झिरो टू वन -पीटर थील | Zero to One by Peter Thiel (Marathi)


आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही, पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्च इंजिन बनवणार नाहीत.  जर तुम्‍ही या लोकांची नक्‍कल करत असाल, तर त्‍यांच्‍याकडून काहीच शिकला नाहीत, असं म्‍हणावं लागेल.

 झिरो टू वन
पीटर थील

मराठी अनुवाद
सुश्रुत कुलकर्णी

मराठी पुस्‍तक परिचय 

Book Review of bestseller Zero to One

by Peter Thiel (Marathi Edition)
 📗📘📙📕📖

एलॉन मस्क, जे जगविख्‍यात कंपनी स्पेस एक्स आणि टेसला यांचे सी.इ.ओ. आहेत ते म्‍हणतात, 

पीटर थील यांनी आजवर अनेक यशस्वी कंपन्यांची स्थापना केलेली आहे. अशा कंपन्या  स्थापन कशा कराव्यात, हे शून्‍य ते एक अर्थातच झिरो टू वन हे पुस्‍तक दाखवतं.

                        -एलॉन मस्क

जगामध्ये अनेक मौलिक आणि नव्या गोष्टी कशा तयार कराव्या, याबद्दल हे पुस्तक संपूर्णतः नव्या आणि अनोख्या कल्पना पुरवतं.

                -मार्क झुकरबर्ग, फेसबुकचे सी.इ.ओ.

जेव्हा एखादी धोका पत्करणारी व्यक्ती पुस्तक लिहिते, तेव्हा ते वाचा. पीटर थील यांचं पुस्तक तर दोनदा वाचा आणि तुम्हाला अजिबात धोका पत्करायचा नसेल तर ते तीनदा वाचा. हे एक अभिजात पुस्तक आहे.

                -नसीम निकोलस तलेब, द ब्लॅक स्वान या पुस्तकाचे लेखक.

एखादी नवी गोष्‍ट करताना शून्‍यातून विचार करावा लागतो (0 to 1) म्‍हणजेच शून्‍यातून एक कडे असा प्रवास करावा लागतो, याला लेखक "उभ्‍या दिशेने" प्रगती करणे (vertical progress) असे म्‍हणतात.  अशी उभ्‍या दिशेने होणारी प्रगतीची कल्‍पना करणं अवघड असतं कारण त्‍यासाठी याआधी कुणी केल्‍या नाहीत अशा गोष्‍टी कराव्‍या लागतात. 

  

तर या उलट आज आपण सर्वत्र पाहात आहोत ती परंपरागत गोष्‍टींची नक्‍कल करणे याला लेखक ''सरळ दिशेने प्रगती'' (horizontal progress) असे म्‍हणतात.  एकच गोष्‍ट जी एका ठिकाणी चांगल्‍या रितीने चालते, काम करते तशीच, त्‍यासारखीच गोष्‍ट इतरत्र घेऊन जाणे, सुरू करणे, नक्‍कल करणे, बनवणे व चालवणे, यालाच आडव्‍या दिशेची प्रगती म्‍हटलेलं आहे, ''जागतिकीकरण'' म्‍हटलेलं आहे.

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी उत्‍तम मार्गदर्शन या पुस्‍तकातून केलेला आहे.  उद्योग जगात पहिले पाऊल ठेवू पाहणा-या प्रत्‍येकाने आणि बहुतांश युवकांनी व महत्‍वकांक्षी लोकांनी या पुस्‍तकाचा उपयोग स्‍वतःसाठी करून घ्‍यावा असे लेखक सुचवतात.
 

आज कोणीच घडवत नसलेली मौल्‍यवान कंपनी कोणती?

आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही, पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्च इंजिन बनवणार नाहीत.  जर तुम्‍ही या लोकांची नक्‍कल करत असाल, तर त्‍यांच्‍याकडून काहीच शिकला नाहीत, असं म्‍हणावं लागेल. 

एखादी गोष्‍टी नव्‍याने बनवण्‍यापेक्षा तिची नक्‍कल करणं नेहमीच सोपं असतं.  आपल्‍याला जे आधीच ठाऊक आहे ते जगाला केवळ शून्‍याकडून अनंताकडे घेऊन जातं, म्‍हणजेच परिचित असणा-या सा-या गोष्‍टीत थोडीशीच सुधारणा होते.  मात्र प्रत्‍येक नवी निर्मिती जगाला शून्‍याकडून एक कडे म्‍हणजेच एका नव्‍या टप्‍प्‍याकडे घेऊन जाते.  हे पुस्‍तक तिथं कसं पोहचावं याबद्दलच आहे. 

लेखक या पुस्‍तकात असे म्‍हणतात की, 

शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी काही विशिष्‍ट विषयात, कौशल्‍यात अगदी निःपुण, कुशल असतात, पण बाहेरच्‍या वास्‍तवातल्‍या मोठ्या जगात या कौशल्‍यांचा कसा उपयोग करायचा ते त्‍यांना ठाऊक नसतं.  

शिक्षणातल्‍या चाकोरीबद्ध चौकटीतून बाहेर पडून आपल्‍या पुढच्‍या मोठ्या भविष्‍याकडे कसं पाहायचं हे या पुस्‍तकातून लेखक इच्छूक नवोद्योजकांना स्‍पष्‍टपणे आणि विस्‍तृतपणे समजावून देतात. 

  • पुस्‍तकः झिरो टू वन 
  • लेखक: पीटर थील 
  • अनुवाद: सुश्रुत कुलकर्णी 
  • प्रकाशन: मधुश्री पब्लिकेशन 

 📗📘📙समाप्‍त 📕📖

 

इतर संबंधितः 

 

zero to one marathi book pdf zero to one book in hindi pdf free download you can win in marathi zero to one book the miracle morning book in marathi jeet aapki in marathi

 


 

वाचत राहा, शिकत राहा, समृद्ध होत राहा.

#Bookshorts

📚📙📘📗📕📖


आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

 

 

#लक्षात ठेवा:
वाचन-लेखन-मनन-चिंतन-आकलन
समजणे-उमजणे-उपोयोजन-ज्ञान-वाटणे-देणे
वाढते-दृढ होते-टिकते

 

#selfhelp #Selfimprovement #selfdevelopment #personality डेव्हलपमेंट #स्वसुधार, #स्वाविकास, #व्यक्तिमत्त्व विकास, #मनोविकास #सायकॉलॉजी #आधुनिक संभाषण कौशल्य #backtobasics  #Bodylanguage #advanceskills #soft #peopleskills 

 

THINK BEFORE YOU SPEAK.

READ BEFORE YOU THINK.

 

बोलण्या अगोदर विचार करा. 
विचार करण्याअगोदर वाचन करा.

 

| 📚 #बुकशॉर्ट्स

| ☯️ ई-वाचनालय

| 🌐 www.evachnalay.in

 

दिसामाजी कांही तरी तें लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥

 

#BOOKSHORTS-WHATSAPP CHANNEL


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive