चाणक्य नीती या पुस्तकातून सांगितलेले काही आयुष्याचे धडे | 📚 Bookshorts #09 | Chanakya Neeti in Marathi

    

     चाणक्य नीती
या पुस्तकातून सांगितलेले काही आयुष्याचे धडे
Life lessons from Chanakya Neeti in Marathi

 📚 Bookshorts #09

चाणक्य नीती या पुस्तकातून सांगितलेले काही आयुष्याचे धडे
Life lessons from Chanakya Neeti in Marathi

#१. प्रमाणिक कर्तव्‍यनिष्‍ठा तपासणे

जर तुम्हाला एक नौकर-कर्मचारी किती प्रमाणिक आहे हे पाहायचं असेल तर, त्याची परीक्षा तो कामावर नसताना घ्या (ऑफ ड्युटीवर) असताना त्‍याला काम सांगून त्‍याची कर्तव्‍यनिष्‍ठा पाहा.  

तुमच्या रिलेटिव्ह म्हणजेच नातेवाईकांना तेव्हा टेस्ट करा, तेव्हा त्यांची परीक्षा घ्या जेव्हा तुम्ही खरोखरच अडचणीत असाल, आणि 

एका मित्राला तुम्ही चिंतीत, समस्‍येत, अडचणीत असताना आणि पत्नीला अशावेळी जेव्हा तुमची सर्व धनसंपत्ती संपलेली असेल अशावेळी खरी परीक्षा घ्‍यायला पाहिजे.

 

#२. खरा रंग

सोनं किती प्युअर, शुद्ध आहे हे पारखायचं अथवा तपासायचं असेल तर सोन्याला घासलं जातं, दगडावर रगडलं जातं,  कट केलं जात, कापून बघितलं जातं, अग्‍नीत तापवलं जातं, आणि तेंव्‍हाच अस्‍सल सोन्‍याचा रंग उजळतो, निखरतो, दिसतो.

यासारखेच एखाद्या व्यक्तीचा अस्‍सल,  वास्‍तविक रंग तेव्हाच कळतो जेव्हा त्याच्यावर एखादी मोठी समस्‍या-अडचण येईल, मोठे संकट येईल तेव्हाच त्‍याचा खरा चेहरा समोर येईल.

 

#३. समजूतदार व्यक्तीने राहणे टाळले पाहिजे

एका समजूतदार व्यक्तीला अशा ठिकाणी राहायला नको पाहिजे, 

      • जिथे कोणालाही कायद्याची भीती नसते, 
      • जिथं सर्वजण बेशरम-निर्लज्‍ज असतात, 
      • ज्यांना लाज नसते, 
      • जिथे कोणीही दान करत नाही आणि 
      • जिथे कलेचा आदर केला जात नाही 
अशा ठिकाणी समजूतदार व्‍यक्‍ती राहणे योग्‍य नाही.

 

#४. मौल्यवान तीनच गोष्टी

काही लोक चक्क दगडांना किमती समजत असतात खरे तर या जगामध्ये तीनच गोष्टी  खूप मौल्यवान आहेत त्यापैकी, एक आहे अन्न दुसरा आहे पाणी आणि तिसरा आहे चांगलं बोलणं. 

      1. एक अन्न
      2. दुसरा पाणी आणि 
      3. तिसरा चांगलं बोलणं

 

#५. तुलना  

पावसाच्या पाण्यासारखं कोणतंही पाणी नसतं,
स्वतःच्या बळासारखं कोणतंही बळ नसतं,
स्वतःची शक्ती, सामर्थ्‍य, ताकद जशी असते तशी,
कोणताही प्रकाश डोळ्यांच्या प्रकाशासारखा नसतो आणि
कोणतीही धनसंपत्ती अन्‍ना एवढी मौल्यवान नसते.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive