खारीच्या वाटा - ल. म. कडू, ज्येष्ठ बालसाहित्यकार | Kharichya Vata -पुस्तक परिचय

एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. 
 
 (२०१८- साली -  साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त - बालसाहित्य)
खारीच्या वाटा 
ल. म. कडू,
ज्येष्ठ बालसाहित्यकार
 
पुस्तक परिचय  

 


खेड्यातील जनजीवन, तेथील माणसे, निसर्ग, शाळा, शिक्षक, मुले, त्यांच्या रोजच्या करामती यांचे वर्णन ल. म. कडू यांनी 'खारीच्या वाटा'मधून केले आहे. दोन मित्र व त्यांनी पाळलेली खार यांच्या भोवती फिरणारी कथा एका वेगळ्या विश्वात नेते. 
 
चालतं, नांदत्या गावात धरण बांधणार असल्याची बातमी येते आणि संपूर्ण गावगाडा काळोखात बुडून जातो. वस्त्या उठतात. मित्रही वेगवेगळे होऊन स्थलांतर करतात. खार मात्र तिथेच राहते. तीला सोडून जाताना मुलांच्या डोळ्यांत आसवं उभी राहतात. खेड्यात राहणाऱ्या उमलत्या वयातील मुलांच्या भावविश्वात आपणही रमून जातो.  उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.  
 
 
Related:
 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive