पहाटेचा चमत्कार | Miracle Morning चमत्कारी पहाट Hel Elrod | 📚 Booksummary Marathi
चमत्कारिक पहाट
पहाटेचा चमत्कार
पहाटेच्या चमत्कारिक सहा सवयी
Miracle Morning Habits
#BooksummaryMarathi
Hel Helord त्याच्या कंपनीमध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच म्हणजे सर्वात कमी वयाचे टॉप सेल्समन म्हणजे विक्रेता बनले होते. त्यांचे रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध लोकांशी उत्तम चालले होते म्हणजे परिवार ही सुखी होतं आणि ते सुद्धा आनंदी-सुखी होते. थोडक्यात सर्व काही चांगभलं चालू होत.
सुरळीतपणे चालू होतं.
परंतु एके दिवशी जेव्हा ते भाषण देऊन आपल्या घरी चालले होते तेव्हा त्यांचा अपघात झाला. एका दारू पिलेल्या व्यक्तीने 80 किलोमीटर प्रतितास येणाऱ्या गाडीला उडविले होते, धडक दिली होती. यामुळे त्यांचा इतका मोठा अपघात झाला की यामुळे त्यांचा एक पाय मोडला, एक हात तुटला, फुफ्फुस पंक्चर झाले आणि बरेच गंभीर (severe injuries ) मार लागले.
इतकेच नाही तर जवळपास सहा मिनिटांसाठी अपघात झालेल्या जागेवर त्या रस्त्यावर ते मृतावस्थेत होते almost dead आणि मग लवकरच पॅरामेडिकल टीमने त्यांना रिवाईव्ह केलं आणि लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. तिथे जवळपास सहा दिवस कोमा मध्ये-अचेतन अवस्थेत होते. निपचित पडलेले होते. जेव्हा ते जागे झाले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की,
त्यांचा मेंदू नेहमीसाठी निकामी झालेला आहे आणि आता ते कधीही चालू शकणार नाहीत.
permanent brain damage, cannot walk.
हे कळल्यानंतर ते खूप जास्त शॉक अँड सॅड झाले म्हणजे त्यांना धक्काच बसला आणि ते खूप निराश झाले. त्यांना मोठा मानसिक धक्काच बसला. परंतु त्यांनी त्यांच्या मेंटोर कडून एक गोष्ट शिकली होती की,
#आपण कोणत्याही निगेटिव्ह रिझल्ट ज्याला आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करून निगेटिव्ह वाटणे साहजिकच आहे, ठीक आहे परंतु केवळ पाच मिनिटांसाठीच..! त्यापेक्षा जास्त वेळ नाही.
म्हणजेच शब्दशः जेव्हाही काही तुमच्या सोबत काही वाईट होईल तेव्हा मनातल्या मनात एक टाइमर लावा पाच मिनिटे रागवा, दुखी रहा, ओरडा, रडा जे करायचे ते करा परंतु फक्त पाचच मिनिटात असं करा आणि पुढे चालायला लागा, मूव्ह ऑन..! सेट फाईव्ह मिनिट्स टाइमर नॉट मोर.
जास्त नको सकारात्मक पॉझिटिव्ह सोल्युशन किंवा
सकारात्मक मार्गाचा विचार करा एक बुद्धिमान माणूस म्हणून तुम्हाला पाच
मिनिटांपेक्षा जास्त वेळ त्या गोष्टीवर घटनेवर वाया करणे पश्चाताप करणे ज्या
गोष्टीला आपण बदलू शकत नाही असं केल्याने असं करणे केवळ आणि केवळ आपल्या
सद्यस्थिती परिस्थितीला वाईट आणखीन वाईट बनवत असते. चांगलं तर नाहीच परंतु अजूनही खरोखर वाईटच
बनवणे.
म्हणून रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी लढा द्या. बाहेर पडा नकारात्मकतेच्या पुढे चाला सकारात्मकतेने.
नकारात्मक विचार सिच्युएशन अँड लाईफ या दोन्हींना खराबच करेल
नकारात्मक विचार परिस्थिती आणि तुमचे जीवन या दोन्हींना खराबच करतील चांगलं तर नाहीच नाही नक्कीच नाही आणि लेखक हेल एलोर्ड यांनी सुद्धा हीच गोष्ट तेव्हाही चांगल्या रीतीने लक्षात ठेवली आणि हेच नियम आपल्यावर लागू केलं आणि अति-विचार करणं, नकारात्मक विचार करणं बंद केलं आणि त्यांनी एक्सेप्ट केलं की,
ठीक आहे.! आता जास्तीत जास्त दोनच गोष्टी होऊ शकतात की, जसे डॉक्टर सांगत आहेत तसं, की,
एक तर, क्रमांक एक, मी तर कधीही चालू शकणार नाही आणि जर असं झालं तर मी त्या अवस्थेत सुद्धा व्हीलचेल चेअरवर चालणारा जगातील सर्वात सुखी आणि आनंदी व्यक्ती बनवून दाखवीन. आणि
दुसरी गोष्ट काय होईल म्हणजे क्रमांक दोन मी डॉक्टरांच्या बोलण्याला चुकीचे ठरवेल आणि परत दोन पायावर चालून दाखवीन. त्यांना चुकीचं ठरवेल proveदेम रॉंग..!
या दोन गोष्टी ठरविल्यानंतर त्यांनी त्यांचं टेन्शन एकदमच संपून टाकलं. ते हास्यविनोद करू लागले. त्या अवस्थेतही असं करताना पाहून डॉक्टरांना वाटलं लेखक ह्या वास्तविकतेला कटू आणि वेदनादायी-पीडादायक वाईट परिस्थितीला सद्य व सत्य परिस्थितीला एक्सेप्ट करत नाहीत, मान्य करत नाहीत आणि त्यांना खूप खोल धक्का पोहोचलेला आहे.
परंतु सत्य तर काही वेगळेच होत आणि यानंतर पॉझिटिव्ह अटीट्युड आणि सुखाने जगण्याचा परिणाम असा लागला की, लेखक खूप वेगाने बरे होऊ लागले. त्यांची तब्येत लवकरत लवकरात सुधारू लागली. इतक्या लवकर की डॉक्टर सुद्धा अचंबित झाले, हैराण झाले, आश्चर्यचकित झाले. हे कसं शक्य आहे आणि केवळ तीनच आठवड्यात म्हणजे महिनाभराच्या आतच डॉक्टरांना चुकीचे सिद्ध करून लेखक आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून चालणे सुरू केले.
हे सर्व झाल्यानंतर लेखकांच्या जीवनात परत सर्व काही योग्य रीतीने चांगल्या रीतीने चालले होते. लेखक त्यांच्या दैनंदिन-सामान्य जीवनात परत आले होते. अधिक आत्मविश्वासाने ते परत आपल्या सामान्य जीवनात परत आले होते तेही पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वासाने.
त्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये कित्येक रेकॉर्ड ब्रेक केले व नवीन सेल्स रेकॉर्ड स्वतःच्या नावे नोंदविले. खूप सारा पैसा कमावला. स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला. लग्न केले व घर घेतलं आणि सर्व काही बेस्ट उत्तम होऊ लागलं.
परंतु पुन्हा त्यांच्या जीवनात एक मोठा झटका लागला. 2007-08 मध्ये आर्थिक मंदी आली आली. ज्यामुळे त्यांचा व्यवसाय रात्रीतूनच बुडायला लागला ते त्यांच्या आयुष्याच्या सर्वात वाईट अवस्थेत मध्ये होते.
हा असा झटका इतका मोठा होता की तेव्हा ते त्यांच्या जीवनातील सर्वात वाईट अवस्था होती कारण त्यांच्यासोबत वाईट, आणखीन वाईटच होत होतं. ते दर दिवशी गरीब, आणखी गरीब होत चालले होते.
इकॉनोमिक क्रायसेस
इकॉनॉमिक क्रॅश
2008 CRASH STOCKMARKET
त्यांना काहीच कळत नव्हतं की, समजत नव्हतं. अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना एक सल्ला दिला की एका मित्राजवळ जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा.
जो एक श्रीमंत व्यक्ती होता जो त्यांच्या जीवनात खूप चांगले करत होता. त्या वाईट परिस्थितीत सुद्धा मंदीच्या काळातही तो उत्तम स्थितीत होता. यासाठीच लेखक हेल मग त्यांच्याजवळ गेले त्यांची ॲडव्हाइस म्हणजे त्यांचा सल्ला घेण्यासाठी.
लेखकाने त्यांच्यासाठी त्यांची परिस्थिती त्यांच्या मित्राला समजावून सांगितली. ते किती चिंतेत आहे, परेशानीत आहेत. त्यांचा व्यवसाय देखील वाईट अवस्थेत आहे आणि त्यांच्याकडून काही बिझनेस टिप्स व्यवसायाच्या युक्त्या-पद्धती मागितल्या.
त्या परिस्थितीला सुधारण्यासाठी तेव्हा त्या मित्रांनी हॅलला म्हणजेच लेखकांना असे सांगितले की तुम्हाला आता व्यवसायासाठी सल्ला नाही तर तुम्हाला दोन गोष्टी करण्याची गरज आहे पहिली गोष्ट म्हणजे दररोज सकाळी लवकर उठून एक्सर्सइज म्हणजेच व्यायाम करा आणि दुसरी गोष्ट व्यायामंतर कोणतीही एक सेल्फ इम्प्रोव्हमेंटवरची पुस्तक वाचा म्हणजेच स्वयं-सुधारणा करणारी सेल्फ हेल्प पुस्तक वाचा.
#क्रमांक एक: दररोज व्यायाम करा
डू डेली मॉर्निंग एक्सरसाइज#क्रमांक दोन: स्वतःचा विकास सुधारणा करण्यासाठी पुस्तक वाचा
दररोज स्वतःचा विकास करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी एखादी पुस्तक वाचा
हा सल्ला लेखकांना जरासाही आवडला नाही आणि ते तिथून निघाले आणि जसे की त्यांना अजून काही समजतच नव्हतं त्यामुळे त्यांनी त्या मित्रांनी दिलेला सल्ला आत्मसात करायचं, उपयोगात आणून बघायचं ठरवलं.
इव्हन पेगण हे हेल यांचे एक मेंटलिस्ट होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मॉर्निंग रिच्युअल असणं म्हणजेच सकाळी लवकर उठून विशिष्ट पण योग्य चांगल्या गोष्टींना दररोज करून त्यांची एक सवय बनवणे दिनचर्या बनवणे ही एक सिम्पल परंतु खूपच इम्पॅक्टफुल परिणामकारक अशी गोष्ट असते जीवनात यशस्वी होण्यासाठी.
IT IS THE MOST IMPACTING TOOL TO BECOME SUCCESSFUL
जो पहाटेला जिंकतो तो संपूर्ण दिवस जिंकत असतो
एक चांगली दिनचर्या मॉर्निंग रिच्युअल आपल्या मनाला आणि मेंदूला SHAKE करत असते हादरवून सोडत असते ज्यावर आधारित आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. यासाठीच लेखक हॅल हेलोर्ड यांनी असंच ठरवलं की ते सकाळी उठून फक्त एक्ससाइज आणि बुक रीड करतील म्हणजेच व्यायाम करतील आणि पुस्तकच वाचतील. फक्त पुस्तकच वाचणार नाही तर ते शोधतील ते सर्व गोष्टी बेस्ट ऑफ द बेस्ट गोष्टी ज्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीने केल्या आहेत, यशस्वी व्यक्तिमध्ये असतात.
सफल व्यक्तीने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तित्व सुधार किंवा स्वयं-सुधार, स्वयं विकास वैयक्तिक विकासासाठी आणि स्वतःला पुढे नेण्यासाठी करत असतो अशा सर्व गोष्टी शोधतील आणि त्या सर्वांचा एक रिच्युअल बनवून, एक सवय बनवून, एक दिनचर्या बनून त्याला दररोज करतील.
दे साईटेड टू मेक रिच्युअल बाय कम्बाईनिंग द बेस्ट हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल
मॉर्निंग रिच्युअल्स मीन्स स्पेसिफिक थिंग्स डेली इन मॉर्निंग अँड मेकिंग हॅबिट ऑफ इट.
मॉर्निंग रीचूअल्स दिनचर्या हि सवय खूपच परिणामकारक अशी सवय आहे.
मग त्यांनी खूप रिसर्च केलं, शोध घेतला तेव्हा त्यांना सर्वात महत्त्वाच्या मुख्य आणि सामान्य सवयी मिळाल्या मोस्ट इम्पॉर्टंट अँड कॉमन हॅबिट्स ज्या जवळपास प्रत्येक यशस्वी व्यक्तीने फॉलो केलेल्या होत्या, यशासाठी अनुसरण केलेलं होतं.
आता या सहा सवयी खूपच जास्त परिणामकारक प्रभावी होत्या. व्हेरी इम्पॅक्टफुल हॅबिट्स यासाठीच लेखकांनी या सर्वांना एकत्र रिच्युअल बनवून करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती तेव्हा लेखक 50 हजार डॉलर चे कर्ज लोकांचे देणे होते. तेवढे कर्ज त्यांच्यावर होतं उधारीवर कर्ज घेतलं होतं. त्यांचं घर त्यांच्यापासून हिरावून जाणार होतं. यामुळे ते स्वतःला अस्वस्थ आणि उदास वाटून घेत होते. स्वतःला खराब करत होते, दुखी होते.
परंतु या सहा सवयींची पहाटेच्या सहा सवयींची मॉर्निंग रुटीन सुरू करण्याच्या केवळ दोन महिन्याच्या आतच त्यांनी त्यांचे उत्पन्न डबल केले, दुप्पट उत्पन्न वाढवलं, स्वतःचं घर वसवलं आणि काही काळात फिट तंदुरुस्त होऊन एक अल्ट्रा मॅरेथॉन पाळण्याची शर्यतीत भागसुद्धा घेतला आणि एक आनंदी सुखी माणूस म्हणून जगू लागले..!
होय, तोच व्यक्ती ज्याला डॉक्टरांनी म्हटलं होतं की तो कधीही चालू सुद्धा शकणार नाही त्यांनीच एक अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजेच पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता आणि हे सर्व इतक्या वेगाने जलद गतीने झालं की लेखक स्वतः हैराण आश्चर्यचकित झाले.
पहाटेच्या आश्चर्यकारक चमत्कारीक सहा सवयी ज्या तुमचे जीवन बदलू शकतात नित्य-नियमाने-संयमाने-समर्पणाने-सातत्याने-दैनंदिन या सवयींना अनुसरून आपणसुद्धा यशस्वी होऊ शकतो. आनंदी-सुखी-समृद्ध जीवन जगू शकतो. त्यासाठी फक्त गरज आहे एखाद्या उद्देशाची, उद्देशाच्या, ध्येयाच्या मार्गावर चालण्याची, त्यावर टिकून राहण्याची.
चला तर मग पाहूया या सकाळच्या चमत्कारिक सहा सवयी कोणत्या ज्या खूपच परिणामकारक आणि यशस्वी आहेत.
यासाठी त्यांनी या पुस्तकाचे नाव देखील चमत्कारी पहाटेच्या सवयी म्हणजेच मिराकल मॉर्निंग असं ठेवलं. कारण हे सर्व त्यांच्यासोबत घडलं ते एखाद्या चमत्कारापेक्षा (Miracle) कमी नव्हतं.
आता तुम्हाला पण या सवयी कोणत्या आहेत ते जाणून घ्यायचं असेल ज्यांच्या मदतीने तुम्ही देखील तुमचे जीवन बदलू शकता, त्या सवयींना एक रिच्युअल एक दिनचर्या बनवून तुम्हाला देखील अनुसरण करायला पाहिजे.
या सहा सवयींना लक्षात ठेवण्यासाठी एक अक्रोनिम फॉर्म केलं आहे एक शब्द बनवला आहे ज्याच्या मदतीने आपण त्या सहा सवयी लक्षात ठेवू शकतो. सहा सवयी लक्षात ठेवण्यास मदत होईल याला लेखकांनी सेव्हर्स SAVERS असे नाव दिले आहे. यात तीन पहिलं अक्षर सुरू होतो एस-S या इंग्रजी वर्णाने ज्याला आपण पहिली सवय म्हणू शकतो ती आहे S-सायलेन्स म्हणजेच शांती निवांतपणा सायलेन्स शब्दाद्वारे लेखक आपल्याला मेडिटेशन किंवा प्रेयर म्हणजेच प्रार्थना-ध्यानधारणा करणे शांतपणे बसून लक्ष केंद्रित करणे, ध्यान लावणे याचे महत्त्व समजावतात व तसे करण्याचा सल्ला देखील देतात.
S – SILENCE शांती
A – AFFIRMATIONS पुनरावृत्ती
V – VISUALIZATION मनसिक प्रतिमा
E – EXERSIZE व्यायाम
R – READ वाचन
S – SCRIBING लिहिणे
#1. S – SILENCE शांती
बरेच जण सकाळी उठतात जगभरातील गोष्टींचा ताण घेत असतात. काही जण बातम्या वाचून-टीव्हीवर बघून, काहीजण फेसबुकवर चेक करून. परंतु यशस्वी लोकं हे सर्व करत नाही ते सामान्यपणे सकाळी उठल्यावर सायलेंट मोड मध्ये जातात म्हणजेच ध्यान करत असतात.
यामुळे त्यांच्या मेंदूला आराम मिळतो (रिलॅक्स आणि काम) शांत-निवांत वाटत असते. शरीर ताजेतवाने असते मेंदू तरतरीत असतो त्याला इतर कोणतेही काम-तान न देता शांत, एकाग्र करत असतात आणि मेंदूला पीक परफॉर्मन्स म्हणजेच सर्वोच्च कार्यक्षमतेमध्ये कार्य करण्यासाठी तयार करत असतात.
अगोदर लेखक यांना वाटत होतं की मेडिटेशन फक्त एक स्पिरीचुअल म्हणजेच धार्मिक गोष्ट असते ज्याचा यशस्वी होण्याशी दूर-दूर पर्यंत काहीही संबंध नसतो. परंतु शोध घेतल्यावर रिसर्च केल्यावर आणि यशस्वी लोकांबद्दल वाचन करत गेल्यावर त्यांना असं कळालं की मेडिटेशन एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे त्या यशस्वी लोकांना पुढे जाण्यासाठी सर्वात जास्त मदत केलेली आहे.
खरे तर एक बिलियन म्हणजेच अब्जाधीश शेअर मार्केटचा हेज फंड मॅनेजर, “रे दालिओ” असे म्हणतात की,
मेडिटेशन हे फायनान्शिअल सक्सेसची नंबर वन किल्ली आहे.
-हेज फंड मॅनेजर, रे दालिओ
म्हणजेच ध्यानधारणा करणे त्यांच्या आर्थिक यशाची गुरुकिल्ली आहे, तेही क्रमांक एकची आणि केवळ तेच नाही तर जवळपास प्रत्येक मोठ्या कंपनीचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या मेंदूला सर्वोच्च क्षमतेने काम करण्यासाठी पीक परफॉर्मन्सवर नेण्यासाठी आणि डिसिप्लिन म्हणजेच शिस्त ठेवण्यासाठी मेडिटेशन म्हणजेच ध्यान-धारणा याला क्रेडिट देतात.
यासाठी सर्वात प्रथम गोष्ट सर्वात आधी पहाटे उठल्यावर सायलेन्स मोड मध्ये जा म्हणजेच ध्यान धरणा प्रार्थना योग प्रार्थना करा नक्कीच परिणाम दिसतील.
#2. A-AFFIRMATION अफरमेशन्स
एक शक्तिशाली टेक्निक आहे, महत्वच तंत्र आहे ज्याला कित्येक यशस्वी लोकं वापरतात. अफर्मेशन अजून काही नसून केवळ एक सकारात्मक परंतु शक्तिशाली स्टेटमेंट म्हणजेच वाक्य असतो जो आपण स्वतःशी वारंवार बोलत असतो. ज्यामुळे ती गोष्ट आपल्या अंतर्मनात सबकॉन्शिअस माइंड मध्ये जाऊन बसते. आपला मेंदू त्या गोष्टीला खरं मानायला लागतो, त्याला खरं वाटायला लागते. नंतर मनाला वास्तविक आणि काल्पनिक यामध्ये फरक करता येत नाही आणि आपण वास्तवात सुद्धा तसेच बनायला लागतो.
उदाहरणार्थ,
जर तुम्ही स्वतःशीच असं म्हंटले की,
- मी एक आत्मविश्वास व्यक्ती आहे
- मी एक कॉन्फिडंट व्यक्ती आहे
- मी एक परफेक्ट व्यक्ती आहे
![]() |
#अफर्मेशन: सकारात्मक परंतु शक्तिशाली स्टेटमेंट |
असं वारंवार करत राहिल्याने, बोलत राहिल्याने, वागत राहिल्याने तुमच्या मनात ही गोष्ट इतकी घट्टपणे रुतून बसेल तुम्हाला समजायला लागेल आणि एकदा का ही गोष्ट तुमच्या सबकॉन्शिअस म्हणजेच अंतर्मनांमध्ये फिट बसली, घट्ट बसली, खोल अंतर्मनात प्रवेश केला की नंतर तुम्ही वास्तवात सुद्धा एक कॉन्फिडंट व्यक्ती बनायला लागाल.
यासाठी अजून एक क्लुप्ती आहे युक्ती आहे ती म्हणजे, “फेक इट टिल यू मेक इट” म्हणजे, जोपर्यंत तुम्ही तसे होत नाही तोपर्यंत असं वागण्याचा, तसं बघण्याचा, खोटेपणा करा वास्तवात येईपर्यंत तसे वागा.
#3. V-VISUALIZATION
तिसरा शब्द आहे व्हिजुलायझेशन म्हणजेच आपल्या मनात मानसिक चित्र उभे करणे,
![]() |
क्रिएट इमेजेस इन माईंड फॉर द डिजायर |
तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये एकच गोष्ट वारंवार पुनरावृत्ती करून घट्ट बसवत असतात तर विज्वलायझेशन मध्ये हीच गोष्ट तुमच्या कल्पनेचा उपयोग करून त्या गोष्टीबद्दल विचार करून करून त्या गोष्टीची प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये बनवतात कल्पनेद्वारे जी तुम्हाला वास्तवात खऱ्या आयुष्यात पाहण्याची इच्छा आहे, बघण्याची बनण्याची इच्छा आहे.
![]() |
हेही वाचा: माणूस जसा विचार करतो तसा बनतो |
उदाहरणार्थ,
जेव्हाही लेखकाला मॅरेथॉनच्या प्रॅक्टिसला जायचं असेल तेव्हा त्यांना सुरुवातीला खूप अडथळे येत होते परंतु जेव्हा त्यांनी विजवलाईज-Visualize करणं सुरू केलं, कल्पनाचित्र उभं करणे सुरू केलं त्याची प्रॅक्टिस करायच्या एक तास अगोदर ते व्हिज्युअलाईस करत असत की,
- ते जॉगिंग-व्यायाम करायला जात आहेत,
- आपले शूज म्हणजे बूट घालत आहेत, आणि
- त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल म्हणजेच एक आनंद आहे आणि
- त्यांना चांगलं वाटत आहे, समाधानी वाटत आहे.
तर असं विज्वलाइज करत राहिल्याने लेखकांना प्रॅक्टिस करायला जाणं खूप सोपं झालं होतं. असंच तुम्ही देखील वेगवेगळ्या गोष्टींसाठी विज्वलायझेशनचा वापर करू शकता म्हणजेच तुम्हाला ज्या गोष्टी करायचे आहेत त्या गोष्टींचा डोक्यामध्ये कल्पनाचित्र उभं करायचा सराव करायचा आहे.
#4. EXERCISE व्यायाम
क्रमांक चौथा येतो E म्हणजेच एक्सरसाइज:
एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम केल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये जास्तीचा प्राणवायूचा पुरवठा होतो ऑक्सिजनची लेव्हल वाढते. तुमच्या मेंदूमध्ये endorphin नावाचा संप्रेरक-हार्मोन स्त्रवत असतो रिलीज होत असतो. तुमचा मेंदू रक्तामध्ये इंडोरफीन नावाचा होर्मोन रिलीज करतो. तुमची थिंकिंग क्लियर होते म्हणजे तुमचे विचार स्पष्ट होतात, तुम्हाला बेटर फील होतं तुम्हाला चांगलं वाटायला लागतं तुमची एनर्जी लेवल म्हणजे तुमची ऊर्जा पातळी वाढते संपूर्ण दिवसासाठी.
![]() |
#व्यायाम: मेंदू रक्तामध्ये BDNF, इंडोरफीन नावाचा होर्मोन रिलीज करतो |
#हेही वाचा: स्पार्क- व्यायामाचे महत्व, विज्ञान, फायदे पुस्तक सारांश Spark booksummary
असेच खूप वेगवेगळे फायदे होतात एक्सरसाइजचे म्हणजेच व्यायामाचे. आता हे सर्व फायदे घेण्यासाठी लेखक असं काही म्हणत नाहीत की तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम शाळेत जाऊन एक्सरसाइज करनच गरजेचं आहे किंवा व्यायाम करण्यासाठी व्यायाम शाळेत जाणच आवश्यक आहे असं नाही असेही नाही.
खरे तर हे सर्व फायदे तुम्हाला पहाटे काही मिनिटं व्यायाम करूनही तुम्हाला मिळू शकतात. तसं पाहता खरे तर सकाळी केवळ एक मिनिटाच जम्पिंग जॅक हा व्यायाम प्रकार केल्यानेच तुमची एनर्जी तुमचा अवेअरनेस तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट यांना दहापट वाढवू शकता. म्हणजेच तुमची ऊर्जा तुमची शक्ती तुमची स्वयं-जाणीव, तुमच्या विचारांची स्पष्टता यांना तुम्ही दहा पट वाढू शकतात.
#हेही वाचा: फाईव ए.एम. क्लब- सकाळी केवळ एक तास स्वतःसाठी-पुस्तक सारांश
Five AM Club 🕔 by Robin Sharma
यासाठी तुम्ही रॉबिन शर्मा यांची five AM Club 🕔 by Robin Sharma ही पुस्तक वाचू शकता या पुस्तकात पहाटेच्या एका तासाचे महत्त्व सांगितलेले आहे म्हणजेच 60 मिनिटांमध्ये तुम्ही वीस वीस वीस असे ट्वेंटी-ट्वेंटी- ट्वेंटी 20-20-20 मिनिटांचे वेगवेगळे कार्य करण्याचे सांगितले आहे त्यामध्ये वीस मिनिटे व्यायाम वीस मिनिटे अभ्यास वीस मिनिटे असे विभागलेली केलेली आहे miracle मॉर्निंग सोबतच तुम्ही फाईव्ह एम क्लब ला जॉईन व्हा..!
आता पाचवा शब्द येतो आर म्हणजेच रीडिंग साठी म्हणजेच वाचन
#5. READING वाचन
रीडिंग याचा अर्थ वर्तमानपत्र किंवा फिफ्टीन शेड ऑफ ग्रे यासारखी पुस्तक वाचायची नसून खरंतर अशी पुस्तकं वाचणं जी तुम्हाला विकसित करतील, तुमच्यामध्ये सुधारणा आणतील म्हणजेच सेल्फ डेव्हलपमेंट बुक्स, सेल्फ इम्प्रूमेंट बुक्स.
उदाहरणार्थ, स्वयं मदतीवर आधारित पुस्तक सेल्फ हेल्प बुक्स अशी पुस्तकाची यादी ई-वाचनालयावर तुम्हाला वाचायला मिळतात.
📖 List of Books📚
📖 Booksummary
📚 Bookshorts
📚 BookReview
वाचनाचा अर्थ वर्तमानपत्र वाचायचं नसून अशा पुस्तक वाचन करण्याचा ज्यामुळे तुमची मदत होईल तुमच्या ज्ञानात भर पडेल, तुमची जाणीव वाढेल, ही तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणणे अशा पुस्तकाना वाचण्यास लेखक सांगत आहेत.
पुस्तक वाचल्याने स्वयं मदत तर होतेच त्यामध्ये तुमची सुधारणा होते तुमच्या ज्ञानात भर पडते, तुमच्या माहितीत वाढ होते इंटेलिजन्स आणि अवेअरनेस वाढते स्व-मदत स्व-विकास स्व-सुधार यावरच ई-वाचनालयाचा मुख्य हेतू आहे. म्हणून तुम्हाला या संकेतस्थळावर अशाच पुस्तकाचे सारांश-लेख-युक्त्या-क्लुप्त्या मिळतील, मिळत आहेत जी तुम्हाला स्वतःला सुधारण्यासाठी मदत करतील. वाचनातील यावरच आधारित हे संकेतस्थळ आहे स्वयं मदतीची पुस्तके वाचून तुम्हाला नक्कीच स्वतःसाठी काही मदत होईल.
शेवटचं अक्षर आहे एस याचा अर्थ होतो स्क्रबिंग म्हणजेच रेखाटने रे-घोट्या ओढणे थोडक्यात सांगायचे तर लिहिणे...!
#6. S-SCRIBING म्हणजेच लिहिणे
स्क्रबिंग म्हणजेच लिहिणे रायटिंग तुमची ध्येय, स्वप्न, तुमचे उद्दिष्ट लिहिणे.
लिहिण्याने काहीतरी विशेष गोष्ट होत असते जी खूपच शक्तिशाली असते. जी आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात-सत्यात-वास्तवात आणण्यास खूप मदत करत असते.
रिचर्ड ब्रानसन जे एक अब्जाधीश आहेत,लिहिण्याच्या सवयीमुळे आहेत. सर्वात चांगली गोष्ट ज्यामुळे आज एक अब्जाधीश बनू शकले ती तुम्ही सुद्धा करू शकता आणि ती म्हणजे आपल्या सोबत नेहमीच एक पेन आणि डायरी छोटीशी का असेना ठेवावी तुम्हाला नेहमीच जे विचार-कल्पना-आयडिया किंवा युक्ती सुचते अशा महत्त्वाच्या गोष्टी त्या डायरीमध्ये नोंद करत चला, लिहित रहा. दररोज.
थोडक्यात जर्नलिंग किंवा डायरी लिहिणे असेही तुम्ही याला म्हणू शकता. थोडक्यात लिखाणाला येथे महत्त्व दिलेला आहे. यामध्ये मग लेखकासारखे लिहिणे कथा गोष्टी एखादे मोठे जाडजुड पुस्तक लिहिणे याचा अर्थ इथे होत नाही.
खरे तर आपल्या मनामध्ये आपल्या, मेंदूमध्ये आपल्या, डोक्यामध्ये ज्या गोष्टी आपल्या सुधारण्यासाठी आवश्यक आहेत, स्वतःच्या मदतीसाठी आवश्यक आहेत त्या कल्पना, त्या गोष्टी, तो आयडिया आपल्या मनात आल्याबरोबर त्याला रेखाटून घेतल्यास किंवा एखाद्या कागदावर एखाद्या वहीवर एखाद्या डायरीमध्ये लिहून काढल्यास खूप फायदा होतो.
आजकाल तर आपल्याला डिजिटल नोटबुक सुद्धा मिळतात म्हणजेच आपण मोबाईलवर सुद्धा त्याची नोंद करू शकता. डिजिटल डायरी बनवू शकता. संगणकावर सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकता. त्याची मदत घ्या त्याच्यावर लिहिते व्हा, लिहिण्याचे फायदे खूप आहेत त्यासाठी तुम्ही खालील काही पुस्तकं दिलेले आहेत यांचे वाचन आवश्य करा.
#जसे-
👉बर्क हेजेस यांची पुस्तक: वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉राईट इट मेक इट हॅपन
👉रायटिंग इज थिंकिंग 🤔
👉राईट डाऊन
👉ध्येय ठरविण्याचे फायदे Brian Tracy Goal 🥅
👉ध्येय लिहून काढण्याचे महत्व Importance of writing goals
👉वारेन बफेट यांची ध्येय निवडण्याची 20/5 पद्धत
👉ध्येय ठरविण्याची S.M.A.R.T.E.R. पद्धत
एक पेन आणि डायरी छोटीशी का असेना सोबत ठेवावी, तुम्हाला नेहमीच जे विचार, ज्या कल्पना किंवा युक्ती सुचते अशा महत्त्वाच्या गोष्टींना त्या डायरीमध्ये लिहित रहा. दररोज.
ही सहज, सोपी, छोटीशी वाटणारी गोष्ट तुम्हाला खूप मोठी मदत करेल. बरीच लोकं दैनंदिनी लिहितात म्हणजेच डायरी लिहितात. आजच्या भाषेत त्याला जर्नलिंग (Journaling) असे म्हणतात. यामध्ये ते त्यांच्या काही विशिष्ट गोष्टी, विचार, कल्पना, महत्त्वाच्या नोंदी लिहितात. याची खूप मदत होत असते.
आपल्यासाठी व स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी वाढ व विकास होण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी यासाठीच तुम्हीसुद्धा एक सवय लावून घ्या ती म्हणजे लिहिण्याची सवय करून घ्या आणि दररोज किमान दहा मिनिटे तरी स्वतःसाठी व्यक्त करण्यासाठी द्या.
लिहिते व्हा. व्यक्त व्हा. मुक्त व्हा.
![]() |
डायरी: फॉर थॉट्स, नॉलेज |
आज स्मार्टफोनमध्ये देखील शॉर्ट नोट देण्यासाठी ॲप डिजिटल म्हणजेच आभासी डायरीपेक्षाही प्रत्यक्ष आहेत जसे नोट, गुगल कीप, इत्यादी परंतु डिजिटल अभासी डायरीपेक्षाही प्रत्यक्ष-फिजिकल डायरी नोंदवही कधीही चांगली असेते असे वाटते. कारण आपल्याला ती जाणवत असते कोणतीही का असेना लिहिण्याची सवय ठेवा फिजिकल किंवा डिजिटल.
- Physical diary
- Digital diary
#BOOKSHORT | थोडक्यात
सिक्स मॉर्निंग हॅबिट्स फॉर सक्सेसफुल पीपल
S – SILENCE शांती - मेंदूला -शिस्त- ध्यान-लक्ष केंद्रित, एकाग्रतेत वाढ
A – AFFIRMATIONS पुनरावृत्ती -सकारात्मक - स्वतःशीच वारंवार बोलणे
V – VISUALIZATION मनसिक प्रतिमा - सकारात्मक कल्पनाचित्र उभं करणे
E – EXERSIZE व्यायाम- ऊर्जा-शक्ती-विचारांची स्पष्टता २०-२०-२०
R – READ वाचन- सेल्फ डेव्हलपमेंट, इम्प्रूमेंट बुक्स
S – SCRIBING लिहिणे- लिहिते व्हा. व्यक्त व्हा. स्पष्ट व्हा. मुक्त व्हा
#लक्षात ठेवा: जो पहाटेला जिंकतो तो संपूर्ण दिवस जिंकत असतो.!
आता जितकं महत्त्वाचं आपल्यासाठी ह्या नव्या सवयी बनवणं असतं त्यापेक्षाही कित्येक पट महत्त्वाचं असतं वाईट सवयींना नष्ट करणे, संपवणं, काढून टाकणं किंवा बदल करणे यासाठी याच संकेतस्थळावर वाईट सवयी कशा सोडवाव्या आणि नव्या सवयी कशा रुजवाव्या यासाठी ऍटोमिक हॅबिट्स या पुस्तकाच्या सारांशमध्ये सांगितलेला आहे तुम्ही इथून वाचू शकता ऍटोमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लियर.
#हेही वाचा: ऍटोमिक हॅबिट्स- वाईट सवयी कशा सोडवाव्या आणि नव्या सवयी कशा रुजवाव्या - पुस्तक सारांश Atomic Habits by James Clear (Marathi)
वरील सेव्हर (SAVERS) सवयी आणि करण्यासाठी स्वतःच्या जीवनात चांगल्या सवयी बनविण्यासाठी मिरॅकल मॉर्निंग ही पुस्तक खूपच मदतगार होईल तुम्हाला जीवनात बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला तुमच्या मध्ये सुधारणा घडवण्यासाठी नक्कीच ही पुस्तक खरेदी करा वाचन करा.
🙏🙏
धैर्यापुर्वक पुस्तक
सारांश वाचन केल्याबद्दल तुमचे
अभिनंदन, आभार, धन्यवाद..!
असेच वाचत राहा, शिकत राहा, समृद्ध होत राहा.
टिप्पण्या