राष्ट्रीय विज्ञान दिन आणि डॉ. सी. व्ही. रमण (रमण परिणाम) | National Science Day & Dr. C. V. Raman (Raman Effect)
शेअर करा
पुस्तक मित्र Book BuddyPosted at
समुद्र
निळे का दिसते? या प्रश्नाचं उत्तर शोधणा-या एक प्रतिभावंत, कुशाग्र, हुशार बुद्धीच्या मुलाने मोठं होऊन भारताच्या वैज्ञानिक क्रांतीचा पाया रचला. ही कथा आहे त्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञाची ज्यांनी त्या काळात भौतिकशास्त्रात जागतिक नोबेल पारितोषिक जिंकलं होतं जेंव्हा भारत इंग्रजांच्या ताब्यात होता.
राष्ट्रीय विज्ञान दिन विषेश
डॉ. सी. व्ही. रमण
जीवनचरित्र मराठी
बायोग्राफी
C.V. Raman: Biography & Inventions
लेखकाविषयी/पुस्तकाविषयी दोन शब्द
ही कथा आहे त्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञाची ज्यांनी त्या काळात भौतिकशास्त्रात जागतिक नोबेल पारितोषिक जिंकलं होतं जेंव्हा भारत इंग्रजांच्या ताब्यात होता, ब्रिटिशांचा गुलाम होता. ही पुस्तक आपल्याला सर सी.व्ही.रमण यांच्या आयुष्याची कथा सांगते की कसं एक प्रतिभावंत, कुशाग्र, हुशार बुद्धीच्या मुलाने मोठं होऊन भारताच्या वैज्ञानिक क्रांतीचा पाया रचला.
ही पुस्तक कोणी वाचली पाहिजे?
सर सी. व्ही. रमण यांच्या जीवन कथेची ही पुस्तक प्रत्येक व्यक्तीला जरूर वाचायला पाहिजे जो विज्ञानामध्ये रूची ठेवतो आणि विज्ञानासाठी ज्यांच्या मनामध्ये खूप आवड आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरणार नाही आणि कधीही विसरले जावू शकत नाही.
त्यांच्या भौतिकशास्त्राातील अमूल्य योगदानामुळे भारताचे नांव संपूर्ण जगामध्ये गाजले, भारताला एक वेगळी ओळख मिळाली.
यासोबतच ज्यांना भारताच्या अशा महान महापुरूषांविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे अशा प्रत्येक भारतीयालादेखिल ही पुस्तक वाचायला पाहिजे.
Dr. C V Raman डॉ. सी. व्ही. रमण
पुर्ण नांव : चंद्रशेखर वेंकट रमण
जन्म : ७ नोव्हेंबर १८८८;
जन्म ठिकाण : तिरुचिरापल्ली
शिक्षणः चेन्नई
मृत्यू : २१ नोव्हेंबर १९७०
गौरव सन्मानः
नाईट बॅचलर Knight Bachelor (1929)
नोबेल पारितोषिक Nobel Prize in Physics (1930)
भारतरत्न Bharat Ratna (1954)
लेनिन पीस पारितोषिक Lenin Peace Prize (1957)
शेकडो-हजारों वर्षांपासून आपला देश ‘’द गोल्डन बर्ड” ‘’सोनेकी चिडिया’’ म्हणजे सोन्याचा पक्षी (सोन्याची खाण जिथून सोन्याचा धूर निघतो..!) म्हणून ओळखला जातो.
आपल्या भारत देशाची भूमी खूप सुपीक आणि समृद्ध आहे आणि इथे नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे या भूमीने अशा अनेक महापुरुषांना जन्म दिला आहे, ज्यांनी आपल्या ज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या नकाशावर आपली अमिट छाप उमटवली आहे.
आपल्या या देशात अनेक महापुरुषांचा जन्म झाला, ज्यांची प्रतिभा आणि ज्ञान जगाने ओळखले आहे. या महान दिग्गजांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या भारत देशाचे नाव गाजवले आहे. आणि यामुळेच टॅलेंटची किंवा प्रतिभेची कोणतीही कमी नसलेला देश म्हणून आज जगाच्या नकाशावर आपले स्थान आहे. भारताने आपली प्रतिभा सर्वत्र सिद्ध केली आहे, मग ते गणित, विज्ञान, तंत्राज्ञान असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य असतानाही आपण कोणापासून मागासलेले नव्हतो.
आई-वडिल आणि बालपण
मित्रांनो, आज आपण अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जे पहिले आशियाई भारतीय होते, ज्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाला आहण. होय! आपण सर सि. व्ही. रमन यांच्याबद्दल बोलत आहोत. चंद्रशेखर वेंकट रमन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 साली एका तामिळ हिंदू कुटुंबात तिरुचिरापल्ली जवळील कावेरी नदीच्या काठी एका छोट्या गावात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर आणि आईचे नाव पार्वती अम्मल होते. वेंकट रमन हे त्यांच्या आठ भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या काळातील प्रथेप्रमाणे, जेव्हा मूल जन्माला येत असे तेव्हा मुलाच्या नावापुढे वडिलांचे नाव जोडले जायचे, त्यामुळे त्यांना चंद्रशेखर व्यंकट रमन हे नाव पडले.
त्यांच्या गावी राहणारे बहुतेक लोकं शेती करायचे आणि ते देखील शेतकरी कुटुंबातलेच होते, मात्र, त्यांचे वडील गावातील स्थानिक शाळेत शिक्षक होते. व्यंकटचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे अभ्यासक होते, ते एक उत्तम संगीतप्रेमी देखील होते आणि त्यांना निसर्गावर प्रचंड प्रेम होते. ते अतिशय शांत, गंभीर आणि कष्टाळू व्यक्ती होते .त्यांची आई पार्वती अम्मल ही पूजा आणि धर्मावर विश्वास ठेवणारी स्त्री होती, जिचे जग फक्त तिच्या कुटुंबाभोवती एकवटले होते.
व्यंकट लहानपणापासूनच अतिशय तेजस्वी आणि कुशाग्र बुद्धीचे होते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या घरी परफेक्ट वातावरण मिळालं, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रतिभेला अथवा टॅलेंटला वाव देण्याची पूर्ण संधी मिळाली म्हणजेच ज्या विलक्षण प्रवासासाठी त्यांचा जन्म झाला, तो त्यांच्या घरातूनच सुरू झाला होता. खूप लवकर त्यांचे आई-वडील आणि जवळच्या लोकांना समजले की वेंकट सामान्य मुलगा नाही.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण
ते तीन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना विशाखापट्टणम म्हणजेच वाईजेग येथे बदली झाल्यामुळे जावं लागलं. व्यंकटच्या वडिलांना त्यांच्या गुणवत्तेमुळे ए. के. व्ही. नरसिंह राव कॉलेज, ज्याला व्हॉल्टेअर हिंदू कॉलेजही म्हटलं जातं, तिथे त्यांना गणित आणि भौतिकशास्त्राच्या फॅकल्टी मध्ये नोकरी मिळाली.
व्यंकट यांनी ‘’सेंट अलॉयसियस’’ येथील ‘’अँग्लो-इंडियन हायस्कूल’’ मध्ये शिक्षण घेतले. त्यांच्या बुद्धीला वस्त-याच्या धारेसारखी धार होती आणि यामुळेच त्यांनी त्यांच्या शाळेतील सगळ्या मुलांच्या अगोदर शालेय शिक्षण पूर्ण केले.
शक्यतो ते देशातील असे पहिलेच विद्यार्थी असतील ज्याने वयाच्या अकराव्या वर्षीच माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्याचप्रमाणे जेव्हा त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तेव्हा ते फक्त तेरा वर्षांचे होते.
त्यांच्या काळातील ते सगळ्यात तरूण विद्यार्थी होते ज्यांना त्यांच्या पात्रतेमुळे शिष्यवृत्ती मिळालेली होती. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी बाकीच्यांच्या आधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण तर पूर्ण केलेच पण संपूर्ण शाळेतही त्यांनी टॉप केलं. मित्रांनो, जसं की आम्ही सुरवातीलाच सांगितलं होतं की, रमन बौद्धिकदृष्ट्या खूप कुशाग्र होते पण त्यांची शारिरिक स्थिती कधीच चांगली नव्हती, ते बऱ्याचदा आजारी पडायचे.
पण आपल्या आजारपणाचा त्यांनी कधीच आपल्या अभ्यासावर परिणाम होवू दिला नाही. रमनला पुस्तकांची खूप आवड होती, त्यांना जे पुस्तक मिळेल ते पुस्तक ते वाचायला बसायचे, याच कारणामुळे त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमात नसलेल्या शालेय पुस्तकांव्यतिरिक्त इतर अनेक पुस्तके वाचली.
त्यांचे वडील, स्वतः महाविद्यालयीन शिक्षक होते, त्यांनी ही गोष्ट चांगलीच ओळखली आणि म्हणून त्यांनी रमनला नेहमीच योग्य पुस्तके निवडण्यास मदत केली. मग हळूहळू वडिलांप्रमाणेच त्यांनाही विज्ञानाची प्रचंड आवड असल्याचे दिसून आले. विज्ञानाची पुस्तके ते अतिशय काळजीपूर्वक वाचायचे आणि त्या विषयात जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचे. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता तेरा वर्षाच्या रमनला महाविद्यालयाची तयारी करायची होती.
त्यांचे वडील जिथे शिकवायचे त्याच कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, जेणेकरून त्यांचा अभ्यास व्यवस्थित होईल. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जेव्हा रमन मोठ्या मुलांसोबत वर्गात बसले तेव्हा त्यांच्याबद्दल वर्गात कुजबुज सुरू झाली, पण रमन त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गप्प बसून राहिले.
मग त्यांचे शिक्षक प्रोफेसर इलियट त्यांना म्हणाले की,"तुम्ही चुकीच्या वर्गात आला आहात का?" यावर रमन म्हणाले, "अजिबात नाही, मी योग्य वर्गात आहे". अशा प्रकारे पहिल्या दिवसापासूनच ते शिक्षकांच्या नजरेत आले.
रमन यांनी ठरवले होते की त्यांना इंग्रजी आणि भौतिकशास्त्रात पदवी घ्यायची आहे. मात्र तरीही त्यांची पुस्तकांची आवड आहे तशी कायम होती. ते जितकं जास्त वाचत गेले तितकं जास्त ज्ञान मिळवण्याची आणि शिकण्याची त्यांची तहान वाढत गेली. आणखी एक गोष्ट होती की रमनने कधीही आपल्या शिक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु ते स्वतः त्यांच्यामुळे प्रभावित झाले होते.
ते त्यांच्या कोर्स बाबतीत कधीच समाधानी नव्हते, त्यांनी अधिक अभ्यास करावा, शिकावे आणि प्रयोग करावेत असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य नाना साहेब यांना रमनच्या क्षमतेची जाणीव होती, त्यामुळे त्यांनी आपल्या कर्तबगार विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे प्रयोग करण्यापासून रोखले नाही किंवा त्यांची अडवणूक केली नाही आणि छोट्या रमनची हीच सवय नंतर त्यांच्या खूप कामाला आली.
1904 मध्ये ते अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी, रमन यांनी मद्रास विद्यापीठातून इंग्रजी आणि विज्ञान विषयात पदवी मिळवली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेप्रमाणेच यावेळीही त्यांनी संपूर्ण कॉलेजमध्ये टॉप केलं होतं. यानंतर रमन यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी एम.ए. करण्याचा निर्णय घेतला, ही एक मोठी गोष्ट होती.
त्यांच्या कामगिरीची (Performance) त्यांच्या प्राध्यापकांना आणि इतर शिक्षकांनाही खात्री होती, त्यामुळे त्यांच्यावर दररोज वर्गात जाण्याचे कोणतेही दडपण नव्हते. त्यामुळे रमन त्यांचा जास्तीत जास्त वेळ प्रयोग करण्यात घालवायचे.
महाविद्यालयीन काळात त्यांच्या प्रतिभेत आणखीनच भर पडली. तेव्हा जे प्रश्न त्यांच्या प्राध्यापकांनाही सोडवता आले नाहीत ते अतिशय अवघड प्रश्न त्यांनी चुटकीसरशी सोडवले. ते जेमतेम अठरा वर्षे वयाचे असताना, एकदा त्यांनी अशीच एक समस्या अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने सोडवून दाखवली, जी समस्या प्रोफेसर सुद्धा सोडवू शकत नव्हते. यामुळे त्यांचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक खूप प्रभावित झाले आणि त्यांनी रमन यांना त्यावर निबंध लिहायला सांगितला.
नंतर हा निबंध ब्रिटीश जर्नल, "फिलॉसॉफी मॅगझिन" मध्ये पाठवण्यात आला आणि अशा प्रकारे रमन यांचा पहिला पेपर "डिफ्रॅक्शन ऑफ लाईट : अन-सिम्मेट्रिकल डिफ्रॅक्शन बाँड ड्यू टू रेक्टॅन्गुलार अपर्चर" (Diffraction of Light - 'Unsymmetrical diffraction bonds due to a Rectangular Aperture) विषयावर प्रकाशित झाला, इतकचं नाही तर त्याच वर्षी त्यांचा आणखी एक शोधनिबंध प्रकाशित झाला जो सर्फेस टेंशन ऑफ लिक्विड्स यावर आधारित होता.
लॉर्ड रेले (Lord Rayleigh) यांची दृष्टी या पेपरवर पडली आणि त्यांनी रमनला पत्र लिहिले आणि अशा प्रकारे दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला, रेलेला स्वप्नातही वाटले नव्हते की, ते ज्याला प्रोफेसर समजत आहेत, तो फक्त अठरा वर्षांचा मुलगा होता.
उच्च शिक्षणासाठी विदेश दौ-याचा खटाटोप
1907 साली वेंकट रमन यांनी एम. ए. ची पदवी घेतली आणि तीही नेहमीप्रमाणे उच्च गुणांसह. त्यांचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक रिचर्ड लेवेलिन जोन्स (Professor Richard Llewellyn Jones) यांची रमन यांनी भौतिकशास्त्राच्या पुढील अभ्यासासाठी परदेशात जावं अशी इच्छा होती. रमनची स्वतःची देखील हीच इच्छा होती पण नशिबाने त्यांच्यासाठी काही वेगळचं ठरवलं होतं. त्या काळी कोणत्याही कारणास्तव परदेशात गेलेल्या व्यक्तीला एक मेडिकल टेस्ट/ वैद्यकीय चाचणी पास करावी लागत होती आणि रमन यांची देखील मेडिकल टेस्ट केली गेली आणि ज्या डॉक्टरांनी त्यांची टेस्ट केली होती त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, रमन इंग्लंडमधील थंडी सहन करू शकणार नाहीत म्हणून रमन यांना इंग्लंड ला जायची परवानगी मिळाली नाही. आणि मग यामुळे उच्च शिक्षणासाठी रमन परदेशात जाऊ शकले नाहीत पण त्यांनी हिंमत सोडली नाही. सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असं त्यांनी ठरवलं होतं, पण इथेही तीच अडचण होती. परदेशातून आलेल्यांनाच सरकारी नोकरी मिळू शकत होती.
सरकारी नोकरी
त्यांनी कोलकत्ता विद्यापीठातून फाइनेंशियल सिव्हिल सर्व्हिसेस ची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा उत्तीर्ण होणं खूप कठीण होतं आणि यात खूप काट्याची स्पर्धा (Cut Throat Competition) होती. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रमन यांच्याकडे परीक्षेच्या तयारीसाठी फक्त एकच महिना होता. कारण ते भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी परदेशात जाण्याची तयारी करत होते. पण असं असूनही रमन यांनी हार मानली नाही, त्यांनी स्वतः ला असे आव्हान दिले होते की खूप मनापासून अभ्यास करून ते परिक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवतील, पण आणखी एक अडचण अशी होती की त्यांना ज्या विषयांचा अभ्यास करायचा होता ते विषय त्यांच्यासाठी नवीन होते जसे की इतिहास आणि राज्यशास्त्र.
रमन समोर एक मोठे आव्हान होते, पण ते मेहनतीने त्याची तयारी करू लागले आणि शेवटी त्यांची मेहनत फळाला आली. पुन्हा एकदा त्यांनी टॉप करून दाखवले. माणसाने पूर्ण प्रामाणिकपणे कष्ट केले तर काय साध्य होत नाही याचे हे फार मोठे उदाहरण होते.
आणि अशा प्रकारे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी, रमन कलकत्ता येथील भारतीय वित्त सेवे मध्ये (Indian Financial Services) असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले. अर्थात, त्यांना विज्ञानाची खूप आवड होती, पण त्यांनी पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणाने आपले काम केले.
संशोधनासाठी फावल्या वेळेचा सदुपयोग आणि आई. ए. सी. एस (IACS)
त्यांनी मनापासून आपल्या कामात लक्ष द्यायला सुरूवात केली पण असा असताना देखील, विज्ञानाला विसरणं त्यांच्यासाठी कठीण होतं आणि यामुळेच त्यांनी त्यांच्या घरी एक छोटी प्रयोगशाळा बनवली होती जिथे ते त्यांच्या फावल्या वेळेत प्रयोग करायचे.
तसं त्यांचा विज्ञानाचा प्रवास अजून संपला नव्हता. ते कलकत्त्याला असताना, एके दिवशी कामावर ते जात असताना त्यांना आई. ए. सी. एस (IACS) म्हणजे इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स चे एक बोर्ड दिसले. रमनने जवळजवळ त्या ट्रेनमधून उडीच मारली आणि बिल्डिंग मध्ये गेले, जी भारतातील पहिली संशोधन संस्था होती. तिथे त्यांची भेट आशुतोष डे आणि अमृतलाल सरकार यांच्याशी झाली आणि ते तिथले मानद सचिव होते आणि संस्थापक महेंद्रलाल सरकार यांचे पुत्रही होते. IACS चा तो दर्जा आता राहिला नव्हता जो महेंद्रलाल सरकारच्या काळात होता. अशा परिस्थितीत जेव्हा सी. व्ही. रमन यांनी त्यांच्यासमोर तिथे काम करण्याची इच्छ प्रकट केली तेव्हा त्यांनी आनंदाने त्यांना त्यांच्या स्वेच्छेने प्रयोगशाळेत काम करण्याची परवानगी दिली. रमन IACS जवळ घर घेऊन राहू लागले, त्यांच्या घरात एक दरवाजा होता जो थेट IACS च्या प्रयोगशाळेत उघडत होता. IACS त्या काळात कोणतेही नवीन संशोधन किंवा पेपर प्रकाशित करत नव्हते.
म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे तर तिथे नवनवीन संशोधनाची तयारी सुरू होती ज्यासाठी रमन रात्रंदिवस काम करत होते. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केल्यावर, रमन यांना जो काही वेळ मिळायचा मग तो सकाळी असो वा संध्याकाळी किंवा रात्री, तो ते IACS मध्ये घालवत होते. ते त्यांच्या कामात इतके गुंतून की रात्र केव्हा निघून गेली आणि सकाळ उजाडली हेही त्यांना कळत नव्हते.
1907 मध्ये, त्यांचा लेख "न्यूटन रिंग्स इन पोलराईस्ड लाईट (Newton's Rings in Polarised Light)" IACS च्या माध्यमातून 'नेचर' या एका ब्रिटीश जर्नलमध्ये प्रकाशित झाला. आणि मग सी. व्ही. रमन केवळ भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रिय झाले. इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचा एक पेपर परदेशात प्रकाशित झाला तेव्हा भारतातील उदयोन्मुख प्रतिभेची बरीच चर्चा झाली.
IACS ने नंतर 1909 मध्ये कल्टिव्हेशन ऑफ सायन्ससाठी एक बुलेटिन देखील सुरू केले. पण त्यानंतर रमनच्या आयुष्यात आणखी एक टर्निंग पॉइंट आला. रमन सरकारी नोकरीत होते म्हणजेच सरकार त्यांची बदली कुठेही करू शकत होती. त्यामुळे 1909 मध्ये त्यांना ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असलेल्या ब्रह्मदेशातील रंगून शहरात म्हणजेच सध्याच्या म्यानमारमध्ये जाण्याचा आदेश मिळाला.
रमनला त्यांची IACS नोकरी आवडली होती कारण इथे त्यांना स्वतंत्रपणे संशोधन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते आणि त्याच वेळी ते त्यांच्या नोकरीबद्दल एकनिष्ठ होते, आणि त्यामुळे ते आनंदाने म्यानमारला जायला तयार झाले. पण तिथे जाताच त्यांना एक वाईट बातमी मिळाली की त्यांचे वडील गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. यामुळे रमन यांनी सहा महिन्यांची सुट्टी घेतली आणि आपल्या आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी ते भारतात परतले.
पण खंत अशी की त्यांच्या वडिलांना वाचवता आलं नाही. रमन यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता, लहानपणापासून आजपर्यंत त्यांचे वडीलच त्यांना मार्गदर्शन करत होते. रमनच्या डोक्यावरून वडिलांची सावली तर उठलीच, पण एक छतही हिसकावून घेतलं होतं ज्याखाली ते आजपर्यंत स्वत:ला सुरक्षित समजत होते. त्यांचे वडील त्यांचे गुरू होते, त्यांचे सर्वस्व होते.
सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर त्यांची नागपूर, महाराष्ट्र येथे बदली झाली. ही 1910 ची गोष्ट होती. कलककत्त्याप्रमाणेच त्यांनी नागपुरातही स्वत:ची एक छोटी प्रयोगशाळा उभारली. जिथे ते त्यांचा बराचसा वेळ घालवत होते.
सहाय्यक लेखापाल जर्नल म्हणून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना अकाउंटंट जर्नल (लेखापाल जर्नल) म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि यावेळी त्यांची बदली पुन्हा कोलकत्ता येथे झाली, ही 1911 ची गोष्ट होती. आणि रमन पुन्हा एकदा IACS मध्ये पूर्वीप्रमाणे काम करू लागले. IACS हळूहळू लोकप्रिय होत होते. 1915 मध्ये कलकत्ता विद्यापीठाने त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे संशोधन विद्वान पाठवण्यास सुरुवात केली.
पुढील काही वर्षात अलाहाबाद विद्यापीठ, रंगून विद्यापीठ, क्वीन्स कॉलेज इंदोर, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर यांसारख्या इतर विद्यापीठांनीही त्यांच्याकडे संशोधन विद्वान पाठवण्यास सुरुवात केली. सी. व्ही. रमन आता अनेक लोकांच्या नजरेत आले होते, त्यापैकी एक आशुतोष मुखर्जी होते, ज्यांना नेहमी पासूनच सी. व्ही. रमन यांच्या कामात खूप रस होता.
आशुतोष मुखर्जी हे IACS चे कार्यकारी सदस्य आणि कोलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू (व्हाइस चांसलर) होते. 1914 मध्ये त्यांनी रमन यांना भौतिकशास्त्राच्या पालित प्राध्यापकाच्या पदासाठी अर्ज करण्यास सांगितलं. या पदाचा पाया श्री तारकनाथ पालित यांनी 1913 मध्ये घातला.
पण तरीसुद्धा, आशुतोष मुखर्जीना शंका होती की कदाचित रमन ही ऑफर स्वीकारणार नाहीत कारण पगार फक्त 600 रुपये होता आणि रमन तर एक अकाउंटंट म्हणून महिन्याला 1100 रुपये कमवत होते. पण आशुतोष मुखर्जीना आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा रमनने ऑफर ऐकताच नोकरी स्वीकारली आणि राजाबाजार सायन्स कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे पालित प्राध्यापक होण्यासाठी त्यांनी त्यांची नोकरी सोडून देण्याचं मान्य केलं.
वास्तविक राजा बाजार सायन्स कॉलेजची स्थापना कोलकत्ता विद्यापीठानेच केली होती. रमनलाही एक प्रकारे दिलासा मिळाला की आता येथे बदली करावी लागणार नाही. आणि अशा प्रकारे वयाच्या 27 व्या वर्षी ते पूर्णवेळेसाठी कॉलेजचे प्राध्यापक बनले. कोलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे पालित प्राध्यापक म्हणून शिकवत असताना त्यांना दोन प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
यातील पहिली त्यांच्याच कॉलेजची आणि दुसरी IACS ची होती. दरम्यान, IACS साठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या अमृतलाल सरकार यांचे 1919 मध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर, सर सी. व्ही. रमन यांची IACS चे मानद प्राध्यापक आणि सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. IACS मध्ये घालवलेले ते दिवस सी. व्ही. रमनच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होते. आणि हो! कोलकत्ता विद्यापीठाच्या सिनेटमध्ये असे बरेच लोकं होते जे IACS चे सचिव म्हणन सी व्ही रमन यांच्या नियुक्तीच्या विरोधात होते.
याचे एक कारण म्हणजे रमन यांच्याकडे पी.एच.डी. ची पदवी नव्हती, जी फक्त परदेशात जाऊनच मिळवता येत होती. पण परदेशात जाऊन पदवी घेणार नाही, असा विचार रमन यांनी केला होता. हे प्रकरण जास्त वाढू नये म्हणून 1921 मध्ये कोलकाता विद्यापीठाने त्यांची मानद डॉक्टरेट म्हणून नियुक्ती केली.
पालित प्राध्यापक म्हणून ते जेव्हा संशोधन करत होते तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज नव्हती पण सी.व्ही.रामन यांना शिकवण्यातही तितकीच मजा येत होती,
ते म्हणायचे की एखादा विषय समजून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो विषय इतरांना शिकवणे. ते स्वतः खूप चांगले शिक्षक होते. जेव्हा त्यांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे विद्यार्थी त्यांच्या जागेला चिकटून राहायचे.
1921 मध्ये, रमन यांना पहिल्यांदा परदेशात जाण्याची संधी मिळाली जेव्हा ते ब्रिटीश साम्राज्याच्या विद्यापीठांच्या काँग्रेसमध्ये (काँग्रेस ऑफ युनिव्हर्सिटी मध्ये) व्याख्यान देणार होते. जे जे थॉमसन आणि लॉर्ड रदरफोर्ड हे या व्याख्यानाचे यजमान (Host) होते आणि त्यांनी रमन यांचे उत्साहाने मनापासून स्वागत केले.
The Man Who Explained Why The Sea Looks Blue समुद्र निळे का दिसते हे समजावून सांगणारा शास्त्रज्ञ
रमन जहाजावरून परतत असताना समुद्राच्या अद्भुत निळ्या रंगाने त्यांना आश्चर्यचकित केले. लॉर्ड रेले यांनी समुद्राच्या निळ्या रंगाबद्दल आधीच स्पष्ट केले होते. ते म्हणाले होते की,
"समुद्राला स्वतःचा कोणताही रंग नसतो, परंतु आकाशाचा निळा रंग त्यावर प्रतिबिंबित होतोआणि म्हणूनच समुद्राचे पाणी निळे दिसते" पण जेव्हा सी व्ही रमन यांनी स्वतः याची
चाचणी केली तेव्हा त्यांना कळले की आकाशाचे प्रतिबिंब न पडताही समुद्राचा
रंग निळा आहे" आणि त्यांनी हे निरीक्षण नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित
करण्यासाठी पाठवले.
निरीक्षणात त्यांनी लिहिले की समुद्राचा रंग आकाशाच्या परावर्तनामुळे निळा नसून पाण्याच्या रेणूंद्वारे प्रकाशाच्या विवर्तनामुळे (लाईट डिफ्रॅक्शन मुळे) आहे.
पुढे जाण्यापूर्वी आता आपण, विवर्तन/डिफ्रॅक्शन म्हणजे काय ते पाहू, तर मित्रांनो, विवर्तन म्हणजे "जेव्हा प्रकाश किंवा ध्वनी लहरीसारखी कोणतीही लहर किंवा वेव अडथळ्यावर आदळते तेव्हा ती वाकते (Bend) होते".
लॉर्ड रेले यांनी स्पष्ट केले होते की, "वातावरणातील वायूच्या अणूद्वारे प्रकाशाचे विवर्तन समुद्राच्या पाण्याला निळा रंग देते" आणि सर सी. व्ही. रमनला लगेच समजले की पाण्याच्या बाबतीतही असेच घडू शकते, परंतु त्यांच्याकडे ते सिद्ध करण्यासाठी कोणताही व्यावहारिक पुरावा नव्हता पण नंतर सात वर्षांनंतर त्यांनी जो शोध लावला तो एक महत्त्वपूर्ण शोध होता.
1924 मध्ये, लॉर्ड रूदरफोर्ड यांच्या शिफारसीनुसार, त्यांना रॉयल सोसायटीचं फेलो बनवण्यात आलं. ही भारतासाठी ही अत्यंत सन्मानाची बाब होती. ते म्हणाले होते की, हा नक्कीच त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
पुढे त्यांना ब्रिटीश इन्स्टिट्यूट फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ने आमंत्रित केले तसेच रमन कॅनडालाही गेले हेाते जेथे त्यांनी लाईट रिॅ्रफक्शन प्रकाश अपवर्तन परिषदेचा अध्यक्ष बनवलं गेलं होतं. तेथून रमन थेट अमेरिकेत गेले आणि तिथे फ्रँकलिन इन्स्टिट्यूटमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करत होते.
त्यानंतर रॉबर्ट मिलिकन यांच्या निमंत्रणावरून ते चार महिने कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेस्ट लेक्चरर या पदावर राहिले. हे पद त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे होते कारण याआधी आइन्स्टाईन आणि सॉमरफिल्ड सारखे महान शास्त्रज्ञ या पदावर राहिले होते. अखेरीस मार्च 1925 मध्ये रमन भारतात परतले.
त्यानंतर ते पुन्हा आपल्या संशोधन कार्यात गुंतले. परत आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधक काम करत होते. त्या दिवसात रमनचे लक्ष फक्त प्रकाशाकडे होते, ते प्रकाशाच्या विखुरण्यावर लक्ष केंद्रित करत होते.
त्यांचा एक विद्यार्थी, रामनाथन, पाण्यात प्रकाश पसरवण्याचा प्रयोग करत असताना त्याला वेगवेगळ्या रंगांचे काही किरण दिसले. मात्र, ते काय आहे हे तेव्हा समजले नाही. दोन वर्षांनंतर, सी.व्ही. रमनचा आणखी एक विद्यार्थी कृष्णन यानेही अशीच गोष्ट पाहिली.
त्यानंतर 1927 मध्ये त्यांच्या आणखी एका विद्यार्थ्यालाही हाच प्रकार पाहायला मिळाला. आता रमनलाही विचार करावा लागला की ही काय गोष्ट आहे. म्हणूनच यासाठी रमन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक्सपरिमेंट कंडिशनला चांगलं बनवण्यास सरुवात केली जेणेकरून त्यांना योग्य परिणाम मिळू शकतील.
अखेर 28 फेब्रुवारी 1928 रोजी सर सी. व्ही. रमन यांनी रमन इफेक्ट शोधला.रमन इफेक्टनुसार, "जेव्हा प्रकाश किरण डिफ्लेक्ट होतो तेव्हा त्याची वेव्हलेन्थ आणि अम्पलीट्यूड बदलते." हा एक महत्त्वाचा शोध होता ज्याला त्यांनी इंडियन फिजिक्स जर्नलच्या दुसऱ्या खंडात प्रकाशित केलं.
ते स्वतः या जर्नलचे संपादक होते. त्यामुळेच आज 28 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो. 1928 मध्ये त्यांना आशा होती की यावेळी त्यांना नक्कीच नोबेल पारितोषिक मिळेल पण त्यांना ते मिळाले नाही.
1929 मध्ये त्यांना पुन्हा वाट पहावी लागली आणि 1930 मध्ये, त्यांना नोबेल पारितोषिक मिळेल याची खात्री होती, म्हणून त्यांनी आधीच विमानाची तिकिटे बुक केली आणि शेवटी त्यांना स्टॉकहोम मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. सी. व्ही. रमन यांना केवळ त्यांच्या रमन इफेक्टसाठीच नव्हे तर त्यांनी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलही नोबेल पारितोषिक देवून गौरवण्यात आले.
दुर्मिळ चलचित्र डॉ.सी.व्ही.रमन यांना नोबेल पारितोषिक साठी स्टॉकहोम येथे आले होते तेंव्हाची काही क्षण-चलचित्रे
साभारः युट्यूब
सर सी. व्ही. रमनला संगीताची खूप आवड होती आणि संगीताच्या आवाजामागील भौतिकशास्त्र / फिजिक्स शोधण्याची त्यांना खूप इच्छा होती. या संदर्भात त्यांनी 1916 ते 1921 या काळात अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले. हा पाया नंतर त्यांचा ऑप्टिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्सचा मूळ सिद्धांत बनला.
तबला आणि मृदंग यांसारख्या भारतीय वाद्यांच्या हार्मोनिक्सचा अभ्यास करणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांनी यांत्रिक व्हायोलिनवरही प्रयोग केले. 1933 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक बनणारे ते पहिले भारतीय नागरिक होते. या संस्थेत ते अथक परिश्रम घेत राहिले आणि त्यानंतर 1948 मध्ये स्वतंत्र भारतात त्यांनी रमन संशोधन संस्थेचा पाया घातला. त्यानंतर ते मरेपर्यंत या संस्थेचे काम करत राहिले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी रमन हे जग सोडून कायमचे निघून गेले.
ज्या रमन संशोधन संस्थेवर त्यांचं इतकं प्रेम होतं, तिथेच त्यांचे शेवटचे क्षण त्यांनी व्यतीत केले आणि संस्थेतच त्यांच्यावर साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत, हीच त्यांची मनापासून इच्छा होती. जिथे त्यांची अंत्यविधी करण्यात आली, तिथे आता चिन्ह म्हणून एक झाड उरले आहे.
भौतिकशास्त्र (फिजिक्स) क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाचे संपूर्ण जगाने कौतुक केले आहे आणि त्यांचे कार्य नेहमी आपल्या स्मरणात राहील. सर सी. व्ही. रमन हे केवळ एक महान शास्त्रज्ञच नव्हते तर ते एक उत्तम शिक्षक आणि अतिशय नम्र व्यक्ती देखील होते.
त्यांनी आपल्या कर्तृत्वाबद्दल कधीही बढाई मारली नाही. परिस्थिती कशीही असो, त्यांनी कधीही हार मानली नाही आणि तक्रारही केली नाही. जेव्हा जेव्हा त्यांना "सर्वात प्रतिष्ठित, प्रसिद्ध आणि यशस्वी भारतीय" म्हणून सन्मानित केलं जातं तेव्हा ते "मी केवळ विज्ञानाचा एक विद्यार्थी आहे" असं नम्रपणे सांगायचे.
विज्ञानाबद्दलची त्यांची आवड आणि समर्पण यांचा काही मेळ नव्हता. त्यांची ही स्टोरी आपल्याला शिकवते की जर एखाद्या व्यक्तीची आवड खरी असेल तर तो त्याचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो.
मित्रांनो, आम्हाला आशा आहे की सर सी. व्ही. रमनची ही कथा विज्ञानाची आवड असलेल्या प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देईल. आजही अनेकजण सर सी. व्ही. रमनला आपल्या मनात ठेवून, त्यांच्या विज्ञानाची आवड जोपासतात.
राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 आणि डॉ. सी. व्ही. रमण
चंद्रशेखर वेंकटरमण (सी. व्ही. रमण C V Raman) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. सी.व्ही. रमण यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.
चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे १९३० सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते. त्यांचे जीवनचरित्र वाचायला आपल्याला नक्कीच आवडेल.
प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग म्हणजेच''रमण परिणाम'' (Raman Effect) या शोधासाठी ते ओळखले जातात.
"जागतिक निरामयतेसाठी वैश्विक विज्ञान" या शीर्षकाअंतर्गत दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ची संकल्पना केली विशद भारत 2023 मध्ये प्रवेश करत असताना, ही संकल्पना जागतिक पटलावरचा भारताचा वाढता दबदबा आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला ठळक वावर दर्शवते - डॉ. जितेंद्र सिंह
#Bharatiya Genius C. V. Raman #भारतीय जीनियस सी.व्ही.रामन #जीवनचरित्र #'रामन इफेक्ट' काय आहे? #विज्ञान दिवस #शास्त्रज्ञ डॉ. सी व्ही रामन #cv raman full name #cv raman place of birth #c.v. raman biography in english pdf #रामन परिणाम माहिती मराठी #cv raman information in English
समुद्र
निळे का दिसते?
x
इतर संबंधितः
सी.वी.रमनः अ बायोग्राफी, लेखकः उमा परमेश्वरम
द लाइफ ऍण्ड टाइम्स ऑफ सी.वी.रमन, लेखक: तेजन कुमान बासु
सर सी.वी.रमन - लेखक: नीरज
बायोग्राफी ऑफ सी.वी.रमन, लेखकः अलेाक कुमार गुप्ता
FAQ (Frequently Asked Questions)
The first National Science Day was celebrated on February 28, 1987. On this day, we remember invention of “Raman Effect” by Indian scientist C V Raman.
Queries Solved
What is the National Science Day of India?
Ans: 28 February.The National Science Day (NSD)is celebrated every year on 28 February to commemorate the discovery of the 'Raman Effect'.
When was first National Science Day celebrated?
Ans:The first National Science Day was celebrated on February 28, 1987
Why is 28th February celebrated as National Science Day?
Ans:The
What is the theme for National Science Day 2023?
Ans: Theme of for National Science Day 2023 “Global Science for Global Wellbeing”
when is international science day celebrated
National Science Day (NSD) Why is it celebrated, facts, significance
#science day in India #national science day celebration in school#science day speech#science day essay in Marathi#science day essay in English #Science day in India 2022 #national science day 2023 theme
International Science Day
World Science Day for Peace and Development
Friday, 10 November, 2023
When is International Science Day celebrated?
Friday, 10 November, 2023
टिप्पण्या
Please feel free to express your valuable comment जीवन पुस्तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥
टिप्पण्या