साद देती हिमशिखरे- पुस्‍तक परिचय मराठी (रामचंद्र जोशी)

जीवनात कोणत्याही प्रकारचा मोह न ठेवता, चिरंतन सुखाच्या मार्गाने माधव हिमालयात जातो. त्याच्या या पूर्ण जीवित प्रवासाची कहाणी साद देती हिमशिखरे या पुस्तकात वाचायला मिळते.  हा ग्रंथ म्हणजे एका मानवाच्या अध्यात्मिक उन्नतीची कथा आहे.

 

साद देती हिमशिखरे  

जी.के.प्रधान 

मराठी अनुवाद

डॉ.रामचंद्र  जोशी 

 

 

Marathi Translation book Review of the book "Towards the silver crest of the himalayas" by the Author G.K.Pradhan 


साद देती हिमशिखरे 

'साद देती हिमशिखरे' हे कै. जी. कें. प्रधान यांच्या " Towards the silver crest of the himalayas" या कादंबरीचा मराठी अनुवाद आहे. अनुवाद डॉ.रामचंद्र ज. जोशी यांनी केला आहे.

माधव हा या कादंबरीचा नायक. कादंबरीची सुरवात त्याला पडलेल्या एका स्वप्नाने होते. स्वप्नात त्याची भेट एका हिमशिखरावर स्वामींसोबत होते. पडलेल्या या विलक्षण स्वप्नाने त्याला एक सुखद अनुभूती येते. 

एक दिवस माधव आपला मित्र रमेश सोबत एक व्याख्यान ऐकायला जातो, स्वप्नात पाहिलेले साधूपुरुष आणि व्याख्यानाला आलेले स्वामीं यांमध्ये फरक आहे हे माधव च्या लक्षात येते. त्यानंतर एक दिवस माधव एका स्टॉल वर जातो तेव्हा त्याचे लक्ष स्टॉल वरील "Mystics Of India" या पुस्तकाकडे जाते. 

मूलतः या विषयाची आवड नसतानाही त्याची ते पुस्तकं विकत घेण्याची इच्छा होते आणि तो ते पुस्तकं विकत घेतो. पुढे वडिलांच्या मित्राच्या घरी व्याख्यानातील स्वामींची माधवशी भेट होते.त्यावेळी त्याचे वडील ही तेथे उपस्थिती असतात. 

आपले वडील आणि स्वामींची ओळखं असल्याच माधवच्या लक्षात येत. स्वामींजीं च्या संभाषणाने माधव भारावून गेला होता. त्याच्या मनात अध्यात्म विषयाची जिज्ञासा निर्माण होते. हे सर्व प्रसंग वाचताना माधव अध्यात्मिक मार्गाकडे आकर्षित होतं चालला आहे हे जाणवतं.

माधव गुढवादाच्या तत्वज्ञानाने भारावून जातो. अध्यात्म आणि गूढवाद यांच्या मुलतत्वांचा शोध घ्यावा असं माधव ला वाटू लागत. त्यामुळे माधव स्वामींच्या सानिध्यात अधीक वेळ येत जातो. त्यांच्याबद्दल माधव च्या मनात आत्मीयता निर्माण होते. 

पुढे स्वामीजींचे गुरुदेव यांच्याशी माधवची रामेश्वर मध्ये भेटू घडून येते. यापुढे माधव हा गुरुदेव आणि स्वामींजींच्या सानिध्यात राहतो, त्यांच्या विचारांने माधव प्रभावित होतो. त्यांच्या तत्वज्ञानातून माधव ला चिरंतन सुखाचा मार्ग सापडतो. स्वप्न पडून सुरु झालेल्या प्रवासाचा शेवट स्वप्नपूर्तीतून होतो.

संसार टाकून परमार्थाची कास धरावी आणि अखेरीस हिमालयाच्या गुहेत जेथे नियतीने आपली जागा राखून ठेवली आहे आणि जी आपल्याला स्वप्नात दिसली होती, तेथे जाऊन परमात्माशी अनुसंधान सादावे अशी ओढ माधव ला लागली होती. 

जीवनात कोणत्याही प्रकारचा मोह न ठेवता, चिरंतन सुखाच्या मार्गाने माधव हिमालयात जातो. त्याच्या या पूर्ण जीवित प्रवासाची कहाणी साद देती हिमशिखरे या पुस्तकात वाचायला मिळते.  हा ग्रंथ म्हणजे एका मानवाच्या अध्यात्मिक उन्नतीची कथा आहे.

अध्यात्मिक मार्गातील, साधना मार्गातील साधकांनी वाचायला हवं असं हे एक उत्तम पुस्तकं आहे. गुरुदेवांनी वेळोवेळी सांगितलेल तत्वज्ञान, अध्यात्मिक ज्ञान, वेगवेगळ्या प्रसंगातून दिलेला संदेश जीवनात आणि साधना मार्गात मार्गदर्शक असा आहे.

एकंदरीत अध्यात्मिक मार्गातील साधकांना, अध्यात्म मार्गाचा शोध घेणाऱ्या शोधकाला आवडेल असं हे पुस्तकं म्हणजेच एक समृद्ध करणारा अनुभव आहे.

 

समाप्‍त

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive