द कंपाऊंड इफेक्ट-डॅरेन हार्डी -पुस्तक सारांश मराठी -भाग-१ | The Compound Effect in Marathi Book Summary Part-1
द कंपाऊंड इफेक्ट
डॅरेन हार्डी
पुस्तक सारांश मराठी
भाग-१
The Compound Effect in Marathi Book Summary
- तुम्हाला तुमचे निरोगी शरीर हवे आहे? तुम्हालाही तुमचे उत्पन्न खूप वाढवायची इच्छा आहे?
- काय तुम्हालाही नोकरी किंवा व्यवसाय-उद्योगाला शिखरावर न्यायचं आहे?
- काय तुम्हालाही तुमच्या नातेसंबंधांना घट्ट आणि समृद्ध बनवायचं आहे?
- जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होय असेल तर ही पुस्तक तुमच्याच साठी आहे.
आज आपण डॅरेन हार्डी लिखित पुस्तक द कंपाऊंड इफेक्ट या पुस्तकांबद्दल बोलणार आहोत. हि पुस्तक यशाविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगते, आणि यशास्वी होण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याबद्दल सांगते.
यशाचे काही मूलभूत आणि सार्वकालीन शाश्वत सत्य आहेत, जसे,
ध्येय-उद्दिष्ट-लक्ष्य, मेहनत-श्रम, सातत्य, चिकाटी, समर्पण, आत्मविश्वास, दृढ निश्चय, कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, नियोजन, व्यवस्थापन, उत्साह, लवचिकता, धैर्य-साहस-संयम, सर्जनशीलता
डॅरेन हार्डी एक अशी व्यक्ती आहेत ज्यांनी अगदी सहज-सोप्या परंतु खूपच परिणामकारक (profound) पद्धतीचा उपयोग केलेला आहे, ज्याच्या मदतीने ते वयाच्या २४ व्या वर्षीच एक मिलियन डॉलर पेक्षाही जास्त उत्पन्न म्हणजेच सात कोटीपेक्षाही जास्त पैसे कमावत होते. आणि याच पद्धतीचा वापर करून त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षीच ५० मिलियन डॉलर किमतीची कंपनी उभी केली.
या सर्व पद्धती समजावण्यासाठी पुस्तकात सहा प्रकरणं आहेत, यामध्ये प्रत्येक प्रकरण एकदुसऱ्याशी जोडलेलं आहे.
तर चला सुरु करूया द कंपाऊंड इफेक्ट, चक्रवृद्धी परिणामाची जादू कशी काम करते ते पाहूया,
#प्रकरण पहिले:
The Compound Effect in Action
कंपाऊंड इफेक्ट एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये तुम्ही लहान लहान पण योग्य गोष्टी करून मोठंमोठे परिणाम मिळवू शकता. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे, तुम्हाला परिणाम तर खूपच मोठे मिळेल परंतु ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या जास्त मोठ्या नाहीत.
बरेचजण चक्रवृद्धीच्या ह्या "सहजपणा"ला बघून आश्चर्यचकित होतात. हे अगदी तसेच आहे जसे एखादी लठ्ठ व्यक्ती दररोज पाळायला जाते पण आठव्या दिवशीच काही परिणाम न दिसल्याने मधूनच सोडून देतात कारण त्यांना वाटते ते अजूनही लठ्ठच आहेत..! त्यांना हे माहित नसते कि, छोट्या छोट्या पाउलांनीच मोठे परिणाम येत असतात. लहान लहान पाऊल जर दररोज उचलले तर काही दिवसांनी ते खूपच मोठे परिणाम दाखवतात.
छोटे परंतु योग्य गोष्टी सातत्याने दररोज करत गेल्यास आपल्याला खूप मोठे फरक आणि परिणाम बघायला मिळतात.
इथे आपण एक उदाहरण बघू ज्यामध्ये तीन मित्र आहेत. ते एकमेकांसोबतच मोठे झालेले आहेत. ते तिघेही एकाच कॉलोनीत राहत होते, ते तिघेही वर्षाला ५० हजार डॉलर रुपये कमावत होते. त्या तिघांचेही लग्न झाले होते. त्यांचे आरोग्य सामान्य आणि वजन सरासरी होते.
👉एकाचे नाव आहे लखन,
- त्याचे आजही पूर्वीसारखेच राहणीमान होते.
- तो जीवनात खूष होता परंतु कधी कधी तक्रारी करत होता कारण
- त्याची परिस्थिती बदलत नव्हती.
👉दुसऱ्या मित्राचे नाव आहे जगन,
- हा अगदी लहान लहान गोष्टी करत असे,
- तो दररोज एखाद्या पुस्तकाचे १० पानं वाचत असे. आणि
- कामावर जात असताना गाडीमध्ये तीस मिनिटे तो प्रेरणादायी आणि कार्यक्षमता उंचावण्यासाठीचे धडे-व्याख्याने पॉडकास्टवर ऐकत असे.
- त्याने दररोज त्याच्या आहारातून १२५ कॅलरी एवढे जेवण कमी केले होते.
👉तिसऱ्या मित्राचे नाव आहे मगन,
- त्याचे काही अयोग्य, चुकीच्या आवडी-निवडी-सवयी होत्या.
- त्याने आत्ताच एक मोठा टीव्ही खरेदी केला होता ज्यावर तो त्याच्या आवडीचे कार्यक्रम पाहत असे.
- तो टीव्हीवरील फूड चॅनेल वरून पाककृती शिकत असे आणि त्यांना बनवून खात असे. आणि
- त्याने दार आठवड्याला त्याच्या आहारात एक ड्रिंकचा समावेश सुद्धा केला होता.
यामध्ये काहीही मोठी गोष्ट नाही तो तर फक्त जीवनाचा आनंद घेऊ पाहत होता. ह्याच आवडी-निवडी-सवयी-दिनचर्या-जीवनशैली मुळे पाच महिन्यांनीदेखील लखन, जगन आणि मगन यांच्या मध्ये फार काही मोठा बदल आलेला नव्हता.
जगन दररोज पुस्तकं वाचत असे आणि कामावर येता-जाता दररोज पॉडकास्ट वर ऑडिओ पुस्तकं यांद्वारे प्रेरणादायी मोटिव्हेशन गोष्टी-कार्यक्रम ऐकत होता. मगन स्वतःच्या जीवनाचा आनंद घेत होता.
लखन देखील अगोदर सारखेच करत होता. परंतु जवळपास २५ महिन्यांनी म्हणजेच दोन वर्षांनी चांगलेच फरक व बदल दिसायला लागले. २७ व्या महिन्यात तर अजूनही मोठा फरक दिसायला लागला. आणि ३१ व्या महिन्यात तर मोठा फरक पाहण्यासारखाच होता, मगन जाड झाला होता, लखन सडपातळ झाला होता आणि जगन मात्र जसा होता तसाच राहिला होता.
फक्त आपल्या आहारातून १२५ कॅलरी जेवण कमी करून जगनने ३१ महिन्यात १७ किलो वजन कमी केले होते.
कंपाऊंडिंगला समजणे तुमच्या आजच्या "इन्स्टा रिजल्ट एक्सपेक्टटेशन" म्हणजेच लगेच बदल पाहण्याच्या अपेक्षेला नष्ट करेल. इन्स्टंट रिजल्ट विषयीचे तुमचे गैरसमज नाहीसे होतील. कंपाऊंडिंग हा एक असा विश्वास आहे ज्यामध्ये फास्टफूड सारखे ३० मिनिटांत परिणाम पाहायचे नाहीत. तुम्हाला स्वतःशीच एक वचन द्यायचे आहे कि तुमच्या मनातून लॉटरी जिंकण्यासारखी हि गोष्ट निघून जाईल.
कारण, यामध्ये आपण एका लॉटरी जिंकणाऱ्याची गोष्ट ऐकत असतो त्यामागील लॉटरीच्या तिकीट खरेदी केलेल्या लाखो लोकांची गोष्ट कोणीही ऐकत नाहीत.
#प्रकरण २:
निवडी (Choices)
आपण सर्वचजण ह्या जगात एकसारखेच आलेलो आहोत, नागडे, घाबरलेले आणि अज्ञानी. इथं आल्यानंतर आपले जीवन आपल्या निवडींचेच परिणाम झालेले असते. जरा याविषयी विचार करा. आज जे काही होत आहे मग ते चांगलं असो किंवा वाईट ते सर्व आपण केलेल्या निवडींमुळेच होत आहे. म्हणजेच,
सुरुवातीला तुम्ही तुमची निवड बनवता मग, नंतर, निवडीच तुम्हाला बनवतात. First you make your choices, and then your choices makes you.
तुम्ही केलेली प्रत्येक निवड तुमच्या जीवनातील चक्रवृद्धी परिणामवर प्रभावित करत असते. (affects on compound effect).
🐘 Elephants don't Bite..!
- तुम्हाला कधी हत्तीने चावलं आहे? किंवा
- डासांनी चावलं आहे?
जीवनात तुम्हाला छोट्या गोष्टीच चावत असतात. आपण इथं त्या छोट्या निर्णयांबद्दल बोलत आहोत जे तुम्हाला काही महत्वाचे वाटत नाहीत. तेच निर्णय जे तुम्हाला वाटते काही मदत करत नाहीत. परंतु हेच ते निर्णय असतात जे तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी आणि बिघडवण्यासाठी कारणीभूत असतात. हे जे छोटे छोटे निर्णय असतात यांना जर तुम्ही दुर्लक्षित केलं तर हे तुम्हाला मार्गावरून हटवू शकतात.
जसे, समजा, तुम्ही दुकानातून एक कोला बॉटल खरेदी केली आणि खाण्यासाठी चिप्स ची पॅकेट आणि जेंव्हा तुम्ही शेवटचा चिप्स खात असता तेंव्हा तुम्हाला जाणवते कि आज दिवसभर घेतलेलं आरोग्यपूर्ण आहार काहीच कामाचं राहिलं नाही. तुम्ही केलेली दिवसभराची "हेल्दी इटिंग डाएट" बिघडली, नष्ट झाली.
काहीही विचार न करता जोपर्यंत तुम्ही तुमच्या निवडी करत राहाल तोपर्यंत तुम्ही तुमच्या वर्तनाला बदलू शकणार नाही. मग, ह्या पुस्तकाच्या मदतीने, आता जागे होण्याची आणि चांगल्या निवडी करण्याची वेळ आली आहे. तुम्ही इथे असे म्हणू शकत नाही कि तुम्हीतर दुर्दैवी आहेत परंतु हेसुद्धा तुमची एक सबबच आहे, बहाणा आहे.
आपण सर्वच जण लकी म्हणजेच सुदैवी आहोत: आपल्या डोक्यावर छप्पर आहे, आणि आपले दोन्ही हातपाय चांगले आहेत आणि तुमच्याजवळ खाण्यासाठी काही अन्न देखील आहे तर तुम्ही खूपच सुदैवी आहात.
मूलभूत अन्न-वस्त्र-निवारा ह्या गरजानंतर सर्वांजवळच लकी म्हणजेच सुदैवी होण्यासाठीची एक शक्यता आहे. सुदैव आपल्या निवडींच्या साखळीवर अवलंबून असते.
आता आपण जर सुदैवाबद्दल बोलताच आहोत तर, इथं एक जुनी म्हण योग्य वाटते, "Luck is when Opportunity meets Preparation म्हणजेच जेंव्हा संधी तय्यारीला मिळते तेंव्हा सुदैव म्हणजेच लक बनत असतो."
परंतु, हे तितकं पुरेसं नाही, तर सुदैवी होण्यासाठीचा परिपूर्ण सूत्र-फॉर्मुला पुढील प्रमाणे आहे,
The Complete formula for getting lucky
Luck = Preparation (Personal Growth) + Attitude (Belief) + Opportunity (a good thing coming your way) + Action (doing something about it)
सुदैव= तय्यारी (स्वतःची वाढ-विकास) + दृष्टिकोन (विश्वास) + संधी (चांगल्या गोष्टी तुमच्यकडे येणं) + कृती (त्याबद्दल काहीतरी करणे)
तय्यारी preparation:
आपल्या ज्ञान, कौशल्य, तज्ज्ञता, नातेसंबंध आणि स्रोत यामध्ये स्वतःला सातत्याने सुधारणे, स्वतःची वाढ करणे, स्वतःला पूर्णपणे तय्यार करणे. जसे कि, अरनॉल्ड पाल्मर यांनी म्हटलं होतं,
" Its a funny thing, the more I practie, the luckier I get."
मी जितका जास्त सराव करतो, तितकाच मी सुदैवी होत असतो."
दृष्टिकोन Attitude:
इथं, बऱ्याच लोकांपासून सुदैव दूर पळून जात असतो. सुदैव आपल्या जवळपासच आहे, खरे तर, आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनाने त्याकडे पाहता आले पाहिजे, आपल्या भोवतालच्या परिस्थितीत, संवादामध्ये आणि ठिकाण इथेच सुदैव लपलेलं असतं. ज्या गोष्टी तुम्ही शोधत नसाल, तुम्हाला त्या गोष्टी दिसणारच नाहीत. आणि तुम्ही त्या गोष्टीला शोधू शकत नाहीत ज्यावर तुम्हाला विश्वासच नाही.
संधी Opportunity :
याबद्दल काही बोलायची गरजच नाही कारण तुम्हा सर्वांना याचा अर्थ माहित आहे. हे परमेश्वराद्वारे दिली जाते.
कृती Action :
इथं आपली महत्वाची भूमिका असते. संधी तर तुम्हाला सृष्टी आणि ईश्वराने दिलेली असते. परंतु कृती तर तुम्हालाच करावी लागेल. हीच तर ती गोष्ट आहे जी रिलायन्स च्या अंबानीला आणि राहुल ला वेगळं करत असते. राहुल..! राहुल कोण आहे? तर त्याला आपण ओळखत नाही. त्याच्याविषयी कधी ऐकलं नाही कारण त्याने कधी कृतीच केली नाही. ऍक्शन घेतलीच नाही.
इथं आपण ती पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे लेखक डॅरेन यांना त्यांच्या निवडी करण्यामध्ये त्यांची मदत केली.
आयुष्यतील असे क्षेत्र निवड ज्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे. तुम्हाला बँक अकाउंटमध्ये खूप पैसे पाहिजेत? काय तुम्हाला सडपातळ व्हायचंय? किंवा तुमच्या जीवनसाथीसोबत चांगले नातेसंबंध? मग आता कल्पना करा कि तुम्ही सध्या त्या क्षेत्रात कोणत्या टप्यावर, कुठं आहात? आणि हेदेखील कल्पना करा कि तुम्हाला स्वतःला कुठं पाहायचं आहे? richer thinner & happier श्रीमंत, सडपातळ आनंदी?
आता इथून पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे कि स्वतःबद्दल aware म्हणजेच तुम्हाला स्वयंजाणीव असली पाहिजे. आता तुम्ही जिथं आहात तिथून पुढं नेमकं जिथं जायचं आहे त्याठिकाणी जिथं जायचं तुमचं स्वप्न आहे. तर तुम्हाला त्या निवडीबद्दल माहित करून घ्यायला पाहिजे जे तुम्हाला तुमच्या इच्छित गंतव्य स्थानापासून दूर नेत असतात.
ज्या क्षेत्रात तुम्हाला सुधारणा करायची आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःची जाणीव असायला पाहिजे. अवेर-जाणीव होण्यासाठी म्हणजेच स्वयंजाणीव होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कृतीबद्दल अवेर व्हावे लागेल.
- समजा, तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या खिश्यातुन निघणाऱ्या पैश्यांवर लक्ष ठेवावं लागेल.
- जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर, तुम्हाला हे पाहावे लगे कि, तुम्ही दररोज नेमकं काय खात आहात.
स्वतःजवळ नेहमीच एखादी डायरी,वही आणि पेन सोबत ठेवा. आणि त्यामध्ये तुमच्या प्रत्येक निवडी लिहा. दररोज न विसरता.
#प्रकरण ३.
सवयी habits
एक बुद्धिमान शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत बोलत चालले होते. मग ते एका लहान झाडाखाली येऊन थांबले, शिक्षकाने एका लहान रोपट्याकडे बोट दाखवत सांगितले जो कि नुकतंच उगवलेलं होतं. त्या विद्यार्थ्याने सहजच उपटून काढलं.
मग शिक्षकाने एका पूर्वीपेक्षा थोड्या मोठ्या रोपट्याकडे बोट दाखवून उपटून काढण्यास सांगितलं जो त्या विद्यार्थ्यांच्या गुडघ्याएवढं होतं, विद्यार्थ्याने थोडासा जोर लावून प्रयत्नाने, काढून टाकलं.
मग शिक्षकाने आणखीन एका झाडाकडे इशारा करून उपटून काढण्यास सांगितले हे झाड त्या विद्यार्थ्यांच्या उंचीचे एवढे होते. त्याला थोडं जास्त प्रयत्न करावे लागले, एका दगडाच्या मदतीने, तोडून, खणून उपटून काढण्यात त्याला शेवटी यश आलं.
मग शिक्षकाने एका झाडाकडे बोट दाखवून म्हटलं याला उपटून काढ, ते ओकचं झाड होतं आणि खूप मोठं होतं. विद्यार्थ्याला त्या झाडाच्या शेंड्यालाही पाहू शकत नव्हता. त्याला माहित होते कि लहान झाडाला उपटून काढायला त्याला किती श्रम करावे लागले होते. म्हणून त्याने शिक्षकाला म्हटले, मी याला उपटून काढू शकत नाही.!"
शिक्षकाने त्याला सांगितले कि सवयीचं पण असंच असतं. जीवनावर सवयीचं काय प्रभाव पडतो ते समजावून सांगितलं. जितक्या सवयी जुन्या होत जातात तितक्या त्या मोठ्या होतात आणि तितकीच त्यांची मुळे देखील मोठी, जाड-दाट होतात ज्यामुळे त्या काढून टाकायला अवघढ होत जातात. काही सवयी तर इतक्या मोठ्या होतात कि, त्यांना आपण सोडायचं प्रयत्नदेखील करत नसतो. ऍरिस्टॉटलने देखील म्हटलेलं आहे,
"आपण तेच आहोत जे आपण वारंवार करत असतो." - ऍरिस्टॉटल
आता तुम्ही बघितलं आहे कि सवयीचा आयुष्यावर काय प्रभाव आणि परिणाम होत असतो. जर तुम्ही खूप वर्षांपासून काही वाईट सवयी बनवून ठेवल्या असतील तर त्या सवयी नक्कीच त्या मोठ्या ओक च्या झाडासारख्या असतील बळकट, कठीण, मोठं.
आता तुम्हाला सांगण्याची वेळ आली आहे कि, तुम्ही तुमच्या वाईट सवयींना कसे हटवू शकतो.
Game changers
अशा पाच गोष्टी ज्यामुळे तुम्ही तुमच्या वाईट सवयींना हटवू शकता,
१. identify your triggers
तुमच्या वाईट सवयीची यादी पहा, प्रत्येक वाईट सवयीचे एक संकेत म्हणजेच ट्रिगर कोणते ते लिहून काढा. म्हणजेच असं काय आहे ज्यामुळे तुम्हाला ती वाईट सवय करू घालते, असे कोणते संकेत आहे ज्यामुळे तुम्हाला ते करू वाटते.
समजा, तुम्ही एकापेक्षा जास्त मित्र असतात त्यांच्यासोबत असता तेंव्हा तुम्ही जास्त ड्रिंक करता. आता ह्या स्थितीला बारकाईने बघा, तुम्हाला असं कधी करू वाटते, जेंव्हा तुम्ही गाडीमध्ये एकटे असता आणि गाडी चालवत असता, किंवा मीटिंग-शिबिरामध्ये असताना.
वर सांगितल्याप्रमाणे एक वही-डायरी पेन काढा आणि ते सर्व ट्रिगर्स लिहून काढा ज्यामुळे तुम्हाला त्या सवयी करू वाटतात. आपोआपच होतातच. ह्या छोट्याशा कामामुळे तुमची अवेरनेस खूपच वाढेल.
२. clean house
जर तुम्हाला ड्रिंक करणे सोडायचे असेल तर, घरातील एक थेंब सुद्धा काढून टाका.
जर तुम्हाला आरोग्यदायी आहार घ्यायचा असेल तर, तुमच्या घरातील फ्रिजमधील सर्व जंक फूड काढून टाका. आणि जंकफूड-फास्टफूड खरेदी करणेही बंद करा.
३. swap in
इथं लेखक त्यांच्या बहिणीचं उदाहरण देऊन समजावतात, कि, कसं, तिला टीव्ही पाहताना कुरकुरीत आणि नमकीन जंक फूड खायची सवय होती, ती बदलून हेल्दी आरोग्यपूर्ण आहार खाण्याची सवय लावून घ्यायची होती. ती चिप्सचं एक अक्खा पॅकेट संपून टाकत होती आणि तिला कळत सुद्धा नव्हतं. तर, तिने तिच्या ह्या सवयीला गाजर खायच्या सवयीने बदललं. आता तिला तीच जाणीव होत होती जी चिप्स खाताना तिला होत होती आणि आता गाजर खाल्ल्याने तिला एक हेल्दी फूड आरोग्यदायी अन्नदेखील मिळायला लागलं होतं.
आता असेच ट्रिगर आणि सवयी यामध्ये खेळा आणि पहा कि तुम्ही कोणत्या सवयी बदलू शकता.
४. ease in
तुमच्यामध्ये खोलवर रुजलेल्या काही वाईट सवयी असतील ज्यांना काढण्यासाठी परिणामकारक अशा छोट्या छोट्या पाउलांनी, गोष्टींनी त्यांना बदलावे लागेल हेच जास्त फायदेशीर ठरेल. तुम्हाला त्या सवयी बनविण्यासाठी खूप वर्षं लागले आहेत, म्हणून त्यांना काढून टाकायला देखील काही वेळ नक्कीच लागेल. थोडं वेळ द्या आणि पायरीदरपायरी करून, हळू हळू एक एक पाऊल घेऊन त्या सवयी काढून टाका.
५. jump in
लेखक इथं स्वतःचं उदाहरण देतात, आणि सांगतात, की, जेंव्हा ते लहान होते, त्यांचे कुटुंब तळ्याकाठी फिरायला गेले होते, ह्या तळ्याला पाणी एका मोठ्या बर्फाच्या ग्लेशियर पासून मिळत होतं, ज्यामुळे तळ्याचे पाणी खूपच थंड असे.
ते दररोज तिथे जात होते परंतु लेखक डॅरेन यांना थंड पाण्यात जाणे पसंत नव्हतं, आवडत नसे. परंतु त्याच्या आई-वडील त्यांना कधीही ह्या क्षणाला सोडत नसत कधी कधी ते डॅरेन यांना तळ्यात उचलून फेकत असत. आणि काही क्षणातच त्यांना पाणी सामान्य वाटायला लागायचं.
जेंव्हा आपण त्यांना सोडू पाहतो तेंव्हा आपल्या सवयी सोबतही असेच होत असते.
सुरुवातीला आपल्याला कठीण जातं, परंतु, काही काळानंतर आपले शरीर त्या बदललेल्या वातावरणानुसार, परिस्थितीनुसार जुळवून घेत असते. ऍडजस्ट होत असते.
Communication Skills | संवाद कौशल्ये | स्वयंविकास-Self Development स्वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्वयंसुधार-Self-Improvement
Keep Reading, Keep Learning and Keep Growing.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
📗📘📖📘📙
पुस्तकं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कार्य करण्याची योग्य शिस्त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्वय, प्रयोजन...एक व्यवस्था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute
📖 BOOK SHORTS
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
📕📙📘📗
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
- आपल्या कामात एवढे चांगले व्हा की कोणीही तुम्हाला नजरअंदाज करणार नाहीत
- माझं चीज़ कोणी हलवलं? Who moved my Cheese?
- तुमच्या अचेतन मनाची शक्ती-द पावर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
- द मॉन्क हू सोल्ड हीज फेरारी-रॉबीन शर्मा
- द पॉवर ऑफ हॅबीट - The Power of Habits
- मिनी हॅबीट्स- Mini Habits- सवयी लहान परिणाम महान
- टायनी हॅबीट्स - Tiny Habits-छोट्या सवयी
- मायक्रो हॅबीट्स - Micro Habits-सूक्ष्म सवयी
- द नाऊ हॅबीट- The Now Habit
- एटामिक हॅबीट- Atomic Habit ऍटॉमिक हॅबिट
- अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी- 7 Habits of Highly Effective People
- मेंदूचे 12 नियम- 12 Rules of Brain
- भावनिकदृष्ट्या भक्कम असणा-या लोकांच्या पाच-५ सवयी
- मनुष्य स्वभाव ओळख : द लॉऽज ऑफ ह्यूमन नेचर
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
- पैशाचे मानसशास्त्र
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
इतर संबंधितः
- बहुरंगी बुद्धिमत्ता - श्रुती पानसे (Multiple Intelligence)
- बहुविध बुद्धिमत्ता - हावर्ड गार्डनर (Multiple Intelligence)
- भावनिक बुद्धिमत्ता - डॅनियल गोलमन (Emotional Intelligence)
- भावनिक बुद्धिमत्ता 2.0 -ट्रॅव्हिस ब्रॅडबरी (Emotional Intelligence 2.0)
- आर्थिक बुद्धिमत्ता - रॉबर्ट कियोसाकी (Financial Intelligence)
- कृत्रिम बुद्धिमत्ता - अच्युत गोडबोले (Artificial Intelligence)
- सामाजिक बुद्धिमत्ता - डॅनियल गोलमन (Social Intelligence)
- इमोशनल हायजॅक -मनोज अंबिके (Emotional Hijack)
- आध्यात्मिक बुद्धिमत्ता - (Spiritual Intelligence)
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो.
|
|
टिप्पण्या