मनाचे व्यवस्थापन Mind Management | #BookReview 📚 बुकशॉर्टस्,

मन हे एक अत्यंत गूढ असं एक कोडं. प्रत्येकाला शोध असतो तो अनाकलनीय मनाचा.  हे पुस्तकं 'मनाचं व्यवस्थापन' शिकवतं, पण मनाचं व्यवस्थापन शिकण्यासाठी मनाला समजून घेतलं पाहिजे, ते कसं काम करतं,त्याचे स्वरूप, त्याचा स्वभाव या सगळ्यागोष्टी या पुस्तकातून समजावल्या आहेतं.

 

मनाचं व्यवस्थापन


📚#बुकशॉर्टस्


📚#बुकशॉर्टस्, (#Book PReview)

  1. व्यवस्थापण कशासाठी?
  2.  मन म्हणजे काय? 
  3. मनावर नियंत्रण कसं मिळवायचं? 
  4. स्वसंमोहन, स्वप्नरंजन म्हणजे काय?
  5.  एकाग्रता, स्मरणशक्ती कशी वाढवायची?
  6.  ध्यान कसं करायचं?
  7.  ध्यानाचे फायदे, तसेच
  8. ध्यान करताना येणाऱ्या अडचणी 
  9. त्या कशा दूर करायच्या?



मन हे एक अत्यंत गूढ असं एक कोडं. प्रत्येकाला शोध असतो तो अनाकलनीय मनाचा. 

  • मन हे आपलं असतं पण त्याचं वागणं आपल्या हातात असतं का? 
  • मनात येणाऱ्या भावना, विचार यांवर आपलं नियंत्रण असतं का? 
  • आपण सुखी किंवा दुःखी का होतो? 
  • आपल्याला आनंद कशामुळे होतो? 
  • कधी कधी आयुष्य खूप आनंदी वाटतं तर कधी सारं काही नकोस वाटतं.
  • अचानक सर्व गोष्टींचा कंटाळा येऊ लागतो. का होत असं? 

'मनाचे व्यवस्थापन' या पुस्तकात लेखकाने मन, मनाचे कार्य, त्याचे स्वरूप समजवण्याचा प्रयत्न केला आहे. मनाशी संबंधित विचार, भावना, क्रिया, प्रतिक्रिया या संबंधित विचार मांडले आहेत. 





हे पुस्तकं 'मनाचं व्यवस्थापण' शिकवतं, पण मनाचं व्यवस्थापन शिकण्यासाठी मनाला समजून घेतलं पाहिजे, ते कसं काम करतं,त्याचे स्वरूप, त्याचा स्वभाव या सगळ्यागोष्टी या पुस्तकातून समजावल्या आहेतं.


हे पुस्तकं मनाच्या व्यवस्थापना सोबतच विचारांचं, सवयींचं, समजुतींचं, भीती, निराशा, सुख, दुःख, आनंद, ताण-तणाव अशा सर्वांचं एकूणचं सर्व व्यक्तिमत्वाचं व्यवस्थापन, नियोजन, नियंत्रण शिकवतं. 


मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व विकासाच्या पुस्तकांमधील हे एक फारच उत्तम असं पुस्तकं आहे. हे पुस्तकं केवळ माहिती देण्याचं काम करतं नाही तर माहिती सोबतच मनाचे नियंत्रण, नियोजन, व्यवस्थापन ही शिकवत.


आजच धावपळीचं जीवन, जीवन पद्धती यांमुळे येणारे ताण तणाव, आजारपण, अपयश, नैराश्य, मानसिक विकार अशा असंख्य गोष्टींमुळे जीवनातून आनंदचं निघून गेलेला दिसतो.मानवी जीवन सुखी आणि आनंदी बनवण्यासाठी, शांत, खंबीर, निर्भय मनासाठी, दुःख, काळजी, चिंता, ताणतणाव निवारण्यासाठी हे पुस्तकं वाचायला हवं.


व्यवस्थापण कशासाठी? मन म्हणजे काय? मनावर नियंत्रण कसं मिळवायचं? स्वसंमोहन, स्वप्नरंजन म्हणजे काय? एकाग्रता, स्मरणशक्ती कशी वाढवायची? ध्यान कसं करायचं? ध्यानाचे फायदे, ध्यान करताना येणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या. 


  • आहार, निद्रा, भय, मैथुन : व्यवस्थापण. 
  • सुख, दुःख, आनंद :व्यवस्थापन. 
  • देव,धर्म, श्रद्धा, मन:शांती : व्यवस्थापण. 
  • अहंकार व विकारांचे व्यवस्थापण. 
  • मेंदूची वर्तणूक, अंतर्मन, कसं जगायचं? कसं वागायचं? 
  • असें अनेक विषय या पुस्तकातून लेखकाने मांडले आहेत.


आपल्या सर्वांना जीवनात मार्गदर्शक ठरेलं, जीवन जगताना उपयोगी येईल, मानवी मन आणि आपले जीवन यासंबंधित अनेक प्रश्नांची उत्तर देणार असं हे पुस्तकं प्रत्येकाने वाचायला हवं..!

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive