Build, Don't Talk by Raj Shamani | निर्माण करा, बोलू नका -राज शामानी -पुस्तक परिचय मराठी

शाळा तुम्हाला शर्यतीत कसं पळायचं हे शिकवतात, कसं जिंकायचं हे मात्र शिकवीत नाहीत. ही पुस्तक तुम्हाला शर्यत जिंकण्यास मदत करेल.  

Build, Don't Talk
Things You Wish You Were Taught in School

by the author
Raj Shamani 

 

#Build, Don't Talk book review in Marathi 
#best seller book in Personal Transformation

निर्माण करा, बोलू नका
राज शामानी
पुस्तक परिचय मराठी 

शाळा तुम्हाला स्पर्धेत-शर्यतीत कसं पळायचं हे शिकवतात, शर्यतीतीत कसं जिंकायचं हे मात्र शिकवीत नाहीत. ही पुस्तक तुम्हाला स्पर्धा-शर्यत जिंकण्यास मदत करेल.  

शाळा तुम्हाला स्पर्धेत कसं पळायचं हे शिकवतात, कसं जिंकायचं हे मात्र शिकवीत नाहीत. 
-राज शामानी,
लेखक (बिल्ड, डोन्ट टॉक)

शाळेत आपल्याला विशिष्ट विषय शिकविले जातात, जसे कि, गणित, विज्ञान, इतिहास इत्यादी.  पण, शाळा आपल्याला हे शिकवत नाहीत कि,  

  • कसे विकावे?
  • नातेसंबंध कसे बनवावे?
  • आव्हानं कशी सांभाळावी?
  • आपल्या मानसिक आरोग्याची-स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी?  
  • स्वतःचे जाळे कसे विणावे?
  • वैयक्तिक अर्थकारण कसे सांभाळावे?    

जेंव्हा आपण वयाने मोठे होत असतो ह्या व अशाच अत्यंत महत्वाच्या गोष्टी, परिस्थितींशी आपला सामना होत असतो, दैनंदिन जीवनातील या गोष्टींना आपण तोंड देत असतो ज्या आपल्याला विद्यार्थी असताना शिकविने तर सोडाच साधी चर्चा सुद्धा केली गेलेली नसते.   

शाळेत आपलयाला ही कौशल्ये शिकविली गेली नाहीत, आणि यामुळेच वास्तविक जगातील आजच्या ज्या काही वैयक्तिक, व्यावसायिक यशाच्या गोष्टी, यशोगाथा, कथा ऐकवल्या व शिकविल्या जातात त्या सर्वच काल्पनिक किंवा आवाक्याबाहेरील वाटत असतात. यामुळे आणि शिक्षणामुळे आजच्या नव्या युवा वर्गाला निःशब्द करून टाकले आहे, लज्जित केले आहे, आम्ही वेडगळ, मूकप्राणी नाही तर आम्हाला फक्त व्यवस्था कशी चालते याविषयी माहित नाही.   

शाळेने आपल्याला शर्यतीत कसे पळायचे हे शिकवले; त्याने तुम्हाला कसे जिंकायचे हे शिकवले नाही. आणि त्यासाठीच हे पुस्तक आहे. तुम्हाला शर्यत जिंकण्यात मदत करण्यासाठी. आजच्या अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगाशी, तंत्रज्ञानाशी आपली पूर्वप्रस्थापित समाज व इतर व्यवस्था कितपत "अपडेटेड" आहे?  कालातीत झालेले "इंग्रजाळ मानसिकतेने भरलेले शिक्षण" अजुनही टिकून आहे. संख्यात्मक वाढ तर झाली परंतु गुणात्मक वाढ व विकास याचे काय?  

आंत्रप्रेनर, मोटिव्हेशनल स्पीकर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, पॉडकास्टर, कॉन्टेन्ट क्रीएटर, एक उद्योजक आणि सामग्री-आशय निर्माता (Content Creator) म्हणून त्यांच्या स्वत:च्या प्रवासातून मिळालेल्या उपयुक्त सल्ल्यांनी युक्त, राज शामानी यांचे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive