व्यवस्थापन करण्यासाठी पोमोदोरो पद्धत | POMODORO for Time Management | 📚 Bookshorts #21

खरोखरच आपल्याजवळ वेळ नाही? वेळ तर सगळ्यांकडे तेवढेच असते.! अधिकचा वेळ कसा निर्माण करावा?  
 

 वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी
पोमोदोरो पद्धत
 

 📚 Bookshorts #२१

Pomodoro Technique
for Time Management

 

Pomodoro Technique:  How to Manage your Time? OR 

How to Create Time?  | अधिकचा वेळ कसा निर्माण करावा? 

 

आज-काल सर्वजण ही एक गोष्ट सांगत आहेत की

''मी खूप व्यस्त आहे', मला वेळंच पुरे होत नाही. मला वेळच नाही.

कामात म्हणा किंवा समाज माध्यमावर-सोशल मीडियावर पोस्‍टस्, रिल्स, मीम्‍स्, स्‍क्रोल किंवा ट्रोल करण्‍यामध्‍ये किंवा शॉर्टस्, स्‍टोरीज्, ट्वीट्स यांवर वेबसिरीज, व्हिडिओ पाहण्यामध्ये व्यस्त... व्यस्त.... व्यस्त...  कामांमध्ये व्यस्त... व्यस्त... व्यस्त... 

  • अशावेळी काय करायला पाहिजे?
  • वेळ तर सगळ्यांकडे तेवढेच असते. परंतु काय हे खरं आहे?
  • खरोखरच आपल्याजवळ वेळ नाही?
  • किंवा आपल्‍याला हे माहित नाही की, 
  • वेळेचे नियोजन कसे करायला पाहिजे?
  • हाउ टू मॅनेज द टाईम?

कारण, जर आपण पाहिलं तर असं लक्षात येईल की, सर्वांजवळच 24 तास असतात.

यासाठी एक खूपच अमेझिंग-उत्‍कृष्‍ठ, टाईम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे नियोजन करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी एक उत्‍कृष्‍ट आणि यशस्‍वी अशी पद्धत आहे,

स्वतःसाठी, इतरांसाठी, आपल्या कामासाठी, अधिकचा वेळ क्रिएट म्हणजेच तयार करू शकतो निर्माण करू शकतो.! 

आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? वेळ कशी निर्माण करता येते?

या पद्धतीचे नांव आहे ''पोमोदोरो टेक्निक'' ''पॉमोडोरो पद्धत.''

 

'पॉमोडोरो पद्धत''

या पद्धतीमध्ये काय होतं तर, जेंव्हाही तुम्ही एखादं काम घेऊन बसता, ते करण्यासाठी, त्या कामाच्या ठिकाणी जवळील सर्व डिस्ट्रॅक्शन अगोदर हटवा म्हणजे मन विचलित होणार नाही अशा गोष्‍टींना तिथून हटवा, बाजूला सारा.  जसे- हा स्‍मार्ट फोन सायलेंटवर किंवा स्विच ऑफ करून ठेवून द्यायचा आहे किंवा कपाटात ठेवून द्यायचा आहे. 

सर्व बिनाकामांच्या, अनावश्‍यक असलेल्या गोष्टी वस्तू हटवून द्यायचे आहेत. तिथे फक्त आणि फक्त जे आपण काम सध्या करणार आहोत त्यावरच लक्ष केंद्रित करण्यासाठी फक्त तेच काम, त्याच गोष्टी आणि त्याच वस्तू टेबलावर ठेवायचे आहेत. 

आणि करणार आहोत ते काम न थांबता, कोणतेही विचलन न बघता, लक्ष विचलित न होऊ देता 25 मिनिटे सतत हाती घेतलेले काम करायचे आहे मग, पंचवीस मिनिटानंतर पाच मिनिटांचा तुम्हाला ब्रेक-विश्रांती घ्यायची आहे, थांबायचं आहे. पाच मीनिट रिलॅक्स करायचा आहे.

जेव्हा तुम्ही अशी एक सायकल पूर्ण करता तुमचा ''एक पोमोदोरो सायकल'' पूर्ण होत असतो. मग तुम्ही तुमचं काम संपवण्यासाठी टार्गेटची पूर्तता करण्‍याासाठी दिवसातून असे आठ पोमोदोरो सायकल करू शकता.

व्यक्तीनुसार, कामानुसार हे पोमोदोरो सायकल आठ, दहा, बारा, असे असू शकतात.  हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना आपल्या कामासाठी किती वेळ निर्माण/क्रिएट करायचा आहे यावर ठरते.

👉 सविस्‍तर वाचाः पोमोदोरो पद्धत

 

 

हे देखिल वाचाः 

 


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive