कल-आवड-पॅशन शोधण्यासाठी प्रॅक्टिकल पद्धत- #भाग-2 | How to find your Purpose OR Passion in Life -Part #2

 Passion-नैसर्गिक कल-आवड ते दिसते तरी कसे? तुमच्या बाजूने निघून गेला असेल आणि तुम्हाला कळालं सुद्धा नसेल..!

कल-आवड-पॅशन
शोधण्यासाठी

प्रॅक्टिकल पद्धत


कल-आवड-पॅशन
शोधण्यासाठी

प्रॅक्टिकल पद्धत

 कल-आवड #भाग- 2
Passion
#Part- 2

How to find your purpose or passion in life. #सफलता का सूत्र #यशाचा मंत्र #keytosuccess #passion #ikigai #purpose #findyourwhy #startwithwhy #howtofindyourpurpose #howtofindyourpassion #जुणून- Passion उत्कट -आवड जिद्द


कल-आवड P A S S I O N
कल आवड Passion #भाग-2
Passion
#Part -2


जर तुम्ही इंटरनेट वर passion विषयी शोध घेत असाल तर तुम्हाला
#Passion भाग-1 नक्कीच वाचायला पाहिजे नाहीतर ह्या लेखाचं काही अर्थ राहणार नांही. 

पहिल्या भागात आपण पाहिलं की passion टॅलेंट नाहीये, इंटरेस्ट देखील नाही आणि passion पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक पणाने इमानदारीने कामं करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. 

जोपर्यंत आपल्याला काम करताना आणि डोकं खर्च करताना मजा येत नाही तोपर्यंत आपण कधीही आपल्या passion पर्यंत पोहोचू शकत नाही. कारण हा रस्ता/मार्ग लांब आहे आणि प्रामाणिकपणा ची ह्याची मागणीअसते. 

हा रस्ता/मार्ग लांब आहे आणि प्रामाणिकपणा मागतो. 

जर तुम्हालाही तुमचं passion शोधायची इचछा असेल तर मोठा प्रश्न हा आहे की, कामं करतांना आणि मेहनत करताना मजा/आनंद कसा येईल?  ह्या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपल्याला neuroscience नयूरोससान्स चा एक छोटासा भाग समजून घ्यावा लागेल, आणि तो आहे  डोपामीन किंवा dopamine..!

#डोपामीन: आनंदाचा हार्मोन हॅपी हार्मोन्स:

जेंव्हा एखाद्या माणसाला pleasure म्हणजेच आनंद मिळनार आहे असं वाटतं तेंव्हा काही neurons dopamine स्रवत असतात, सोडत असतात. Dopamine मुळे अपल्याला आनंद वाटत नसतो, तो तर अफीमचं (opioids) काम आहे.

 Dopamine चं काम आहे की मेंदूला संदेश सिग्नल देणं की,

"भाऊ तुला आता मजा आली ना, आनंद वाटला आहे ना, तू ह्या हालचालीला लक्षात ठेव आपण ह्या गोष्टीला परत परत, पुनःपुन्हा करूया..!"

ही हालचाल काहीही असू शकते, व्यायाम करणं, कसरत करणं, मग्न होऊन काम करणं, मास्टरबेशन म्हणजेच हस्तमैथुन करणं, सामाजिक माध्यमांवर सोशल मीडियावर आवडीचे, इंटरेस्टिंग गोष्टी पाहणे, स्मोकिंग धूम्रपान करणं इत्यादी वगैरे वगैरे.

परंतू आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची शिल्लक बाकी आहे आणि ती म्हणजे,addiction.


#हुक्की/लत/व्यसन/addiction ची सुरुवात:


मागील काही वर्षांत फेसबुक ची खुपच टर, खिल्ली उडवली गेली आहे, (#delete facebook) ''फेसबुक बंद करा'' सारखे मोहीम (campaign) सुध्दा समोर आले.  बघायला मिळाले,.

जेंव्हा neuroscientist आणि psychologist यांना ही गोष्ट माहीत आहे की लोकं हे फेसबुक आणि सोशल मीडियाची ही उघड चोरी माहीत असतांनासुद्धा लोकं सोडू शकत नाहीत.

Releases extra dopamine.

असं का? कारण, जेंव्हा एखाद्या हालचाली मूळे activity गोष्टीमुळे सूख-आनंद-मजा वाटते जाणवते तेंव्हा मेंदूमध्ये अधिकचा डोपामीन स्त्रावत असतो  releases extra dopamine. तेंव्हा हा मेंदूला सांगतो , की, "हो, भाऊ मजा आली, पुन्हा कर..!"आणि पुन्हा एकदा केल्यानंतर आणखीन जास्त प्रमाणात डोपामीन स्त्रावतो. 

तो मेंदूला परत म्हणतो,  "यार, मजा तर यातच आहे..! पुन्हा एकदा कर .!"

आणि इथेच addiction ची सुरुवात होत असते.


यामुळेच तर एका चेन स्मोकर ला एक सिगारेट पुरेसा नसतो, त्याला एका सिगारेट नंतर आणखीन एक असे  सिगारेट पिण्याची तीव्र ईच्छा होत असते. आणि यासाठीच हे माहीत असतानादेखील की वेळ वाया जात आहे (time waste) आपण YouTube चे shorts, फेसबुकची पोस्ट, tiktok चे व्हिडिओ, इन्स्टाग्रामवर चे reels,  एकानंतर एक स्क्रोल scroll करतच जातो न संपणारे, अनलिमिटेड..!

तर अशावेळी आपल्याला काय करायला पाहिजे?

#सोळा तासांचा नियम 16 Hour Rule

मेंदूला reward बक्षीस शोधण्यासाठी motivate (उद्दीपित stimulate) करणं हे डोपामीन चं काम आहे. म्हणजेच जी गतिविधी ऍक्टिव्हिटी तुम्ही करत आहोत त्यात pleasure सुख आनंद मजा शोधणे. आणि असं करण्यासाठी मेंदूला त्यावर लक्ष केंद्रित focus करावे लागते. 

जर तुम्ही असं करण्यासाठी सकाळीच ऑनलाईन गेम खेळून, chatting करून, पॉर्न बघून, डोपामीन dopamine चा dose घेतला असेल तर दिवसभर तुम्हाला त्यानंतर कशातही मजा, आनंद मिळनार तर नाहीच आणि इतर कोणत्याही गोष्टीत कामात मन सुद्धा लागणार नाही.
मन लावण्याची ईच्छा देखिल होत नाही.

यासाठीच artificial dopamine dose घेऊन सकाळी उठण्याच्या 12 ते 16 तासांपर्यंत दूर राहा.  ह्या सोळा तासांत तुम्हाला इतर गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.

#कामाला खेळात रूपांतर करा (Gamify your work)

डोपामीन चे न्‍यूरोन्स, visual signals वर react करतात.
जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याचे ऑफिस बघितलं तर, तुम्हाला टेबलवर to do list कामाची यादी, charts, आणि colorful daily plan रंगीत दैनंदिन नियोजन डायरीत  लिहिलेलं बघायला मिळेल.

डोपामीन चे न्‍यूरोन्स, visual signals वर react करतात.


जेव्हाही तुम्ही एखादे टास्क complete करता आणि लिहिलेल्या यादीत to do list किंवा कॅलेंडर वर पेन-पेन्सिलीने खोडता, तेंव्हा मेंदूतील reward system आणि डोपामीन neurons activate उद्दीपित होत असतात, जो तुम्हाला पुढं ही ऍक्टिव्हिटी हेच काम, हीच क्रिया, continue, repeat करण्यासाठी सांगत असतो.

तुम्हलाही तुमच्या कामाला किंवा ध्येयाला goal छोटया छोट्या भागात तोडून घ्या आणि प्रत्येक complete task ला highlight करा.
 

👉अधिक मदतीसाठी खालील पुस्‍तक सारांश नक्‍की वाचाः

  • #Atomic Habits
  • #Compound Effect
  • #don't break the chain
  • #goals
  • #eat that frog


#पूर्व नियोजन #Pre-Planning one night before:

एक रात्र अगोदरच आदल्या रात्रीच उद्या करायच्या किमान पाच 5 कामांची यादी बनवून घ्या, लिहून घ्या अशी कामं जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही हालतीत complete करायचीच आहेत, आणि दररोज रात्री ह्या list ला review करायचं आहे.

जेंव्हा आपण रात्री completed list झालेल्या कामांची यादी बघतो, तेंव्हा आपण आपल्या मेंदूला (हे सांगत असतो की) सचेतपणे consciously कामात मजा आनंद शोधण्यास train करत असतो.
 
असं आहे बघा की, इथं आमचा हेतू, तुम्ही स्वतःला दुःख, वेदना देणं किंवा punish शिक्षा करणं हा नसून, खरेतर जो सर्वोत्तम पर्याय आहे best available option आहे त्याला आनंदाने एन्जॉय करणं हा आहे.

केवळ मेहनती आणि आनंदी स्वभावाचे व्यक्तीच आपला passion शोधू शकतात, याची स्पष्टता येण्यासाठी passion वर लिहिलेलं भाग-1 नक्कीच अवश्य वाचा. 

पॅशन

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive