यश तुमच्या हातात-आपण जिंकू शकता-शिव खेरा-पुस्तक सारांश-You Can Win- Shiv Khera -book Summary Marathi
जागतिक स्तरावर एक कोटी पेक्षाही जास्त प्रती विक्री झालेलं पुस्तक
यश तुमच्या हातात
आपण जिंकू शकता
पुस्तक सारांश मराठी
You can Win
Shiv Khera
Book Summary Marathi
✍लेखकाबद्दल थोडंस- About Author Shiv Khera
शिव खेरा आज अशा उंचीवर पोहोचेले आहेत की, जगभरातील प्रभावशाली
लोकांच्या पंक्तीत त्यांनी आपले स्थान पक्के करून टाकले आहे. त्यांनी अनेक
पुस्तके लिहली आहेत. जेव्हा त्यांचे पुस्तक एखाद्या व्यक्तीच्या हातात
पडते, तेव्हा ते त्याच्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण केल्याशिवाय राहत
नाही. आज जाणून घेऊया अशाच एका पुस्तकाविषयी….यश तुमच्या हातात. हे पुस्तक
शिव खेरा लिखित YOU CAN WIN या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे.
पुस्तकाची रूपरेखा
(You can win book in Marathi)
पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेत हे पुस्तक कुणासाठी आहे, पुस्तकाचा कसा वापर करून घ्यावा, त्यासाठी कोणता कृतीकार्यक्रम अवलंबवावा हे नमूद केले आहे. पुस्तकाची अनुक्रमणिका खालीलप्रमाणे आहे-
- महत्व दृष्टिकोनाचे Importance of Attitude
- यश- Success
- प्रेरणा- Motivation
- आत्मप्रतिष्ठा- Self Esteem
- परस्परसंबंध-परस्परसंवाद कौशल्य आणि विकास -
Communication Skills and Development - सुप्त मन आणि सवयी - Subconscious Mind and Habits
- ध्येय ठरवणे- Goal Setting
- नितीमुल्ये आणि दूरदृष्टी- Ethics, Values and Long Vision
आपण जिंकू शकता पुस्तक सारांश
(You Can Win book Summary)
जीवनात सुख-दु:ख, आशा-निराशा, यश-अपयश यांचा लपाछपिचा खेळ हा चालूच असतो. उन-सावली-पाऊस यांचा खेळ म्हणता येईल. यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता जे लोक आपले ध्येय ठरवून त्यासाठी योग्य कृतिकार्यक्रम बनवतात व तो सत्यात उतरवतात, ती यशस्वी आणि महान बनतात. या पुस्तकात आपल्याला यशाची रेसिपी बघायला मिळते. विद्यार्थी असो, व्यावसायिक असो, अथवा सामान्य मनुष्य, ज्याला ज्याला आपले आयुष्य उत्तम दर्जाचे बनवायचे आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक वरदान आहे.
तुम्ही कधी अशी स्वप्ने बघितली आहेत का ज्यांना तुम्ही मनापासून सत्यात उतरवू इच्छित होता. की फक्त इतरांच्या यशाच्या कथा तुम्ही ऐकल्या आहेत? होय, आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटते कि आपल्यापेक्षा इतरांना ईश्वराने जास्त काहीतरी दिले आहे. म्हणून ते जास्त यशस्वी होतात. परंतु यशाचे समीकरण इतके सरळसोपे असत नाही. तर त्यासाठी मोठ्या अग्निदिव्यातून माणसाला जावे लागते. या पुस्तकात यशाचा संपूर्ण रोडमॅप लेखकाने आपल्याला दिला आहे.
Read More: As a Man Thinketh माणूस जसा विचार करतो तसा बनतो
दृष्टीकोन- यशाचा पाया
(Yash tumchya hatat Marathi book)
सर्वप्रथम लेखक यश निर्मिती मध्ये दृष्टिकोनाचे महत्व अधोरेखित करतात. फुगा हा त्याच्या रंगामुळे नाही तर आत भरलेल्या वायू मुळे आकाशात उडत असतो. त्याचप्रमाणे आपण किती उंचीवर जाणार, यशाची कोणकोणती शिखरे पादाक्रांत करणार हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते तर ते आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. ह्या दृष्टीकोनात बदल करूनच आपण आपल्या आयुष्यात बदल करू शकतो.
ज्या इमारतीचा पाया मजबूत आहे, ती इमारत वादळ वाऱ्यात सुद्धा टिकून राहते. हेच काम आपला दृष्टीकोन करत असतो. जो सकारात्मक दृष्टीकोन ठेवतो तो नेहमी स्वत: बरोबर इतरांचे भले करत असतो. त्यासाठी आपण सतत शिकत राहिले पाहिजे. आपल्याबरोबर इतरांना शिकवलं पाहिजे.
एकदा दृष्टीकोनाची पायाभरणी झाली कि मग त्यावर यशाचे मंदिर उभे करता येते. यश ही काही रातोरात पदरात पडणारी गोष्ट नसते. आपल्या अनेक वर्षांच्या कठोर मेहनतीला आलेले ते एक मधुर फळ असते, न कि नशिबाचा जुगार असते. यश हा एक अविरत चालू राहणारा प्रवास आहे. प्रत्येक यशोगाथा ही मोठ्या अपयशाचीही कथा असते.
Success is a Journey
not a Destiny.
हेही वाचा: दृष्टीकोन हेच सर्वकाही -Attitude is Everything by
यश मिळण्यापूर्वी १० हजार वेळा अपयशी ठरलेला थॅामस एडिसन असो अथवा राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी अनेक वेळा निराशा पदरी लागलेले अब्राहम लिंकन असोत, यांनी अपयशाला अडथळा मानला नाही. ते अविरत कष्ट करत राहिले. आपल्यात कठोर मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. लक्षात ठेवा, यश त्यांच्याच पायाशी रुंजी घालत असते, जे संयम ठेवतात, सातत्य ठेवत सतत आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करतात.
Success Is A
Matter Of Choice,
Not Chance.
-Shiv Khera
#you can win, you can win pdf
📑🔖📕📗📖📘📙
आपण आपले दृष्टीकोन कसे बनवतो, कसे निर्धारित करतो?
👉तुम्ही जिंकू शकता-भाग-१ -दृष्टीकोन |
YOU CAN WIN- Part-1 - How do we form Attitude
📑🔖📕📗📖📘📙
ध्येयवेडेपणा
यशाच्या प्रवासात आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे आपण किती जोखीम घेतो. बरेच लोक ध्येयाच्या एकदम जवळ जाऊन माघार घेतात. ज्याला यशस्वी व्हायचे असेल त्यांनी ही गोष्ट टाळली पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात जोखीम घेणे हा यशाला समानार्थी शब्द बनला आहे.
एकदा एका व्यक्तीने सोक्रेटीसला विचारले की यशाचे रहस्य काय आहे? तेव्हा सोक्रेटीस त्याला नदीच्या किनारी बोलावतात. अचानक त्याला नदीत बुडवायचा प्रयत्न करतात. तसा तो माणूस स्वत:ला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करू लागला. पण सोक्रेटीस ने त्याला पूर्ण ताकत लाऊन दाबून धरले होते.
तो जीव वाचवण्यासाठी कासावीस झाला होता. धडपडत होता, काळा नीळा पडला होता. तेवढ्यात सोक्रेटीस त्याला सोडतो. व्यक्ती पाण्यातून बाहेर येताच सोक्रेटीस त्याला विचारतात कि जेव्हा तू पाण्यात होता तेव्हा तुझ्यासाठी कोणती गोष्ट जास्त जरुरीची किंवा अत्यंत महत्वाची वाटली होती?
धापा टाकत टाकत ती व्यक्ती म्हणते कि हवा-श्वास.! मग सोक्रेटीस त्याला समजावतात की, जेवढी गरज तुला पाण्यात असताना हेवेची वाटत होती, तितकी गरज जेव्हा तुला यशाची वाटेल, तेवढे प्रयत्न तू करशील, तेव्हा यश स्वता:हून तुला शोधत येईल.
आत्मप्रतिष्ठा व स्वयंप्रेरणा (Self Esteem and Self Motivation)
यशासाठी प्रयत्न करताना बऱ्याच वेळा आपण थकून जाण्याची शक्यता असते. त्यासाठी लागते ते मोटीवेशन. माणसाने स्वत:ला सतत प्रेरणा देत राहिले पाहिजे. जेवढे आपले ध्येय उदात्त असेल तेवढे आपण जास्त प्रेरित झालेलो असतो. आपण इतरांना देखील प्रेरणा देऊ शकतो. कधी आपल्या कृतीतून, त्यांच्या योग्यतेला वाव देऊन, शाब्बासकी देऊन तर कधी जबादारी सोपवून.
आपण बऱ्याच वेळा स्वत:ला इतरांच्या चष्म्यातून बघत असतो. आपली जडणघडण होण्यात आजूबाजूच्या वातावरणाचा, संस्कारांचा खूप मोठा वाटा असतो. आपण नेहमी नकारात्मक विचारांपासून स्वता:ला दूर ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही तेव्हाच जगाला ओळखू शकता, जेव्हा तुम्ही स्वत:ला ओळखायला शिकता. स्वत:वर प्रेम करणे, स्वत:च्या ध्येयावर प्रेम करणे, ही यशस्वी माणसाची निशाणी आहे.
अशा व्यक्ती कधी जबाबदारीपासून दूर पळत नाहीत. माणसाचा आत्मविश्वास इतका प्रबळ असायला हवा की, लाथ मारील तिथे पाणी काढू शकेल. टाकेल तिथे उभा राहू शकेल. त्यासाठी गरज आहे ती सकारात्मक आत्मप्रतिष्ठा निर्माण करण्याची! त्यासाठी जबाबदारी घ्यायला शिका, यशस्वी माणसांच्या सहवासात रहा. अंगी शिस्त बाणवा आणि आपली उद्दिष्टे निश्चित करा.
चांगल्या सवयी (Good Habits) You can Win Book Summary
आपण सारे यशाचे शिखर गाठण्यासाठी आतुर आहोत. किंबहुना त्यासाठीच आपण जन्म घेतला आहे. आपल्या आत तशी क्षमता देखील आहे. पण जर कोणती एक गोष्ट यात अडथळा आणत असेल तर, ती म्हणजे आजूबाजूच्या समाजाचे नियम आणि आचार विचार. यशस्वी व्यक्ती काही परग्रहावरील व्यक्ती नसतात, तर ती आपल्यातीलच माणसे असतात.
त्यांनी आपल्या अनुभवातून एवढे धडे घेतलेले असतात की, यश ही त्यांच्यासाठी एक सवय होऊन जाते. आपल्या अचेतन मनाची शक्ती वापरून असाध्यास साध्य करण्याची किमया साधतात. त्यांचा आत्मविश्वास, प्रेरणा, हातात घेतलेल्या कामावर स्वत:ला झोकून देण्याची वृत्ती इतकी प्रभावी असते की, सहज ते कुठलीही गोष्ट करतात.
#अधिक वाचा: छोटे बदल, उल्लेखनीय परिणाम-एटॉमिक हैबिट्स
Atomic Habits Marathi By James Clear
#अधिक वाचा: सवयींचा सापळा पावर ऑफ Power of Habits by Charls Duhigg
#अधिक वाचा: श्रीमंत आणि यशस्वी लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये एकच फरक असतो
Million Dallar Habits by Brian Tracy
म्हणून चांगल्या सवयी लाऊन घेणे म्हत्वाचे आहे. या सवयीच तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. आपल्या अवती-भोवती आपण यशाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आपल्याला आपले ध्येयच दिसायला हवे. तेव्हा आपले शक्तिशाली अचेतन मन आपले अर्धे काम सोप्पे करून टाकेल. गरज आहे ती सर्व but-लेकीन-किंतु-परंतु बाजूला ठेऊन आपल्या कृती वर भर देण्याची.
ध्येय निश्चिती करणे (You can Win Book Summary)
ज्या लोकांकडे कोणतेही ध्येय नाही ते कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोक फक्त आयुष्यभर भटकत राहतात. आयुष्यात काय साध्य करायचे आहे हेच तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही साध्य तरी काय करणार? आहे त्यात समाधान मानून मोठे होता येत नाही. महत्वाकांक्षा हीच महान लोकांना सामान्य माणसांपासून वेगळी बनवत असते. ध्येय कशी असावी याबद्दल लेखकाने मार्गदर्शन केले आहे. SMART हा शब्दप्रयोग वापरला आहे. SMART म्हणजे सुस्पष्ट, मोजमाप करण्याजोगी, आटोक्यातील, वास्तववादी आणि निश्चित कालमर्यादा असलेली.
#अधिक वाचा: स्मार्ट ध्येय कसे ठरवावे? How to set S.M.A.R.T.E.R. Goal?
#अधिक वाचा: ध्येय का ठरवावे? why to set Goal?
#अधिक वाचा: ध्येय ठरविण्याची वॉरेन बफेट यांची पद्धत? Set Goal Warren Buffett way.
मुल्ये ओळखणे-ठरवणे (You can Win Book Summary)
आयुष्यात यश, श्रीमंती कुणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. त्यासाठी काहीजण कष्ट करण्यास तयार असतात तर काही यशाला शॅार्टकट शोधायचा प्रयत्न करतात. पण लेखक इथे यशनिर्मितीच्या मार्गाबद्दल नमूद करताना, मूल्यांचे महत्व अधोरेखित करताना विसरत नाही. यश बऱ्याच वेळा तात्पुरते असू शकते; परंतु मुल्ये ही कायमस्वरूपी असतात.
मुल्ये ही आपल्या जीवनाचा आधार आहेत. मानसिक समाधान हे कोणत्या यशापेक्षा कमी नाही. आपण स्वत:च्या नजरेत सुद्धा चांगले बनले पाहिजे. त्यासाठी आपण यशाबरोबरच आपली नितीमुल्ये सुद्धा प्राणपणाने जपली पाहिजेत. महान लोकांचे विचार आदर्श ठेवेले पाहिजेत.
#अधिक वाचा: आपली तत्वे आणि मुल्ये यातील फरक
अति परिणामकारक लोकांच्या सात सवयी
वाचक मित्रांनो आशा करतो की You can Win Book Summary वाचून तुमच्या मनात सकारात्मक विचार जागृत होतील, तुमचा दृष्टीकोन बदलेल, तुम्ही योग्य मार्गाची निवड करून, कृती कराल, यशाकडे जाणारे निर्णय घ्याल, ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल, तुम्ही यशस्वी व्हाल.
तुम्हाला या पुस्तकातून कोणती गोष्ट आवडली? आपला अमूल्य अभिप्राय-मत नक्की कळवा. संकेतस्थळावर काही चुका असतील त्या खालील टिप्पणीद्वारे किंवा ई-संदेशाद्वारे कळवा त्या दुरुस्ती करता येतील आणि हो आपल्याला कोणती पुस्तक वाचायची ते कळवा आम्ही तुमच्यासाठी सारांश नक्कीच बनवू.
the way that you think, feel or behave.
तुमची वैचारिक, भावनिक किंवा वर्तनाची ठेवण किंवा रीत
📑🔖📕📗📖📘📙
पुढे पाहुया आपण आपली मूल्यं कसे निर्धारित करतो, मूल्यं कशी बनतात?
👉तुम्ही जिंकू शकता-भाग-2 -जीवन मूल्ये |
YOU CAN WIN- Part-2 - LIFE VALUES
📑🔖📕📗📖📘📙
इतर संबंधितः
- दृष्टीकोन बनण्याचे रंजक गणित
- दृष्टीकोन बदला आयुष्य बदला -Attitude is Everything
-
- माणूस जसा विचार करतो तसा बनतो As a Man Thinketh
- विचार करा आणि श्रीमंत व्हा Think and Grow Rich
- वाचन करा आणि श्रीमंत व्हा Read and Grow Rich
- सन्याशासारखा विचार करा Think Like a Monk
- विचार बदल आयुष्य बदला Change your Thinking Change Your Life
- मित्र जोडा आणि प्रभावी बना-डेल कार्नेगी- हाऊ टू विन फ्रेंडस् & इन्फ्यूएन्स पीपल
- देहबोली- आपल्या शरिराची भाषा -संवाद साधण्याचे आधुनिक पद्धत
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute
📖 BOOK SHORTS
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
📕📙📘📗
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
- आपल्या कामात एवढे चांगले व्हा की कोणीही तुम्हाला नजरअंदाज करणार नाहीत
- माझं चीज़ कोणी हलवलं? Who moved my Cheese?
- तुमच्या अचेतन मनाची शक्ती-द पावर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
-
- द मॉन्क हू सोल्ड हीज फेरारी-रॉबीन शर्मा
- द पॉवर ऑफ हॅबीट - The Power of Habits
-
- मिनी हॅबीट्स- Mini Habits- सवयी लहान परिणाम महान
- टायनी हॅबीट्स - Tiny Habits-छोट्या सवयी
-
- मायक्रो हॅबीट्स - Micro Habits-सूक्ष्म सवयी
-
- द नाऊ हॅबीट- The Now Habit
- एटामिक हॅबीट- Atomic Habit अॅटॉमिक हॅबिट
- अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी- 7 Habits of Highly Effective People
- मेंदूचे 12 नियम- 12 Rules of Brain
-
- भावनिकदृष्ट्या भक्कम असणा-या लोकांच्या पाच-५ सवयी
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच डॅड-पुअर डॅड
-
#हेही वाचा: आर्थिकः Rich dad poor dad रिच डॅड पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
-
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. |
टिप्पण्या