डोक्यात डोकवा -जाणून घ्‍या मेंदूच्‍या आतील घडामोडी -श्रुती पानसे | Dokyat Dokva by Shruti Panse

आपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मुले, विद्यार्थी-पालक-शिक्षक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक

 डोक्यात डोकवा
श्रुती पानसे 

मराठी पुस्‍तक परिचय-परिक्षण

 


पुस्‍तकांत, चित्रांत आपण पाहतो की सर्वांचा मेंदू दिसायला सारखाच असतो परंतू थोड्या-फार फरकाने तो वेगळा असतो.  त्‍याच्‍या आतमध्‍ये होणा-या विविध रासायनिक क्रिया, अभिक्रिया वेळेनुसार, शिक्षणानुसार, अनुभवानुसार या वेगवेगळ्या असतात यामुळेच आपण इतरांपेक्षा वेगळा विचार करत असतो, वेगळे असतो.

आपण कसं शिकतो? अभ्यास आनंदाचा कसा होईल? आपली लर्निंग स्टाईल कोणती? भावना कुठे तयार होतात? आपण विचार कसा करतो? एखादी गोष्‍ट करण्‍याआधी आणि नंतर आपल्‍या मेंदूमध्‍ये नमकं काय हातं? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात.

लेखिका डॉ. श्रुती पानसे यांनी 🧠 मेंदू या विषयावर पी. एचडी. मिळवलेली असून यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त असे पुस्तक प्रत्‍येकाने वाचावे व यातील दिलेल्‍या ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल अशी आशा आहे. 

मेंदू हा मानवी शरीरातील सर्वांत किचकट, गुंतागुंतीने भरलेला, अजूनही संपूर्णपणे न समजलेलं अंग असून आपल्‍याला न उलगडलेलं काेडं आहे.  तरीही दिवसेंदिवस विज्ञान व तंत्रज्ञानाच्‍या विविध शाखा व शास्‍त्रज्ञ मेंदूवर संशोधन, अभ्‍यास करतच आहेत आणि आपल्‍यासाठी नवनवीन शोध, माहिती, मेंदूच्‍या आश्‍चर्यकारक क्षमता यांना उजागर करत आहेत.  परंतू लेखि‍केने पुस्‍तकात म्‍हटल्‍याप्रमाणे विज्ञानावर आधारित कोणतीही गोष्‍ट समजायला अवघड असते असा एक समज आहे, आणि ते सोपं करून सांगता येतं हे या पुस्‍तकाने सिद्ध केलं आहे. 

या पुस्‍तकाद्वारे सामान्‍य विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्‍यक्‍ती असे कोणीही ज्‍यांना वाचता येतं त्‍यांना डोक्‍यात डोकावल्‍यावर कळेल की मेंदू विज्ञान हा काही खूप मोठं रॉकेट सायन्‍स वगैरे नसून दैनंदिन आयुष्‍यात आपण त्‍याचा कळत-नकळत, जाणते-अजाणतेपणी वापर करतच असतो. फक्‍त आपल्‍याला ते माहित नसतं की ते कसं काम करतं? तेच या पुस्‍तकाद्वारे सहज-सोप्‍या भाषेत, अगदी आपल्‍या रोजच्‍या सामान्‍य उदाहरणांद्वारे समजावण्‍यात आलेलं आहे. 

उदाहरणार्थः 

आपला मेंदू आपल्‍याला जे करायला सांगतो तेच आपण करतो, घराबाहेरून मित्र-मैत्रिनीची हाक आल्‍यावर आपण बाहेर जायचं की नाही हे आपला मेंदू ठरवत असतो.  कोणाची हाक आल्‍यावर जायचं आणि कोणाची हाक आल्‍यावर जायचं नाही हे आपले मेंदू ठरवत असतं आणि त्‍यानुसार आपण वागत असतो. 

कधीकधी मेंदूला म्‍हणजेच आपल्‍याला कंटाळा येतो, एखादी गोष्‍ट, एखादे काम नकोसे वाटते, तेव्‍हा नेमकं काय होतं? तर कधी कधी मनात खूप उत्‍सात असतो, खूप प्रसन्‍न वाटतं, स्‍फुर्ती असते अंगात म्‍हणजे नमकं काय असतं?आपल्‍याला गाणी आवडतात, काही आवडत नसतात, खाणे-पिणे, लिहिणे-वाचणे, अभ्‍यास करणे, लक्षात ठेवणे, विसरणे, हसणे-रडणे, यामागेही आपल्‍या मेंदूमहाशयांचा हात असतो.  

नेमक्‍या आवडी-निवडीमागे ठरवण्‍यासाठी आपला मेंदू आपल्‍याला कशी मदत करतो, एखादी गोष्‍ट शिकताना नेमकं डोक्‍यात, मेंदूत काय प्रक्रिया होत असतात? अशा अनेक प्रश्‍नांची उत्‍तरं तुम्‍हाला या पुस्‍तकातून मिळतील आणि तेही ओघवत्‍या, सहज भाषेत. 

मेंदूच्‍या गमतीजमतीही या पुस्‍तकात दिलेल्‍या आहेत. आपल्‍या शरिरातील 15 ते 20 टक्‍के रक्‍त म्‍हणजेच उर्जा एकटे मेंदूच वापरत असते यावरूनच कळेल की आपल्‍या शरिरातील हृदयानंतरचे महत्‍वाचे अंग मेंदूच आहे.

आठवणी कशा बनतात? ऐकणे, बघणे, बोलणे, स्‍पर्शाचे ज्ञान होणे, जखम झाल्‍यास वेदना होतात, त्‍या कशा जाणवतात? स्‍मृती-आठवणी कशा साठवल्‍या जातात?  भावना आणि आठवणी, विचार यांचा संबंध, डावा मेंदू, उजवा मेंदू, मेंदूसाठी आहार, आराम आणि व्‍यायाम, संगीताचा मेंदूशी संबंधी, मन शांत ठेवण्‍यासाठी कसरत, राग, द्वेष, संताप अशांत मन म्‍हणजे नेमकं काय, मन मजबूत करण्‍याासाठी खेळ, इत्‍यादी पहिल्‍या 20 छोट्या-छोट्या प्रकरणांद्वारे समजावण्‍यात आलेलं आहे.  

उर्वरित 20 धडे मेंदूचा आपल्‍या दैनंदिन जीवनात उपयोग व वापरावर भर दिलेला आहे.  मेंदूचं ऐकून करियर करा, अतिताणतणाव कसं आपल्‍यासाठी मारक ठरतं, मेंदूचा उपयोग आपल्‍याला कार्यक्षम करण्‍यासाठी, कौशल्‍य आत्‍मसात करण्‍यासाठी व विकसित करण्‍यासाठी कसा, केव्‍हा आणि किती वापर करावा यावर भर दिलेला आहे. 

आपली शिकण्‍याची शैली कोणती? (Learning Style), आपल्‍या अंतरंगाची शैली, मेंदू विकासासाठी विविध प्रकल्‍पांची मदत कशी होते, चलनवलन, मेंदूचा टी.व्‍ही का आवडतो, वाढत्‍या वयातल्‍या गोष्‍टी, स्‍वतःचा मेंदू दुरूस्‍त करा..! अशा मेंदूशी निगडीत जवळपास सर्वच पैलूंनी युक्‍त अशी डोक्‍यात डोकवा ही पुस्‍तक तुम्‍हाला पुस्‍तकात डोकवायला लावेल.  अशी सर्वसमावेशक माहिती पुस्‍तकात लेखिकेने थोडक्‍यात परंतू आवश्‍यक दिलेली आहे.

प्रत्‍येकाने मेंदूला जाणून घेतल्‍यास ब-याच नवीन गोष्‍टी कळतील, आपल्‍याला पडलेले प्रश्‍न, समस्‍या सुटतील.  मेंदूच्‍याच शिक्षकाने पुस्‍तक लिहिलेलं असल्‍याने कंटाळा येण्‍याचा प्रश्‍नच नाही.  जिज्ञासू विद्यार्थी, पालक, शिक्षक, यांनी वाचून यातील गोष्‍टी आत्‍मसात करावी अशी ही पुस्‍तक आहे.  सहज, सोप्‍या व ओघवत्‍या भाषेत पुस्‍तक असल्‍याने वाचताना कंटाळाही येत नाही.  

 पुस्‍तकात म्‍हटल्‍याप्रमाणे, 

मेंदूला चालना देणा-या खूप गोष्‍टी आहेत. त्‍यासमजून घेतल्‍यास आणि केल्‍यास, मेंदू ताजातवाना राहतो, कामात गुंतवून ठेवलं नाही तर तो बिचाराहोऊन जातो.  म्‍हणून पुस्‍तकात सांगितलेल्‍या गोष्‍टी अनुसरण केल्‍यास, अंगिकारल्‍यास, आत्‍मसात केल्‍यास आपल्‍या मेंदूची कार्यक्षमता वाढेल व आपलीही वाढेल. 

आपण जे खातो त्‍यातून मेंदूला शक्‍ती मिळते, जोमाने काम करण्‍यासाठी त्‍याला मदत होते.  चांगले अन्‍न, आहार मिळाले नाही तर तो  लवकरच थकायला लागतो, कमजोर होत जातो, आणि हळूहळू आपल्‍या क्षमतादेखिल कमकुवत होत जातात.  यासाठी जसे निरोगी आणि बळकट शरीरासाठी जसे अन्‍न आपण खातो ते फक्‍त शरीरासाठीच फायद्याचे नाही तर मेंदूलाही खूप उत्‍साही, कार्यक्षम आणि ताजेतवाने राहण्‍यास मदत करते. 

👉💡अधिक वाचाः जसे अन्‍न तसे तन आणि वैसे मन

आपली वागणूक, वर्तणूक, विचार, दृष्‍टीकोन, आवडी-निवडी, सवयी, शिकण्‍याची शैली, शिकलेली कौशल्‍यं, निसर्गबुद्धी, स्‍मृती, आठवणी, आपण केलेली कृती, यासाठी विजेच्‍या वेगाने दिवस-रात्र, हृदयासारखे न थकता आपल्‍यासाठी काम करत राहणा-या मेंदूविषयी जाणून, त्‍याच्‍या कार्य-काम करण्‍याच्‍या पद्धती समजून घ्‍यायलाच पाहिजे जेणेकरून आपण त्‍याला  उत्‍तमरितीने काम करण्‍यास मदत करू शकतो.  आयुष्‍यात स्‍वतःला घडवण्‍यास मदत करणा-या मेंदूला पर्यायाने स्‍वतःलाच मदत करू शकतो. 

 

इतर संबंधि‍तः 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive