द $ 100 स्टार्टअप : तुमच्या बॉसला निरोप द्या आणि तुमच्या आवडीचं काम करा | The $100 Startup -Marathi

आयुष्‍य समृद्ध करण्‍यासाठी करा कल्‍पकतेने काम

द $ 100 स्टार्टअप
तुमच्या बॉसला निरोप द्या आणि तुमच्या आवडीचं काम करा
क्र‍िस गुलिब्‍यू 

मराठी अनवाुद
जुई नाडकर्णी आणि रतन वैद्य

मराठी पुस्‍तक परिचय


The $100 Startup
Fire Your Boss, Do What You Love and Work Better To Live More 

Chris Guillebeau (Author)
Jui Nadkarni & Ratan Vaidya (Translator)

 

पुस्तक वाचल्यावर जर स्वत:चा उद्योग सुरू करण्याची तुमची तयारी झाली नसेल तर तुम्हाला हे पुस्तक पुन्हा एकदा वाचण्याची गरज आहे.  शून्‍यातून एक (0 to 1) पर्यंतचा सफर सुरू तर करा नक्‍कीच तुम्‍ही पुढचे आकडे वाढवत न्‍याल.  
 
10 पैकी 08 स्‍टार्टअप, नव-उद्योग बंद पडतात, याची कारणे काय हे सर्वांत आधि आपण चाचपडली पाहिजे, परंतू फक्‍त अशी आकडेवारी पाहून जर कोणी सुरूवात करायचीच थांबवत असेल तर एक गोष्‍ट सांगावीशी वाटते तुम्‍ही सुरूवात तर करा, तुमच्‍या कल्‍पनेला, आयडीयाला, मेहनतीची आणि प्रयत्‍नांची जोड जोड दिल्‍यास तुम्‍ही यशस्‍वी स्‍टार्टअप चालवू शकला यात शंका नाही. 
ई-मिथ ही पुस्‍तक आणि द 100 डॉलर स्‍टार्टअप या दोन पुस्‍तकं एकानंतर एक वाचल्‍यास नक्‍कीच तुमच्‍या विचारांमध्‍ये फरक पडेल.  ई-मिथ पुस्‍तकात सांगितल्‍याप्रमाणे नवीन उद्योग सुरू करण्‍यापूर्वी नोकरी न सोडता देखिल स्‍टार्टअप सुरू करता येतो, मग गरज पडलीच तर नोकरी सोडून पूर्णवेळ तुमच्‍या उद्योगाला देता येईल.
आयुष्य बदलण्यासाठी तुमच्या कामाचं स्वरूप बदला कर्जांचे हप्ते भरण्यासाठी, मुलांना उत्तम शाळेत पाठविण्यासाठी आणि वर्षातून एकदा पर्यटन करण्यासाठी तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये नऊ ते पाचची नोकरी पत्करण्याची आता गरज नाही. जीवघेणी स्पर्धा सोडून द्या आणि तुम्हा स्वत:चा उद्योग सुरू करा. 
तो करण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटच्या डिग्रीची किंवा भल्यामोठ्या भांडवलाचीदेखील आवश्यकता नाही. नवीन जीवनपद्धती आचरणात आणण्यासाठी ‘द $ 100 स्टार्टअप’ हिकमती उद्योजकाला मार्गदर्शन करतं.  
आणि आज माहितीयुगात तर प्रचंड संधी भविष्‍यासाठी आहेत, गरज आहे ती फक्‍त डोळसपणे, सकारात्‍मक दृष्‍टीकोनातून पाहण्‍याची आणि निर्णय घेऊन, योग्‍य मार्गदर्शन, नियोजन आणि मेहनतीची जोड देण्‍याची यश निश्चितच तुमच्‍या पदरी पडेल यात शंका नाही.  100 डॉलर स्‍टार्टअप या पुस्‍तकाच्‍या रूपात आपल्‍यालाला योग्‍य मार्गदर्शक  मिळालेला आहे.  गरजू व होतकरू नवोद्योजकांना नेमक्‍या कोणत्‍या वेळी काय करावे, पायरी दर पायरी मार्गदर्शन मिळाले आहे असे म्‍हणता येईल.
या पुस्तकात हे शिकायला मिळेल
  • उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या सामान्य व्यक्ती स्वत:च्या मर्जीनुसार सामर्थ्यशाली आयुष्य कसं उभं करू शकतात?
  • तुम्हाला हवं तेव्हा आणि हवं तिथे स्वत:च्या मर्जीनुसार उत्तम कमाई कशी करता येईल? 
  • आवड आणि उत्पन्न याचा परिपूर्ण समन्वय साधून तुम्हाला प्रिय असलेल्या गोष्टीचं उदरनिर्वाहाच्या साधनात कसं रूपांतर करता येईल? 
  • 100 डॉलर्स किंवा कमी भांडवलामध्ये ज्या पन्नास सामान्य व्यक्तींनी हे साध्य करून दाखवलं त्यांचा मौल्यवान सल्ला प्रत्यक्षात कसा आणावा? 
“विचारांना चालना देणारं, मनोरंजक आणि अत्यंत उत्कंठावर्धक असं हे मार्गदर्शनपर पुस्तक दाखवून देतं की, उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या सामान्य व्यक्ती स्वत:च्या मर्जीनुसार सामर्थ्यशाली आयुष्य कसं उभं करू शकतात?”
        -ग्रेचेन रुबीन, ‘द हॅपीनेस प्रोजेक्ट’ या न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकाचा लेखक
 
पुस्‍तकाविषयीः 

‘द डॉलर 100 स्टार्टअप’ या पुस्तकाच्या मदतीनं दोन हेतू साध्य करता येतील.  ते तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायला प्रेरणा देतं आणि एकदा प्रवास सुरू केल्यावर ते तुम्हाला मार्गक्रमण करण्यासाठी नकाशा पुरवतं.  
 
नवोद्योजकांना या मार्गदर्शनात्मक पुस्तकात क्रिस गुलिब्यू दाखवून देतो की, एखाद्या कल्पनेचं रूपांतर एका यशस्वी उद्योगात करणं हे तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा सोपं असू शकतं... कोणत्या कल्पनांसाठी आपला वेळ द्यावा हा निर्णय मात्र सर्वस्वी तुमचा असतो आणि प्रगतीचं पुढचं पाऊल टाकण्यासाठी दररोज सकाळी आपण नव्या उमेदीने जागं व्हावं यासाठी हे पुस्तक आपल्याला मदत करतं.
 
तुमच्याकडे असलेला पैसा पुरेसा आहे. क्रिस हे इतक्या स्पष्टपणे समजावून सांगतो की, तुमच्याकडे काहीही सबबी उरत नाहीत. उद्योग सुरू करावीशी वाटेल.  या पुस्तकातील कल्पना नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.
 
करिअरच्या जुन्या पर्यायांची दार बंद झाल्यावर खूप भीती वाटणं साहजिक आहे; परंतु क्रिस गुलिब्यूला अशा परिस्थितीतदेखील संधी दिसते. तुम्हाला अत्यंत प्रिय असलेल्या गोष्टींमधून करिअर बनविणं हे स्वप्नवत वाटेल; परंतु या साध्यासरळ, मनोरंजक पुस्तकातून तो दाखवून देतो की, प्रत्येकवेळी एक साधंसं पाऊल उचलून ते कसं साकार करता येतं.  
 
नवोद्योजकांना ज्याची आवश्यकता आहे अगदी तेच हे पुस्तक देऊ करतं, अगदी मर्यादित भांडवलामध्ये नवीन उद्योग कसा सुरू करावा याचा पारखून घेतलेला अत्यंत प्रभावी व व्यवहारचतुर सल्ला या पुस्‍तकातून लेखकांनी दिलेला आहे. 
 
लेखकांनी गुलिब्यूने वर्षानुवर्षे उद्योग चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्यानं व इतर अनेकांनी आपल्याला आवडत असलेल्या कामाचं रूपांतर नफयामध्ये कसं केलं याबाबत तपशीलवार मार्गदर्शन त्यानं या पुस्तकामध्ये केलं आहे. स्वयंपूर्ण उद्योजकांसाठी हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.  
 
हे पुस्तक ‘कसे साध्य करावे’ यापेक्षा अधिक मार्गदर्शन करतं, ते ‘या व्यक्तींनी हे कसे साध्य केले’ या प्रकारचं मार्गदर्शन करतं. नवीन उद्योग सुरू करणा-या प्रत्येकाला ते या गोष्टीची जाणीव करून देतं की, त्यांना यासाठी खूप मोठ्या भांडवलाची आवश्यकता नाही. 
 
 
लेखकांविषयीः
 
क्रिस गुलिब्यू हा एक लेखक, उद्योजक व जगप्रवासी आहे.  ऑनलाइन प्रकाशन ते पश्चिम आफ्रिकेमध्ये केलेलं स्वयंसेवकाचं काम अशा विविध उपक्रमांतून काम करत असताना त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच पृथ्वीवरील प्रत्येक देशाला भेट दिली आहे. त्याने ‘वर्ल्ड डॉमिनेशन समिट’ या सृजनशील व्यक्तींसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय मेळाव्याचं यजमानपद भूषविलं आहे. 
 
अत्यंत प्रेरणादायी व व्यवहारचतुर असा सल्ला देऊन क्रिस प्रत्येकाला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देतो. www.chrisguillebeau.com या त्याच्या मुख्य संकेतस्‍थळाला दरमहा सुमारे तीन लक्ष लोक भेट देतात.
 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive