खोटे ओळखण्याची पाच लक्षणं | Five sign of a lier | 📚 Bookshorts #५५
खोटे ओळखायच्या पाच लक्षणे
📚 Bookshorts #५५
Five signs that someone lies to you
अशी पाच चिन्ह ज्यांच्या मदतीने तुम्ही अंदाज लावू शकता की कोण तुमच्या सोबत खोटं बोलत आहे
खोटं ओळखण्याची पाच चिन्ह
#१. क्रमांक एक:
डोळ्यांची नजरा-नजर
जर कोणी तुमच्या तुमच्या समोर खोटं बोलत असेल तर पुढील व्यक्ती नक्कीच तुमच्याशी नजरेत नजर मिसळून बोलणार नाही. डोळ्यात डोळे टाकून बोलायचं टाळेल याची दाट शक्यता असते किंवा त्या खोट्याला खरं दाखवण्यासाठी तो खूपच जास्त डोळे मिळवण्याचा, डोळ्यात पाहून बोलण्याचा प्रयत्न करेल जे की अनैसर्गिक वाटेल. आर्टिफिशियल वाटेल.
तुम्हाला मुळात अनैसर्गिक- अन-नॅचरल पॅटर्न निरीक्षण करायचे आहे जे त्यांच्या वागणुकीमध्ये सामान्यपणे तुम्ही कधीही पाहिलेली नसतील कारण जेव्हा व्यक्ती नर्वस म्हणजे अस्वस्थ असतो खोटे बोलत असतो तेव्हाच तो असा वागत असतो. खोटं बोलताना व्यक्ती नर्वस होतो चेहऱ्याचे हावभाव त्याच्या हातांचे, ठिकाण डोळ्यांची नजरा-नजर इत्यादी गोष्टीवर लक्ष दिल्यास नक्कीच तुम्हाला खोटं बोलणाऱ्या व्यक्ती ओळखता येतील.
👉यासाठी तुम्हाला देहबोली म्हणजेच बॉडी लँग्वेज ही पुस्तक नक्कीच वाचायला पाहिजे तुमची मदत होईलच.
#२. क्रमांक दोन:
तुमच्या प्रश्नावर गरजेपेक्षा अधिक माहिती किंवा खूपच छोटी-छोटी उत्तरं देतील
खोटे बोलणारी व्यक्ती तुमच्या प्रश्नांची खूप छोटी छोटी उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील किंवा गरजेपेक्षा अधिक माहिती देत असेल, जितकी तुम्ही विचारली देखील नसेल, विचारही केला नसेल इतकी माहिती देण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्ही त्यांच्या खोटेपणावर, खोटे बोलण्यावर विश्वास करू शकाल. यासाठी ते खोटं पण रेटून बोलतील. बोलण्यासाठी गोल-गोल फिरून गोड-संदिग्ध शब्दांमध्ये आपल्याला बोलतील, फिरवतील.
#३. क्रमांक तीन:
लढा-पळा-गोठवा.!
Triggers Fight-Flight-Freeze auto response of body
खोटं बोलताना बऱ्याच लोकांचा फ्लाईट फ्लाईट फाईट और फ्रिज रिस्पॉन्स ट्रिगर होत असतो ज्यामुळे त्यांचा शरीरामध्ये अचानक हे संप्रेरक हे हार्मोन स्पाईक म्हणजेच स्त्राव रक्तामध्ये स्त्रवतो ज्याला शांत करण्यासाठी ते काही ना काही तरी हरकत (मुव्हमेंट) हालचाल सुरू करत असतात.
Fight - Flight - Freeze
जसे की, आपल्या हाताने चेहऱ्याला हात लावणे, आपल्या हाताची जास्त प्रमाणात हालचाल करणे, जसे की, पेन हलवणे, चेहऱ्याला हात लावणे, कानाला, नाकाला, केसांना हात लावणे, पाय हलवणे, नाका तोंडावर हात नेणे लपवणे इत्यादी.
#हेही वाचा: होर्मोन्स/संप्रेरके काय असतात?
#४. क्रमांक चार:
बोलताना अडखळतात/बोबडी वळते
खोटं बोलताना अधिकांश व्यक्ती स्वतःला घेऊन खूप कॉन्शियस होऊन जातात म्हणून ते त्यांच्या बोलण्यावर त्यांचा नियंत्रण सुटतो आणि बोलताना अडखळतात, बोबडी वळते. असेही होऊ शकते की त्यांच्या आवाजाची टोनसुद्धा सामान्यपेक्षा/नेहमीपेक्षा आवाज उच्च असेल (high pitch) येत असेल आणि त्यांचा (ब्रिथिंग पॅटर्न सुद्धा अनस्टेबल) अस्थिर होऊन गेलेला दिसतो म्हणजेच त्यांच्या श्वासोच्छवासात श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल तुम्हाला झालेला दिसून येईल.
#५. क्रमांक पाच:
कारण नसतानाही खोटे बोलणे
काही लोकांना खोटं बोलायची इतकी सवय असते की ते लहान सहान गोष्टींवर सुद्धा खोटं बोलायला लागतात, जिथे गरजच नसते. जर कोणी व्यक्ती तुमच्यासमोर मित्रांशी खोटं बोलत असेल तर याची दाट शक्यता आहे की तो कधी ना कधी तुमच्याशी देखील खोटं बोलायला मागेपुढे पाहणार नाही. तुम्हालाही खोटं बोलेल.
**बोनस**
#६. क्रमांक सहा:
डोळ्यांची स्थिती डावीकडे का उजवीकडे? जर व्यक्ती बोलताना डोळे डाव्या बाजूला नेत असेल तर ती व्यक्ती खरं बोलत असते आणि जर बोलताना डोळे उजवीकडे नेत असेल तर ती खोटं बोलत असते. डायरेक्शन ऑफ आयबॉल्स लेफ्ट ऑर राईट, एन. एल. पी. सायन्स (NLP Science)
डोळे डाव्या बाजूकडे - retrieve म्हणजेच आठवत असेल recalling पुनर्प्राप्ती आठवणे 🤔
डोळे उजव्या बाजूकडे-create बनवणे, मनघडत कथा तयार करणे, कल्पना, रचना करणे निर्माण करणे Imagination
👀 डोळे डाव्या बाजूला म्हणजे खरं
👀 डोळे उजव्या बाजूला म्हणजे खोटं.
फक्त डोळे पाहूनही तुम्ही कोणाचेही खोटे बोलणे पकडू शकता. समजा तुम्ही एकाद्याशी बोलत आहात आणि बोलताना त्याचे डोळे डाव्या बाजूला जात असतील, वारंवार जात असतील तर तो खरं बोलत आहे आणि जर उजवीकडे राइट साइड कडे डोळे वारंवार जात असतील तर तो काहीतरी क्रिएट करत आहे असं होऊ शकते की तो खोटं बोलत असेल.
मेंदूचा डाव्या बाजूचा भाग स्मृती-मेमरीचा असतो रिकॉलचा असतो. तुम्हाला जर विचारले कि काल काय खाल्लं होतं? तर तुम्हाला ते आठवावे लागेल, तपशील घेण्यासाठी तुम्हाला आठवण्यासाठी डाव्या बाजूचा मेंदू उपयोगात येईल जिथे आपली मेमरी-स्मृती असते, सर्व गोष्टी साठवलेल्या असतात.
इथं तुम्हाला अजून एक बोनस टीप देत आहोत नक्कीच निरीक्षण करा परीक्षण करा. आजमावून पहा हि ट्रिक तुमच्या कामाला येईलच.
एखाद्या व्यक्तीला तो खोटं बोलत आहे किंवा खरं बोलत आहे हे ही पडताळून पाहण्यासाठी तुम्ही त्याच्या डोळ्यांवर लक्ष ठेवा. डोळे जर डाव्या बाजूला वरच्या दिशेने जात असतील तर तो खरं बोलत आहे याची दाट शक्यता असते कारण तो काहीतरी आठवण करून बोलत असतो कारण आपल्या मेंदूमध्ये मेमरी म्हणजेच स्मृती म्हणजेच माहिती साठवणूक करण्याचा क्षेत्र मेंदूच्या डाव्या बाजूकडे असतो आणि जर त्याला तुम्ही एखादा प्रश्न विचारल्यावर तो तुम्हाला त्याच्या डोळ्यांना उजवीकडे घेऊन जात असेल तर तो त्याच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये काहीतरी शिजवत (.!) असतो, म्हणजेच कल्पना करत असतो म्हणजेच आपल्या मेंदूच्या उजव्या भागामध्ये इमॅजिनेशन म्हणजेच कल्पनेचा भाग उद्दीपित होत असतो.
नैसर्गिकरित्या आपले डोळे तिकडे जातात म्हणजेच काहीतरी खिचडी शिजवून आपल्याला बोलायचा प्रयत्न केला जात असतो. समजा उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना विचारल्यास तुमच्याकडे शंभर कोटी रुपये आले तर तुम्ही काय कराल?
तुम्ही आजमावून पाहा त्यांचे डोळे नक्कीच उजवीकडे जातील म्हणजेच राईट ब्रेन उजवीकडे जाईल कारण त्याला शंभर कोटी रुपये मिळाल्यावर तो काय करेल यासाठी त्याला कल्पनाच करावी लागेल, स्वप्नामध्ये सुद्धा त्याने विचार केला नसेल यासाठी त्याला मेंदूमधून कल्पनेचीच मदत मिळेल. कारण त्याच्याकडे काही मेंदूमध्ये डाव्या बाजूला डेटा स्टोअर नसेल, माहिती साठवलेली नसेल.
अत्यंत उत्कृष्ट अशी पुस्तक आहे एन एल पी सायन्स या युक्तीला वापरून खोटं पकडू शकता
यासाठी याला एन एल पी सायन्स (न्युरोलिंगविस्तिक प्रोग्रामिंग सायन्स) असे म्हणतात नक्कीच ही पुस्तक सुद्धा तुम्हाला वाचायला पाहिजे खालील लिंक द्वारे तुम्ही सारांश वाचू शकता.
#लक्षात ठेवा:
👀 डोळे डाव्या बाजूला म्हणजे खरं
👀 डोळे उजव्या बाजूला म्हणजे खोटं.
###
Khup chan mahiti dili ex dole right site khot left site true
उत्तर द्याहटवाई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
हटवाभेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.
ई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
हटवाभेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.