बिलीव्ह इन युअरसेल्फ-मराठी -जोसेफ मार्फी-Believe in Yourself (Marathi)-स्वतःवर विश्वास ठेवा
डॉ . जोसेफ मार्फीनी स्वतःवर विश्वास ठेवा (मूळ इंग्लिश पुस्तक: बिलीव्ह इन युअरसेल्फ )या पुस्तकात यशप्राप्तीचंरहस्य सांगितलंय. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या आंतरिक क्षमता वापरल्यास ती नक्कीच यशस्वी होऊ शकते,याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलंय . प्रत्येक माणसात जन्मापासूनच अनेक क्षमता असतात.
‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड’ हे जगविख्यात पुस्तकाचे लेखक जोसेफ मर्फी
स्वतःवर विश्वास ठेवा
जोसेफ मर्फी
Believe in Yourself (Marathi)
मराठी संस्करण
पुस्तक परिचय मराठी
Marathi translation of Believe in Yourself
या पुस्तकातून काय शिकाल
- स्वतःची स्वप्ने साकार करण्यासाठी, सत्यात उतरविण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते
- आपल्या अंतर्मनाचा व्यावहारिक उपयोग कसा करून घ्यावा
- आपण स्वतःवरील विश्वासाविना यशाची कल्पनाच करू शकत नाही
- आपल्यापैकी प्रत्येकात जन्मजात अशा क्षमता नैसर्गिकरित्याच आहेत
- यश मिळविण्यााठी अवचेतन मनाची प्रोग्रामिंग करण्यासाठी कशाची गरज असते
लेखकाविषयी
डॉ.
जोसेफ मर्फी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध लेखक, समुपदेशक आणि
व्याख्याते होते. त्यांनी सातत्यानं अनेक पौर्वात्य धर्मांचा अभ्यास केला.
अनेक वर्षं भारतात राहून सखोल संशोधन केलं. ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस
माइंड’ हे डॉ. मर्फींचं सर्व काळातलं बेस्टसेलर पुस्तक आहे.
या पुस्तकात, डॉ. जोसेफ मर्फी, आपल्या जीवनात महान यश मिळविण्यासाठी आपले स्वप्न कसे पूर्ण करावेत हे दाखवून देतात. आपल्यापैकी प्रत्येकात जन्मजात अशा क्षमता नैसर्गिकरित्याच आहेत. योग्य मानसिक रितीने, यशस्वी होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते तुमच्याकडे अगोदरच आहे.
प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या आंतरिक क्षमता वापरल्यास ती नक्कीच यशस्वी होऊ शकते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलंय. प्रत्येक माणसात जन्मापासूनच अनेक क्षमता असतात. विचारांना दिशा दिल्यास माणूस आपल्या अंतर्मनाच्या या क्षमता जागृत करू शकतो. या क्षमतांच्या आणि दिशायुक्त प्रयत्नांच्या बळावर त्याची स्वप्नं सहज साकार होऊ शकतात.
तुम्ही तुमच्या सशक्त मनाला उत्तेजन देऊ शकता, जे एक असे इंजिन आहे जे तुम्हाला वास्तविक जीवनात अप्रत्यक्षरित्या कृती करण्याची शक्ती देत असतो तो म्हणजे आपला अदृश्य परंतू अफाट शक्तींचा भंडार आहे असा अवचेतन मन जो आपल्याला शक्ती देतो. अवचेतन मनाला जी अफाट शक्ती मिळते ती शक्ती आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्म -विश्वासाने मिळत असते.
प्रत्यक्षात, अस्सल आयुष्यात आपल्या अवचेतन मनाची शक्ती अनुभवायची असेल तर आपला आपल्या स्वतःवर प्रथम विश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासाच्या बळावर असाध्य ते साध्य करण्याची प्रेरणा आणि उर्जा-शक्ती आपल्याला आपल्या आतूनच, स्वतःवरील विश्वासानेच मिळत असते, बाहेरून आपण फक्त प्रेरित होतो परंतू प्रत्यक्षात काही करण्यासाठी स्वयंप्रेरणा,. आत्मप्रेरित, स्वतःवरील विश्वासच महत्वाचा असतो.
आपली जी काही स्वप्नं आहेत, आपल्या महत्वाकांक्षा आणि आकांक्षा आहेत त्या पुर्ण करण्याच्या मार्गावर वास्तवात कृती-कार्य करण्यासाठी स्वतःवरील विश्वास आपल्याला प्रेरणा, उत्तेजना व आत्मबळ देईल.
कवि, कलाकार, आविष्कारक आणि उद्योजकांनी विविध क्षेत्रातील साध्यकर्त्यांनी त्यांचे स्वप्न आणि कल्पना आपल्या फायद्याचे आणि फायदेकारक उद्दिष्टे मिळवून त्यांचे अवचेतन मन प्रोग्राम करून आणि आपण आपल्या आयुष्यास समृद्ध करण्यासाठी त्याच पद्धतींचा सहजपणे कसा उपयोग करू शकता हे समजून घेऊ शकता.
ही पुस्तक तुम्हाला आपली स्वप्नं साकारण्यासाठी, ध्येयं गाठण्यासाठी, उद्दिष्टं साध्य करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. जगातील सर्व महापुरूष जे होऊन गेले आहेत, जे आहेत त्यांनी जे काही मिळविले आहे, साध्य केले आहे ते सर्व त्यांच्या आत्मविश्वासामुळेच, आत्मविश्वासाचे महत्व त्यांना कळाले होते त्याचा उपयोग त्यांनी स्वतःला यशस्वी होण्यासाठी करून घेतला.
आजवर अनेक कवींनी, कलाकारांनी, संशोधकांनी आणि उद्योजकांनी अंतर्मनाची शक्ती वापरून पद, पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. तुम्हीही असं देदीप्यमान यश नक्कीच मिळवू शकता. आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकता. स्वतःवर विश्वास ठेवा..!
📗📘📙📕📑🔖
- द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस
माइंड- अवचेतन मनाची शक्ती
- द पॉवर ऑफ पॉजि़टिव्ह थिंकिंग - सकारात्मक विचारांची शक्ती
- चेंज युवर थिंकिंग चेंज युवर लाइफ - विचार बदला आयुष्य बदला
- द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग -मोठं विचार करण्याची जादू
- थिंक ऍण्ड ग्रो रिच -विचार करा आणि श्रीमंत व्हा
- रिड ऍण्ड ग्रो रिच - वाचन करा आणि श्रीमंत व्हा
- ऍटीट्यूड इज एव्हरिथिंग - दृष्टीकोन हेच सर्वकाही
- द पॉवर ऑफ हॅबिट - दैनंदिन सवयींची शक्ती
टिप्पण्या