जिद्द-चिकाटी,आत्मविश्वासाने व आंतरिक दृढ निश्चयाने प्रेरणा देणारी सर्वकालीन उत्कृष्ठ लघुकथा: द ओल्ड मॅन अँड द सी - लेखक - अर्नेस्ट हेमिंग्वे | The Old Man And The Sea (Marathi) | Earnest Hemingway | #BookShorts 📚

एक वयस्कर कोळ्याची कथा, शक्तिशाली निसर्गापुढे गुडघे न टेकता, जिद्द आणि आशा, अजिबात खचून न जाता, आत्मविश्वास, अथक प्रयत्न, संघर्ष-चिकाटी-अनुभआणि सामर्थ्याची, अनंत ऊर्जेने व संयम-धैर्य-धाडसाने व्यापलेली आहे.  जिद्द-चिकाटी, न हारता, प्रत्येक दिवशी संपूर्ण नव्याने, एका मोठ्या आत्मविश्वासाने व आंतरिक दृढ निश्चयाने जीवन नव्याने सुरुवात करणाची प्रेरणा देणारी... आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारी सर्वकालीन उत्कृष्ठ लघुकथा

 

#BookShorts 📚

द ओल्ड मॅन अँड द सी
अर्नेस्ट हेमिंग्वे
अथांग सागर आणि एक वयस्क थकलेला कोळी



The Old Man And The Sea (Marathi)
by the Author
Earnest Hemingway

 
अथांग सागर आणि एक वयस्क थकलेला कोळी
- द ओल्ड मॅन अँड द सी (मराठी) 


The Old Man and the Sea (Marathi):
साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेली लघुकादंबरी 'आशा न करणं मूर्खपणाचं आहे, ते पाप आहे असं त्याचं म्हणणं होतं.' हवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा. हेमिंग्वेची ही उत्कृष्ट कथा आहे एक म्हातारा, एक लहान मुलगा आणि एक महाकाय मासा यांची कहाणी. या कमालीच्या शौर्यकथेने हेमिंग्वेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. निसर्गातील पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल...

ही कथा एका वयस्कर कोळ्याची, सँटियागोची आहे, जो कधीही जिद्द आणि आशा सोडत नाही. ८४ दिवस एकही मासा पकडता आला नसूनही अजिबात खचून न जाता तो तेवढ्याच आत्मविश्वासाने दररोज समुद्रात मच्छिमारीसाठी जातो. समुद्रात खूप आत गेल्यावर त्याला काही माशांचा, खास करून शार्कचा सामना करावा लागतो. माशांच्या आक्रमणाला सँटियागो कसे हाताळतो, तो त्यांच्याशी कसे लढतो याची ही कहाणी आहे. त्याच्या भरपूर वेळच्या अथक प्रयत्नानंतर जेव्हा तो बंदरावर परत येतो, तेव्हा इतर लोकांची प्रतिक्रिया काय असते, त्याच्या छोट्या मित्राची, मॅनोलिनची काय प्रतिक्रिया असते, हे थक्क करणारे आहे. सँटियागो आणि मॅनोलिनच्या मैत्रीची झलकदेखील या पुस्तकात दिसून येते.

  

अर्नेस्ट हेमिंग्वे हा अमेरिकन दर्जेदार कादंबरीकार आणि कथाकार. १९५२ मध्ये द ओल्ड मॅन अँड द सी ही हेमिंग्वे यांची उत्कृष्ट कादंबरी प्रसिद्ध झाली. ती विलक्षण गाजली आणि लोकप्रियही झाली. ह्या कादंबरीला पुलित्झर पारितोषिकासह १९५४ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. पुढे ही कादंबरी जगभर गाजली. 

 

क्यूबाचा एक वयस्क, थकलेला कोळी, सँटियागो आणि एक प्रचंड मर्लिन मासा ह्यांची लढाई ह्या कादंबरीत लेखकाने दर्शवली आहे. सँटियागोचे जीवन हे अनंत ऊर्जेने व धैर्य-धाडसाने व्यापलेले आहे. ८४ दिवसात एकही मोठा मासा गळाला लागलेला नसूनही जिद्द न हारता, प्रत्येक दिवशी संपूर्ण नव्याने, एका मोठ्या आत्मविश्वासाने व आंतरिक दृढ निश्चयाने म्हातारा समुद्रात मच्छिमारीसाठी लाटांवर स्वार होतो. 

 

 

या लघुकादंबरीवर ८० च्या दशकात एक सिनेमादेखील निघाला होता, तो देखील पाहण्यासारखाच आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence- AI) वापर करून आज एक शॉर्ट अनिमेटेड फिल्म देखील पाहण्यात आली ती सुधा पहा.

 
समुद्राच्या खूप आत आत गेल्यावर त्याच्या गळाला विशाल मर्लिन मासा लागतो. म्हातारा मर्लिनशी संघर्ष करतो. आयुष्यभरच्या सर्व अनुभवाने आणि सामर्थ्याने, तो संघर्ष करीत मर्लिनला तो आपल्या होडीला बांधतो. मर्लिन माशाची लांबी ही म्हातार्‍याच्या होडीपेक्षाही लांब असते. परतताना शार्क माशांची नजर होडीला बांधलेल्या मर्लिन माशावर पडते. आता शार्क माशाशी मोठ्या निकराने म्हातार्‍याला लढणे भाग पडते. शार्क मासे, मर्लिनला संपूर्णपणे लचके तोडून गिळंकृत करतात. उरतो फक्त त्या मार्लिन माशाचा डोक्याचा भाग आणि मागील सांगाडा! 

 

जिद्द-चिकाटी,आत्मविश्वासाने व आंतरिक दृढ निश्चयाने प्रेरणा देणारी सर्वकालीन उत्कृष्ठ लघुकथा: द ओल्ड मॅन अँड द सी - लेखक - अर्नेस्ट हेमिंग्वे | The Old Man And The Sea (Marathi) | Earnest Hemingway | #BookShorts 📚

 

निसर्गापुढे हतबल म्हातारा अथक प्रयत्न करून, संघर्ष करून पकडलेला मासा शार्क मासे फस्त करत असताना लचके तोडत असतानाचा आणि समुद्राच्या लाटांचा-पाण्याचा आवाज अंधारात ऐकण्यावाचून पर्याय नसतो. ही शोकांतिका जरी असली तरी नंतर पुढे तो किनारी बंदरावर परत आल्यानंतर, हताश-निराश सँटियागो झोपायला आपल्या झोपडीत जातो. या दरम्यान, त्याच्या बोटीला बांधलेला मर्लिन माशाचा सांगाडा पाहून इतर लोक थक्क होतात. दुसर्‍या दिवशी तो थकलेला म्हातारा सँटियागो, मॅनोलिन सह पुन्हा नव्याने, मोठ्या आत्मविश्वासाने मच्छिमारीस निघतो. 

एक वयस्कर कोळ्याची कथा, जिद्द आणि आशा, अजिबात खचून न जाता, आत्मविश्वास, अथक प्रयत्न, संघर्ष-चिकाटी-अनुभआणि सामर्थ्याची, अनंत ऊर्जेने व संयम-धैर्य-धाडसाने व्यापलेली आहे.  जिद्द, न हारता, प्रत्येक दिवशी संपूर्ण नव्याने, एका मोठ्या आत्मविश्वासाने व आंतरिक दृढ निश्चयाने जीवन नव्याने सुरुवात करणाची प्रेरणा देणारी... आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारी सर्वकालीन उत्कृष्ठ लघुकथा प्रत्येकानं वाचून शिकवण आत्मसात करण्याची उमेद जागृत करेल यात शंका नाही. 



 

 

#हेही वाचा:
127 तास खडक व दरीमध्ये अडकलेल्या माणसाची सत्यकथा

127 Hours between a Rock and a Hard Place

 

ते १२७ तास


#हेही वाचा: 


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

 

जीवनात पुस्‍तकं असतात आपली,
मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानीम्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔


 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 

Two Minute
📖 BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



 

www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive