वेळ सांभाळा आयुष्य सावरेल- ब्रायन ट्रेसी मराठी | मास्टर युवर टाइम मास्टर युवर लाइफ- Master Your Time, Master Your Life (Marathi)
वेळ अमूल्य आहे, “Time is money”, असे आपण खूप वेळा ऐकलं आहे परंतू खरोखरच आपल्याला त्याची जाणीव नाही की, आपल्याजवळ अधिकचा वेळ नाही, आणि आपण कुणाकडून उसणेही घेऊ शकत नाही.
वेळ सांभाळा आयुष्य सावरेल
ब्रायन ट्रेसी
Master Your Time, Master Your Life
The Breakthrough System to Get
More Results, Faster, in Every Area of Your Life
आपण सर्वांनी ''वेळ अमूल्य आहे, वेळ म्हणजेच पैसा'' किंवा “Time is money”, ''आपण अधिक पैसा मिळवू शकता परंतू आपल्याला अधिक वेळ मिळू शकत नाही'', एकदा गेलेली वेळ आपण परत आणू शकत नाही, असे आपण खूप वेळा ऐकलं आहे. परंतू खरोखरच आपल्याला त्याची जाणीव नाही की, आपल्याजवळ अधिकचा वेळ नाही, आणि आपण कुणाकडून उसणेही घेऊ शकत नाही.
आपण आपला अमूल्य वेळ इतर अनावश्यक गोष्टींवर वाया घालवण्याऐवजी त्या वेळेवर आपले नियंत्रण मिळवू शकतो आणि आपल्या आहे त्या आयुष्यात त्या वेळेचा सदुपयोग करून सुखी,समाधानी आणि समृद्ध जीवन जगू शकतो.
इट दॅट फ्रॉग या आंतरराष्ट्रीय बेस्टसेलिंग पुस्तकाचे लेखक ब्रायन ट्रेसी आपल्याला कोणतं
काम कधी करावं (WHAT & WHEN) याचं अनोखं तंत्र सांगताहेत.
आपली कामांची यादी "टू डू
लिस्ट" इतकी लांबलचक असते की, आपल्या आयुष्यात एक प्रकारचं
साचलेपण येतं. यावर अनेक जण उत्तर देतात की, मुळात ही वेळच अशुभ आहे.!
पण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, उत्पादन क्षमता कशी वाढवावी याचा मूलमंत्र देणारे तज्ज्ञ व बेस्टसेलिंग लेखक ब्रायन ट्रेसी हे मास्टर युवर टाइम मास्टर युवर लाइफ या पुस्तकात एखादं काम त्या त्या वेळीच पूर्ण करण्याचं महत्त्व सांगताहेत.
आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपण वेळेचा सदुपयोग केला तर आपल्याला आजवर कधीच मिळाले नाहीत असे आश्चर्यकारक परिणाम प्राप्त होतील! लेखकाचा वैयक्तिक अनुभव आणि उत्पादनक्षमता कशी वाढवावी यावरचं संशोधन, यांतून एक गोष्ट या पुस्तकात आढळते. ती म्हणजे ब्रायन ट्रेसींनी मांडलेले वेळेचे दहा प्रकार.
- अमुक एक काम कधी करावं?
- आपली उत्पादनक्षमता कशी वाढवावी?
- कामांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा? आणि
- आपल्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळेचं
नियोजन कसं करावं?
गरजेने प्रेरित, उत्साहित किंवा व्हिडीओ पाहून मोटीवेट होऊन आपण एखादे काम सुरु तर करतो परंतु छोटीशी अडचण आली कि लगेच, मधेच ते हाती घेतलेले काम सोडून देत असतो तेंव्हा अशा मार्गदर्शकाची, दिशा दाखविणारे गुरु, मित्र किंवा मेंटोर ची गरज असते अशावेळी ते मिळतीलच असे नाही तेंव्हा हे पुस्तक ती कमतरता पूर्ण करते. या पुस्तकात तुम्ही ब्रायन ट्रेसी एक गुरु-मित्र-मेंटोर म्हणून पायरीदर पायरी वेळेचे, स्वतःचे नियोजन शिकवतील.
आपले वय काय? आपण कुठून आलेले आहोत? कसे दिसतो? हे महत्वाचे नाही. आपण कुठूनही, कधीही, केंव्हाही सुरुवात करू शकतो. गरज असते ती फक्त आपले विचार बदलून, "बर्निंग डीजायार" म्हणजेच आतून ज्वलंत दृढ निश्चय करून, कौशल्य-शिक्षण-प्रशिक्षण घेऊन आत्मबल-आत्मविश्वास वाढवून, पेटून उठण्याची, सकारात्मक दृष्टीकोन, स्पष्ट ध्येय ठरविण्याची, त्यात कठोर मेहनत-श्रम, शिस्त-संयम, जिद्द, सातत्य-सचोटी-समर्पण, लक्ष केंद्रित करून, या आंतरिक गोष्टीवर प्रभुत्व मिळविल्यावर बाह्य गोष्टी तितक्या महत्वाच्या राहत नाहीत. सहज दिशा-मार्ग सुचत जातात, भेटतात. लहान लहान दैनंदिन उद्दिष्ट प्राप्त करून, लहान पाउलांनी शिखर पादाक्रांत करता येतात. ध्येय गाठता येतात, यश मिळविता येतो.
आहे त्या परिस्थितीत, आहे त्याच वेळेत योग्य नियोजन, टप्याटप्याने पुढे कसे जावे, आपली स्वयंप्रेरणा म्हणजेच (Inner Capacity-Energy) आंतरिक क्षमतेचा-ऊर्जेचा अधिकाधिक विनियोग-वापर कसा करावा आणि स्वत:च स्वत:ला मदत (self help) करुन आपली सर्वोच्च प्रगती कशी साधावी, याबद्दल अचूक सल्ला देणारे तज्ज्ञ ब्रायन ट्रेसी यांनी आजवर लिहिलेल्या 70 पुस्तकांनी विक्रीचे जगातील सगळे विक्रम मोडीत काढले आहेत.
इतकेच नव्हे तर, त्यांनी 1000 हून अधिक कंपन्यांना सल्लासेवा दिली असून, 65 देशांतील पाच दशलक्ष लोकांसमोर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. ब्रायन ट्रेसी हे ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तुमची साध्ये- लक्ष्ये ही वैयक्तिक असोत वा व्यावसायिक, ती कल्पनातीत वेगाने कशी साध्य करावी, याची नेमकी दिशा व दृष्टी देत तुम्हाला सर्वतोपरी मदत करणे, हे ब्रायन ट्रेसी यांचे ध्येय आहे.
👉#इतर संबंधितः
- विचार बदला आयुष्य बदला
- इट दॅट फ्रॉग सर्वांत कठिण काम सर्वांत आधी
- गोल्सः आयुष्यात ध्येय ठरविण्याचे महत्व व फायदे
- स्वयंशिस्तीची शक्तीः सबबी सोडा, कारणे दाखवणे व टाळाटाळ करणे टाळा
- मिलियन डॉलर हॅबिट्सः धनवान, कोट्याधिश लोकांच्या सवयी
- फोकल पॉईंटः लक्ष केंद्रित करण्याचे महत्व
- डू इट टुडेः सबबी, टाळाटाळ करणे या सवयींवर मात करा
- पॉवर ऑफ हॅबिट दैनंदिन सवयींचा सापळा
- ऍटॉमिक हॅबिट्सः एक पट, दुप्पट, तिप्पट नाही तर कशातही 37.78 पट उत्तम व्हा..!
- नाऊ हॅबिट्सः आपले लक्ष केंद्रित करून सवर्जनशिलता वाढविणे
- दृष्टीकोन हेच सर्वकाहीः ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग
- ब्रेन रूल्सः आपल्या मेंदूसाठी 12 नियम
- फ्लोः प्रवाही अवस्थेत काम करून 10 वर्षाचे काम 6 महिन्यात करा




टिप्पण्या