" यशाचे फॉर्मुले"
काहीही झाले तरी आपला यशाचा
मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली,
पाय ओढले, थट्टा मस्करी केली,
अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या
कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा.
"यशाचे फॉर्मुले..!"
१) तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचयं, काय व्हायचयं, कुठे पोहचायचय, काय मिळवायचंय हे आज,
आत्ता, ताबडतोब ठरवा...
२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी
लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या
अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना
भेटा. त्या गोष्टी मिळवा.
3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा.
शेंडी
तुटो वा पारंबी..ध्येय गाठायचे
म्हणजे गाठायचे !!
4) कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा.
5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही.
6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा.
तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच
तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात.
आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण
शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे
पुढारी, नेते, वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.
7) कोणाची जातपात पाहू नका.
कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण
मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार
चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य
जवळ ठेवा.
9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने
विचार करा
१. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
२. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
३. हे असच का ?
या तीन
बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा
फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.
10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल
*वैयक्तिक जीवनात कसे
वागावे ??
१) सकाळी
सुर्योदयापुर्वी उठावे..
२) रोज
थोडा का होईना व्यायाम करणे
३) अंघोळ
शक्यतो थंड पाण्याने करणे
४)
ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घेणे.
उदा. महामानव, आईवडील इत्यादी .
५) नाष्टा, जेवण घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खाणे.
६)
प्रसन्न मनाने घराबाहेर पडावे. प्रसन्न मनानेच काम करावे
७) सहकारी
व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागावे
८) गाडी
चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा
वापर करू नये. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घालावे
९) फेसबुक, WhatsApp, यांचा मर्यादित वापर करावा. फायद्यासाठी वापर करावा
.
१०) आई
वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नये.
११)
कोणतेही व्यसन नसावे. असेल तर सोडावे आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नये.
१२) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर ,अभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे
१३) टी.व्ही. व चिञपटात चांगले ते पहावे.
१४)
कोणाशी कोणताही वाद घालू नये. पटत नसेल तर सोडून द्यावे पण फालतू वेळ घालवू नये
१५)
शक्यतो मांसाहार टाळावे, घरची भाजी भाकरी अमृत
आहे.
१६)
आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करावा.
१७) शक्य
झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार करावा.
१९)
झोपताना लवकर झोपावे. लवकर उठावे.
२०) वाईट
गोष्टी टाळाव्यात. चांगल्या स्विकाराव्यात.
"ध्येयाचा
ध्यास असेल तर कामाचा ञास वाटत नाही "
🎯ध्येयसिध्दी
पटले तर कृती करा....आणि दररोज स्वतःला सांगा की "मी माझे ध्येय साध्य करणारचं!"
वाचत राहा, शिकत राहा, समृद्ध होत राहा.
#Bookshorts
📚📙📘📗📕📖
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
#लक्षात
ठेवा:
वाचन-लेखन-मनन-चिंतन-आकलन
समजणे-उमजणे-उपोयोजन-ज्ञान-वाटणे-देणे
वाढते-दृढ होते-टिकते
#selfhelp #Selfimprovement #selfdevelopment #personality डेव्हलपमेंट #स्वसुधार, #स्वाविकास, #व्यक्तिमत्त्व विकास, #मनोविकास #सायकॉलॉजी #आधुनिक संभाषण कौशल्य #backtobasics #Bodylanguage #advanceskills #soft #peopleskills
THINK BEFORE YOU SPEAK.
READ BEFORE YOU THINK.
बोलण्या
अगोदर विचार करा.
विचार करण्याअगोदर वाचन करा.
| 📚 #बुकशॉर्ट्स
| ☯️ ई-वाचनालय
| 🌐 www.evachnalay.in
दिसामाजी कांही तरी तें लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥
Khup motivation bhetla ayushat lazy pana mule kahi karta yet navt pn inspired zale
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक, ई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. अमूल्य टिप्पणीमुळे आमचा उत्साह वाढतो.
हटवाआयुष्यात बदल घडविण्यासाठी आपण स्वतःला समजून घेत आहात, स्वतःला जाणून घेण्याच्या प्रयत्नात वाचनाला निवडलात याबददल आपले अभिनंदन. आपण स्वयंमदत, स्वयंविकास करण्यासाठीच्या मार्गावर आहात यावरून दिसून येते.
आपल्या सवयी, टाळाटाळ करणे टाळा, दृष्टीकोन, मेंदू चे नियम असे उत्कृष्ठ स्वयंमदत म्हणजेच Self Help पुस्तकांचे सारांश वाचा. तुम्हाला नक्कीच आवडतील.
ई-वाचनालय वरील इतर लोकप्रिय पुस्तक सारांश अवश्य वाचा. कृपया वाचनाची आवड जपा. भेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.