मनात- मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर - अच्युत गोडबोले
हे पुस्तक अगदी प्रत्येकाने नक्की वाचावं असं आहे. मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण
प्रवास लेखकाने तपशीलात मांडलेला आहे. मनात ही मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर नक्की अनुभवावी अशीच आहे.
मनात
मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर
अच्युत गोडबोले
Manat-Manashastrachi-Utkanthavardhak-Ramya-Safar
मनात -अच्युत गोडबोलेमानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफरमानसशास्त्राची खूप सारी पुस्तक वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक वाचने सोप्पे आहे.
मराठीमध्ये
शास्त्रीय दृष्टीकोनाने "मन" यावरील सर्वसमावेशक, सहज-सोप्या भाषेत
उपलब्ध असलेली पुस्तकं ज्याद्वारे आपल्याला
- मन या विषयाची सखोल माहिती मिळेल,
- ज्ञानात भर पडेल,
- संकल्पना स्पष्ट होतील,
- गुढता नष्ट होईल,
- संदिग्धता राहणार नाही,
- गैरसमज दूर होतील,
- तुम्ही स्वयंविकसित व्हाल,
- तुम्हाला स्व-जाणीव होईल,
- इतरांबद्दल व स्वतःबद्दल मनाच्या शंकांचे निरसन होईल,
- त्यामुळे तुमच्या समस्येचे समाधान मिळेल नव्हे तुम्ही स्वतः तसे करण्यास पुढाकार घ्याल.
- सर्वांनी अवश्य वाचावी अशी पुस्तक.
मनात -अच्युत गोडबोले
मनात या पुस्तकाचे पुस्तक परिचय-सारांश
👉येथून वाचाः
👉येथून वाचाः
मनात अच्युत गोडबोले
🔖📖📗📘📙📑📕
अच्युत गोडबोलेंच मनात
हे पुस्तक अगदी प्रत्येकाने नक्की वाचावं असं आहे. मोठं आहे, जड आहे पण
तरीही उत्कंठावर्धक आहे. मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण
प्रवास लेखकाने तपशीलात मांडलेला आहे. फ्रॉइड पासून एरिक फ्रॉम पर्यंत
अनेक मानसशास्त्रज्ञांची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख ह्या पुस्तकातून
होते.
अनेकदा आपल्याला काही विषयांबद्दल कुतूहल असतं आणि अश्या विषयांची व्याप्ती प्रचंडच असल्याने कुठे सुरुवात करावी हा प्रश्न भेडसावत राहतो. आपसूकच इच्छा असूनही त्या वाटेला जाता येत नाही. मानसशास्त्राबद्दल असं कुतुहूल असणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच एक योग्य सुरुवात ठरेल यात शंका नाही.
अनेकदा आपल्याला काही विषयांबद्दल कुतूहल असतं आणि अश्या विषयांची व्याप्ती प्रचंडच असल्याने कुठे सुरुवात करावी हा प्रश्न भेडसावत राहतो. आपसूकच इच्छा असूनही त्या वाटेला जाता येत नाही. मानसशास्त्राबद्दल असं कुतुहूल असणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच एक योग्य सुरुवात ठरेल यात शंका नाही.
आजकाल आपल्याला एखाद्या पुस्तकातून काय मिळेल हा पहिला प्रश्न पडतो. त्यातून ते ५०० पेक्षा अधिक पानांचं, नॉन फिक्शन प्रकारचं पुस्तक असेल तर तेवढा वेळ खर्च करावा का हा अजून एक प्रश्न. असा प्रश्न पडला असेल तर पुस्तक घेऊन प्रथम त्यातील समारोपाचा भाग वाचावा.
एका दीर्घ
निबंधातून संपूर्ण पुस्तकाची गरज समजायला नक्कीच मदत होईल. त्या नंतर
अखेरचीच काही प्रकरणं वाचून आजच्या मानसशास्त्रातल्या आणि
समाजस्वास्थ्यातल्या अनेक गोष्टींची जाणीव होईल. आणि त्यानंतर तुम्हाला
कुतूहल वाटलंच तर मात्र सुरुवातीपासून हे पुस्तक नक्की वाचा वाचाव.
अनेक
पुस्तकांचे संदर्भ घेऊन, वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करून लेखकाने पुस्तक
परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबर, ह्या ज्ञानशाखेतील
काहीही माहिती नसणाऱ्यांसाठी सुद्धा पुस्तक समजण्यायोग्य राखण्यात लेखकाला
नक्कीच यश आलेलं आहे. ह्याचं संपूर्ण श्रेय अच्युत गोडबोले यांच्या ओघवत्या लेखनशैलीला
जातं. मनात ही मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर नक्की अनुभवावी अशीच आहे.
मानसशास्त्र हा असा
विषय आहे ज्याच्यावर एवढी वर्षे दुर्लक्ष होत होते. पण जसजसा काळ बदलला,
जीवनशैली बदलली तसे याला महत्त्व मिळत गेले. मला मानसशास्त्राविषयी खूपच
ओढ. लोकांच्या नकळत त्यांचे बोलणे, त्यांचे हावभाव यांचे निरीक्षण करत
असतो. एवढं असूनही या विषयावर कधी वाचन केले नाही त्यांच्यासाठी उत्तम पुस्तक आहे.
मनात हे पुस्तक
सामान्य माणसाला मानसशास्त्राची माहिती देण्यासाठी लिहिले गेले.
मानसशास्त्राचे वेगवेगळे पैलू यात मांडले आहेत. भाषा रंजक ठेवण्याचा
लेखकाने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण सुरुवातीच्या काही
प्रकरणानंतर तोचतोचपणा जाणवतो. प्रत्येक प्रकरण एकाच साच्यात घालून तयार
केले आहे असे वाटते.
मधल्या पानांत तर मानसशास्त्र सोडून
मानसशास्त्रज्ञांच्या जीवनाविषयी जास्त पाने खर्च केली आहेत. यामुळे
सुरुवातीला आपले लक्ष वेधून घेणारे हे पुस्तक नंतर नंतर कंटाळवाणे होत आहे असे जरी वाटले तरी असे असूनही या पुस्तकात मानसशास्त्राविषयी प्रचंड माहिती दिली आहे.
जवळपास या विषयाचा संपूर्ण इतिहास संक्षिप्त स्वरूपात मांडला आहे.
ज्यांना मानसशास्त्राची आवड आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच. बाकीच्यांना हे कंटाळवाणे वाटण्याची संभावना आहे. वाचायचं ठरवलंच तर हळूहळू वाचा. कारण यात घेण्यासारखे खूप काही आहे. ’मनात’ मराठीत तर सोडाच पण भारतात लिहिल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही इतका विस्तृत तपशील लालित्यपूर्ण शैलीतून मांडला आहे.
ज्यांना मानसशास्त्राची आवड आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच. बाकीच्यांना हे कंटाळवाणे वाटण्याची संभावना आहे. वाचायचं ठरवलंच तर हळूहळू वाचा. कारण यात घेण्यासारखे खूप काही आहे. ’मनात’ मराठीत तर सोडाच पण भारतात लिहिल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही इतका विस्तृत तपशील लालित्यपूर्ण शैलीतून मांडला आहे.
असंख्य वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडेल अशी मानसशास्त्राची रंजक कहाणी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वांना प्रचंड उपयुक्त ठरेल. व्यापक अर्थानं माहिती देणारं हे पुस्तक म्हणजे कुतूहल असणार्या प्रत्येक वाचकासाठी भरभरून असा खजिनाच आहे.
थोड़े मोठे आणी जाड पुस्तक आहे, पण खरोखरंच खूप माहिती मिळते.
अगदी मानसशास्त्राच्या उगमापासून आता पर्यंतचा इतिहास लेखकांनी ह्यात
मांडला आहे. मानसशास्त्राची खूप सारी पुस्तक वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक
वाचने सोप्पे आहे.
अच्युत गोडबोले यांची इतर लोकप्रिय पुस्तकं:
- मनात: मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर
- अर्थात: अर्थशास्त्राचा इतिहास, सिद्धान्त आणि चरित्र यांची रंजक सफर
- गणिती: आधुनिक शास्त्राचा पाया रचणारे
- मुसफिर: अच्युत गोडबोले यांचे आत्मचरित्र/जीवनचरित्र/आत्मकथा
- अनर्थ: विकासनीती- सर्वनाशाच्या उंबरठ्यावर? आपला विकास निसर्गाचा विनाश.!
- नादवेध: असंख्य जणांना "नादा"ला लावणार्या शास्त्रीय देशी-विदेशी संगीताचा घेतलेला "वेध"
- गुलाम: वर्णद्वेषी गुलामगिरीचा जीवघेणा, अमानुष, चित्तथरारक प्रवास
- आपले अन्न: अन्नाभोवती फिरणारा माणसाचा संक्षिप्त रंजक इतिहास
- आर्टिफिशियल इंटेलिजेंट: आधुनिक मानवाची कृत्रिम बुद्धिमत्ता
- मनकल्लोळ भाग-1 : मानसिक आजार, विकार व उपचार यांचा मागोवा
- मनकल्लोळ भाग-2: मानसिक आजार, विकार व उपचार यांचा मागोवा


टिप्पण्या