ट्वेंटी-ट्वेंटी-ट्वेंटी नियम | The 20/20/20 Rule | 📚 Bookshorts #20

भारतातील अनेक लोकं फोनवर सरासरी 3-तास दररोज वेळ घालवतात



ट्वेंटी-ट्वेंटी-ट्वेंटी नियम
The 20/20/20 Rule

📚 Bookshorts #२०

 

वाढता स्‍क्रीन टाईम

मित्रांनो आज एक गोष्ट आहे जी खूप कमीत कमी आपल्याला करायची आहे आणि ते म्हणजे आपल्या स्मार्टफोन म्हणजेच डिजिटल स्क्रीन टाईम मोबाईलला डोळे वटारून पाहणे, आपला चिकटून राहणे, हे आपल्याला माहित आहे की हे आपल्या डोळ्यासाठी योग्य नाही तरीही आपण व्‍यसन लागल्यासारखे दररोज तासनतास संगणक इंटरनेटवरील माहिती, मोबाईलवर, लॅपटॉप, टीव्ही, यावर पाहण्‍यात वाया घालवत आहोत. 

👉भारतातील अनेक लोकं फोनवर सरासरी 3-तास दररोज वेळ घालवतात

अगदी काटेकोर बोलायचं असेल तर, सरासरी तीन तास दररोज भारतातील अनेक लोकं डिजिटल सॅव्‍ही झालेले आहेत, मग भले इथे लहान मुलं असो, मोठे-प्रौढ व्यक्ती असो, किंवा  वयस्कर लोकं असू देत. प्रत्येकांचा Screen Time दररोज वाढत चाललेला आहे असे दिसून येत आहे

आणि हे देखील आपल्याला माहित आहे की हे असं करणं आपल्या डोळ्यांसाठी देखील योग्य नाही, चांगलं नाही, ठीक नाही तरीही आपण फोनवर तासन्तास डोळे घालून बसलेले असतो.

 

यासाठी काय करता येईल?

खूपच सहज-सोपा नियम आहे ज्याला आपण 20-ट्वेंटी-20 चा नियम म्हणतो.

ज्याला फॉलो करून, अनुसरण करून, उपयोग करून आपण रिलॅक्स करू शकतो, हेल्दी राहू शकतो, डोळे हेल्दी ठेवू शकतो.  


 

डोळ्यांसाठी 20/20/20 चा नियम

The 20/20/20 Rule for Eyes

या नियमाचे नाव आहे ट्वेंटी-ट्वेंटी-ट्वेंटी नियम 20/20/20 चा नियम. 

या नियमानुसार तुम्हाला करायचं काय आहे,तर, 20 मिनिटे काम करायचं आहे, मग लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर. मोबाईलवर काम होत नसते समजा, परंतु, जे काही तुम्ही बघत आहात, ऐकत आहात, शिकत आहात, स्क्रीनवर बघत आहात, पाहत आहात, मग ते लॅपटॉप असो टीव्ही असो किंवा तुमच्या हातात असलेल्या मोबाईलवर. 

 

अधिक वाचाः संवादामध्‍ये डोळ्यांचा 5-सेकंदाचा नियम
 

हे काम तुम्ही वीस मिनिटांपर्यंत करायचं आहे. मग वीस मिनिटानंतर 20 फूट दूर अशा वस्तू गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे, फोकस करायचा आहे जे तुमच्या पासून 20 फुटाने दूर असेल आणि त्या गोष्टीला, त्या वस्तूला जी तुमच्यापासून वीस फूट दूर आहे त्याला तुम्हाला सतत 20 सेकंदापर्यंत पाहायचा आहे.

यामुळे होईल काय तर, तुमच्‍या डोळ्यांना आराम मिळेल. डोळे रिलॅक्स होतील, तुमचा परफॉर्मन्स वाढेल, कामामुळे डोळे थकतात, त्‍यामुळे डोळ्यात येणारं पाणी असेल किंवा डोळे जळजळ करत असतील किंवा मानेचा, डोळ्याचा थकवा आल्यामुळे तो थकवा निघून जाईल

अशी ही खूपच अमेझिंग टेक्निक आहे तुम्ही नक्कीच ही वापरून पाहायला पाहिजे. जेणेकरून तुमचा स्क्रीन टाईम कमी होईल, कामही वाढतील म्हणजेच प्रोडक्‍टीव्‍हीटी म्‍हणजेच कार्यक्षमता सुधारेल, उत्पादकता वाढेल आणि तुमचे डोळे हेल्दी देखील राहतील, ह्या 20-ट्वेन्‍टी-20 नियमाचा डोळ्यांच्‍या स्‍वास्‍थ्‍यासाठी वापर नककीच करा मदत होईल.

 

इतर संबंधितः 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive