दोन मिनिटांचा नियम 🕑 | What is Two Minute Rule? | 📚 Bookshorts #15

 दोन मिनिटांत मॅगी... अगदी सहज, सोपी, कमी वेळेत होणारी, चवीलाही चटकदार, आणि दोनंच मिनिटांत बनणारी व खावून संपणारी, पण जिभेला, आपल्‍याला सवय लावणारी मॅगी
कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी, मग ते शिक्षण, अभ्यास, नवं कौशल्य शिकणं असेल, नव्या सवयी बनवण्यासाठी असेल त्यांना हा 2-मिनिटांचा नियम खूपच कामाचा आहे.


दोन मिनिटांचा नियम
What is Two Minute Rule? 🕑


⚛️
Atomic Habits
by James Clear

Marathi

📚 Bookshorts #१५

 

🕑 दोन मिनिटांचा नियम- 2 मिनिट रूल

What is Two Minute Rule? 

मित्रांनो तुम्ही जर तुमच्या आयष्यात तुम्‍ही कोणत्याही सवयीला बनविण्याचा प्रयत्न करत असाल आणि खूप प्रयत्न करूनही, खूप कष्ट करून ही, त्या सवयील १००% पूर्णपणे आपल्या आयुष्यात आत्‍मसात (adopt) करू शकत नसाल तर तुम्हाला लेखक जेम्स क्लिअर यांच्या ऍटॉमिक हॅबिटस् (Atomic Habits) या पुस्तकातून सांगितलेले काही उत्कृष्ट उपायांपैकी एक उपाय तो म्हणजे, दोन मिनिटांचा नियम (2 मिनिट रूल) नक्‍कीच कामाला येईल. 

मॅगी...

दोन मिनिटांत मॅगी... अगदी सहज, सोपी, कमी वेळेत होणारी, चवीलाही चटकदार, आणि दोनंच मिनिटांत बनणारी व खावून संपणारी, पण जिभेला, आपल्‍याला सवय लावणारी मॅगी... 


दोन मिनिटांचा नियम 2 मिनिट रूल

या नियमानुसार, तुम्हाला एखाद्या सवयीला आत्मसात करायचं असेल तर, त्या विषयी खूप जास्त, अती-नियोजन करू नका, तर पुढच्या 2-मिनिटांत त्या गोष्टीला, सवयीला आपण कसं करू शकतो? असा प्रशन करा. 

आणि जेंव्हा तुम्ही नेहमीच कोणत्‍याही कामाला किंवा अशा कामाला जी तुम्‍हाला त्‍याची सवय करून घ्‍यायची असेल अशी गोष्‍ट दररोज फक्‍त २ मिनिटं असं करायला लागता, तेंव्हा एक सवय तयार होत असते. 

आणि असंच दैनंदिन जीवनात सवयी बनवण्यासाठी छोट्या छोट्या, तुकड्यांमध्ये विभागल्या गेल्याने, अंगिकरायला नवीन सवय खूप कठीण न जाता अगदी सहजच आपोआपच आपल्यामध्ये by default सवय बनवली जाते.

दररोज असे दोनच मिनिटे केल्‍याने, त्यामुळे एक सकारात्मक परिणाम होऊन नवीन सवय निर्माण होते आणि आपल्याला जाणवत, कळत देखील  नाही की आपण एक नवी सवय अपल्याला लावून घेतलेली आहे.

कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी, मग ते शिक्षण, अभ्यास, नवं कौशल्य शिकणं असेल, नव्या सवयी बनवण्यासाठी असेल त्यांना इतक्या लहान, छोट्या प्रमाणात करायला सुरू करा की ते आपल्याला अवघड, कठीण न वाटता, अगदी सहज करता आला पाहिजे, त्यापैकीच एक म्हणजे २ मिनिटांचा नियम. 

विचार केला तर, समजा जर तुम्हाला 350 पानांचं एक पुस्तक वाचायचं असेल तर दररोज केवळ 2-मिनिटे पुस्तक वाचा, किंवा 2 उतारे-paragraph किंवा अगदी 2-ओळीच का होत नाहीत पण दररोज वाचा.

वाचण्‍याासाठी, कोणत्‍याही कामाची-गोष्‍टीची सवय लावून घेण्‍यासाठी, त्या गोष्टीला इतकं सहज, सोपं, ते करण्यासाठी लागणारा वेळ इतका कमीत-कमी करून घ्या की कंटाळा, टाळाटाळ करता आला नाही पाहिजे. 

कधी पुस्तकाची जास्तीचीं पानं वाचलात तरीही चालेल परंतु कमीत कमी 2-पानं किंवा दोन मिनिटं वाचायचं हे मात्र विसरायचं नाही. 

दोन मिनिटांच्‍या नियमाचा सकारात्‍मक परिणाम तुमच्‍यावर नक्‍कीच होईल आणि ही दोनच मिनिटांमुळे कधी तुमची सवय बनून गेलेली असेल हे तुम्‍हालादेखिल कळणार नाही.  समजणार नाही.  


अधिक वाचाः 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive