द कंपाऊंड इफेक्ट-डॅरेन हार्डी -पुस्तक सारांश मराठी -भाग-2 | The Compound Effect in Marathi Book Summary Part-2


जगातील काही मोजक्याच लोकांनी वापरलेलं आहे, जसे,  स्टिव्ह जॉब्स, बिल गेट्स, टोनी रॉबिन्स इत्यादी.

द कंपाऊंड इफेक्ट
डॅरेन हार्डी
पुस्तक सारांश मराठी
भाग-2

The Compound Effect in Marathi
Book Summary
PART-2

👉(सारांश भाग-१ वाचण्यासाठी For Part-1 )

 👇PART-2👇

💡सूचना: 📖📗📘📙
 
वाचकांना विनंती आहे कि या पुस्तकातील गाभा समजून घेण्यासाठी कृपया सारांश भाग-१ अगोदर वाचा.

👉भाग-1 वाचण्यासाठी इथे जा 

📖📗📘📙

  👇 पुस्तकाचा पुढील उर्वरित सारांश 👇
भाग-२

#प्रकरण ४.

Momentum


तुम्ही जर दहावी-१२ वी वर्गात विज्ञान विषय शिकलं असेल तर तुम्हाला नक्कीच भौतिकशास्त्रातील न्यूटनचा एक नियम आठवत असेल आणि तो म्हणजे  न्यूटनचा गतीचा पहिला नियम" (Newtons first Law of Motion), या  नियमानुसार, ज्या गोष्टी स्थिर, अचल असतात ते स्थिरच असतात जोपर्यंत बाहेरून एखादा बल लावला जात नाही तोपर्यंत आणि ज्या वस्तू मोशन म्हणजेच गतीमध्ये असतात त्या गतीमध्येच राहतात जोपर्यंत त्या गतीला कोणी थांबवत नाही तोपर्यंत.
 

न्यूटनचा गतीचा पहिला नियम:

ज्या गोष्टी स्थिर, अचल असतात ते स्थिरच असतात जोपर्यंत बाहेरून एखादा बल लावला जात नाही तोपर्यंत आणि ज्या वस्तू मोशन म्हणजेच गतीमध्ये असतात त्या गतीमध्येच राहतात जोपर्यंत त्या गतीला कोणी थांबवत नाही तोपर्यंत. 


या नियमाला दुसऱ्या शब्दात सांगायचं असेल तर असं सांगता येईल कि, ज्या व्यक्ती टीव्ही समोर बसलेले असतील ते टीव्हीसमोरच बसलेले राहतील, आणि ज्या व्यक्ती जीवनात काही यश प्राप्त करतात ते पुढं आणखीन  मोठं यश मिळवत राहतील. 

मोमेंटमला म्हणजेच संवेग बनवणे सोपं नाही परंतु, एकदाका मोमेंटम बनला कि, तुमची बरीचशी कामं सोपी होऊन जातात.

उदाहरणार्थ जसे कि, 

तुमच्या लक्षात असेल, जेंव्हा तुम्ही लहान होता तेंव्हा मेरिगो राऊंड वर खेळत असताना त्यावर तुमचे इतर काही मित्रही त्यावर उभे राहत होते आणि ओरडत होते कि वेगाने फिरवा.. तुमची सुरुवात सावकाश होती परंतु तुम्ही त्यासाठी पूर्ण ताकतीने बल लावत होता आणि काही प्रयत्न केल्यावर ते अजुन वेगाने फिरायला लागत असे. 

परंतु तुम्हाला ज्या वेगाने फिरवायचं होतं त्या वेगासाठी तुम्हाला अजुनही वेगाने जोर देऊन फिरवावा लागत असे आणि तेंव्हाच तुम्हाला यश मिळत होतं.  

कोणत्याही गोष्टीला आत्मसात करताना असंच होत असतं.  तुम्हाला छोटे पाऊल घेऊन सुरुवात करावी लागते, छोटीशी कृती करावी लागते. प्रगती हळू हळू होते परंतु जेंव्हा ह्या नव्या सवयीला करता करता कालावधी जस जसा वाढत जातो तसा मोठा फरक येतो. आणि तुमचे यश आणि परिणाम खूपच वेगाने कंपाऊंड व्हायला लागत असतात.

अजुन एका उदाहरणाने सांगायचं झाल्यास, 

 रॉकेट चे उदाहरण घेता येईल. जमिनीपासून वर आकाशात कक्षेत पोहोचण्यासाठी झेपावण्या-अगोदर रॉकेट सुरुवातीच्या काही मिनिटांत जितकी ऊर्जा खर्च करतो तितकी पूर्ण खेपेससुद्धा लागत नसते.  असे का होते? कारण, रॉकेटला पृथ्वीची ओढ म्हणजेच गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून बाहेर निघायचं असते.  एकदा का तो वर पोहोचला कि मग कक्षेत स्थिरावतो.

तुमच्या जुन्या सवयी आणि परिस्थिती त्या रॉकेटला खाली ओढणाऱ्या  गुरुत्वाकर्षण शक्ती सारखे असतात सर्वच गोष्टी स्थिरच राहू इच्छितात.  तुम्हाला ह्या गुरुत्वाकर्षणाला तोडायला खूप मेहनत-श्रम लागेल. परंतु, जेंव्हा तुम्ही असे करण्यात यशस्वी व्हाल आणि तुम्हाला एक गती मिळेल, मोमेंटम मिळेल तेंव्हा तुम्हाला थांबविणे खूपच कठीण होईल. 

 

#प्रकरण ५.

Influence

इन्फ्लुएन्स, ज्या लोकांसोबत तुम्ही नेहमी वेळ घालवता त्यांना तुमचे "रेफेरेंस ग्रुप" (reference group) संदर्भ गटअसे म्हणतात.एका अभ्यासानुसार, हा अभ्यास समाज मानसशास्त्रज्ञ डॉ. डेविड यांच्यातर्फे केला गेला होता, त्यांना असं कळालं कि, तुमच्या मित्रांचा संदर्भ गट म्हणजेच रेफेरेंस ग्रुप यांचा तुमच्या आयुष्यात मिळणाऱ्या यशात आणि अपयशात  ९५%  पर्यंत वाटा असतो. 

आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे कि आपण त्या पाच लोकांचे सरासरी असतो ज्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवत असतो.  
WE ARE AVERAGE OF FIVE PEOPLE WE LIVE WITH. 


तुम्ही नकारात्मक व्यक्तींसोबत राहून सकारात्मक जीवन जगण्याचा विचार करू शकत नाही.  तर, तुमचे मित्र किंवा सोबती अशा गोष्टी करत असतील जे तुम्हाला आवडत नाहीत तर अशावेळी अशा व्यक्तींसोबत तुम्हाला कमीत कमी वेळ घालवायचा आहे. आणि काही नवीन लोकं, मित्र, गट शोधा ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता, शिकू शकता, तुमच्या विकासात व यशात तुम्हाला वाटते ते योग्य आहेत असे. 


तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना तीन भागात विभागू शकता, मर्यादित मंडळी, असंघटित मित्रमंडळी, विस्तारित मित्रमंडळी. 

FRIENDS ASSOCIATION CATEGORY

  • DISASSOCIATION 
  • LIMITED ASSOCIATION & 
  • EXPANDED ASSOCIATION


DISASSOCIATION

तुम्हाला हे अगोदरपासूनच माहित आहे कि काही लोकं-व्यक्ती अशा आहेत ज्यांच्यापासून तुम्हाला जीवनात नेहमीच दूर राहायचं आहे.  हे सोपं नाही, परंतु हे खूप गरजेचेही आहे. तुम्हाला हे कठीण निर्णय घ्यावेच लागेल, जेणेकरुन तुम्हाला त्यांच्या नकारात्मक प्रभावाचा जास्त होणार नाही. 

अगोदर हे ठरवून घ्या कि तुम्हाला नेमकी कोणत्या प्रकारचे जीवन जगायचं आहे. आणि मग त्या लोकांसोबत स्वतःला जोडा ज्यांच्याकडे तुमच्यासारखी दृष्टी आहे.  

LIMITED ASSOCIATION

असे काही व्यक्ती असतील ज्यांच्यासोबत तुम्ही तीन तास घालवू शकता परंतु तीन दिवस नाही. काही असे असतील ज्यांच्यासोबत तुम्ही तीन मिनिटे घालवू शकता परंतु तीन तास नाही. इथे लेखक स्वतःचे उदाहरण देतात, त्यांचा एक शेजारी आहे जो तीन मिनिटे घालवू शकतात असा मित्र आहे.  तीन मिनिटांसाठी ते मजेने, आनंदाने बोलू शकतात परंतु दोन तीन तासांसाठी नाही. 

तुम्हालादेखील तुमच्या सर्वच नातेसंबंधांना बघायला पाहिजे, आणि जाणून घ्यायला पाहिजे कि तुम्ही तीन मिनिटवाल्या व्यक्तीसोबत तीन तास तर घालवत नाही..!

EXPANDED ASSOCIATIONS

आत्ताच आपण नकारात्मक लोकांना स्वतःच्या आयुष्यतून काढणविषयी बोललो, परंतु, जेंव्हा तुम्ही असे कराल तेंव्हा तुम्हाला दुसऱ्या लोकांकडेसुद्धा जावे लागेल. अशा लोकांचा शोध घ्या ज्यांच्याकडे सकारात्मक गुण आहेत, त्या क्षेत्रात ज्यामधी तुम्हाला सुधारणा करायची आहे. 

जर तुमच्या बजेटमध्ये आवाक्यात असेल तर त्या समूह किंवा क्लब चे सदस्य व्हा ज्यामध्ये अशा व्यक्ती ये-जा करत असतात जसे उद्योगी क्लब, व्यावसायिक संघटना. इत्यादी.  

परंतु तुम्ही जर हे करू शकत नाही तर, तरीही एक चांगली गोष्ट अशी कि, तुम्ही आयुष्यात मग कुठेही राहा, लहान मुलांना सांभाळत असाल, किंवा त्या लोकांसोबत राहत असाल ज्यांच्यामध्ये तुमच्यासारखे काहीही नाही तरीही तुम्ही त्या मार्गदर्शक, अनुभवी व्यक्ती अथवा मेंटॉर कडून शिकू शकता ज्याच्याकडून तुम्हाला शिकायचं आहे.  

फक्त त्या मार्गदर्शकाने-मेंटॉरने त्याच्या कल्पना, विचार यांना एखाद्या कथेत-गोष्टीत किंवा एखाद्या पुस्तकात किंवा अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले असेल. 

तर, तुम्ही त्यांच्याकडूनही शिकू शकता. (स्टोरी-बुक-कोर्स).  यासर्व गोष्टींचा फायदा उचला आणि ती सर्व पुस्तकं वाचा.  अशी बरीचशी पुस्तकं तुम्हाला मिळतील, उपलब्ध आहेत.

ई-वाचनालय या संकेतस्थळावर देखील तुम्हाला स्वमदत, स्वयं-सुधार, स्वयं-विकास, स्वयं-वाढ (Self Help, Self Improvement, Self Development) अशा परिचय-सारांश-समीक्षा वाचायला मिळतील, यादी खाली दिलेली आहेच.  

 

#प्रकरण ६.

acceleration -प्रवेग-गतिवर्धन-गती वाढवणे

इथं लेखक स्वतःचं उदाहरण देतात, जेंव्हा ते कॅलिफोर्निया मध्ये राहत होते, तेंव्हा ते डोंगरावर सायकल चालवायला जात असत. आणि न थांबता २ मैलांपर्यंत चालवत जात होते. आणि यामुळे त्यांना खूप वेदनाही होत होत्या. आणि चालवत चालवत जेंव्हा ते एका अशा अवस्थेत येत असत ज्याला "हिट द वॉल" असे म्हणतात. 

या अवस्थेत आपला मेंदू खुपसाऱ्या गोष्टी सांगायला लागत असतो, कि, "का? थांबायला पाहिजे".  आणि मग तुमचा सामना होतो खऱ्या प्रश्नाने, कि, एक तर तुम्ही वेदना सहन कारणार आणि पुढं चालणार किंवा तुम्ही मोडणार आणि हार स्वीकार कराल. 

 
जेंव्हा लेखक डॅरेन रिअल इस्टेट व्यवसायात होते तेंव्हा ते एका दिवसातच "हिट द वॉल" सारख्या खूप मोठ्या गोष्टी करत असत.  जेंव्हा त्यांच्या प्रॉपर्टी विकल्या जात नव्हत्या, जेंव्हा शेवटच्या ग्राहकाने देखील त्यांना "नकार" कळवला होता. तेंव्हा त्यांचे मन खुपसाऱ्या गोष्टी सांगत असे, की, "त्यांना ह्या विक्रीला सोडून टाकायला पाहिजे, आणि परत ऑफीसला जायला पाहिजे". 

परंतु हार स्वीकार करण्याऐवजी ते समजले होते कि, त्यांचे प्रतिस्पर्धी देखील याच समस्यांचा सामना करत आहेत.  डॅरेन यांना माहित होते कि जर ते या वेळेला पार करून गेले, या कठीण काळाला-क्षणाला पार करून गेले, तर ते नक्कीच त्यांच्या सर्वच प्रतिस्पर्धी यांच्या पुढं राहतील. आणि हेच तुमच्या यशाचा सर्वात महत्वाचा क्षण असतो. (DEFINING MOMENT). 

 इथं हे महत्वाचं राहत नाही कि, तुम्ही वॉल हिट केली किंवा नाही. महत्वाचं तर हे असतं कि, तुम्ही त्या वॉल ला हिट केल्यानंतर काय केलं?"

अशी कल्पना करा कि, तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षण घेत आहोत, आणि तुमच्या प्रशिक्षकाने (ट्रेनर) ने तुम्हाला वजन उचलण्याचे व्यायाम म्हणजेच १२ रेप्स करायचे आहेत.  तुम्ही जर १२ रेप्स व्यायाम केलं तर ठीक, असं करून तुम्ही ट्रेनर च्या अपेक्षा पूर्ण करत आहोत. 

परंतु जेंव्हा तुम्ही १२ रेप्स करता म्हणजे तुम्ही तुमच्या कमाल टप्प्याला गाठता, आणि यावरही ३ किंवा ५ रेप्स आणखीन करता तेंव्हा तुम्ही मागे केलेल्या १२ रेप्स च्या परिणामांचा प्रभाव द्वीगुणित होतो, कित्येक पट वाढतो.  म्हणजे तुम्ही जे जास्तीचे रेप्स केलेले आहेत ते ऍड (+) होणार नाहीत तर ते मल्टिप्लाय (x) करतील..!

 १२ + ३ = १५ नाही, तर, १२ x ३ = ३६  


याचा अर्थ असा होतो कि तुम्ही तुमच्या कमाल क्षमतेपेक्षाही जास्त काम केलं आहे. मागील १२ रेप्स तुम्हाला तिथपर्यंत घेऊन आलेले आहेत. जी खरी वाढ आहे ती या १२ रेप्स नंतर होत असते. म्हणजेच तुम्ही जेंव्हा वॉल हिट करता..! 

हीच संकल्पना तुम्हाला आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात वापरायला पाहिजे. तुमच्यकडून जितकी अपेक्षा केली गेली आहे त्यापेक्षा जास्त करा.

सारांश समाप्त

सारांश भाग-१ वाचण्यासाठी  For Part-1

📖📗📘📙

💡🙏👉विशेष विनंती: 

मित्रांनो लक्षात ठेवा, आम्ही जगप्रसिद्ध, ज्ञानवर्धक पुस्तकाचा गाभा, महत्वाचा सार थोडक्यात परंतु साध्या-सरळ-सहज-सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सारांश वाचून सगळं काही समजलं असा गैरसमज कधीच करून घेऊ नका. 

लेखकांचे अनुभव, उदाहरणं, दृष्टिकोन समजावून सांगण्याची भाषा-कौशल्य-शैली हे वेगळं असू शकते, म्हणून शक्यतोवर पुस्तक खरेदीकरून संपूर्ण पुस्तक वाचा असा आमचा सल्ला राहील.  कमी वेळेत जगातील उत्कृष्ठ पुस्तकांचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.


ई-वाचनालय या संकेतस्थळाला भेट देऊन, पुस्तकांच्या मंचावर येऊन आपला अमूल्य वेळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि धैर्यवपूर्वक पुस्तकाचे सारांश वाचन केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.  


www.evachnalay.in

👉Also Read: 

 

तर वाचक मित्रांनो ह्या पुस्‍तकाचे सारांश तुम्‍हाला कसे वाटले, कोणती सवय तुमच्‍याकडे अगोदरच होती व तुम्‍ही कोणती सवय आजपासून अंमलात आणायला सुरूवात कराल? आम्‍हाला खालील टिप्‍पणीद्वारे व ई-मेलद्वारे अवश्‍यक कळवा.

तसेच ई-वाचनालय | www.evachnalay.in या संकेतस्‍थळवर तुम्‍हाला काही त्रुटी दिसून आल्‍यास, तुमच्‍या सूचना, तक्रारी, प्रश्‍न, अडचणी-समस्‍या असतील काही सुधारणा हव्‍या असतील, तर आम्‍हाला खालील टिप्‍पणी व ई-मेल द्वारे अवश्‍य कळवा, आम्‍ही आपली दखल अवश्‍य घेऊ. धन्‍यवाद.

#7-हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्‍ह पीपल मराठी #अति-परिणामकारक लोकांच्‍या ७-सवयी पुस्‍तक परिचय #पुस्‍तक सारांश #The 7-Habits of Highly Effective People by #Stephen Covey #Book Review in Marathi  #Book Summary in Marathi  #Book Review of Marathi Translation of international bestseller The 7-Habits of Highly Effective People by the Author Stephen Covey

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 

पुस्‍तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्‍तरपणे पुस्‍तक वाचन करून आपले व्‍यक्‍तीमत्‍व सुधारा, आपला विकास करा, यशस्‍वी व्‍हा.

वैयक्तिक विकास, स्‍वयंमदतीवर ही पुस्‍तक तुम्‍हाला कशी वाटली याबद्दल आम्‍हाला अवश्‍य कळवा.  तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्‍थळावरील अशाच संवाद कौशल्‍यांवर, लोकव्‍यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्‍तक सारांश अवश्‍य वाचा.

Communication Skills | संवाद कौशल्‍ये  |  स्‍वयंविकास-Self Development स्‍वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्‍वयंसुधार-Self-Improvement

 

Keep Reading, Keep Learning and Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


इतर संबंधि‍तः 

 


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

नेहमीच लक्षात ठेवा
Always Remember




www.evachnalay.in

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive