पाच पीडादायक कटू सत्य जे तुम्हाला जाणण्याची गरज आहे | 📚 Bookshorts #४७

धकाधकीच्या, व्यस्त, जीवनातील असे पाच कटू सत्य जे तुम्हाला आजच्या घडीला जाणून घेण्याची गरज आहे...

 Five Bitter & Brutal but Real truths that you need to know

या पाच गोष्टी तुम्ही जाणून घेतलात तर तुमचे आयुष्य बदलून जाईल

Five harsh truths you need to know in life.

 

👉#१. तुम्ही कित्येक महिन्यापूर्वी एखादे हे निश्चित केलं होतं एक गोल-ध्येय बनवलं होतं आणि आजपर्यंत त्याच्यावर काहीही प्रगती केलेली नाही. तर तुम्ही आज या क्षणी, यावर काम करावयास तयार नाहीत आणि आताही विचार करत आहात की उद्या करेन तर याची दाट शक्यता आहे की तुम्ही यापुढेही त्यावर काहीही करू शकणार नाही आणि अशाच प्रकारे महिने, वर्ष निघून जातील आणि तुमचे ध्येय-गोल-ड्रीम स्वप्नच बनून राहून जातील.

 

👉#२. आपल्यापैकी अधिकांश लोकांना हे माहित आहे की आपल्यासाठी या क्षणी सर्वात महत्त्वाचं काम काय आहे? तरीही आपण त्या कामापासून पळ काढून प्रेरणादायी आणि कार्यक्षमतेवरील (मोटिवेशन आणि प्रॉडक्टिविटी) व्हिडिओकडे जात असतो कारण असं केल्याने तुमच्या मनाला असं वाटत असते की तुम्ही काहीतरी महत्वाचं-प्रॉडक्टिव्ह करत आहात.   

खरे तर वास्तवात ही एक (procrastination) म्हणजेच टाळाटाळ, चालढकल करण्याची एक चतुर युक्ती पद्धत आहे.

 

👉#३. जेव्हाही नवीन गोष्ट-गोल-ध्येय बनवण्याचा असतो तेव्हा अधिकतर लोकं हा एक्सक्युज किंवा बहाना बनवतात, सबबी पुढ करतात की, “माझ्याजवळ वेळच नाहीये”.

परंतु त्यांच्या शेड्युलमध्ये म्हणजेच टू-डू, time table, दिनचर्या जर बघितली तर कळून येईल,  आपल्याला माहित होईल ते खरे तर इतके बिझी-व्यस्त नाहीतच. ते तर फक्त अनावश्यक-फालतू गोष्टीवर आपला अमूल्य वेळ वाया घालवत असतात, त्यांना याची जाणीवच नसते की आपला वेळ वाया जात आहे त्यांना वाटत असते आपण काहीतरी काम करत आहोत. जसे- बातम्या पाहणे, गप्पा गोष्टी- चायपेचर्चा करणे, सामाजिक माध्यमांवर अनावश्यक वेळ घालवणे इत्यादी.

 

#हेही वाचा:  सबबी, कारणे सांगणे,  सोडा- स्वयंशिस्तीची शक्ती -ब्रायन ट्रेसी

आजची


👉#४. कधीही असा व्यक्ती बनू नका जो वेळोवेळी स्वतःची समस्या घेऊन तक्रारी करत असतो आणि इतरांकडून सल्ला-ॲडव्हाइस मागत असतो परंतु कधीही त्या समस्यांना सोडवण्यासाठी, सुधार करण्यासाठी काहीही कृती-ॲक्शन घेत नाही. असे करून तुम्ही दुसऱ्या लोकांना त्रास तर द्यालच, परेशान करालंच त्यासोबतच तुमच्या स्वतःच्या नजरेतही तुमचा विश्वास खालावेल.

 

👉#५. तुमची इच्छा असो वा नसो वेळ कुणासाठी थांबणार नाही, थांबतही नाही. तुम्ही थांबवा किंवा न थांबवा वेळ कोणासाठीच थांबत नसतो. हळूहळू तुमच्या अपॉर्च्युनिटी म्हणजेच संधी आणि तुमचे आयुष्य दोन्ही कमी होत आहेत. हे कटू आहे परंतु सत्य आहे.

 


तर तुम्हाला स्वतःच्या कंफर्टझोनमधून- आरामाचे क्षेत्र/मधुकोशातून बाहेर पडून कृती करायला पाहिजे, ॲक्शन घ्यायला पाहिजे. जेव्हाही काही करायचं आहे ते आत्ता, या क्षणी, आजपासूनच करायचे आहे. कारण तुम्हालाही माहित नाही की तुमच्याजवळ किती वेळ शिल्लक आहे.

 

जसे, ब्रायन ट्रेसी नेहमीच म्हणतात,

“तुम्हाला जर तुमचे आयुष्य बदलायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा:
कृती करा, कृती करा आणि आजच कृती करा.

If you want to change your life,
Take action, take action & take action NOW.
-Brian Tracy (Author, Goals, Eat That Frog)

 

#हेही वाचा:  ग्रीट - जिद्द, चिकाटी, सातत्य, हिंमत, सचोटी, चारित्य्र यशस्वी होण्यासाठी यांचे महत्व  

#हेही वाचा: सो गुड दे कान्त इग्नोर you -आपली आवड जपावी पण आवड पैसा कमवून देत नाही असे का?

 


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive