एक साधं कौतुक…" एक जादुई शब्द"
एक साधं कौतुक…"एक जादुई शब्द "
HOW TO WIN FRIENDS AND INFLUENCE PEOPLE
| 📚 #बुकशॉर्ट्स
"अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे, कालचा भात उरलाय अजून," सासूबाई म्हणाल्या, ओट्यावर भांडी आहे ते पण लावून ठेव.
"हो आई, लक्षात ठेवलंय."
सुनबाईने सौम्य हसून उत्तर दिलं.
ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ती स्वतःसाठी थांबत नसे. स्वयंपाक, आवराआवरी, सासूचं सासऱ्याचं वेळवर जेवण , नवऱ्याची तयारी, सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची.
पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम जाणवत राहायची — कोणीच तिचं कौतुक करत नव्हतं.
नविन जवाबदाऱ्या. नविन घर सगळ व्यवस्थित सांभाळाचा प्रयत्न करत होती. तिच्यासाठी सगळ नवन.
त्या दिवशी सकाळी चहा करताना, गॅसजवळ उभी असताना तिला आईच्या शब्दांची आठवण झाली —
"मुली, घरच्यांचं कौतुक शोधायचं नसतं. स्वतःचं समाधान महत्त्वाचं."
ती हसली. पण मनात काही तरी चुटपुटत राहिलं.
तितक्यात सासूबाई मागून आल्या आणि म्हणाल्या,
"सुनबाई, कालची आमटी अगदी छान झाली होती… मी म्हटलं, सांगावं जरा."
सुनबाईचे डोळे क्षणभर विस्फारले.
"म्हणजे… खरंच?"
"हो गं! हलकीशी तिखट पण मस्त, अगदी माझ्या आईसारखी चव होती."तूझ्या हाताला चव आहॆ. तुझी आई सुगरणच आहे ना?
ती काही बोलली नाही, फक्त गालातलं हसू लपवत राहिली.
पहिल्यांदा, एवढ्या दिवसांत पहिल्यांदा, कुणीतरी तिच्या केलेल्या गोष्टीचं कौतुक केलं होतं.
त्या एका वाक्यानं तिला काहीतरी शिकवलं.
"माझं काम कुणीच ओळखत नाही," ही तक्रार एका क्षणात विरून गेली. कारण, आज ज्या एका छोट्याशा वाक्यानं तिचा दिवस सुंदर झाला, तेच दुसऱ्यालाही द्यावं, हे तिला जाणवलं.
त्या दिवशी दुपारी, सासूबाई घराच्या ओट्यावर माठातून पाणी भरत होत्या. त्यांच्या पाठ थोडी वाकली होती,सुनबाईने लगेच धावत येऊन त्या पाण्याचे घागर स्वतः उचलली .
"आई, किती सुंदर पद्धतीनं तुम्ही ओटा स्वच्छ करता! माझा तर दमछाक होतो, पण तुमचं हातपाय चाललेत बघा, हे खरंच कौतुकास्पद आहे."
सासूबाई एक क्षण स्तब्ध झाल्या. मग त्या हसल्या.
"अगं, मी ते काय विशेष करते, इतकी वर्षं केलंय म्हणून सवय झालीये."
"सवय म्हणून केली तरी त्यात मेहनत आहे ना, आई? मी दररोज पाहते तुम्हाला – तुम्ही थकत नाही, कुरकुर करत नाही. तुमचं बघून मला शिकावं वाटतं."
सासूबाईंच्या चेहऱ्यावर लाजलेलं हसू आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसली.
त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्वतःहून चहा करून सुनबाईसमोर ठेवला.
"घे गं, तुझ्यासाठी. आज तू मला माझंच काम वेगळ्या डोळ्यांनी दाखवलंस."
कौतुकाचा हा खेळ दोघींमध्ये सुरू झाला.सुनबाईने एक दिवसशेजराच्या मुलाला गणित शिकवणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
"इतकं संयम ठेऊन शिकवतोस तू… खरंच, माझ्यासारखं घाईघाईनं ओरडून काही झालं नसतं. मुलाच्या आयुष्यात तू शिक्षकासारखं वागतोस!"
तो थोडा गोंधळला. पण हसला. आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात कौतुकामुळे चमक होती.
दुसऱ्याच दिवशी, सासूबाईंनी तिच्या सुनबाईच्या हस्तकलेच्या कुंड्या पाहिल्या.
मातीच्या एका भांड्यात तिनं क्ले वर्क केलं होतं.
सासूबाईंनी भांडं हातात घेत म्हणाल्या,
"तुझ्या हातात जादू आहे गं! माझ्या आईसारखी नक्षी आहे ह्या रंगांत."
ते ऐकून सुनबाईचं मन फुलून आलं.
ती एक क्षण मागे गेली — लहानपणी रंगकाम केलं की आई गोड बोलायची, "तुझं रंगसंगतीचं कौतुक करावं असं आहे!"
आणि एक संध्याकाळ…
सासरे जुन्या वहीत एक कविता शोधत होते.
अर्धवट लिहिलेलं होतं काहीसं…
सुनबाईच्या एका वाक्याने —
"बाबा, तुमची कविता किती गोड आहे! शेवट पूर्ण केलात, तर ती खरंच सुंदर वाटेल!"
त्यांनी खळखळून हसत पेन उचलला,
ती कविता त्यांनी त्या रात्री पूर्ण केली.
हळूहळू घरात एक नवीन वळण आलं होतं…
जिथं टीका नव्हे, तर प्रोत्साहन ऐकू येत होतं.
जिथं चुकांवर नाही, तर प्रयत्नांवर लक्ष दिलं जात होतं.
जिथं प्रत्येक वाक्यात "मी सांगितलं होतं" ऐवजी, "मस्त केलं!" असं ऐकायला यायचं.
घरात एक नवीन वळण आलं होतं.
घरातलं वातावरण जरा जास्त जिव्हाळ्याचं झालं होतं.
एका संध्याकाळी दोघी गच्चीत बसल्या होत्या. सायंकाळी गुलाबी ऊन आणि गार वारा.
सासूबाई म्हणाल्या,
"सुनबाई, मी तुला एक गोष्ट सांगते का?"
"सांगा ना आई!"
"मी लग्न होऊन ह्या घरात आले, तेव्हा तुझी आजचे सासू म्हणजे माझ्या सासूबाई, फार कठोर होत्या. मी काहीही केलं, ते कधीच योग्य वाटलं नाही त्यांना. मी कितीदा आमटी चांगली केली, घर स्वच्छ ठेवलं, सण सजवले… पण कधीच त्यांनी एक शब्दही कौतुकाचं नाही म्हटलं."
"मग तुम्ही काही बोललात नाही त्यांना?"
"नाही गं. तेव्हा असं वाटायचं – 'आपलं काम हे आपलं कर्तव्य आहे, त्याचं कौतुक नको.' पण आताशा वाटतं, त्या जर एकदाच म्हटलं असतं – ‘छान केलंय गं’ – तर माझ्या थकव्यात जरा जीव मिळाला असता."
सुनबाई शांत झाली.
सासूबाई पुढे म्हणाल्या,
"म्हणून मी ठरवलं, मी माझ्या सुनेचं कौतुक करणार. कारण ‘कौतुक’ हा शब्द नाही… तो आधार आहे. हक्काचं असावं, पण अचानक मिळालं की जास्त गोड लागतं."
त्या रात्री, सुनबाईनं आपल्या डायरीत लिहिलं:
“कौतुक ही भावना नसून ती संस्कृती आहे…
ती पुढच्या पिढीकडे देणं ही माझी जबाबदारी आहे."
काही दिवसांनी, शेजारच्या वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन आल्या.
"ताई, माझी गोजिरी कॉलेजात पहिल्यांदाच कविता लिहिलीये. ऐका ना."
गोजिरी थोडीशी घाबरत होती. पण सुनबाई हसून म्हणाली,
"अगं बाई, कविता करायला धाडस लागतं. तू आधीच कौतुकास पात्र आहेस."
मग गोजिरीने कविता वाचली, थोडी वळणदार, थोडीशी चाचपडलेली.
सुनबाईने तिला जवळ घेतलं.
"अगदी मनापासून लिहिलंयस गं! शब्द थोडे अजून वळणावर येतील, पण तुझी भावना स्पष्ट पोचते. खरंच, छान वाटली."
गोजिरीचे डोळे चमकले.
सासूबाई आतून हसत बाहेर आल्या –
"बघ, आता तुझं कौतुक दुसऱ्यांचं आयुष्य उजळवतंय."
त्या घरात आता रोज काही तरी छोटंसं कौतुक ऐकू यायचं –
“तू छान केलंस…”
“अगदी बरोबर वेळेवर आलास…”
“आजच्या जेवणात प्रेमाची चव होती…”
“तू हसलीस, म्हणून दिवस उजळला…”
कौतुकाचं ते वातावरण…
कुठलीच मोठी गोष्ट नव्हती, पण माणसं जरा जास्त सजग, प्रेमळ आणि एकमेकांमध्ये गुंतलेली वाटायची.
कारण त्या घरात आता "कौतुक" ही नित्यनेमाची परंपरा झाली होती."कौतुक – एक जादुई शब्द…"
कौतुक म्हणजे केवळ एखाद्याच्या कामावरची स्तुती नाही.
कौतुक म्हणजे समजून घेतलेली नजर, ओळखलेली भावना, आणि दिलेलं एक हलकंसं थोपटणं.
एक साधं "वा!", "छान केलं!", "तुझ्यामुळे जमलं!" असं म्हणणंही, कधी कधी एखाद्याच्या थकलेल्या जीवाला नवा श्वास देतं.
ते शब्द नसतात… ते आश्वासक साक्षी असतात —
It costs
ZERO
dollars to speak
TWO
sweet words.
म्हणून या इंग्रजी भाषेतील म्हणीप्रमाणे जमलं तर कौतुक करा. कौतुक करायला पैसे लागत नाही. फक्त दोन शब्द लागतात. ते दोनच शब्द. जगणं बदलतं.
माणूस फुलतो.
कारण कौतुकाचा तो क्षण…
तो कुणाच्या आयुष्यात वळण घालतो — हलकासा, पण खोलवर छाप उमटवणारा क्षण असतो. थेट हृदयात..!
तृप्ती देव 🅒︎🅟︎copyright
कथाविश्व
- गोड कथांचे अनोखे विश्व
(Content Source: #shortstory Forwarded from WhatsApp University.! to Internet in public interest)
#All the content published on this platform is credited to respected Writer/Authors/Poets who are the sole owners of their intellectual property.
तुमचे धन्यवाद. आणि अभिनंदन..!
ही लघुकथा शेवटपर्यंत वाचलीत आणि आपला मौलिक वेळ वाचनासाठी दिला त्यासाठी आम्ही आपले अभिवादन करतो. आणि आशा करतो या लघुकथेतील शिकवण कौतुक करणे, आपुलकीचे दोन शब्द बोलणे यामुळे एकमेकांमध्ये सौहार्द वाढून, नातेसंबंध दृढ होतात, म्हणून कौतुकाचे बोल नक्कीच तुम्हाला जीवनात कामी येतील.
· कमेंट: आवडले असल्यास टिप्पणी द्वारे आपले मत कळवा.
· शेअर: तुम्हाला आवडलेले, आपल्या गरजू, मित्र-नातेवाईक यांना याबद्दल सांगा.
· अधिक जाणून घेण्यासाठी इतर लेख-पुस्तक सारांश वाचा.
तुम्हालाही असे जीवन जगण्याचे मार्गदर्शन, लोकव्यवहार, जग रहाटीचे धडे समजून घ्यायचे असतील तर कित्येक दशकांपूर्वी लिहिलेली, जागतिक स्तरावर गाजलेली, अनेक भाषांमध्ये अनुवादित केलेली #डेल कार्नेगी यांची #हाऊ टू विन फ्रेंड्स & इन्फ़्लुएन्स पीपल ही प्रचंड लोकप्रिय असलेली,पुस्तक वाचून जीवनात योग्य दिशा तुम्हाला नक्कीच मिळेल.
पुढील दुव्याद्वारे पुस्तकाचे सारांश वाचा आणि आपल्या जीवनात त्यातील समाजात वावरताना लागणारे लोकव्यवहाराचे धडे आत्मसात करा, सराव करा, तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल अशी आशा करतो.
👉इथून वाचा: #हाऊ टू विन फ्रेंड्स & इन्फ़्लुएन्स पीपल #डेल कार्नेगी
#BookShorts
#howtowinfriends&influencepeople #dalecarnegie #Bookmark #BookStop
#BookBank #Bookstagram #moralstories #selfhelp #selfdevelopment #youtubeshorts
#trending #booktalk
#----------#-------- संबंधित ---------#--------#
#हेही वाचा: लोकव्यवहार: लोकांना जिंकण्याची कला-#व्यवहार ज्ञानाचे धडे
#हेही वाचा: तुम्ही जिंकू शकता: जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन-लेखक-शिव खेरा
#नेमके काय बोलावे: भुरळ पाडणारे आणि प्रभावी असे जादूई शब्द पुस्तक सारांश मराठी-भाग-१
![]() |
#BOOKSHORTS-WHATSAPP CHANNEL |
वाचत राहा, शिकत राहा, समृद्ध होत राहा.
#Bookshorts
📚📙📘📗📕📖
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
#लक्षात
ठेवा:
वाचन-लेखन-मनन-चिंतन-आकलन
समजणे-उमजणे-उपोयोजन-ज्ञान-वाटणे-देणे
वाढते-दृढ होते-टिकते
#selfhelp #Selfimprovement #selfdevelopment #personality डेव्हलपमेंट #स्वसुधार, #स्वाविकास, #व्यक्तिमत्त्व विकास, #मनोविकास #सायकॉलॉजी #आधुनिक संभाषण कौशल्य #backtobasics #Bodylanguage #advanceskills #soft #peopleskills
THINK BEFORE YOU SPEAK.
READ BEFORE YOU THINK.
बोलण्या
अगोदर विचार करा.
विचार करण्याअगोदर वाचन करा.
| 📚 #बुकशॉर्ट्स
| ☯️ ई-वाचनालय
| 🌐 www.evachnalay.in
दिसामाजी कांही तरी तें लिहावे ।
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंमदत, स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी-समृद्ध जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल-समृद्ध बनवू शकता.
|
जीवनात पुस्तकं असतात आपली, ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानीम्हणून पुस्तकं वाचा. कारण, प्रचंड वेगाने बदलणारे जग, किचकट मानवी जीवन, त्यात माहिती चे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती-लेख सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास (Self Development), वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute
📖 BOOK SHORTS
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
📕📙📘📗
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
- आपल्या कामात एवढे चांगले व्हा की कोणीही तुम्हाला नजरअंदाज करणार नाहीत.
- माझं चीज़ कोणी हलवलं? Who moved my Cheese?
- तुमच्या अचेतन मनाची शक्ती-द पावर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
- द मॉन्क हू सोल्ड हीज फेरारी-रॉबीन शर्मा
- द पॉवर ऑफ हॅबीट - The Power of Habits
- मिनी हॅबीट्स- Mini Habits- सवयी लहान परिणाम महान
- टायनी हॅबीट्स - Tiny Habits-छोट्या सवयी
- मायक्रो हॅबीट्स - Micro Habits-सूक्ष्म सवयी
- द नाऊ हॅबीट- The Now Habit
- एटामिक हॅबीट- Atomic Habit अॅटॉमिक हॅबिट
- अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी- 7 Habits of Highly Effective People
- मेंदूचे 12 नियम- 12 Rules of Brain
- भावनिकदृष्ट्या भक्कम असणा-या लोकांच्या पाच-५ सवयी
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
आर्थिक विषयावरील इतर उत्कृष्ट पुस्कांची यादी-क्लीक करून पाहा
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो.
#लक्षात ठेवा |

टिप्पण्या