वन पर्सेंट सोल्‍यूशन -3-lessons from The 1% Solution | 📚 Bookshorts #19

पुरस्‍कार जिंकणारे विक्रय क्षेत्रातील व्‍यक्‍ती, टॉप परफॉर्मर्स, सर्वोत्‍कृष्‍ठ विद्यार्थी, आघाडीच्या कंपन्या, जगप्रसिद्ध खेळाडू आणि इतर यशस्वी लोकांमध्ये काय साम्य आहे? त्यांना 1 % ची शक्ती समजते. 

इंडिविज्युअल आणि प्रोफेशनल (वैयक्तिक/व्‍यावसायिक)
या
दोन्ही सक्सेस मिळवण्यासाठी

1% (एक टक्‍का)
उपाय/समाधान
वन पर्सेंट सोल्‍यूशन


The 1% Solution
for Work and Life
How to Make Your Next 30 Days the Best Ever
by Tom Connellan


📚 Bookshorts #१९


 

''वन पर्सेंट सोल्युशन'' या पुस्तकातून तीन महत्त्वाचे धडे
 3-lessons from the book The One Percent Solution

आपल्या आयुष्यात व्यवसायिक आणि वैयक्तिक म्हणजेच इंडिविज्युअल आणि प्रोफेशनल या दोन्ही सक्सेस मिळवण्यासाठी ''वन पर्सेंट सोल्युशन'' या पुस्तकातून तीन महत्त्वाचे धडे नेहमीच लक्षात ठेवा.  


#1. जुन्‍या गोष्‍टी बदलणे

आपल्या आयुष्यात बदल येण्यासाठी परिवर्तन आणण्यासाठी जुन्या सवयींना बदला, वाईट गोष्‍टी सोडा आणि काम करण्याची जुन्या पद्धती बदला आणि स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलचे पूर्वग्रह-समजूती, मतं, beliefs आपण गृहीत धरून ठेवलेले आहेत, कळत-न-कळत पाळून ठेवलेले आहेत ते देखील बदला.

 

#२.  प्रेरणेसाठी कामं-मेहनत करा

मोटीव्‍हेशनसाठी व्हिड‍िओ नाही तर कामं करा.  तुम्‍हाला मोटीव्‍हेशन व्हिडिओ बघून नाही तर ऍक्‍शन घेऊन,
कृती-करूनच मिळेल, तुम्ही एखाद्या कामाला किती जास्त करता तितकंच त्या कामाला करण्यासाठी तुम्ही मोटिव्‍हेटेड, प्रेरित राहता.   जास्तीत जास्त मेहनत करा, कामं करा. कोणी म्हणू शकते तुम्हाला ''वर्क होलिक''.  परंतू तेच तुमच्‍यासाठी मोटीव्‍हेशन असेल.

कृती हीच तुम्‍हाला पुढील कार्य करण्‍यासाठी उर्जा देईल, तेच तुमच्‍यासाठी, तुम्‍हाला कामं करण्यासाठी प्रेरित करत असते,  त्‍यातुनच तुम्‍हाला मोटिवेशन मिळत असते.  

कोणत्याही अमेझिंग-अद्भूत गोष्टीला प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी खूप मेहनत आणि प्रयत्न करायची गरज असते परंतु आपल्याला हार मानून थांबायचं नसते, थांबायलाही नको पाहिजे, आपल्याला पक्क्या इराद्याने सततपणे, पुढं जात राहायला पाहिजे. कन्सिस्टनटली पुढं गेलं पाहिजे

 एक म्‍हण लक्षात ठेवा, कृतीनेच तुम्‍हाला प्रेरणा मिळते. Action Causes Motivation

कृतीनेच तुम्‍हाला प्रेरणा मिळते
Action Causes Motivation


#3.  पुस्तकांचे वाचन करणे

तिसरी गोष्ट जी तुम्ही आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यश मिळवण्यासाठी करू शकता ती म्हणजे, अशाच स्‍वमदत-सेल्‍फ हेल्‍प, स्‍वयंसुधार-सेल्‍फ इम्‍प्रुव्‍हमेंट, स्‍वविकास-सेल्‍फ डेव्‍हलोपमेंट विषयांवरील पुस्तकांचे वाचन करणे जेणे करून तुम्हाला मदत होईल. आयुष्‍यात प्रेरणा मिळत जाईल.  तुम्‍हाला बाह्य प्रेरणेवर अवलंबून राहावे लागणार नाही.  धन्यवाद.

  • स्‍वमदत-सेल्‍फ हेल्‍प
  • स्‍वयंसुधार-सेल्‍फ इम्‍प्रुव्‍हमेंट
  • स्‍वविकास-सेल्‍फ डेव्‍हलोपमेंट

स्‍वतःला आणि त्‍यांच्‍या दृष्‍टीकोनत ज्‍यांना लगेच बदल हवा आहे अशा लोकांसाठी ही पुस्‍तक खूपच उपयोगी ठरेल.  ही पुस्‍तक तुम्‍हाला लगेच सुसाट वेगात पळत सुटायला सांगत नाही, किंवा एकदाच खूपकाही मिळविण्‍यास सांगत नाही तर सावकाशपणे चालत, हळूवारपणे कार्य करून, छोट्या-छोट्या पाऊलांनी, अगदी लहानसे बदल करण्‍यास सांगते. 

तुम्‍ही 100 टक्‍के कधीच मिळवू शकनार नाही कारण वास्‍तविक जगात काहीच शंभर टक्‍के नसतं.  म्‍हणूनच छोटे छोटे बदल स्विकारून पुढे चालण्‍यास ही पुस्‍तक सांगते. 

🔖📕📖📗📘📙📚

 

#बुकशॉर्ट

पुस्‍तकाबद्दल

पुरस्‍कार जिंकणारे विक्रय क्षेत्रातील व्‍यक्‍ती, टॉप परफॉर्मर्स, सर्वोत्‍कृष्‍ठ विद्यार्थी, आघाडीच्या कंपन्या, जगप्रसिद्ध खेळाडू आणि इतर यशस्वी लोकांमध्ये काय साम्य आहे? त्यांना 1 % ची शक्ती समजते. 

आणि आता, तुम्हीदेखील तसेच करू शकता.  न्यूयॉर्क टाइम्सचे सर्वाधिक विकले जाणारे ''वन पर्सेंट सोल्‍यूशन'' पुस्‍तकाचे लेखक टॉम कोनेल  या पुस्तकाद्वारे ते तुम्हाला तुमची लपलेली क्षमता शोधण्यात आणि यश प्राप्‍त करण्यास मदत करतील.

खरं तर हे आहे की विजेते कधीही इतरांपेक्षा 100 टक्के चांगले नसतात. ते इतर शेकडो गोष्टींमध्ये इतरांपेक्षा फक्त 1 टक्के चांगले असतात. उदाहरणार्थ, तुम्हाला माहित आहे का की, ऑलिम्पिक खेळातील सुवर्णपदक विजेते जे खेळाडू येतात जे चौथ्या क्रमांकावर असतात त्यांच्यापेक्षा फक्त 1 टक्के चांगले असतात ?

ही पुस्तक तुम्हाला दाखवून देते की, ''लीवरेज'' ची शक्ति म्‍हणजेच फायदा मिळवण्याच्या सामर्थ्यामुळे तुमच्या कार्यपद्धतीतील लहानसा, छोटासा, सूक्ष्‍म असा बदल देखील तुमच्या परिणामांमध्ये कसा मोठा फरक आणू शकतात,  तुमचे ध्येय तुमच्या व्यवसायाशी किंवा करिअर, कारकीर्दीशी संबंधित आहे किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनातील बदल, लेखक कॉनेलन तुम्हाला हे छोटे बदल शाश्वत बनवण्यात आणि मोठे परिणाम मिळवून देण्यास मदत करते.

पुस्तकात व्यक्त केलेले विचार तुम्ही तुमच्या कृतीत आणि दैनंदिन जीवनात अंमलात आणताच, त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया निर्माण होईल आणि काही दिवसांतच तुमचे जीवन अधिक चांगले होऊ लागेल. या पुस्तकातील व्यावहारिक कल्पना आणि प्रभावी पद्धती यांची सांगड घालण्यात आली आहे. सखोल संशोधन आणि प्रायोगिक पद्धती असल्‍याने पुढील 30 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनवून टाकतील. 

 

लेखकांबद्दलः

टॉम कॉनेलन एक मुख्‍य वक्ते आहेत, यांनी फ़ेडेक्स, सोबीज़, नीमेन मार्क्स, आरबीसी, डेल, कॅनेडियन टायर, सोनी, मेरियट, होम डिपो आणि इतर जागतिक स्‍तरावरील कंपन्‍यांना आपली सेवा दिलेली आहे. 

सेलिंग पावर मॅगज़ीन ने तर त्‍यांना सात "कटू-कठोर परंतू सद्य-सत्‍य कथन" करणा-या मुख्‍य वक्‍त्‍यांपैकी एक यासाठी नामांकित केलं , कारण ते महत्‍वाच्‍या, परिणामकारक विचारांना लपवून, थांबवून ठेवत नाहीत तर ते सत्‍याला उघडपणे सांगत असतात.  

  🔖📕📖📗📘📙📚

 

इतर संबंधितः 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive