Talk Money by Monika Halan
आजवर पैसा कमाविण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आता पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. खास भारतीय मानसिकतेचा आणि आर्थिक योजनांचा विचार करून हे पुस्तक खास तुमच्यासाठी लिहिलं गेलं असल्याने ते वित्त विषयातील इतर पुस्तकांपेक्षा वेगळे ठरते.
पैशांविषयी बोलू काही
मोनिका हालन
मराठी अनुवाद
सीमा भानू
मराठी पुस्तक परिचय
पैसे कमावण्यासाठी आपण खूप मेहनत करतो ; पण कितीही पैसे कमावले तरी पैशांची चिंता दूर होत नाही. वेगवेगळी बिलं, कर्जाचे हप्ते , वैद्यकीय कारणासाठी होणारा खर्च, शैक्षणिक खर्च, सुट्ट्यासाठी होणारा खर्च आणि त्याचबरोबर निवृत्तीसाठी लागणारे पैसे .. पैशांची चिंता सतत मनात असतेच.
आपण पैसे कमावण्यासाठी जसे कष्ट करतो, तसंच पैशांनेही आपल्यासाठी काही केलं तर ते किती सुखकारक होईल ! एखाद्या साध्या, गुंतागुंत नसलेल्या योजनेत सहज पैसे गुंतवता आले आणि त्याचा चांगला मोबदला मिळाला तर आपले आजचे आयुष्य सुखाचे होईल.
या पुस्तकात भारताच्या वयक्तिक वित्त क्षेत्रात सगळ्यात विश्वासार्ह काम करत असलेल्या मोनिका हालन तुम्हाला गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करत आहेत. हे पुस्तक, 'तुम्ही झटपट श्रीमंत कसे व्हावे ? 'हे सांगत नाही; मात्र कुठलीही धास्ती न बाळगता योग्य गुंतवणुकीचा मार्ग दाखवते, जो तुमच्या स्वप्नातल्या आयुष्याचा रस्ता आहे.
खास भारतीय मानसिकतेचा आणि आर्थिक योजनांचा विचार करून हे पुस्तक खास तुमच्यासाठी लिहिलं गेलं असल्याने ते वित्त विषयातील इतर पुस्तकांपेक्षा वेगळे ठरते.
टिप्पण्या