सायकॉलॉजी ऑफ मनी (मराठी) | Psychology of Money in Marathi

तुमच्या पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना! पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोक पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक काही गोष्टी सांगत आहेत. शिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक अशा 'पैसा' या विषयावर महत्त्वाचे धडे देत आहेत.

सायकॉलॉजी ऑफ मनी (मराठी)

Psychology of Money
in Marathi
by Morgan Housel


पैशाचे नियोजन, त्याची गुतवणूक आणि धंद्यातील निर्णय या गोष्टीमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते, पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत, ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात... जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात.



#१. आर्थिक यशासाठी स्मार्टनेस पेक्षा सायकॉलॉजी महत्त्वाची असते: 

Psychology is more important than Smartness in Financial Success

तुमच्या आर्थिक यश या गोष्टीवर अवलंबून नसते की तुम्ही आर्थिक क्षेत्राबद्दल किती विचार करत असता, खरे तर या गोष्टीवर निर्भर करते की तुम्ही पैशाविषयी कसे वागत असतात किंवा कसे वागता या गोष्टीवर अवलंबून असते.

मासिक बजेट बनवताना आर्थिक नियोजन नियोजन करताना बचत करताना खर्च करताना निवृत्ती विषयी पैशांना घेऊन तुमचा दृष्टिकोन कसा आहे

तुम्हाला शेअर मार्केट विषयी खूप माहिती आहे कॅश-फ्लो विषयी देखील सर्व काही माहिती आहे परंतु जर तुमचा वर्तन म्हणजेच तुमचे बिहेवियर जर पैशाच्या प्रकृती बद्दल जर मेल खात नसेल तर तर हे तुमचे आर्थिक ज्ञान काहीही कामाचे नाही. 

हेही वाचा: विचार बदला आयुष्य बदला- ब्रायन ट्रेसी 

हेही वाचा: माणूस जसा विचार करतो तसा बनतो- AS A MAN THINKETH

 

अगदी या उलट असे व्यक्ती ज्यांना पैशाविषयी खूप नॉलेज नाही किंवा ज्ञान नाही माहिती नाही परंतु पैशांना घेऊन त्यांचे बिहेवियर त्यांचे वर्तन अगदी योग्य आहे तर अगदी सहज रीतीने रित्या ते आर्थिक यश मिळवू शकतात.

 हेही वाचा: मनुष्य स्वभाव कसा ओळखावा-द लॉsज ऑफ ह्युमन नेचर

जसे वर सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे रीड आणि रिचर्ड यांच्या आर्थिक आर्थिक क्षेत्राची दिग्गज आणि एक सर्वसामान्य व्यक्ती परंतु दोघांचा दृष्टिकोन पैशांकडे पाहण्याचा किंवा पैशांना घेऊन आपले वर्तन, वागणूक, बिहेवियर वेगवेगळे असू शकतो असतो म्हणून त्यांचे परिणाम देखील वेगवेगळे असतात.

अजून एक उदाहरण द्यायचेच म्हटल्यावर इथे रिच रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे रिच डॅड म्हणजेच त्यांचे आर्थिक वडील आणि त्यांचे वडील यांचे शिक्षण यामध्ये खूप तफावत होती.  परंतु व्यवहारी ज्ञानामध्ये आणि पैशांना घेऊन त्यांचे बिहेवियर दोघांचे वेगवेगळे होते यामुळेच रिच डॅड रिच बनले आणि त्यांचे वडील उच्चशिक्षित असूनही तसेच राहिले.

इथे पैशांना घेऊन त्यांची वागणूक, दोघांचाही दृष्टिकोन महत्त्वाचा होता.

हेही वाचा:  दृष्टीकोन हेच सर्वकाही- ATTITUDE is EVERYTHING

तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला एक गोष्ट नोंदविली असेल नक्कीच की मोठ्या मोठ्या महाविद्यालयातून विद्यापीठातून युनिव्हर्सिटीमधून एमबीए केलेले मोठमोठे पदव्या घेतलेले लोक दुसऱ्यांसाठी कंपन्यांमध्ये काम करत राहतात तर आपल्या एरियातील किराणा दुकानाचे चालक ज्यांना बिजनेस नियमाबद्दल फार काही माहिती नसते ते त्यांच्या पैशांबद्दल असलेल्या सॉफ्ट स्किल (मृदू कौशल्य) यांच्या बळावर करोडपती बनत असतात.

कारण ते पैशांना समजत असतात आणि त्यांना त्यांच्या परिणामांसाठी म्हणजे रिझल्ट साठी लागणारा पेशंस म्हणजेच संयम, असतो.

 

 

#२. पैशांपेक्षा वेळेवर नियंत्रण हे महत्त्वाचे  

Ultimate price not money 💰₹ but control over your Time 

पैसा तुम्हाला सर्व काही देऊ शकत नाही हे तर तुम्ही ऐकलंच असेल परंतु सर्वात महत्त्वाची आणि गरजेची समाधानाची गोष्ट वस्तू ते तुम्हाला पैसा देऊ शकतो ती म्हणजे वेळ जीवनाचा अल्टिमेट सर्वोच्च ध्येय आणि ते म्हणजे फ्रीडम स्वातंत्र्य.

जीवनाचा परम ध्येय असते स्वतंत्र आणि पैसा तुम्हाला ते देऊ शकतो आपल्या वेळेवर नियंत्रण मिळवणं हे पैशाचा सर्वात महत्त्वाचा व मोठा फायदा आहे.

सर्वात धनवान व्यक्ती तो आहे जो आपल्या वेळेवर नियंत्रण मिळवत असतो असा व्यक्ती जो जिथे जेव्हा पाहिजे तेव्हा जेवढ्या व जितक्या प्रमाणात मनाप्रमाणे करू शकतो, वेळेचे बंधन नसते.

खरा आनंद या गोष्टींमध्ये नसतो की तुमच्याकडे किती मोठे घर आहे, किती मोठी व महागडी गाडी आहे, जर तुमच्याजवळ पैशांची सिक्युरिटी आहे तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा रिटायर म्हणजेच निवृत्त होऊ शकता.

तर हीच खरी संपत्ती आहे.

पैशांची सर्वात मोठी चांगली गोष्ट ही आहे की, खासियत ही आहे की, हा तुम्हाला तुमच्या वेळेवर नियंत्रण मिळवून देऊ शकतो.

👉💡 मेहनतीचा परतावा पैसा असतो आणि आणि पैशाचा परतावा वेळ असते.

 

 

#३.  श्रीमंत असणं आणि धनवान असणं यामध्ये फरक असतो
There's Difference Between Rich and Wealthy 

श्रीमंत लोकांना ओळखणं कठीण असतं कारण त्यांचे ध्येय असते लोकांनी त्यांना बघावे म्हणून ते लोक त्यांना ओळखावे ओळखावे म्हणूनच ते श्रीमंत बनतात.

ते त्यांचा ते त्यांचा पैसा श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी खर्च करत असतात.  एखादा व्यक्ती जर 50 लाखाची कार चालवत असेल तर तो श्रीमंत आहे परंतु तो धनवान नक्कीच नाही.  

 💡 वेल्थ त्या पैशाला म्हणतात जो खर्च होत नाही.

धनवान व्यक्ती आपला पैसा चैनीच्या विलासी गोष्टींवर खर्च करत नसतो कारण तू लाखो रुपयाच्या कारसाठी पैसा खर्च करेल तर त्याचा पैसा संपून जाईल आणि कार त्याला काही कमावून देणार नाही आणि त्यासोबतच गाडीचा मेंटेनन्स चा खर्च देखरेखीचा खर्च देखील यासोबत जोडेल. 

एका धनवान व्यक्तीला हे माहीत असते की त्याचा हाच पैसा त्याला इतर पर्याय देखील पुरवत असतो अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी ज्यामुळे त्याचा पैसा पुढे वाढेल अशा जागी गुंतवणूक करण्यासाठीचे पर्याय जे त्याच्या पैशाला अजून वाढवतील. 

एक श्रीमंत व्यक्ती आपल्या वेळेच्या मोबदल्यात म्हणजेच त्याची Earned Income अर्ण इन्कम मग ती भलेही त्यात धन केलेल्या नोकरीतून असेल किंवा तो स्वतः करत असलेल्या व्यवसाय उद्योग, कामातून असेल ज्यामध्ये त्याला स्वतःला काम करणे गरजेचे आहे त्या पैशातून किंवा कर्ज घेऊन तो मोठी महागडी गाडी खरेदी करण्याचे विचार करेल विलासी जीवन शैली जगेल, चैनीच्या दिखाव्याच्या वस्तू खरेदी करेल, महागड्या घरात, हॉटेलात राहील, विमानातून फर्स्ट क्लास मध्ये प्रवास करेल.

हेही वाचा: वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी कशा लावाव्या- Atomic Habits by James Clear

तर इथे एक धनवान व्यक्ती देखील ह्याच गोष्टी करेल परंतु इथे एक फरक आहे धनवान व्यक्ती स्वतःच्या कमावलेले उत्पन्न- अर्नेड इन्कम ऐवजी स्वतःच्या पॅसिव्ह इन्कम ने या सर्व गोष्टी करेल. 

आपल्या पॅसिव्ह इन्कम ने ह्या गोष्टी खरेदी करेल एक धनवान व्यक्ती स्वतःच्या अर्णड इन्कम पासून असेट्स बनवत असतो म्हणजेच संपत्ती निर्माण करत असतो. ज्यामधून त्याला परत परतावा मिळत मिळत येईल मिळत जाईल जो त्याला पैसा कमावून देत असेल आणि कमावलेला पैसा ते परत नव्या संपत्ती बनवण्यामध्ये गुंतवत असतात आणि उर्वरित स्वतःच्या लक्झरिअस जीवनशैलीसाठी खर्च करत असतात

एक धनवान व्यक्ती त्याची Earned Income कमावलेला पैसा तिथेच खर्च करत असतो ज्यांच्यामुळे त्याचे काम चालू शकत नाही अशाच गोष्टीवर ते खर्च करत असतात ज्यामुळे त्याला अडथळे येतात अडचणी येतात अशाच गोष्टीवर ते खर्च करतात. 

वर पहिल्याप्रमाणे रीड आणि रिचर्ड यांच्या यांच्या गोष्टी मध्ये रिचर्ड याच्याकडे मोठा महालासारखं घर होतं परंतु तो शेवटी कर्जामुळे कंगाल झाला तर त्याच्या अगदी उलट रीड जवळ फक्त दोन बेडरूमचं घर होतं परंतु त्याची नेटवर्थ आठ मिलियन डॉलर्स इतकी होती कारण रिचर्ड Rich होता आणि रीड Wealthy होता.

"रिचर्ड Rich होता आणि रीड Wealthy होता"

जर तुम्ही देखील आपल्या Earned इनकम पासून महागडे गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा फक्त गरजांवर व आवश्यकतांवर लक्ष केंद्रित केल्यास आणि उर्वरित पैशापासून तुम्ही संपत्ती म्हणजेच असेट्स बनवत असाल तर तुम्ही सुद्धा एक wealthy व्यक्ती बनाल.

इथं काही लोक म्हणतील मुकेश अंबानीने तर त्याच्या मुलीच्या लग्नात 700 कोटी रुपयांचा खर्च केला..!

तर अशावेळी तुम्हाला नेटवर्थ माहित असणं खूप गरजेचं आहे.

मुकेश अंबानीची नेटवर्थ सात लाख करोड रुपये आहे तर या लग्नामध्ये ७०० कोटी रुपये त्यांच्या त्यांच्या नेटवर्थच्या 0.01% टक्का खर्च होता..!

     ₹7.65 lakh crore

तुमचा नेटवर्थ किती आहे?

तुम्ही देखील तुमचा नेटवर्थ कॅल्क्युलेट करू शकता काढू शकता. खूप सोपा आहे सूत्र खूप सोप आहे.

तुमच्याकडे जेवढे काही असेट आहेत म्हणजे तुमच्याकडे जेवढे काही कॅश असेल मग ती सेविंगच्या रूपात एफडी च्या रूपात हातामध्ये रोकड बॉण्ड मध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये जे पैसा लावलेला आहे किंवा तुमचं घर खरेदी केलेले असेल तुमच्याकडची जी गाडी आहे त्याची रिसेल व्हॅल्यू म्हणजेच तुमची गाडीच्या किमतीमध्ये आज विकेल ती किंमत.

या सगळ्यांचे कॅल्क्युलेशन म्हणजेच टोटल जे काही रक्कम येईल ती होईल तुमचं एसेट्स यामधून तुम्हाला मायनस लायबिलिटी करायचं आहे त्या सर्व गोष्टी म्हणजे तो तो पैसा जो तुम्हाला दुसऱ्याला द्यायचा आहे चुकता करायचा आहे किंवा कर्ज घेतलेला आहे. 

 

तुम्ही त्याला परत करायचं आहे किंवा तुम्ही काही कर्ज घेतलं असेल थोड थोडक्यात सांगायचं तर युवर असेट्स मायनस युअर लायबिलिटीज इज इक्वल टू युअर नेटवर्थ.

आता असं गृहीत धरा की तुम्ही एक करोडपती व्यक्ती आहात.

तुमच्याकडे एक कोटी रुपये आहेत आणि तुमच्या एक कोटीचं 0.01% पर्सेंट होते 1000 (एक हजार) रुपये तुम्ही कोट्याधीश तुमची नेटवर्थ एक करोड रुपये तुमच्यासाठी 0.01% पर्सेंट आहेत 1000 रुपये आणि मुकेश अंबानी साठी 0.01% पर्सेंट आहे 700 कोटी रुपये फक्त.

तर जी व्हॅल्यू एक हजार रुपये तुमच्यासाठी ठेवतात एक कोट्याधीश किंवा करोडपती असताना एक हजार रुपये हे तुमच्यासाठी 0.01% असते, तीच किंमत किंवा व्हॅल्यू त्यांच्या नेटवर्थच्या मुकेश अंबानी साठी 700 कोटी रुपये असते. 

तर मुकेश अंबानी यांनी सुद्धा फार काही खूप मोठा खर्च केलेला नाही त्यांच्या मुलीच्या लग्नात सुद्धा


#४.  अनिश्चितता हीच परताव्याची किंमत आहे
Uncertainty is the price of Returns

कोणतीही गोष्ट मोफत नसते प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते.

तुम्ही शूज खरेदी करता त्याची किंमत चुकवता.

एखादा व्यवसाय उभा करतो त्यामध्ये पैसा गुंतवत असतात आणि रिस्क सुद्धा घेत असता.

पैसा कमावण्यासाठी तुम्ही एखादी स्किल शिकता किंवा कौशल्य शिकता त्यामध्ये वेळ पैसा आणि मेहनत श्रम ही गुंतवणूक करत असता.

जीवनात काही देखील मोफत नाहीये शेअर मार्केटला पाहून तुम्हाला वाटत असेल की आपण तिथे पैसा लावल्यावर आपला पैसा वाढेल आणि आपल्याला परत देखील मिळेल तर त्या शेअर मार्केटची सुद्धा एक किंमत असते कारण मार्केटमध्ये काही देखील certain नसते, निश्चित नसते आणि हीच अनिश्चितता म्हणजेच मार्केट मधून मिळणाऱ्या परताव्यावर म्हणजेच रिटर्न ची किंमत असते.

उदाहरणार्थ,

2011 मध्ये नेटफ्लिक्सच्या किमतीमध्ये 80 टक्के पर्यंत घसरण आली होती परंतु त्यानंतर कधी त्याची किंमत वर किंवा खाली जात राहिली आणि एका दीर्घ कालावधीनंतर  यावर्षामध्ये म्हणजे आज ती आतापर्यंतच्या सर्वोच्च किमतीवर आहे.

या दरम्यान काही लोकांनी मार्केटची ही uncertainty किंवा अनिश्चितता सहन केली झेलली आणि त्यांना याचा फायदा झालेला आपण पाहतच आहोत.

 


#५.  चक्रवृद्धी वेळेची किमया
Time compounding

आपण सर्वांनीच वॉरन बफेट्स (Warren Buffet)  यांचं नाव तर नक्कीच ऐकलं असेल त्यांच्यामध्ये स्किल म्हणजेच त्यांचं गुंतवणुकीचं कौशल्य हे तर होतच इन्व्हेस्टमेंट स्किल त्यांची होतीच नक्कीच.

परंतु यामध्ये खरा खेळ होता वेळेचा.  ⏰

स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याच जणांना वरून खाली खालून वर रंकाचा राजा आणि राजांचा रंक बनवले किंवा कित्येक जणांचे आयुष्य बदलले, किस्मत बदलली यामध्ये सर्वात आधी नाव नक्कीच येते वॉरंट बफेट.

बफेट यांची वाढ व गुंतवणुक यांच्या ग्रोथ आणि इन्व्हेस्टमेंट यांना निरीक्षण करून लेखक म्हणतात की ते या निष्कर्षावर पोहोचले की,

यामध्ये काहीच दुमत नाहीये की वॉरेन बफेट एक महान गुंतवणूकदार होते परंतु यामध्ये खरा खेळ आहे तो म्हणजे वेळेचा.

-मॉर्गन हाउसेल, लेखक

तुम्हाला जर खरंच एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणजेच इन्वेस्टर व्हायचं असेल तर लवकर सुरुवात करणे आणि तुमचा वेळेचा म्हणजेच कालावधी वाढायला पाहिजे. लाँग टाईम पिरेड इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे.

म्हणजेच गुंतवणुकीमध्ये टाईम ही खूप महत्त्वाची व शक्तिशाली गोष्ट आहे जी तुमच्या टेम्पररी किंवा तात्पुरत्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला योग्य आणि बरोबर निर्णयांमध्ये बदलण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते.

हेही वाचा: द कंपाऊंड इफेक्ट- चक्रवृद्धी परिणाम

यासाठीच असं म्हटलं जाते की वेळेनुसार छोट्या-छोटे रकमेला गुंतवत गेल्यास एका वेळेनंतर ती खूप मोठी रक्कम नक्कीच बनते आणि मोठमोठ्या चुकांना टाळता येऊ शकते.

शॉर्ट टर्म इन्वेस्टिंग लक आणि रिस्क वर चालत असते परंतु लॉन्ग टर्म मध्ये म्हणजे दीर्घावधीमध्ये लक आणि रिस्क मॅटर करत नाहीत जर तुम्ही योग्य ठिकाणी इन्वेस्ट केलं असेल तर फायदा नक्कीच होईल.

2010-11 मध्ये ज्यांची इन्व्हेस्टमेंट स्किल चांगली राहिली असेल, ज्यांचं व्हिजन म्हणजेच दूरदृष्टी असेल त्यांनी नक्कीच नेटफ्लिक्समध्ये गुंतवणूक केलेली असेल.

उदाहरणात,

समजा त्यांनी 34 डॉलर्स ची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत 500 डॉलर पेक्षाही जास्त झालेली असेल.

परंतु फायदा त्यालाच झालेला आहे ज्याने दीर्घावधीमध्ये लॉन्ग टाइम पिरेडचा विचार केला असेल आणि त्यामध्ये संयमाने टिकून राहिला असेल.

कारण 2011 नंतर नेटफ्लिक्सने खूप सारे ग्राहक गमावून बसलेले होते त्यानंतर त्यांच्यामध्ये 80% पर्यंतची घसरण आलेली होती ज्यांनी नेटफ्लिक्समध्ये शॉर्ट टर्म साठी लक किंवा रिस्क म्हणून गुंतवणूक केली होती त्यांना नक्कीच तोटा, नुकसान झालेला आहे लॉस झालेला आहे.

परंतु आज आपण बघत आहोत नेटफ्लिक्स मध्ये लॉंग टर्म साठी ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांना आज फायदाच फायदा झालेला आहे.

वॉरेन बफेट यांची नेटवर्थ 84.5 बिलियन डॉलर्स इतकी आहे यापैकी 84.2 बिलियन डॉलर्स त्यांनी वयाच्या पन्नाशी गाठल्यानंतर कमावलेले आहेत,  यापैकी सुद्धा 81.5 बिलियन डॉलर्स त्यांनी वयाची साठी पार केल्यानंतर कमावलेले आहेत. 

👉💡 बफेट यांनी योग्यवेळी, योग्य वेळेत, योग्य ठिकाणी गुंतवणूक केली होती.
Right Time Right Place

एका ओळीत जर सांगायचं राहिल्यास
, "कुठे आणि किती इन्वेस्ट करायचं ही एक इन्व्हेस्टमेंट स्किल अवश्य आहे परंतु रिटर्न किती येईल हे मात्र वेळेवर अवलंबून आहे". depend on time.

हेही वाचा:  बुद्धिमान गुंतवणूकदार द इंटेलीजेंट इन्वेस्टर-वारेन बफेट यांचे गुरु बेंजामिन ग्राहम

 

#6. निर्णयाचा परिणाम
Taking Financial Decisions and their Responsibility Wisely

आर्थिक निर्णय घेताना हे लक्षात नेहमीच असू द्या की हा निर्णय घेतल्यानंतर मला आज निवांतपणे झोप येईल काय?

निर्णय घेणे कठीण काम आहे पण निर्णय जर पैशांशी निगडित असेल तर हीच अडचण अजून वाढत असते.!

आपल्या पैशांना अशाप्रकारे मॅनेज करा की तुम्हाला रात्री चैनीने झोप येऊ शकेल. तुम्ही चैनीने झोपू शकत याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही गुंतवणूक करून त्या मधून उच्च परतावा हायेस्ट रिटर्न काढण्याचा प्रयत्न कराल. कारण, जेव्हा तुम्ही हायेस्ट किंवा जास्तीच अचीवमेंट करून घ्याल तेव्हा तुम्हाला जास्त accomplishment वाटणार नाही.

प्रत्यक्षात तुमचा ambition म्‍हणजेच महत्‍वाकांक्षा आणखीन वाढत जाईल काही लोकं तोपर्यंत निवांतपणे चैनीने झोपत नाही जोपर्यंत  ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट चा Highest Return काढून घेत नाहीत.

तर याच्या उलट काही लोक असतात जे मार्केट मधून छोटे छोटे रिटर्न्स फायदाकाढून घेत असतात आणि आणि समाधानी असतात.

मग असं नेमकं काय करायला पाहिजे ज्यामध्ये अधिक लोभ पण वाढायला नको पाहिजे आणि चांगला परतावा पण त्यामधून निघायला पाहिजे.

यासाठी तुम्हाला स्वतःशीच एक असा प्रश्न विचारायला पाहिजे किंवा आयुष्यामध्ये केव्हाही आर्थिक निर्णय घेताना हा प्रश्न विचारायला पाहिजे की,

हा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही चैनीने झोपू शकाल का किंवा मी हा निर्णय घेतल्यानंतर समाधानाने चैनीने झोपू शकेल काय?

हा प्रश्न तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह चेंज आणि क्लॅरिटी म्हणजेच एक सकारात्मक बदल आणि स्पष्टता घेऊन येईल. आणण्यास मदत होईल.

 

#7.  फक्त काहीच थोडेच योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न करा
Try to take few but important and right decisions

तुम्ही दिवसभरात किती निर्णय घेत असतात कदाचित खूप सारे, बरेचसे निर्णय जसे,

  • नाश्त्यामध्ये काय खायला पाहिजे? किंवा काय बनवू?
  • कोणता ड्रेस घालू?
  • मित्राबरोबर किंवा कामानिमित्त बाहेर असल्यास कोणत्या रेस्टॉरंट मध्ये जाऊ?
  • तिथं काय ऑर्डर करू?
  • इत्यादी इत्यादी

अशा प्रकारचे खूप सारे निर्णय आपण घेत असतो परंतु यापैकी एकही कोणताही निर्णय महत्त्वाचा नाहीये.

 दिवसभरात आपण दोन चार अशी थोडकेच निर्णय असतो जे खूप महत्त्वाचे असतात. जसे,

  •  इन्व्हेस्ट कुठे करायचं आहे
  • क्लाइंटला कन्व्हेन्स कसं करायचं?  
  • कस्टमरची कसं बोलणी करायचं आहे?  
  • इत्यादी इत्यादी.

एखाद दिवशी तुम्ही काय करता, किंवा कोणता ड्रेस घालतात हे महत्त्वाचं नाही तर एखाद्याला कन्व्हेनस करण्यासाठी तुम्ही कसे बोलता? तुमचा दृष्टिकोन कसा आहे?हे महत्त्वाचं असते.

फायनान्स म्हणजे आर्थिक क्षेत्रात देखील असंच असते जर तुमचे अधिकांश निर्णय चुकीचे असतात परंतु त्यातली काही मोजकेच योग्य आणि महत्त्वाचे बरोबर ठरत असतील तेव्हा सुद्धा तुमची नशीब बदलू शकते.

थोडक्यात बोलायचं म्हटलं तर तुमचे 80% रिझल्ट 20% योग्य निर्णयांनीच येत असतात हा नियम फायनान्स मध्येच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कामाला येईल.

2013 मध्ये बर्क शायर हॅथवे यांच्या मीटिंगमध्ये वॉरेन बफेट यांनी असं सांगितले होतं की त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये 400 ते 500 स्टॉक्स खरेदी केले परंतु यापैकी अधिकांश पैसा मात्र फक्त दहा स्टॉक्सनेच कमावून दिला होता.

त्यांचे पार्टनर म्हणजेच चार्ली मुंगर यांनी सुद्धा असे म्हटले आहे की बर्कशायर हॅथवे चे इन्व्हेस्टमेंट मधील टॉप स्टॉक्स जर हटवले तर त्यांचा रेकॉर्ड एव्हरेजच राहिला आहे.

 #हेही वाचा: परेटो प्रिन्सिपल किंवा ८०/२० चा नियम- एटी/ट्वेंटी चे तत्व 80/20 Rule

महत्त्वाचे हे नाही की तुम्ही किती योग्य निर्णय घेतलेले आहेत किंवा किती चुकीचे निर्णय घेतलात.  महत्त्वाचं तर हे आहे की जेव्हा तुम्ही तो निर्णय घेतला त्यापासून तुम्ही किती पैसा कमावला आणि चुकीच्या निर्णयापासून तुम्हाला किती नुकसान-तोटा-लॉस झाला.

 

#८. आपल्या गुंतवणुकीचे ध्येय ठरवा
Decide your investment goal

इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणुकीचे सर्वात अवघड किंवा कठीण परंतु महत्त्वाचं गोष्ट ही म्हणजे इन्व्हेस्टमेंट गोल decideकरणे.

तुम्ही तुमच्या घरामध्ये परिवारामध्ये आपल्या पेक्षा मोठ्या सदस्यांना बोलताना पाहिलं असेल कधीही कोणालाही 100% मिळत नाहीत. याचा अर्थ हा नाही की तुमची सर्वच गरजा पूर्ण होणार नाहीत असेही नाही, तुमचे सर्वच स्वप्न पूर्ण होतील असेही नाही, खरंतर यांचा अर्थ असा आहे की आपली इच्छा, महत्त्वकांक्षा ह्या कधीही न संपणाऱ्या असतात यासाठीच असं म्हटले जाते की शंभर टक्के कधीही नसतं नेहमी 99% होतं.

गुंतवणुकीमध्ये देखील असंच असतं जर तुम्ही स्वतःचं इन्व्हेस्टमेंट गोल आर्थिक आर्थिक बजेट किंवा गुंतवणुकीचा एखादा टप्पा जर ठरवला नसेल तर पुढे जाण्याचा काही अर्थच राहत नाही कारण तुमच्या आयुष्यात एंड पॉइंट म्हणजे शेवट नाहीच.

गुंतवणुकीवर जर तुम्हाला एखादा परतावा मिळालाच आणि तुम्ही जर परत गुंतवणुकीसाठी अधिक परताव्यासाठी लोभ हाव दाखवत असाल तर स्वतःला कधीही समाधानी ठेवू शकणार नाहीत.  नेहमीच असंतुष्ट राहाल अशा प्रकारचे एक पाऊल तुमच्या गोल पासून तुम्हाला चार पावले दूर नेत असतो असे मानले जाते.

 हेही वाचा: सर्वोच्च ३% लोकामध्ये सामील व्हा- लिखित ध्येय असण्याचे फायदे- गोल्स

यासाठी तुम्ही तो गोल अचीव करण्यासाठी ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही अधिकाधिक रिस्क घेण्यास लागाल लेखक मॉर्गन हाऊसेल एक सुंदर खूप चांगली ओळ आपल्याला सांगतात एका ओळीत सांगतात ती पुढील प्रमाणे आहे

 "ज्या गोष्टींची तुम्हाला गरज नाहीये त्या गोष्टींसाठी आपल्या गरजेच्या गोष्टींना दावणीला लावू नका."

"There is no reason to risk what you have and need for what you don't have and don't need".

-Morgan Housel (Author: The Psychology of Money)

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive