पाच तासांचा नियम | 5 Hours Rule | 📚 Bookshorts #16

कोणतीही नवी गोष्‍ट, कला, कौशल्‍य, शिक्षण-प्रशिक्षण घेताना असं वाटत असते की एका रात्रीतून आपण त्यामध्ये निःपुणता मिळू शकतो किंवा सर्व काही शिकू शकतो, बटन दाबल्यासारखे जसं उजेड येतो दिवा पेटतो तसं. परंतु तसं नसते.
 
पाच तासांचा नियम

पाच तासांचा नियम
5 Hours Rule for learning

📚 Bookshorts #१६

 

मित्रांनो आपण सर्वजण काही ना काही नवीन शिकू इच्छितो, आपण सर्वांनाच काही ना काही शिकायची इच्छा असते.  एखादे कौशल्य विकसित करायचे असते, एखादी कला आत्‍मसात करायची असते. 

परंतु कुठं ना कुठेतरी नेहमीच आपण असं सुरुवात तर करत असतो परंतु शेवटपर्यंत कधी पोहोचतच नाही. मग अर्ध्यामध्येच ते काम, ती गोष्‍ट सोडून टाकतो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण आरंभ शूर असतो परंतू कृती शून्य असते.

आरंभ शूर पण कृती शून्य

 असं का होत असते?

कित्येकदा जेव्हा आपण काहीही शिकायचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण एक गोष्ट करत नाही आणि ती म्हणजे की, 

  • काय खरंच मला ती गोष्ट शिकायची आहे? 
  • ते कौशल्य शिकायचं आहे? 
  • ती कला आत्मसात करायची आहे? 
  • ते खरोखरच शिकायचे आपण प्रयत्न करत आहोत काय? 
  • त्यामध्ये सातत्य ठेवत आहोत काय? 

कित्येक वेळेस अपयशाचे एक  सर्वांत मोठे कारण असते ते म्हणजे, आपण त्यावर सातत्याने प्रयत्न मेहनत श्रम समर्पणाने करत नसतो, ज्यामुळे आपण कोणतेही नवे कौशल्य शिकू शकत नसतो.

आपल्याला असं वाटत असते की एका रात्रीतून आपण त्यामध्ये निपुणता मिळू शकतो किंवासर्व काही शिकू शकतो, बटन दाबल्यासारखे जसं उजेड येतो दिवा पेटतो तसं. परंतु तसं नसते.


तर मित्राांनो तुम्हालाही अशीच समस्या असेल तर, तुम्हाला हा महत्वाचा पाच तासांचा नियम म्हणजेच ''फाईव्ह आवर रुल'' (5-Hour Rule) वापरून पाहायला पाहिजे. तुमच्या नक्कीच कामाला येईल. 

पाच तासांच्या नियमाला खूप जणांनी, मोठमोठ्या व्यक्तींनी वापरलेलं आहे, याची प्रशंसा केली आहे, त्यांनी याचा उपयोग आपल्या आयुष्यात केलेला आहे ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांमध्ये  यश प्राप्त केला आहे.

या नियमानुसार ते असे म्हणतात की, तुम्ही कोणतीही नवी कला, कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा तुम्हाला किमान म्हणजेच कमीत कमी आठवड्यातून पाच तास त्या कौशल्याला शिकायला, प्रशिक्षित व्‍हायला, आत्‍मसात करायला, द्यायला पाहिजे आणि त्याचा सराव करायला पाहिजे.  

जर तुम्ही आठवड्यातून पाच तास एखाद्या गोष्टीवर लावाल तर तुम्हाला काही दिवसानंतर असं दिसून येईल की, तुम्ही त्या गोष्टींमध्ये निःपुण झालेले आहोत, पारंगत, मास्टर झालेले आहोत.  ते कौशल्य तुम्ही आत्मसात केलेलं असेल आणि हा सातत्याने दररोज केलेल्या सरावाचा परिणाम असतो.

 

अधिक वाचाः 

 


 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive