तीन अशा सवयी ज्या तुम्हाला श्रीमंत होऊ देत नाही | 📚 Bookshorts #३६
तीन अशा वाईट सवयी ज्यामुळे तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही अशा सवयी ज्यांच्यामुळे अधिक तर लोकं कधीच रिच म्हणजे श्रीमंत बनत नसतात
3-ब्रूटल मिस्टेक्स
तीन अशा वाईट सवयी ज्यामुळे तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही.!
अशा सवयी ज्यांच्यामुळे अधिक तर लोकं कधीच रिच म्हणजे श्रीमंत बनत नसतात
#1.
स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास न करणे Faith in ability
रिच म्हणजे श्रीमंत लोकांमध्ये स्वतःच्या सामर्थ्याला घेऊन खूप विश्वास असतो त्यांना स्वतःवर खूप आत्मविश्वास असतो की, मी जे काही करीन त्यामध्ये यशस्वी होईलच. आपण कोणत्याही गोष्टीत आपले पूर्ण प्रयत्न तेव्हाच करत असतो जेव्हा आपण त्या गोष्टीच्या सफलतेला घेऊन नि:संदिग्ध असतो. पण जो एफर्ट टाकत नाही, प्रयत्न करत नसतो अशांच्या यशाची शक्यता आणखीनच कमी होऊन जाते ते फेल होतात. म्हणूनच स्वतःवर विश्वाश ठेवून, कौशल्य प्राप्त करा, अभ्यास, सराव करा, ज्ञान घ्या आत्मविश्वास वाढेल.
#2. आयुष्यात कोणताही धोका न पत्करणे Being Safe
एक म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल की, कोणताही निर्णय न घेणं हा सुद्धा एक निर्णयच असतो आणि कोणताही धोका न पत्करणे हे सुद्धा एक प्रकारचा धोकाच असतो. जीवनात श्रीमंत लोकांमध्ये धोका पत्करण्याची भूक जास्त असते.
रिस्क घेण्याची अपेटाइट खूप हाय लेवलवर असते ते ओपन माइंडने इकडे-तिकडे हातपाय मारत असतात. रियल इस्टेट, शेअर मार्केट, क्रिप्टो, बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, अशा विविध क्षेत्रांमध्ये हात मारून चाचपडून बघतात कारण त्यांना माहित असते की जीवनात काही मोठे करायचं असेल तर अशा मार्गावर चालावं लागेल जिथे खूप कमी लोक जाण्याची हिंमत दाखवतात आणि कमी लोकच चालतात.
#RISKOMETER:
Low Risk – Low Profit
Moderate Risk – Medium Profit/ Average Profit
High Risk- High Profit
#RISKOMETER: जसे प्रत्येकाची भूक, चव, आवड, खाण्याची पद्धत वेगवेगळी असते, तशीच आपली धोका पत्करण्याची/पचवण्याची क्षमता/भूक देखल वेगवेगळी असते. गुंतवणुकीसाठी आर्थिक प्रश्नावली सोडवा आणि आपली रिस्क घेण्याची क्षमता तपासा इथून आणि त्यानुसार गुंतवणूक करा.
#3. स्वतःच्या इन्वेस्टिंग वर वर लक्ष न देणे
श्रीमंत लोकं आपल्या कारकिर्दीच्या/वयाच्या सुरुवातीच्या वर्षात आणि खर्चे कमी करून विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण, कौशल्ये, रियल इस्टेट, स्टॉक्स, असे अनेक असेट बिल्ड करण्यासाठी गुंतवणूक करत असतात. आता इथे गुंतवणूक म्हणजे केवळ पैसाच नसून त्याहीपेक्षा महत्वपूर्ण वेळ आहे.
शिक्षण घेतेवेळेस अभ्यास, संशोधन, मेहनत, कौशल्य आत्मसात करणे हेदेखील आपल्या वेळेच्या गुंतवणुकीचे प्रकारच म्हनायला हरकत नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी श्रम, प्रयत्न करून आपण केलेल्या गुंतवणुकीवर नक्कीच परतावा मिळत असतो.
भारताच्या मोठ्या कंपन्या जसे रीलायंस, टीसीएस, आयआरटीसी, एसबीआय, एलआसी, आयटीसी किंवा अंतरराष्ट्रीय कंपन्या फेसबुक-मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल-अल्फाबेट आणि ॲपल, ट्विटर-एक्स, नेटफ्लिक्स
सारख्या कंपन्यांचे प्रॉडक्ट आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो म्हणून तुम्ही अशा
कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून त्यांचा एक भाग बनू शकता. म्युचुअल फंड, एसायपी, स्टोक्स यांद्वारे गुंतवणूक सुरु करा.
#हेही वाचा: वाईट सवयी सोडून नव्या चांगल्या सवयी कशा बनवाव्या- Atomic Habits
#हेही वाचा: टाळाटाळ करणे, कामात चालढकल, दिरंगाई, उद्या करेन कसे टाळावे-Now Habits


टिप्पण्या