5 एएम क्‍लब - रॉबिन शर्मा | 🕔 Five AM Club by Robin Sharma | 📚 Bookshorts #17

 माणूस हा चुकीचा पुतळाच नाही तर सवयींचा गुलामही असतो

🕔
5 AM Club
by Robin Sharma

📚 Bookshorts #१७

#Five AM Club #Robin Sharma


मित्रांनो फाईव्ह ए.एम. क्लब (5 AM Club) या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळालेली खूपच महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे कोणत्याही सवयीला, रुजवायला, अंगीकरायला आपल्याला 66 दिवस लागतात.

कोणत्याही गोष्टीला सवयीला आपण समर्पणाने-डेडिकेटेडली 66 दिवस सातत्याने अनुसरण केल्यास, फॉलो केल्यास ती नवी सवय आपल्या आयुष्यात नेहमीसाठी म्हणजेच पर्मनंटली आत्मसात बनवली जाते, मेंदूत खालवर रुजवली जाते.

जर तुम्हाला कोणतीही जुनी सवय सोडायची असेल, बदलायची असेल किंवा नवी सवय रुजवायची असेल तर तुम्हाला त्या सवयीसाठी स्वतःला हेतूपूर्वक 66 दिवसापर्यंत सातत्याने पुढं ढकलायला पाहिजे, स्वतःला ''पुश'' केलं पाहिजे, टिकून राहायला पाहिजे.

तर मित्रांनो तुमचा विचार असेल की, मला एखादी नवीन सवय लावायची आहे किंवा एखादी जुनी वाईट सवय सोडायची असेल किंवा जुन्या सवयीला नव्या सवयीने रिप्लेस करायचं असेल बदलायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे,

66 दिवस 66 दिवसापर्यंत तुम्हाला 66 दिवसांचं, शेड्युल-वेळापत्रक बनवायचं आहे, त्‍या सवयीसाठी कामांची यादी बनवायची आहे.  त्यामध्ये दररोज तुम्ही त्या सवयीसाठी जी गोष्ट करणार आहोत ती एक गोष्ट सातत्याने दैनंदिन कामासारखे 66 दिवसांपर्यंत न थांबता दररोज करायचे आहे त्यासाठी यादीवर टीक, नोंद करायचे आहे. 

जेणेकरून आपल्याला काहीतरी मिळवल्याचा आनंद दररोज होत राहील जेणेकरून मेंदू मध्ये ''डोपामाईन'' हे ''हॅपी हॉर्मोन'', रसायन स्‍त्रवेल, आणि सरते शेवटी आपल्या मेंदूला हे कळेल की ही सवय आनंदासाठी आहे म्हणून 66 दिवसानंतर ही सवय आपल्यामध्‍ये नेहमीसाठी आत्‍मसात होइ्रल.

जेणेकरून आपल्याला ती गोष्ट, ते काम, ती सवय, करताना आनंद होईल आणि तेव्हाच तुम्ही यशस्वीरित्या त्या जुन्या सवयीला बदलून नवी सोय आत्मसात कराल. 


अधिक वाचाः 

 


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive