RICH DAD POOR DAD -Marathi- Robert Kiosaki | रिच डॅड पुअर डॅड - मराठी-रॉबर्ट किओसाकी

श्रीमंत आणि गरीब यांतील वास्तविक बारकावे आणि विचारसरणीतील बदल या पुस्तकात अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडले आहेत. रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट टी.कियोसाकीचे पुस्तक आपल्याला अर्थसाक्षरते विषयी मार्गदर्शन करते.

 

 Rich Dad Poor Dad Marathi Summary
रिच डॅड पुअर डॅड
 

 रॉबर्ट टी.कियोसाकी

 

मराठीमध्ये सारांश

 

 

Rich Dad Poor Dad Marathi Summary

 

 

”लोकं आर्थिक दृष्ट्या झगडत राहतात याचं मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्षे शाळेत गेलेले असतात, पण पैशाबद्दल काहीच शिकलेले नसतात. परिणामी लोक पैशासाठी काम करायला शिकतात, पण पैशाला कामाला लावायला कधीच शिकत नाहीत.”
     रॉबर्ट कियोसाकी.

 

या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट किओसाकी यांना दोन वडील होते.! त्यांचे एक वडील शिक्षित, पीएचडी धारक होते, पण आयुष्यभर गरीब राहिले आणि गरीबीतच मरण पावले. म्हणून रॉबर्ट त्यांना पुअर डॅड म्हणतं.  

तिथेच, त्यांचे दुसरे वडील फार शिक्षित नव्हते, पण खूप श्रीमंत होते. त्यांना रॉबर्ट रिच डॅड म्हणतं. आता तुम्ही विचार करतं असाल की, एकाच माणसाला दोन वडील कसे असू शकतात! रॉबर्टचे दुसरे वडील जे श्रीमंत होते, प्रत्यक्षात ते रॉबर्ट यांचा मित्र माइकचे वडील होते.

 

एक आदर्श श्रीमंत वडिल कसे असावे म्हणून आणि त्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून समजावण्यासाठी लेखकांनी मित्राच्या वडिलांना रिच डॅड जे खरोखरच श्रीमंत होते आणि दुसरे उदाहरण त्यांच्या स्वत:च्या वडिलांचे जे उच्चशिक्षित असूनही आणि आयुष्यभर कष्ट-श्रम-नोकरी करूनही त्यांची स्थिती फार काही चांगली नव्हती म्हणून त्यांना पुअर डॅड असा प्रतिकात्मक उदाहरणाचा उपयोग केला आहे.


त्यांच्या पुअर डॅड चे एकचं स्वप्न होते, खूप अभ्यास करून, रॉबर्टने एका मोठ्या कंपनीत काम करून आपले भविष्य सुरक्षित केले पाहिजे. पण रॉबर्टचे दुसरे वडील जे श्रीमंत होते, त्यांना वाटतं होते, रॉबर्टने आपल्या जीवनात काही आव्हान घ्यावे, कारण सगळे धडे शाळेतच शिकविले जात नाहीत. आयुष्यातले अनुभव ही आपल्याला काही धडे शिकवत असतात. शालेय शिक्षण केवळ चांगले ग्रेड देऊ शकते, पण जीवनाचा अभ्यास-अनुभव- बरचं काही शिकवत असतो.

 

पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारिक जीवनातील शिक्षण कधीही परिणामकारक ठरते.  अर्थातच शिक्षणाला स्वतःचे महत्त्व आहे, पण केवळ त्यावर अवलंबून राहून काहीही साध्य होऊ शकत नाही. म्हणूनच पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष जीवनातील शिक्षणही तितकेच महत्वाचे आहे.

 

#RICHDADPOORDAD #RobertKiosaki #richdadpoordadmarathi #money #finance #investment #financialplanning #budget #ratrace #liabilities #financiallitrecy #financialgoals

 

रिच डॅड पुअर डॅड

  •  आर्थिक साक्षरतेची गरज 
  • आकडे वाचता यायला हवेत
  • मालमत्ता व कर्ज यातील फरक 
  • श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात 
  • योग्य ठिकाणी गुंतवणूक करा 
  • शिक्षण घ्यायला सुरुवात करा
  • आर्थिक बुद्धिमत्ता 
  • सुरक्षित गुंतवणूक करा 
  • सारांश

 

पाहिली शिकवण:

श्रीमंत लोकं पैशासाठी काम करत नाहीत.

 

मित्रांनो आपण सर्वांना गाढव आणि गाजर यांची गोष्ट नक्कीच माहित असेल नसेल तर पाहुया, एका व्यक्तीकडे एक गाढव होते. जेव्हा जेव्हा त्याला गाढवाकडून काही कष्ट करून घ्यायचे असतील, तेव्हा तो त्याच्यासमोर एक गाजर लटकवायचा. 

ते लोभी गाढव गाजर खाण्यासाठी खूप काम करायचे. एक दिवस तो त्या गाजरापर्यंत पोहोचेल अशी त्याला आशा होती. त्या माणसासाठी ही एक उत्तम कल्पना-आयडिया होती. पण गरीब गाढवाला ते गाजर कधीच मिळाले नाही. कारण ते गाजर म्हणजे फक्त लोभ देण्यासाठी उपयोगात आणलेले माध्यम होते.  

 

बरेच लोकं त्या गाढवासारखे असतात. एक दिवस ते श्रीमंत होतील या आशेने ते कठोर परिश्रम करत राहतात. त्यांचं स्वप्नंच पैसा असतं. या स्वप्नाच्या मागे धावून, तुम्ही पैशापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही.

 

म्हणून पैशासाठी काम करण्याऐवजी पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर केवळ पैसे मिळवण्यासाठी काम करू नका. कारण जेव्हा तुम्ही  श्रीमंत होण्याच्या मार्गावर जाल तेंव्हा पहिलं तर भिती तुमच्या मनात घर करेल. मी गरीब तर राहणार नाही नां? असे प्रश्न मनात गोंधळ घालायला सुरूवात करतील. ही भिती तुम्हाला अजून जास्त मेहनत करण्यास भाग पाडेल. आणि नंतर तुमचा लोभ तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागतो. 

 

  पैशासाठी काम करण्याऐवजी
पैशाला तुमच्यासाठी
काम करू द्या

 

आपण पैशाने मिळणाऱ्या सगळ्या सुंदर गोष्टींची कल्पना करायला सुरूवात करतो, हीच भीती (fear) लोभ (greed) आपल्याला कधीही न संपणाऱ्या गोंधळात टाकतात. आपण जास्त पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो व त्यानंतर आपला खर्चही त्यानुसार वाढतो. हा एक ट्रॅप आहे यालाच रिच डॅड "रॅट रेस" (Rat Race) म्हणतात.

 

आपल्याला लोभ व भीती या सापळयापासून दूर रहावे लागेल. कारण आपल्यापैकी बहुतेकजण ज्यांना श्रीमंत व्हायचे आहे, ते या जाळ्यात बळी पडतात. तुम्ही पैशाच्या मागे धावू नका, उलट पैशाला तुमच्या मागे धावण्यासाठी मजबूर करा. 

 

जर तुम्हाला नोकरी लागली, तर दरमहा तुम्हाला पगार मिळणार आहे, हा विचार करून कामावर जाऊ नका.  कारण त्या पगारातून तुमचा खर्च क्वचितच भागवला जाईल, आणि दर महीन्याला असंच चालत राहिल. कंटाळल्यानंतर तुम्ही दुसरी नोकरी शोधण्यासाठी शोध सुरू कराल. तरी देखील तुम्ही केवळ पैशासाठीच काम करतं राहाल.

 

सत्याला सामोरे जा. तम्ही स्वत: च स्वतःसाठी जबाबदार आहात. त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते स्वत:ला विचारा, कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरे फक्त तुमच्याकडेच आहेत. 

 

 स्वत: च स्वतःसाठी जबाबदार

  • तुमच्या आयुष्यात सुरक्षितता राहावी म्हणून तुम्ही काम करत आहात का?
  • तुमच्या मनात नोकरीमधून काढून टाकण्याची भीती आहे का?
  •  फक्त दोन पैसे मिळवण्यासाठी तुम्ही काम करताहेत का? आणि  
  • तुम्हाला वाटतं का, असे करून तूम्ही श्रीमंत व्हाल?

 

जर तुमचे उत्तर होय असेल, तर मला तुमच्या विचारांवर खेद वाटतो. अशाने तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.  तुम्ही नेहमी गरीबचं रहाल आणि जर तुमचे उत्तर नाही असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही मनातील भीती काढून टाका.  कारण पैशाबद्दल मनात बाळगलेली इनसिक्युरिटी तुम्हाला विचार न करता अथवा कोणतेही काम करण्यास भाग पाडेल, आणि तुमचे हेच पाऊल तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल.

 

नक्कीच सगळ्यांमध्ये भीतीची भावना असते, पण त्या भीतीला तुमच्यावर अधिराज्य करू देऊ नका. नाहीतर तुम्ही त्याच्या आहारी जाऊन उलट-सुलट निर्णय घेऊ लागाल. तुम्ही कोणताही निर्णय घेण्याआधी त्याबद्दल बराच विचार केला, तर चांगले होईल. मनापासून नव्हे, तर डोक्याने काम करा.  

 

दररोज सकाळी स्वतःला विचारा,

  • कोणत्याही कामाला करताना तुम्ही तुमचे १००% देत आहात का? 
  • जेवढं तुम्ही करू शकता, तेवढं तुम्ही करत आहात का?
  • तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपुर वापर करत आहोत का?
  • कुवतीनुसार तुम्ही तेवढं करत आहात का?

 

केवळ आणि केवळ पैशासाठी काम करणाऱ्या सामान्य लोकांसारखे विचार करणे थांबवा.  "माझा बॉस कमी पैसे देतो, मला जास्त मिळायला हवं, मी यापेक्षा अधिक कमवू शकतो" असा विचार करणे थांबवा.

 

👉लक्षात ठेवा,

केवळ तुम्हीच, तुमच्या समस्यांसाठी जबाबदार आहात, दूसरे कोणीही नाही. जर बॉस तुमची सॅलरी वाढवत नसेल, तर त्याला दोष देऊ नका. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या समस्यांसाठी जबाबदारी घेत असाल, तरच तुम्ही त्यावर उपाय शोधू शकाल. हाच आहे पहिला धडा जो रिच डॅड ने शिकवला.

 

रिच डॅड ने आपल्या लेखकांना म्हणजेच रॉबर्ट यांना, एका किराणा दुकानामध्ये (कन्वीनीयेंस स्टोर) कामाला लावले होते. त्यांना या कामासाठी पैसे मिळाले नाही, पण ते मनापासून काम करत राहिले, याचा फायदा असा झाला की, त्या काळात त्यांच्या मनात बऱ्याच नवीन कल्पना येत राहिल्या. पैशाला आपल्या मागे कसे पळवयाचे, याविषयी त्यांच्या मनात अनेक आयडिया आल्या.

 

याचे एक उदाहरण पाहूया…

संध्याकाळी, दुकानात एक डिस्ट्रीब्युटर म्हणजेच वितरक येत होता. तो क्रेडिट देण्यासाठी कॉमिक्स बुक घेत आणि त्या बदल्यात नवीन कॉमिक्सची पुस्तके देत. एके दिवशी रॉबर्टने त्या डिस्ट्रीब्युटरला विचारले, मला जुनी कॉमिक्स बुक्स मिळतील का? ते त्याने मान्य केले, पण त्या कॉमिक्स बुक्सला रॉबर्ट विकणार नाहीत, या अटीवर.

 

ही त्यांच्या मनातील एक नवीन बिझनेस कल्पना-आयडीया होती. त्यांनी ती जुनी कॉमिक्स बुक्स, आपल्या मित्रांना आणि इतर मुलांना अभ्यासासाठी, वाचण्यासाठी भाड्याने देण्यास सुरुवात केली. ते प्रत्येक कॉमिक्स बुक्स मागे 10 सेंट एवढे पैसे लावत. प्रत्येक कॉमिक बुक्स केवळ दोन तास वाचण्यासाठी दिले जात होते, याचा अर्थ प्रत्यक्षात ते बुक्स विकत नव्हते. त्यांनी माईकच्या बहिणीला देखील त्या कामासाठी ठेवले, ज्यासाठी तिला दर आठवड्याला $1 डॉलर देण्यात आला व त्यांनी स्वत: $9.5 डॉलर्सची कमाई केली.

 

👉💡यातून ते शिकले की, पैशाला कसे स्वतः मागे पळवावे.

 

 

दुसरी शिकवण:

आर्थिक साक्षरतेचे महत्त्व

 

(फिनान्सियल लिटरसी-IMPORTANCE OF FINANCIAL LITERACY)

 

इ.स. 1923 मध्ये Edge water Beach Hotel Chicago शिकागो येथे एक मीटिंग झाली. जगातील बरेच नेते आणि खूप श्रीमंत उद्योजक या मीटिंग मध्ये होते. त्यात मोठ्या स्टील कंपनीचे मालक, चार्ल्स स्वाब आणि त्या काळातील सगळ्यात मोठे युटिलिटी प्रेसिडेंट सॅम्युअल इंसुल आणि बरेच मोठे बिझनेसमन होते. या मीटिंगच्या 25 वर्षानंतर, या लोकांपैकी बरेच जण गरिबीत मरण पावले, काहींनी आत्महत्या केली आणि बऱ्याच लोकांनी मानसिक संतुलन गमावले.

 

खरी गोष्ट अशी आहे, लोक पैसे कमाविण्यात इतके गुंतले जातात की, पैसा टिकून कसा ठेवायचा, ही विशेष गोष्ट शिकणे विसरतात. पैसे कमवण्यापेक्षा तो टिकून ठेवणे अवघड असते, आणि जर तुम्ही हे कौशल्य शिकला, तर तुम्हाला सहजपणे कोणत्याही त्रासदायक परिस्थितीचा सामना करता येईल. लॉटरीमध्ये लाखो जिंकणारे, काही वर्षे मजेत घालवतात, पण लवकरच ते त्यांच्या जुन्या स्थितीत पुन्हा येतात. 

 

बहुतेक लोकांना श्रीमंत कसे व्हायचे याबद्दल प्रश्न पडतात. तसेच बहुतेक लोक या प्रश्नांच्या उत्तरांमुळे निराश होतात. पण ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर, तुम्हाला अगोदर आर्थिक साक्षर व्हायला शिका, असे असेल.

 

पहा! जर तुम्हाला एक मोठी बिल्डिंग तयार करायची असेल, तर तुम्हाला, अगोदर एक खोल खड्डा खणून घ्यावा लागेल, त्यानंतर एक मजबूत पाया घालवा लागेल. पण जर तुम्हाला एक लहान घर बांधायचे असेल, तर 6 इंचाच्या कॉंक्रीट स्लॅबनेही तुमचे काम होईल. पण खेदजनक गोष्ट ही आहे की, आपल्यापैकी बहुतेकांना 6 इंचाच्या स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग बांधायची आहे, व त्यांनी तसे केले तर हे निश्चित आहे की, बिल्डिंग पडणारचं.

 

पुअर डॅड यांना रॉबर्टने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा असे वाटतं होते, पण रिच डॅड ला, रॉबर्टने फिनेंसियेली लिट्रेट म्हणजेच आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावे अशी इच्छा होती. बहुतेक शैक्षणिक संस्था एज्यूकेशन सिस्टम केवळ मजबूत घरे बनवण्यास शिकवतात, मजबुत पाया घालण्यास नाही. शालेय शिक्षणात, शिक्षणाचे स्वतःचे महत्त्व आहे, पण वास्तविक जीवनात केवळ हेच महत्त्वाचे नाही.

 

K  I  S  S
कीप इट सिंपल, स्टूपिड..!

 

लाएबिलिटीज़ आणि एस्सेट्स यांच्यातील फरक समजून घ्या आणि एस्सेट्स खरेदी करा, हे ऐकणे खूप सोपे वाटते. पण हा एक नियम आहे जो आपल्याला श्रीमंत बनविण्यात मदत करेल.  बरेचदा गरीब आणि मध्यमवर्गीय लोकं लाएबिलिटजला एस्सेट समजतात. पण श्रीमंतांना लाएबिलिटज आणि एस्सेट मधील खरा फरक माहीत आहे, म्हणून बहुतांश श्रीमंत लोकं एस्सेटला खरेदी करतात.

 

मालमत्ता व कर्ज यातील फरक :

तुम्हाला मालमत्ता व कर्ज यातला फरक कळणं आवश्यक आहे आणि मालमत्ता खरेदी करायची आहे हे समजलं पाहिजे. श्रीमंत व्हायचं असेल तर  हे माहीत असायलाच पाहिजे. श्रीमंत लोक मालमत्ता मिळवतात. गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज मिळवतात आणि तीच आपली मालमत्ता असल्याचं समजतात.

रिच डॅड “KISS” या तत्वावर विश्वास ठेवतात. याचा अर्थ "कीप इट सिंपल,स्टूपिड" असा आहे. त्यांनी आपल्या लेखक आणि माइकला ही सिंपल गोष्ट शिकविली, ज्यामुळे ते एक भक्कम पाया ठेवण्यात यशस्वी होतील. जर हे इतके सोपे आहे, तर प्रत्येक माणूस श्रीमंत होईल. नाही का?

 

Literacy v/s Financial Literacy

 

पण इथे प्रकरण उलट आहे. हे इतके सोपे असूनही कोणीही त्याबद्दल विचार करत नाही. लोकांना वाटते की, त्यांना लाएबिलिटीज़ आणि एस्सेट्‌समधील फरक माहित आहे, पण त्यांना केवळ लिट्रसी म्हणजेच साक्षरतेबद्दल माहिती आहे, आर्थिक साक्षरतेबद्दल नाही.

 

ॲसेट्स आणि दायित्वे
Asset आणि Liabilities विषयी माहीती-Assets and Liabilities information in Marathi

Asset म्हणजे एखादी संपत्ती,मालमत्ता किंवा धन.ज्यात घर,कार,दागिने जमिन,कंपनी इत्यादीपैकी कशाचाही समावेश होऊ शकतो.  

Asset म्हणजे एक अशी वस्तु किंवा गोष्ट जिच्यामुळे आपल्या खिशामध्ये पैसे येत असतात म्हणजेच पैशांची आवक होत असते.


इन्कम स्टेटमेंटला “प्रॉफिट किंवा लॉसचे स्टेटमेंट मानायला हवे. याचा अर्थ असा होतो की, इन्कम म्हणजे, तुमच्याकडे किती पैसे आले आणि एक्सपेंस म्हणजे किती पैसे खर्च झाले. बेलेंस शीट एस्सेट्स आणि लाएबिलिटीज़ मध्ये बॅलेंस बनवतात. बऱ्याच सुशिक्षित अकाउंटेंट्सना हे देखील माहिती नसते की बॅलेंस शीट आणि इनकम स्टेटमेंट एकमेकांशी कसे संबंधित असतात.

 

Financial Terms:

  • Profit & Loss – नफा-तोटा
  • Income & Expense – जमा-खर्च 
  • Income- उत्पन्न
  • Income Statement – 
  • Balance Sheet - विवरणपत्र
  • Assets - मालमत्ता
  •  Liabilities - दायित्व
  •  Cash flow- रोख प्रवाह
 


 

लाएबिलिटी मध्ये कॅश फ्लो असा होतो:

 

 

कॅशफ्लो चार्ट -रोख प्रवाह

 

कॅशफ्लो चार्ट -रोख प्रवाह

 वरिल हा चार्ट पाहायला खूप सिंपल-सोपा वाटेल. लोकांना हे सहज समजावून सांगता येते की, एस्सेट्स अशी गोष्ट आहे, जी तुमच्यासाठी पैसे कमविण्याचे काम करते.

 समजा, तुम्ही एखादे घर विकत घेतले आणि ते भाड्याने दिले,भाड्याने दिल्यामुळे, तुम्ही येणाऱ्या पैशातूनच, घर

खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकता. आता घर देखील तुमचे आहे आणि त्यामधून तुम्हाला मिळणारे भाडेही.

याउलट, लाएबिलिटीज मुळे तुमच्या खिशातून पैसे खर्च होतात. जसे की घर खरेदी करणे आणि त्यात आपण स्वतः राहाणं. यातून आपल्याला कोणतीही इन्कम मिळणार नाही.

 

तर आता, तुम्हाला समजले असेलच की, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल, तर एस्सेट्स खरेदी करा आणि

👉जर तुम्हाला गरीब रहायचे असेल तर लाएबिलिटीज़ बिल्ड करा.

श्रीमंत लोकांकडे जास्त पैसे असतात कारण ते KISS-कीप इट सिंपल, स्टूपिड" या तत्वाचे अनुसरण करतात. तर दुसरीकडे गरीब लोक या प्रिंसिपलला नीट समजून घेत नाहीत. म्हणूनच आपले लेखक यावर भर देतात की, केवळ लिट्रेट-साक्षर होऊ नका, तर आर्थिकदृष्ट्या साक्षर (फायनेंशियली लिट्रेट) व्हा.

बर्‍याच कुटुंबांमध्ये हे पाहिले गेले आहे की, कष्टकरी व्यक्तीकडे पैसे असतात, पण, ते सगळे पैसे केवळ लाएबिलिटीज़मध्ये खर्च केले जात असतील, तर त्याचा काय फायदा?

 

मध्यमवर्गीय जीवनशैली -Middle Class Cashflow

 आता पहा, हा मिडल क्लास कैश फ्लो आहे:

 

मिडलक्लास कॅशफ्लो चार्ट

 

 

इनकम स्टेटमेंट, ह्या चार्ट मधून आपल्याला कळतेकी, मध्यमवर्गीय माणूस आपले पैसे कसे खर्च करतो. जर त्यांची जगण्याची शैली-पद्धत हीच राहिली, तर ते आयुष्यभर मध्यमवर्गीय म्हणूनच जगतात. किंवा काय सांगता येईल, कदाचित सध्याच्या परिस्थितीहून ही बिकट अवस्था होवू शकते. 

कारण तुम्ही पाहू शकता की, त्यांचे सगळे पैसे लाएबिलिटीलज़ मध्ये खर्च होत असतात. 

  • कधी रेंट, 
  • कधी गाडीचं कर्ज, 
  • घराचं कर्ज, 
  • क्रेडिट कार्ड बिल, 
  • शाळेची फी 

अशा बऱ्याच गोष्टीसाठी त्यांची सगळी कमाई ते वाया घालवितात.

 

दुसरीकडे, खूप गरीब लोक येतात, ज्यांची कोणतीही लाएबिलिटी नाही, पण त्यांच्याकडे कोणतेही एस्सेट्स देखील नसते. ते पैसे कमवतात, पगार मिळवतात, पण त्यांचे सगळे पैसे दररोजच्या खर्चात निघून जातात. समजा एखादा, गरीब माणूस हजार डॉलर्स कमावतो.

त्यापैकी तो त्याच्या घर भाड्यासाठी 300 डॉलर, प्रवासासाठी 200 डॉलर, टॅक्ससाठी 200 डॉलर्स आणि अन्न व कपड्यांमध्ये 200 डॉलर्स खर्च करतो. शेवटी त्याच्याकडे काय उरेल? काही नाही, आणि कधीकधी तर त्याला कर्ज घेवून काम करावे लागते, ज्यामुळे तो अधिक गरीब होतो.

 

याउलट, श्रीमंत लोक एस्सेट्स विकत घेत असतात. मग त्यांचे एस्सेट्स त्यांना अधिक पैसे कमवून देतात. असेच त्यांचे उत्पन्न दोनचे चार, चारचे आठ होत राहतात.

 

बरेच श्रीमंत लोक डोक्याने काम करतात. ते घर कर्जावर घेऊन भाड्याने देतात. कोणतेही कष्ट न करता दरमहा भाडे मिळतं जाते, यामुळे ते त्यांच्या कर्जाची परतफेड देखील करतात. असं समजा, कर्जाचा हप्ता $1 डॉलर असेल, तर ते त्यांच्या घरासाठी 2 डॉलर भाडे आकारतील. आपल्या खिशात 1 डॉलर आणि बँकेला 1 डॉलर.

 RICH AND POOR ARE TWO SIDES OF A COIN..!

 

यातून आपल्याला कळते, रिच डॅड आणि पुअर डॅड यांच्यात केवळ विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपले लेखक म्हणतात, पैसे कसे आणि कुठे खर्च करायचे, हे समजनेच खूप महत्वाचे आहे.

 

1960 च्या दशकात, 'मुलांना मोठे होवून काय व्हायचे?' असं विचारले, तर सगळ्यांचे उत्तर एकच असायचे, ते चांगले ग्रेड आणतील आणि डॉक्टर-इंजिनियर होतील. त्या वेळी सगळ्यांना असे वाटतं, चांगले ग्रेड घेऊन ते खूप पैसे कमवू शकतील. त्यापैकी बरेच लोक आज मोठे डॉक्टर-इंजिनियर झाले आहेत, पण असे देखील खूप आहेत, जे अजूनही फायनेंशियेली स्ट्रगल करताना दिसतील.

 

आज अशी परिस्थिती नाही. आज बऱ्याच मुलांना प्रसिद्ध खेळाडू, एखाद्या कंपनीचा सिईओ किंवा सिनेकलाकार, रॉकस्टार बनण्याची इच्छा असते. कारण त्यांना माहितआहे, केवळ चांगला अभ्यास आणि चांगल्या ग्रेडवर अवलंबून राहून, त्यांची कारकीर्द घडू शकत नाही.

 

आजकाल फायनेंशियल नाईटमेयर खूप प्रचलित झाले आहे. बरेचदा नवीन विवाहित जोडप्यांना असे वाटते की, आता त्यांची सॅलरी दुप्पट होईल, कारण दोघेही पैसे कमवत आहेत. एका छोट्याशा घरात राहून, ते एका मोठ्या घराचे स्वप्न पहायला लागतात, त्यासाठी ते पैसे जमवू लागतात. 

यामुळे त्यांचे सगळे लक्ष केवळ त्यांचे करियर बनविण्यात राहते. आणि त्यांची कमाई वाढू लागते, आता ह्या नवीन जोडप्याने, इतके पैसे मिळवले की, त्यांना एक मोठे घर विकत घेता येईल. त्यांना वाटेल, ते आता थोडे श्रीमंत झाले आहेत.

 

पण वास्तव हे आहे की, मोठ्या घराबरोबरच, ते नवीन लाएबिलिटीज़ खरेदी करतील. प्रॉपर्टी टैक्सचा खर्च आता त्यांच्या कैश फ्लो मध्ये वाढला आहे. आता त्यांना नवीन कार, फर्निचरची गरज वाटेल. त्यांची लाएबिलिटीज़ वाढतच जाईल व त्यामुळे उत्पन्नासोबत खर्चही वाढू लागेल

जेव्हा तुम्ही फायनेंशियेली लिटरेट न होता, पैसे कमवत असाल किंवा विचार न करता खर्च करत असाल, तर तुम्ही आधीपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यास सुरवात करता.

 

 

 #लक्षात ठेवा:

Salary is a DRUG which is given to you
to forget your DREAM..!

अधिक वाचा:

               

हा एक असा ट्रॅप आहे, जो चालूच राहतो. आणि आपण या रॅट रेस मध्ये पूर्णपणे फसलेलो असतो. असेच लोक आपल्या लेखक रॉबर्टकडे येतात, आणि विचारतात, श्रीमंत कसे व्हायचे? आता हा प्रश्नचं, अडचणींचे मूळ कारण आहे. 

त्यांची समस्या ही नाही की, ते जास्त पैसे कमवत नाहीत, तर त्यांच्याकडे जे काही आहे, ते कसे हाताळायचे हे त्यांना माहीत नसते. एक म्हण आहे, जी येथे लागू होते "जेव्हा तुम्ही स्वत:ला खोल खड्ड्यात पडलेले पाहता, तेव्हा तुम्ही खोदणे थांबविता"

 

का बरं लोक पब्लिक स्पिकिंगला घाबरतात? कारण लोकांना रीजेक्शनची भीती असते, असे मनोचिकित्सकांचे मत आहे. "लोक आपल्याबद्दल काय विचार करतील (सबसे बडा रोग… क्या कहेंगे लोग..) आणि ते आपल्यावर हसणार तर नाही ना?" अशा विचारांमुळे खूप लोक पब्लिक स्पिकिंग पासून दूर पळतात. त्यांना तेच करायला आवडते जे सगळे करतात, ते स्वतःला गर्दीचा एक भाग बनवून संतुष्ट होतात.

 

  • "तुमचे घर तुमचे सर्वात मोठे एस्सेट आहे", 
  • "लोन घ्या",
  •  "आता प्रमोशन झाले आहे आता सॅलरी वाढली आहे, तर नवीन घर घ्या"

 

ह्या अशा गोष्टी आपण लोकांकडून नेहमी ऐकत असतो. आपण देखील त्याच रस्त्यावर चालायला लागतो. आपण असा विचार करतो की, जे सगळेच करत आहेत तेच बरोबर असेल. हो की नाही?

पण नाही! असं बिलकुल नसते. रिच डॅड ने म्हंटले होते, जापनीज लोकं तीन गोष्टींची ताकत ओळखतात; तलवार, किमती दागिने आणि आरसा. तलवार आपल्या ताकतेचे प्रतीक आहे. किमती दागिने पैशाचे प्रतीक व आरसा स्वतः मध्ये असलेली ताकद दर्शवतो आणि तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.

 


रिच डॅड ज्या काही मिटींग्स आपल्या एकाउंटेंट, मेनेजेर्स, इन्वेस्टर आणि एम्प्लाई सोबत ठेवत, तेथे सोळा वर्षाच्या रॉबर्ट व माईक यांना घेऊन जात. येथे एक असे रिच डॅड पाहायला मिळतात, जे कमी शिकलेले आहेत. ज्यांनी वयाच्या 13 व्या वर्षीच शाळा सोडून दिली होती, पण आज ते मीटिंग्स ठेवतात व त्यांच्या खाली काम करणाऱ्या उच्च शिक्षित लोकांना ऑर्डर व बिझनेसच्या टिप्स समजून सांगतात. 

हे असे व्यक्ती होते, जे गर्दीचा भाग बनले नाही, ज्यांनी धोका पत्कारला, रिक्स घेतली, लोकांच्या मताची पर्वा केली नाही.

 

रिच डॅड सोबत अटेंड केलेल्या मिटींग्स मुळे लेखक व त्यांच्या मित्राचे शालेय शिक्षणात लक्ष लागत नव्हते. जेव्हा केव्हा त्यांचे शिक्षक त्यांना काही काम देत, तेव्हा ते काम त्यांना ठरलेला नियमानुसार पूर्ण करावे लागे, आणि यामुळे त्यांना समजले की शालेय शिक्षण कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला ओळखत नाही. 

त्यांच्या क्रिएटिव्हिटीला मारून त्यांना समाजाचा एक पुतळा बनवले जाते. "चांगले मार्क्स मिळवुनच यशस्वी-सफल व श्रीमंत बनता येते" हे त्यांच्या शिक्षकांचे म्हणणे त्यांना पूर्णपणे चुकीचे वाटतं होते.

 

एकेदिवशी रॉबर्टचे त्यांच्या पुअर डॅड सोबत भांडण झाले. त्यांचे म्हणणे होते की, त्यांचे घरच त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. पण ते एका २7 २.८६ चे भाग होते, जेवढी त्यांची इन्कम होती तेवढा त्यांचा खर्च होता. हीच गोष्ट रॉबर्ट त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, त्यांचे घर एस्सेट नव्हे, तर लायबिलिटी आहे. 

त्यांच्या घरावर त्यांचे पैसे खर्च होत होते, आणि बदल्यात त्यांना काहीच मिळत नव्हते. ही गोष्ट पुअर डॅड यांना समजत नव्हती आणि हाच फरक होता रिच डॅड आणि पुअर डॅड मध्ये. अश्या पद्धतीनं त्यांचा तो वादविवाद चालूच राहिला. त्यांनी आपल्या पुअर डॅड ला सांगितले की, खूप लोकांचे जीवन लोन फेडण्यातच निघून जाते. ते लोन पूर्ण फेडल्यावर काही लोक पुन्हा एक मोठे नवीन घर घेतात, आणि त्याचे लोन फेडत राहतात.

 

आता घराची किंमतही, त्याचप्रमाणे वाढेल की,  नाही हे अनेक गोष्टींवर निर्भर करते. काही लोक असेही आहेत, ज्यांनी जेवढी घराची किंमत नव्हती त्यापेक्षा मोठी रक्‍कम लोन म्हणून घेतली आणि यामुळे घराच्या किमतीपेक्षा जास्त कर्ज त्यांच्या डोक्यावर येते.

 

याचं सगळ्यात मोठं नुकसान असं होत की, ते लोक अशा कर्जामुळे इतर कोणत्याही गोष्टीत इन्वेस्ट करू शकत नाही, कारण त्यांचे सगळे पैसे घरातच जातात. यामुळं त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी आणि इन्वेस्टमेंट बद्दल काहीच शिकायला मिळत नाही. अशा प्रकारे अनेक चांगले एस्सेट्स त्यांच्या हातातून निघून जातात. त्यामूळे लोकांनी फक्त एस्सेट्सवर लक्ष दिले, तर त्यांचे फ्युचर आधिक चांगले होईल.

 

एक उदाहरणाद्वारे समजून घेवू;

रॉबर्टच्या पत्नीचे पालक एका मोठ्या घरात शिफ्ट होणार होते. त्यांचे असे मत होते की आपल्यासाठी एक नवीन, मोठं घर घेणे हा एक उत्तम निर्णय असेल. कारण इतरांसारखाच त्यांनादेखील घर विकत घेणे हेच एकमेव एस्सेट्स

आहे असं वाटत होतं. पण ते आश्चर्यचकित झाले जेव्हां त्यांना समजले की, त्या घराच्या प्रॉपर्टीचा टॅक्स $1000 आहे. ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी किंमत होती, कारण ते रिटायर झाले होते. त्यामुळे एवढे पैसे टॅक्समध्ये भरणे त्यांच्या बजेटच्या बाहेर होते.

 

आम्ही असे म्हणत नाही आहोत की, तुम्ही नवे घर घेऊ नका. आम्हाला असं म्हणायचं आहे की जितके पैसे तुम्ही नवीन आणि मोठे घर घेण्यात लावणार, ते जर कोणत्या एस्सेट्स मध्ये इन्व्हेस्ट केले तर बरं होईल.

 

तुमचे एस्सेट तुमच्यासाठी पैसे कमवतील आणि काही काळानंतर तुमच्याकडे इतके पैसे असतील की, तुम्ही कोणत्याही कर्जाशिवाय तुम्हाला हवं असलेलं घर सहजपणे घेण्यास सक्षम असाल.

 

हा एक कर्जात डुबलेला समाज आहे, ज्यात आपण राहतो. आपल्या घराला एस्सेट समजणे, हेच ते कारण आहे, जे आपल्याला कर्जाच्या ओझ्याखाली दाबते. जर आपली सेलेरी वाढली, तर लोक विचार करतात की, आता ते एक मोठे घर घेऊ शकतात.

 

कारण त्यांना नवीन घर घेणं हेच पैशाचा चांगला वापर आहे असं वाटते. याच्या बदल्यात जर त्यांनी ते पैसे एखाद्या योग्य जागी इन्व्हेस्ट केले, तर त्यांचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. पण असं होत नाही. त्यांचा पूर्ण वेळ कष्ट करण्यातच निघून जातो.

 

आपल्या नोकरीला सेफ झोन समजल्यामुळे, ते इतर गोष्टींचा विचार करू शकत नाहीत. सोबतच त्यांच्यावर कर्जाचे एवढे ओझे असते की, ते नोकरी सोडण्याचा ही विचार करू शकत नाहीत. आता स्वतःला हा प्रश्न विचारून पहा, आत्ता जर तुम्ही तुमची नोकरी सोडली, तर किती दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा भागवू शकता?

कारण तुम्ही फायनेंशियली लिटरेट नाहीत. जर तुम्ही तुमचे सगळे आयुष्य फक्त सॅलरी वरच भागवले असेल आणि एस्सेट्सच्या बदल्यात लाएबिलिटीज घेतल्या असतील, तर नक्काच तुमचं जीवन एक खूप मोठा संघर्ष असेल.

 

Net Worth-नेट वर्थ आपल्याला सांगते, आपल्याकडे खरचं किती पैसे किंवा संपती आहे. कदाचीत ती संपती गॅरेजमध्ये पडलेल्या जुन्या कारच्या स्वरूपात देखील असू शकते. भलेही ती कार तुमच्या कामाची नसेल. तर दुसरकडे वेल्थ मुळे आपल्याला समजते की आपल्याकडे असलेल्या पैशातून आपण किती पैसे कमवतो.

 

समजा जर तुमच्याकडे अशी एस्सेट आहे, जी तुम्हाला दरमहा $5000 कमाई करुन देते आणि जर तुमचा महिन्याचा खर्च $6000 असेल तर तुम्ही $5000 मध्ये फक्त अर्धा महिने तुमचा खर्च भागवू शकता. तर मग याचे सोल्युशन काय असेल? याचे एकच सोल्युशन आहे ते म्हणजे आपण आपल्या एस्सेट्स मधून मिळणारी इन्कम वाढवायला हवी.

 

जेव्हा इन्कम $6000 इतकी होईल तेव्हा तुम्ही एका रात्रीत श्रीमंत होणार नाही, पण अशाच पद्धतीने तुम्ही वेल्थी व्हायला लागाल. आता जर तुम्ही अचानक नोकरी सोडली, तरी तुमचे एस्सेट्स तुमचा सगळा खर्च कव्हर करतील. तुम्ही वेल्थी तेव्हाच बनू शकता जेव्हा तुमचे खर्च तुमच्या एस्सेट्स च्या ग्रोथ पेक्षा कमी असतील.

 

 

 

तिसरी शिकवण:

तुमच्या कामाशी काम ठेवा.

 

जगात सगळ्यात मोठ्या फुड चेन मॅकडोनाल्डचे फाउंडर ‘रे क्रोक' यांनी एका MBA क्लासमध्ये स्पीच दिली होते. ही 1947 ची गोष्ट आहे, त्यांचे हे स्पीच खूपच छान व लोकांना प्रेरित करेल असे होते. स्पीच संपल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यांना काही वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करावा अशी रिक्वेस्ट केली व ती त्यांनी मान्यही केली. तेव्हा बोलण्या बोलण्यातच रे क्रोक यांनी, तेथील विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला,

 

“तुम्हाला माहितआहे का, मी कोणत्या बिजनेस मध्ये आहे?"

 

आता ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती की, ते हॅमबर्गर विकतात.
हे ऐकून ते हसायला लागले व म्हणाले,

 

 "त्यांचा खरा बिजनेस तर रियल इस्टेट आहे..!"

 

मॅकडोनाल्ड साठी प्रत्येक लोकेशनची निवड खूप विचारपूर्वक केली जाते आणि तेथे त्याची फ्रॅँचाईजी बनवली जाते. याचा सरळ सोपा अर्थ असा होतो, मॅकडोनाल्ड ची फ्रँचायजी विकत घेणाऱ्याला ती जमीन देखील विकत घ्यावी लागते. अशा पद्धतीने पाहिलं, तर हा एक रिअल इस्टेट बिजनेस ही होऊ शकतो.

 


बऱ्याचदा लोकं स्वतःसाठी सोडून दुसऱ्यांसाठी किंवा कंपनीसाठी काम करतात. हे सगळं होण्याचे कारण म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम. शाळा आपल्याला उद्योजक नाही तर कर्मचारी बनायला शिकवते.

 


जे तुम्ही वाचता ते तुम्ही बनता..!

You will become what you READ.

 

Also Read:

 

जर तुम्ही बायोलॉजी शिकला असाल, तर डॉक्टर, मॅथेमॅटिक शिकला असाल, तर इंजिनियर म्हणजे तुम्ही जे शिकता, ते तुम्ही बनतात. जर एखद्याने विचारले, "आपला व्यवसाय काय आहे?" तेव्हा एखद्याने हे म्हणने चुकीचे असेल की, मी एक डॉक्टर किंवा बँकर आहे, कारण ते तुमचे प्रोफेशन आहे, व्यवसाय नाही.

 

सांगायचे तात्पर्य हे आहे की,

तुम्ही जे करता त्याला तुमचा बिजनेस बनवा, नोकरी नाही.

इतरांना श्रीमंत बनविण्याकरिता आपले सगळे आयुष्य वाया घालवू नका, तर आपले जीवन समृद्ध करण्यासाठी काम करा.

 

 

चौथी शिकवण: एस्सेट्स

 

बर्‍याच लोकांना हे उशीरा कळते की, गृह कर्जा मुळे त्यांचे जीवन त्रासदायक बनले आहे. नंतर त्यांना वाटू लागते, त्यांनी चूक केली आहे. खरंतर ती कोणती एस्सेट नव्हतीच. जेव्हा लोक कार घेतात, तेव्हा त्यासंबंधित असणारे इतर खर्च त्यांच्यासाठी लाएबिलिटीज़ होतात. एखादी नोकरी त्यांना ह्या लाएबिलिटीज़ना फेडण्यासाठी आवश्यक आहे आणि जर ती नोकरी त्यांच्या हाताततून  गेली तर त्यांचा त्रास सुरू होतो.

 

म्हणूनच आम्हा तुमच्या उत्पन्नाच्या कॉलमवर नव्हं, तर एस्सेट कॉलमवर जास्त जोर देत आहोत. आणि फिनेंशियली सिक्योर होण्यासाठी हाच एक मार्ग आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात, हे जाणून घेण्यासाठी नेट वर्थ हा योग्य मार्ग नाही, कारण जेव्हा तुम्ही तुमची एस्सेट्‌स विकता, तेव्हा त्यांच्यावर देखील कर आकारला जातो. तुम्हाला वाटतात तितके पैसे, तुम्हाला मिळणार नाहीत.

 

तुमच्या बेलेंस शीट नुसार तुम्हाला जे काही पैसे मिळतील, त्यावर कर भरावा लागेल. हे पुस्तक तुम्हाला कधीही नोकरी सोडण्याचा सल्ला देणार नाही. तुम्ही तुमची नोकरी करत रहा, पण एस्सेट्स देखील जमा करा. मी असे म्हणणार नाही, तुम्ही कार घ्या, कारण जेव्हा तुम्ही गाडी चालवण्यास सुरुवात करता, तेव्हा त्याची किंमत 25% ने कमी होते. शक्‍य तितका खर्च व लाएबिलिटीज़ कमी करा.

 

मग कोणत्या प्रकारचे एस्सेट्स खरेदी केले पाहिजेत?
 

येथे आम्ही आपल्याला काही उदाहरणे देत आहोत:

 

एक असा बिझनेस, जिथे तुमची उपस्थिती जास्त महत्त्वाची नसेल. ज्याला दुसरे लोक तुमच्यासाठी चालवतील. कारण जर तुम्ही तेथे जास्त वेळ देत असाल, तर तो बिझनेस नव्हे, तर एक नोकरी ठरेल.

 

  • रियल इस्टेटमध्ये पैसा लावा. रियल ध्ये पैसा लावा.
  • स्टॉक किंवा बाँड खरेदी करा.
 

जेव्हा एस्सेट विकत घ्याल, तेव्हा तुमच्या आवडत्या गोष्टींवर पैसे लावा. कारण तुमचे मन असेल, तरचं तुम्ही त्यामध्ये लक्ष देऊ शकाल. तुम्हाला त्यात रुची आल्यावरच तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने समजू शकाल.

रॉबर्टला रियल इस्टेट व स्टोक्स मध्ये रुची होती. खास करून छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणे. रिच डॅड च्या सल्ल्यानुसार, रॉबर्टने आपली नोकरी कधीच सोडली नाही. तो जॉब करत राहिला, तसेच त्याच्या एस्सेट कॉलमला मोठे आणि मज़बूत बनवत गेला.

 

  • जो पैसा तुम्ही कमवता त्यातील एक पैसाही वाया जाऊ देऊ नका. 
  • तुम्ही पैशाला, गुलाम मानून काम करा.

 

तुम्ही लक्झरी गोष्टी विकत घेण्याचा विचार करतं आहात का? नक्कीच घ्या. पण हे विसरू नका, जिथे मध्यम वर्गाती पैसे येताच, पहिले लक्झरी मध्ये खर्च करेल. तर त्या उलट तेथे श्रीमंत माणूस त्याला शेवटी विकत घेईल. एवढं समजून घेतल्यानंतर आता तुम्ही, पुढच्या शिकवणीमध्ये श्रीमंत लोकांच्या सगळ्यात मोठ्या सिक्रेट बद्दल जाणून घेणार आहात.

 

 

 

पाचवी शिकवण:

श्रीमंत लोक पैसे बनवतात..! (Rich People Invent Money)

 

अलेक्जेंडर ग्रैहम बेलने टेलिफोन invent केल्यानंतर टेलिफोन ला स्वतःचे पेटंट बनवले होते. त्यांचा बिझनेस एवढा वाढला की, सांभाळणने अवघड होवू लागले. ते वेस्टर्न  युनियनला गेले आणि त्यांनी त्यांच पेटेंट व त्यांच्या छोट्या कंपनीला 1,00,000 डॉलरला विकण्याचा प्रस्ताव मांडला. 

त्यावेळी वेस्टर्न यूनियनच्या अध्यक्षाने, हा प्रस्ताव अस्वीकार केला. त्यांना $1,00,000 जरा जास्तच वाटत होते. म्हणून बेल ने मग स्वत:च कंपनी उभारण्याचे काम सुरु केले आणि मग याच्या परिणाम स्वरूपात AT & T या जगप्रसिद्ध कंपनीचा जन्म झाला.

  "In the real world, it's not the smart that get ahead
but the BOLD."
-Robert Kiyosaki

रॉबर्ट 1984 पासून प्रोफेशनल लेव्हलला शिकवत होते. एक गोष्ट जी हजारो लोकांना शिकवल्यानंतर त्यांना समजली, ती म्हणजे, खरं पाहिलं, तर प्रत्येक एका व्यक्तीमध्ये पोटेन्शियल आहे, जे त्याला महान बनवू शकते. 

पण जी गोष्ट आपल्याला थांबवते ती म्हणजे स्वत:वर डाउट करणे. शालेय शिक्षण झाल्यानंतर आपल्याला समजते, जीवनात पुढे जाण्यासाठी फक्त चांगले मार्क्सचं गरजेचे नाहीत.


फक्त चांगले मार्क्स घेणारे लोकचं पुढे जात नाहीत, तर ती लोकही पुढे जातात, जी  बोल्ड असतात.

 

Those are not SMART who change the world..!
but those are BOLD who change the world.

 

Read more.. BOLD by Peter


ही गोष्ट खरी आहे, फायनेंशियेल जीनियस होण्यासाठी त्याचे पूर्ण नॉलेज असणे गरजेचे आहे. पण त्या सोबत हिम्मत आणि बोल्डनेस सुद्धा महत्त्वाची आहे. बरेच लोकं पैशाच्या बाबतीत तरी, रिस्क घेत नाहीत. पण श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल. स्वतः ला बोल्ड बनवून, रिस्क घेण्याची हिम्मत करावीच लागेल.

 

कदाचित येणाऱ्या काळात एखादा नवीन बिल गेट्स तयार होवू शकतो किंवा नवीन एलेक्जेंडर ग्राहम बेल जन्म घेऊ शकतो, आणि असं ही होवू शकतं की, बाकी सगळे गरिबीतचं जगतील. आता निवड तुमची आहे, तुम्ही काय बनू इच्छिता. तुम्ही तुमचा फायनेंशियेल आईक्यू म्हणजेच आर्थिक बुद्ध्यांक वाढवत असाल, तर तुम्ही खूप काही मिळवू शकता. नाही तर येणारे काही वर्षे, अजूनही भयानक असू शकतात.

 

कारण, प्रत्येक जुनी गोष्ट जाते तेव्हा नवीन येत असते. आजच्या काळात लोकं फायनान्शिअल स्ट्रगल करत आहेत, कारण त्यांचे विचार अजूनही जुने आहेत व ते स्वतःची चूक न स्विकारता, बॉसला किंवा नवीन टेक्नॉलॉजीला दोषी ठरवतात. जे काल एस्सेट होते, तेच आज लायबिलिटी बनलेत, त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणे गरजेचे आहे.

 

 

रॉबर्टने एक गेम डिझाइन केला, ज्याला ते "कॅश फ्लो" म्हणतात. हा गेम लोकांना शिकवतो की, पैसा कसे काम करतो, श्रीमंत होण्यासाठी कोणता मार्ग आहे आणि रॅट रेस मधून बाहेर कसे पडावे? या सगळ्या गोष्टी लेखकांनी या गेममधून समजवण्याचा प्रयत्न केलाय. एके दिवशी, एका महिलेने, गेम खेळताना एक बोट कार्ड जिंकले. 

याचा अर्थ होता की तिने त्या गेम मध्ये एक बोट जिंकली. त्या बाईला खूप आनंद झाला, पण जेव्हा तिला समजले की, ती बोट घेण्यासाठी तिला एक मोठी रक्‍कम टॅक्सच्या स्वरूपात भरावी लागेल, हे ऐकून तिचा आनंद जणु गायब झाला.

 

ती नाराज झाली, कारण ती बोट तिच्यासाठी एक एस्सेट नव्हे, तर लाएबिलिटी बनली होती. तिला समजले होते, टॅक्स ची रक्‍कम तर तिला कंगाल करेल. यामुळे तीने रिफंडची मागणी केली आणि तिला तिचे पैसे परत मिळाले व ती तिथून रागात निघून गेली, पण नंतर तिला या गेमची आयडिया समजायला लागली. आता ती त्या गेमला स्वतःच्या लाईफ सोबत जोडून पहात होती.

 

पैसे कसे काम करतात ही गोष्ट न समजल्यामुळे तिचे तेथून रागात निघून जाणे आणि चिडचिड करणे सहाजिक होते. आपणही नॉर्मली असंच रिअँक्ट करतो, जी गोष्ट आपल्या समजण्याच्या बाहेर आहे, तिच्यावर आपण लवकर राग व्यक्त करतो. पण जर शांत डोक्याने विचार केला, तर  तुम्हाला कळेल, रिअँक्ट होण्याची ही पद्धत एकदम चुकीची आहे.

 

खूप सारे लोक "कैश फ्लो" गेममध्ये खूप पैसा जिंकतात, पण त्यांना समजत नाही की, त्या पैशाचा वापर कसा करायचा. आणि ते गेम मध्ये हरायला लागतात. याचं कारण आहे, त्यांची जुनी विचारपद्धती, जी त्यांना पुढे जाऊ देत नाही. यामुळे हळू हळू ते सगळा पैसा हरवून बसतात.

 

काही लोक म्हणतात, त्यांच्याकडे योग्य पत्ते नसल्याने ते हारले. बरीच लोकं अशाच पद्धतीने जीवनात एखद्यासंधीची वाट पहात बसतात.

 

काही लोकांना, संधी मिळते देखील, पण संधीचे सोने कसे करायचे, संधीचा फायदा कसा करून घ्यायचा, हे त्यांना माहीत नसते. याचे कारण देताना ते म्हणतात, त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना संधीचा फायदा घेता आला नाही.

 

काही लोकं अशी ही आहेत, ज्यांना पैसा आणि संधी दोन्ही मिळतात पण ते त्याचा फायदा घेऊ शकतं नाही, कारण त्यांना समजतच नाही की, स्वतःला अवलंबवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे..

 

 

 

आर्थिक बुद्ध्यांक : financial Intelligence

 

फायनान्शियल इंटेलिजन्सचा अर्थ असा हेातो की, तुम्ही पैशाच्या बाबतीत किती क्रिएटिव्ह आहात.  जर तुम्हाला पैसे नसताना संधी मिळाली तर तुम्ही काय काय कराल? आणि जर पैसा असेल पण संधी नसेल, तर काय कराल? हे सगळं तुमच्या फायनान्शियल इंटेलिजन्सवर  अवलंबून आहे.  तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे, संधीची वाट न पाहता, स्वत:च स्वत:साठी संधी निर्माण केली जाऊ शकते.

 

जी लोकं यशस्वी झाली आहे, त्यांच्यासोबत जर चालायचे असेल, तर तुम्हाला पैसे कमवण्याची इच्छा स्वत:मध्ये निर्माण करावी लागेल.  तुम्हाला तुमच्या सगळ्यात मोठ्या एस्सेट म्हणजेच तुमच्या विचारांमध्ये गुंतवणूक करावी लागेल, कारण तुमचे विचाराचं तुमच्यासाठी सगळ्यात मोठै एस्सेट आहे.  ते आपल्याला खूप जास्त श्रीमंत किंवा खूप जास्त गरीब बनवू शकतात.

 


उदाहरणार्थ:

1990 च्या दशकात एरिजोना आणि फोनिक्सची आर्थिक परिस्थिती बिकट होती.  तेथे प्रत्येकाला दर महिन्याला 100 डॉलर बचत करण्याचा सल्ला दिला जात होता.  बिकट परिस्थितीत पैशाची बचत करण्याचा विचार हा काही काळापुरता योग्य आहे.

पण त्या पैशाचा उपयोग काय, जो तुम्ही केवळ जमा करून ठेवता.  यापेक्षा त्या पैशातील काही भाग इन्वेस्ट करायला हवा, ज्यातून तुम्हाला उद्यासाठी काही फायदा होईल.

 

तर मित्रांनो, एरिज़ोना आणि फोनिक्स मधील लोकांबद्दल बोलुयात, जे बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देत होते. अशातच इन्वेस्टरला ही एक मोठी संधी वाटली. लोकं त्यांची प्रॉपर्टी कमी पैशात विकू लागले होते. जी गुंतवणूकदारांनी विकत घ्यायला सुरुवात केली. आपले लेखक, म्हणजेच रॉबर्टने देखील 75,000 डॉलर किमतीचे एक घर फक्त 20,000 डॉलर मध्ये विकत घेतले. त्यानंतर त्यांनी अटॉर्नीच्या ऑफिसमध्ये एक एंड दिली व 75,000 डॉलरचे घर केवळ 60,000 डॉलरमध्ये घेण्यासाठी ग्राहकांची लाईन लागली. 

 

 👇ALSO READ👇


रॉबर्टचा फोन वाजने बंद होत नव्हते. हा पैसा त्यांना त्या एस्सेट मधून मिळणार होता, जो त्यांनी प्रॉमिसरी नोटच्या स्वरूपात ग्राहकांकडून घेतला होता. त्यांना एवढे पैसे कमविण्यासाठी फक्त पाच तास लागले. त्यांनी $40,000 कमवले, जे त्यांच्या कॉलम ऑफ़ एस्सेट मध्ये क्रिएट झाले होते. 

अशा प्रकारे, टॅक्स न भरता, अचानक आलेल्या एका संधीचा फायदा घेऊन, त्यांनी हे पैसे क्रिएट केले. काही वर्षानंतर, त्यांनी या बिझनेस मधून खूप पैसे कमावले. आणि त्यांनी तो पैसा कंपनी, इन्शुरन्स, क्लाइंट्ससोबत डिनर, ट्रिप आणि इतर गोष्टंसाठी वापरला.

 

सरकार टॅक्स लावेल, त्याआधीच या सगळ्या मध्ये खूप साऱ्या गोष्टी फ्री टॅक्स 6200610565 म्हणून खर्च झाल्या होता. काही वर्षांनंतर, $60,000 मध्ये विकल्या गेलेल्या घराची किंमत आता 110,000 डॉलर्स झाली होती. त्यांच्याकडे अजूनही काही संधी होत्या, पण रॉबर्टला त्याच्यासाठी एक मौल्यवान एस्सेट आणित्यांचा वेळ देखील वापरावा लागला असता. म्हणून ते पुढे गेले कारण त्यांना नवीन संधी शोधायची होती.

 

हे जग नेहमी बदलत राहते, जे आज आहे, ते उद्या नसणार, कधी मंदी असेल, तर कधी तेची. वेळे सोबत टेक्नॉलॉजी पुढे जातं राहील. आज मार्केट वर आहे, तर उद्या खाली असेल, खास करून स्टॉक मार्केट. पण जर तुम्ही फायनान्शिअल इंटेलिजंट असाल, तर यातून तुम्हाला काय फरक पडेल. कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार असाल. 

तसेच तुम्हाला जीवनात अनेक संधी ही मिळतील. येथे तुम्ही तुमच्या फायनान्शिअल इंटेलिजंसचा फायदा उठवू शकतात. गरजेचे आहे, ते फक्त त्या संधींना पकडणे...

 

नॉर्मली आपण 2 प्रकारचे गुंतवणूकदार पाहतो, पहिले जे पॅकेज इन्व्हेस्टमेंट विकत घेतात, खरंतर हे फार सोपे व बिनाझंजटचे काम आहे. दुसरे इन्वेस्टर स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट क्रिएट करतात. यांना तुम्ही प्रोफेशनल ही म्हणू शकता. 

जेवढं हे इन्वेस्ट करतात त्यापेक्षा खूप जास्त पैसे हे कमवतात. जर तुम्हाला या सारखे इन्वेस्टर बनवायचे असेल, तर तुम्हाला खास करून या तीन कौशल्यांना ‍किंवा स्कील्सला समजणे गरजेचे आहे:

 

१) बाकीच्यांना मिळणार नाही, अशी एक संधी शोधा.

  लक्षात ठेवा, तुमचे मन ते पाहू शकते, जे दुसऱ्यांचे डोळे पाहू शकत नाहीत.

 

२) पैसे वाढवा.

 जेव्हा गरज पडते, तेव्हा मिडलक्लास फक्त बँकेत जातात, पण दुसरीकडे इन्वेस्टर पैशाला मोठे करून

बरचं कॅपिटल आणतात, त्यांना नेहमी बँकेची गरज पडत नाही.

३)स्मार्ट लोकांना ऑर्गनाईज करा.

इंटेलिजंट लोक ते असतात जे आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट लोकांसोबत काम करतात. त्यामुळे इन्वेस्टमेंट करण्याआधी आपल्यासाठी एक चांगला इन्व्हेस्टमेंट एडवाइज़र निवडा.मला माहित आहे की, हे सगळं तुमच्यासाठी खूप जास्त आहे, पण हे लक्षात ठेवा की याचे फळ देखील शानदार असणार. जीवन आले की, रिस्क येतेच, पण त्याला हँडल करूनच तुम्ही श्रीमंत बनू शकता.

 

 

सहावी शिकवण:

शिकण्यासाठी काम करा पैशासाठी नव्हे

 

एकदा एका जर्नालिस्टने रॉबर्टचा इंटरव्यू घेतला, रॉबर्टने तिचे आर्टिकल पहिलेच वाचले होते आणि त्या  र्नलिस्टच्या लिखाण शैलीने रॉबर्ट फार प्रभावित झाले होते. इंटरव्यू नंतर त्या जर्नलिस्टने रॉबर्टला सांगितले, तिला देखील एक फेमस लेखिका बनून रॉबर्ट सारखं प्रसिध्द व्ह्यायचे आहे. रॉबर्टने तिला विचारले,

 

"तर मग असं काय आहे जे तुला फेमस होण्यापासून थांबवत आहे?"

 

या प्रश्नावर उत्तर देत ती जर्नलिस्ट म्हणाली, तिचा जॉब-नोकरी तिला पुढे जाऊ देत नाही आहे. यावर उत्तर देत रॉबर्टने तिला एक सूचना दिली, त्या जर्नालिस्टला कोणतातरी सेल्स क्लास जॉईन करायला हवा.

 

जर्नलिस्टने सांगितले, तिच्या एका मैत्रिणीने तिला आधीच ही ऑफर दिली आहे, पण तिला ते छोटं काम वाटत होते. ती हे विसरली होती की, रॉबर्ट स्वतः एकेकाळी सेल्स स्कूल मध्ये होते. या गोष्टीचे तात्पर्य हे आहे, जर तुमच्याकडे कोणते टॅलेंट असेल व जर त्याच्या दमावर तुम्ही काही पैसे  कमवू पाहत असाल, तर तुमचे ते टॅलेंट पुरेसे नाही.

 

कारण टॅलेंटचा उपयोग कशा पद्धतीने करायला हवा हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत टॅलेंट निरुपयोगी आहे. जोपर्यंत तुम्ही त्या टॅलेंट ला लोकांसमोर प्रदर्शित करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही पैसे कमवू शकत नाही. त्यामुळे विक्रीची कला शिकण्यात कोणतीच लाज वाटू देऊ नका. 

रिच डॅड आणि पुअर डॅड यांच्यात हाच एक फरक सगळ्यात मोठा होता. पुअर डॅड नेहमी नोकरीची चिंता करत होते. त्यांना त्यांचा जॉब नेहमी सिक्योर ठेवण्याची चिंता राहतं, कारण त्यांच्यासाठी एक सेफ नोकरी असणे म्हणजे सगळं काही असण्या

सारखे होते. आणि दुसरीकडे रिच डॅड नेहमी काही ना काही नवीन शिकण्यावर जोर देत होते.

 

श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला खूप काही शिकावे लागेल. याचे उदाहरण पहा, मास्टर्स डिग्री मिळवल्यानंतर कोणत्यातरी एका स्पेशल फील्डमध्ये विद्यार्थी डॉक्टरेट मिळवतात व त्यात एका छोट्याश्या विषयाचा खूप सखोल अभ्यास करावा लागतो.  म्हणजे एका छोट्याशा विषयात महारत मिळवण्यासाठी त्यांना खूप वाचावे लागते.

जगाच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्या कोणत्या पद्धतीने काम करतात ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अनुभव करू तेव्हाच आपले नॉलेज वाढेल. कदाचित हेच कारण होते की, रिच डॅड लहान रॉबर्ट व माइकला त्यांच्यासोबत मीटिंगमध्ये घेऊन जात.

 

जेव्हा रॉबर्टने मेरिन कोर्प्स ज्वाइन करण्यासाठी आपली हाई पेईंग जॉब सोडली, तेव्हा त्याचे पुअर डॅड त्याच्या या निर्णयामुळे फार दु:खी झाले होते. रॉबर्टने त्यांना समजून सांगण्याचा फार प्रयत्न केला. पण त्यांना ही गोष्ट पटत नव्हती. रॉबर्ट त्यांना म्हणाले, "या मोकळ्या आकाशात कसे उडतात, कसं वर्कर च्या टीमला हॅण्डल केले जाते, एखद्या कंपनीला कसे चालवायचे, हे सगळं त्यांना शिकायचे आहे."

 

'व्हिएतनाम' हून परतल्यावर रॉबर्टने रिजाइन केले आणि "झेरॉक्स कॉर्प्स" ला जॉईन केले. त्यांना ही नोकरी कोणत्या फायद्यासाठी करायची नव्हती. रॉबर्ट एवढे लाजाळू होते की, दुसऱ्यांना काही विकण्याचा विचार करूनच त्यांना घाम फुटत होता आणि त्यामुळे आपल्या या कमतरतेला दूर करण्यासाठी त्यांनी झेरॉक्सचे सेल्स ट्रेनिंग प्रोग्रामचे ट्रेनिंग घेतले.

 


 यानंतर रॉबर्टने स्वत: आपल्या नवीन कंपनीची सुरुवात केली आणि आपला पहिला शिपमेंट पाठवला. जर ते याच्यात नाकाम झाले असते, तर ते दिवाळखोर बँकरपट झाले असते. पण त्यांनी आपल्या रिच डॅड ची शिकवण लक्षात ठेऊन ही रिस्क घेतली. वय 30 होई पर्यंत दिवाळखोर होण्याचे रिक्स आपण घेऊ शकतो. 

 

कारण या वयात आपल्याला रिकव्हर होण्याचा टाईम भेटून जातो. खूपदा बरेच एम्पलोयी आपल्या वर्कर्सला जास्त पे करतात, कारण त्यांना त्या वर्कर्सला आपल्याच कंपनी मध्ये बांधून ठेवायचे असते. तसेच खूप वर्कर्स जीव तोडून काम करतात कारण त्यांना कामावरून काढून टाकण्याची भीती वाटत असते. या विचारांना सोबत घेऊन त्यांचे काही वर्ष आरामात जातात.

 

पण  त्यांनी आपल्या रिच डॅड ची शिकवण लक्षात ठेऊन  ही रिस्क घेतली. वय 30 होई पर्यंत दिवाळखोर होण्याचे रिक्स आपण घेऊ शकतो. कारण या वयात आपल्याला रिकव्हर होण्याचा टाईम भेटून जातो. पदा बरेच एम्पलोयी आपल्या वर्कर्सला जास्त पे करतात, कारण त्यांना त्या वर्कर्सला आपल्याच कंपनी मध्ये बांधून ठेवायचे असते. 

तसेच खूप वर्कर्स जीव तोडून काम करतात कारण त्यांना कामावरून काढून टाकण्याची भीती वाटत असते. या विचारांना सोबत घेऊन त्यांचे काही वर्ष आरामात जातात, पण हे खुप काळ काम करत नाही.

 

एखादे खास प्रोफेशन किंवा जॉब निवडण्याच्या आधी तुम्ही त्या गोष्टी शिका ज्या तुम्हाला शिकायच्या होत्या, कारण एकदा का तुम्ही तुमचे प्रोफेशन निवडले, तर तुम्ही त्यातच बांधून राहणार व तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी शिकायला कमी वेळ मिळणार.


 👉#Download Rich Dad Poor Dad Marathi PDF

 👉#RICH KID SMART KID

  👉#How to Talk to Kids so they Listen &
   How to Listen so Kids will Talk.!

 

 👉#RICH KID SMART KID

 
RICH KID SMART KID

 

HOW TO TALK SO KIDS WILL LISTEN &
LISTEN SO KIDS WILL TALK


 

MONEY AND FINANCE RELATED BOOKS YOU SHOULD READ:
 

 
 


 
 
 
 


टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive