अभ्यास करताना लक्ष केंद्रित कसे करावे मन एकाग्र कसे ठेवावे 📚 Bookshorts #५३

अभ्यास करताना जर तुमचं लक्ष केंद्रित होत नसेल किंवा फोकस करू शकत नसाल अथवा अभ्यास करताना मन लागत नसेल तर या तीन पद्धतीचा तंत्रांचा (tips while study) वापर करा ज्यामुळे तुमचा फोकस वाढेल इन्स्टंटली ..!

अभ्यास करताना
लक्ष कसे केंद्रित ठेवावे

 Three ways you can improve
your focus while study

#Bookshorts

 

#१.क्रमांक एक

 अगोदर ठरवा Decide first

अभ्यास करण्यास बसण्या अगोदरच ठरवा-डिसाईड करा की तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे? आणि किती वेळ अभ्यास करायचा आहे?

उदाहरणात मला एका तासात एक प्रकरण किंवा एक धडा संपवायचा असेल तर जेव्हा तुम्ही स्टडी प्लान डिसाईड न करता मनावर सोडता तेव्हा तुमचे मन नेहमीच असे निर्णय घेत असतो जो शॉर्ट टर्म मध्ये चांगले वाटत असतात परंतु लॉन्ग टर्म मध्ये याचे खूप तोटे असतात.

अभ्यास, काय आणि किती करायचं याची स्पष्टता असेल तर तुम्हाला एक डेड लाईन किंवा एंड पॉईंट मिळत असतो, नेमकेपणा कळत असतो आणि तुम्ही तुमच्या मनाला हे सांगता की जोपर्यंत हे एक प्रकरण संपत नाही तोपर्यंत मी हलनार नाही, उठणार नाही, थकणार नाही.

 हारेगा नही.. झुकेगा नही...


 

 #२.क्रमांक दोन

 अंथरूणावर अभ्यास कधीच करू नका No study on the Bed

अंथरुणावर बसून, झोपून अभ्यास कधीच करू नका. कधीही अंथरुणावर बेडवर झोपून बसून महात्वाचं अभ्यास-पुस्तक वाचन करू नका. जेव्हा तुम्ही बेडवर बसून अभ्यास करत असता तेव्हा तुम्हाला थोडं अधिकच कम्फर्टेबल, आरामदायक वाटायला लागतं आणि तुम्ही हळूहळू डुलकी घ्यायला लागता, झोप यायला लागते. विशेष तर जेव्हा तुम्ही एखादे बोरिंग सब्जेक्ट वाचत असाल तर नक्कीच वेळ लागतो. 

 #हे ही वाचा: फोनवरून अभ्यासात लक्ष केंद्रित कसे करावे? हायपर फोकस पुस्तक सारांश

 

झोप येत असल्याने तुमचं लक्ष लागत नाही आणि कार्यक्षमतादेखील ढासळते.  फोकस आणि एफिशियन्सी दोन्ही कमी व्हायला लागते. यासाठी प्रयत्न करा की तुम्ही नेहमीच स्टडी टेबलवर बसून अभ्यास करा. 

 

 

#३.क्रमांक तीन

अभ्यास केल्यानंतर स्वतःला बक्षीस द्यायची सवय लावा

create Reward on Study system

 अभ्यासानंतर स्वतःला बक्षीस द्या..! एक बक्षिसाची योजना-पद्धत-सिस्टीम क्रिएट करा. स्वतःशीच असं बोला की ह्या प्रकरणाला संपवताच मी स्वतःला एक रिवार्ड-बक्षीस देईन मग भलेही ते तुमच्या आवडीचे एखादे ॲनिमेटेड कार्टून सिरीयल बघणे असेल किंवा मित्रां दोस्तांसोबत एखादे गेम खेळणे असू द्या, चॉकलेट खाणे असू द्या, बाहेर दोन मिनिटांसाठी फिरणं असू द्या. 


असे केल्याने तुमच्या मेंदूला संकेत मिळत असतात की हे काम केल्याने हे बक्षीस मिळेल, हे एखादे काम, विशिष्ट काम केल्याने हे बक्षीस मिळेल. यानंतर तो स्वतःच आपोआपच हाय फोकस म्हणजेच एकाग्रतेने काम करायला सुरुवात करेल जेणेकरून तुम्हाला ते बक्षीस लवकरात लवकर मिळू शकेल.

 

#हे ही वाचा: सर्वात कठीण काम सार्वत आधी करा? eat that frog पुस्तक सारांश

#हे ही वाचा: चालढकलपणा, उद्या करीन या सवयी पासून सुटका कशी मिळवावी?
Procrastination पुस्तक सारांश

 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive