5-लक्षणं जे सांगतील तुम्ही एक ओव्हरथिंकर आहोत, अतीचिंता, अतिविचार | 5-Signs you are an Overthinker 📚#Bookshorts

कल्पना आणि विचार करण्याची शक्ती संपूर्ण प्राणीमात्रात केवळ मानवालाच ही भेट-वरदान निसर्गाकडून मिळालेले आहे.  कल्पना आणि विचार शक्तीचा उपयोग करूनच आज आपण इतका विकास व प्रगती करू शकलो हे सिद्ध होते.  मानवी मन-मेंदू-शरीर यांचा योग्य ताळमेळ साधला गेला नाही तर एकमेकांचा परिणाम एक-दुसऱ्यावर होतंच असतो.

 

 हे 5-लक्षणं जर तुमच्यात असतील तर तुम्ही एक ओव्हर थिंकर 🤔 आहोत

 ही चार लक्षणं जर तुमच्यात असतील तर तुम्ही नक्कीच एक ओव्हर थिंकर असाल 🤔 Mental Health Tips)

 

चिंता = चिता,
चिंता का? चिता.. चिता..! चिंता नका ..!
Over Analysis makes you Paralysis..!

चिंता ही चिते समान असते.


चिंता ने चिता से मुस्कुराते हुये कहा तू मुर्दों को जलाती है,
मैं जिंदो को जलाती हूँ तू एक ही बार जलाती है,
मैं हर रोज जलाती तू बिदा कर देती है, मैं जकड़ लेती हूँ,
तू मृत्यु का विषय है, मैं जिंदगी का विष हूँ,
तू अंतिम सत्य है, मैं प्रथम सत्य हूँ....

 

चिंता ही चिते समान असते. अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. त्यावरून लक्षात येईल कि अति चिंता केल्यास ती व्यक्तीला आतून पोखरून टाकते, गिळून टाकते, संपवून टाकते. चिंता-दोन लघु शब्द परंतु अति चिंता केल्यास समस्या वाढतात, दुष्परिणाम गंभीर आणि दीर्घ कालावधीचे असतात.

आजच्या धकाधकीच्या, पळापळीच्या, व्यस्त जीवनशैली मुळे घरातल्या आणि बाहेरच्या कामाच्या घाई-गडबडीत आपण कितीही ठरवलं तरी आपले चंचल मन शांत राहत नाही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार मनात येतचं असतात.

यामुळे होते काय कि, कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केल्याने मनात नकारात्मक विचार येत असतात. ओव्हरथिंकींगचा परिणाम असा की त्यामुळे व्यक्ती कधी नकारात्मक विचार करून नैराश्यात जाते हे त्या व्यक्तीलाही कळत नाही..! हे तथ्य आहे..!  

 

  • हे 5-लक्षणं जर तुमच्यात असतील तर तुम्ही एक ओव्हर थिंकर 🤔 आहोत
  1. जर तुम्ही सतत घटनांची पुनरावृत्ती करत असाल
  2. निर्णयांचा अंदाज घेत असाल आणि 
  3. संभाव्य नकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करत असाल तर तुम्ही अतिविचार करणारे असू शकता. 
  4. इतर लक्षणांमध्ये भूतकाळातील चुका विसरून जाण्यात अडचण येणे,
  5. मानसिक थकवा येणे आणि आराम करण्यास किंवा लक्ष केंद्रित करण्यास संघर्ष करणे यांचा समावेश आहे. 

अतिविचार करण्याच्या लक्षणांवर अधिक तपशीलवार नजर टाकूया:

 

⭕अतिरेकी विश्लेषण:     

तुम्ही वारंवार परिस्थिती, निर्णय आणि संभाषणांचे विश्लेषण करता, अनेकदा थकवा येतो. 

 

विचार करणे:

तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा त्याच विचारांमध्ये, काळजींमध्ये किंवा भीतींमध्ये अडकलेले आढळता.   दुसरा अंदाज: तुमचे निर्णय आणि कृती घेतल्यानंतरही तुम्ही सतत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता.

 

आपत्तीजनक: 

तुम्ही सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करता आणि नकारात्मक परिणामांची अपेक्षा करता.   

 

सोडून देण्यात अडचण:

तुम्हाला भूतकाळातील घटना किंवा चुका विसरून जाण्यासाठी, त्या तुमच्या मनात पुन्हा घडवून आणण्यासाठी आणि प्रत्येक तपशीलाचा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो.   

 

अनियंत्रित गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे:

तुम्ही ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही, बदलू शकत नाही किंवा सुधारू शकत नाही त्यावर लक्ष केंद्रित करता, ज्यामुळे ताण आणि चिंता वाढते.  

 

मानसिक थकवा: 

जास्त विचार करण्याशी संबंधित सततच्या मानसिक हालचालींमुळे मानसिक थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय येऊ शकतो.   

 

निर्णय घेण्यात अडचण: 

तुम्हाला निर्णय घेणे आव्हानात्मक वाटते कारण तुम्ही सतत स्वतःचाच अंदाज घेत असता आणि संभाव्य परिणामांबद्दल काळजी करता.  

 

लक्ष केंद्रित करण्यात अडचण: 

जास्त विचार केल्याने इतर कामांवर किंवा कामांवर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते.   

 

असुरक्षित वाटणे: 

अतिविचार केल्याने तुम्ही असुरक्षित मनःस्थितीत येऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला राग, असहाय्य आणि असुरक्षित वाटू शकते.   

छोट्या समस्यांवर अतिरेकी प्रतिक्रिया देणे: 

असुरक्षिततेच्या क्षणी, तुम्ही छोट्या समस्यांवर जास्त प्रतिक्रिया देऊ शकता किंवा प्रियजन मदतीचा हात देतात तेव्हा बचावात्मक भूमिका घेऊ शकता.   

 

 

भावनिक आणि वर्तणुकीची चिन्हे:     

तुम्हाला सतत चिंता आणि चिंता वाटते, अनेकदा अशा गोष्टींबद्दल जे कधीच घडू शकत नाहीत.    

निराश किंवा निराश वाटणे: तुमचे विचार दुःख, निराशा किंवा नैराश्याच्या भावनांना कारणीभूत ठरू शकतात.   

आराम करण्यात अडचण: तुमचे मन सतत विचार आणि काळजींनी भरलेले असल्याने तुम्हाला आराम करणे आणि विश्रांती घेणे कठीण जाते.   

 

नकारात्मक विचारांमध्ये वाढ:

तुमच्या मनात खूप नकारात्मक विचार असतात आणि परिस्थितीच्या नकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची प्रवृत्ती असते.   भूक किंवा झोपेत बदल: सतत चिंता आणि ताणतणाव यामुळे भूक किंवा झोपेच्या पद्धतींमध्ये बदल होऊ शकतात.   

 

शारीरिक लक्षणे:

अतिविचार केल्याने डोकेदुखी, स्नायूंचा ताण किंवा धडधडणारे हृदय यासारख्या शारीरिक लक्षणांमध्ये प्रकट होऊ शकते.

 

परस्परसंवाद:

तुम्ही अनेकदा तुमच्या मनात संभाषणे आणि सामाजिक संवाद पुन्हा खेळता, लपलेले अर्थ किंवा संभाव्य चुका शोधता.   बाह्य प्रमाणीकरण शोधत आहे: तुमच्या स्वतःच्या निर्णयावर तुमचा विश्वास नसल्याने तुम्ही सतत इतरांकडून आश्वासन किंवा मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत राहू शकता.  

 

जबाबदारी टाळणे:

संभाव्य नकारात्मक परिणामांच्या भीतीने तुम्ही तुमच्या कृती किंवा निर्णयांची जबाबदारी घेण्याचे टाळू शकता.   लोकांना आनंद देणारे: तुम्ही लोकांना खूश करणारे बनू शकता, संभाव्य संघर्ष किंवा टीका टाळण्यासाठी सतत इतरांना खूश करण्याचा प्रयत्न करत राहाल.

 

परिपूर्णतावाद: 

तुम्ही जे काही करता त्यात परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील राहिल्यामुळे देखील अतिविचार, ज्यामुळे ताण आणि चिंता वाढू शकते. 


💬🙇ओव्हरथिंकिंग टाळण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स वापरू शकता.

(Easy Ways To Stop Overthinking Every Small Thing)

 

अतिविचार करण्याचे प्रकार

  •  भूतकाळाबद्दल काळजीकरणे Thinking about Past.
  •  भविष्याबद्दल काळजी करणे Thinking about Future

 

'छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त किंवा खूप खोलवर विचार करणे'. तर भारतीय समाजात कोणताही निर्णय घेताना किंवा एखाद्या परिस्थितीचे मूल्यमापन करताना सखोल विचार करणे हा भारतीयांचा मानवी स्वभाव आहे. 

 

अतिविचार करणे म्हणजे काय

पण जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा अतिजास्त मनातल्या मनात विचार करतो आणि स्वतःला त्या विचारांपासून वेगळेकरू शकत नाही. तेव्हा या स्थितीला अतिविचार- ओव्हरथिंकिंग म्हणता येईल. 

अतिविचार करणे किंवा तो काही अपरिहाय गोष्टींसाठी करावाच लागतो,  अशी वेळ प्रत्येकांच्या आयुष्यात कधी ना कधी येतचं असते. जीवनात आपण सर्वजण अनेकवेळा अशा काही वाईट घटना अनुभवतो ज्यामुळे आपण नकळत चिंतेत किंवा तणावग्रस्त स्थितीचे शिकार होतो.  बरेचजण विचार चक्रातून काही वेळात बाहेर पडतात परंतु काही लोकं मात्र या परिस्थीतीतून बाहेर पडू शकत नाहीत. ते त्याच विचारांत अडकून पडतात आणि मग ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोक्याचे लक्षण ठरते. 

 

असे लोक भविष्याबद्दल फार चिंता करतात आणि अद्याप न घडलेल्या संभाव्य घटनांबद्दल कल्पनेवर स्वार होऊन भयानक अंदाज लावतात. ते भूतकाळाचाही विचार करतात. खरे तर जीवनात आनंदी-हसत-खेळत राहीले पाहीजे.   पण असे लोक इतका विचार करतात की, इतर लोकसुद्धा त्यांच्याबद्दल काय विचार करतात याचीही त्यांना चिंता असते..! 

 

#सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग.!

#लक्षात ठेवा: लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे तो लोग क्या सोचेंगे.!

 


तरीही काही ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात,त्यासाठी आपण पर्याय धुंडाळतो, एका पेक्षा अनेक पर्यायांचा विचार करणे वाईट नाही परंतु निर्णय घेण्यात ते अडचणी निर्माण करतात. अनेकवेळाकोणताही कठोर निर्णय देखील अडचणी निर्माण करू शकतो. अनेक वेळा तुम्हीतुमच्या मनात अनेक पर्यायांचा विचार करता पण योग्य पर्याय शोधणे इतके अवघडहोऊन बसते की त्यामुळे तुमची विचारसरणी खुंटते.  

 

D  E  C  I  S  I  O  N

(#कोणताही निर्णय न घेणे हादेखील एक निर्णयच असतो.!)

 

अशा परिस्थितीत चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा निर्णय न घेणेच बरे असे तुम्हाला वाटते. त्यामुळे अतिविचार करणारे व्यक्ती कोणतीही कृती करण्यास धजावत नाहीत. पण कोणताही निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे केव्हाही चांगले.  मग, खूप विचार करण्याची तुमची सवय असो  किंवा एखादा कठीण निर्णय घेण्याची गरज असेल, तुमचा मेंदू खूप विचार करत असेल तेव्हा तुम्हाला झोप येत नाही. 

 

  • झोपेचा-मानसिक-शारीरिक आरोग्याशी घनिष्ट संबंध असतो.
 

अतिविचारामुळे नैराश्य किंवा नैराश्याची लक्षणे वाढू शकतात. त्यामुळे तुमची तणावाची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता.

जेव्हा तुम्ही लहान-सहान गोष्टींवर अतिविचार करण्याच्या तुमच्या प्रवृत्तीबद्दल अधिक जागरूक व्हाल, सजग व्हाल, तेव्हा तुम्ही बदलण्यासाठी पावले उचलू शकता.

परंतु प्रथम, आपण हे समजून घेतले पाहिजे की जास्त विचार करण्याने फायदा कमी नुकसान अधिक असतो.  काहीवेळा, लोकांना असे वाटते की एखाद्या गोष्टीवर अतिविचार केल्याने ती गोष्ट खराब होण्यापासून थांबवता येते. पण खरे तर हे आहे की भूतकाळाचा खूप विचार केला तरी भूतकाळ बदलता येत नाही. आणि भविष्याचा अति विचार अथवा चिंता करूनही हाती काही लागत नसते.  म्हणूनच इथे एक म्हण चपखल बसते, 

 

Yesterday is Past-History
and
Tomorrow is a Future-Mistry
but Today is a Gift
hence it is called as
P R E S E N T.

 

मागे घडले ते भूतकाळ होते उद्या जे होईल ते भविष्य असेल परंतु आपण भूत-भविष्याचा अतिविचार करून मौल्यवान वर्तमान म्हणजेच आपला आज वाया घालवत असतो. जर तुम्हालाही हा अनुभव आला असेल तर तुम्ही आता काळजी करण्याची गरज नाही.   

 

भूतकाळाचा पश्र्चाताप आणि दुःख कुरवाळत बसण्याची सवय कशी सोडवावी?

भूताळातील कटू आठवणी आजही आपणच आपल्या मनात एखाद्या कोपऱ्यात, अतीखोल अंधाऱ्या दरीमध्ये, जागे ठेवतो, होय होय आपणच.. यासाठीच मेंदूला असे वाटते की ही अमुक अमुक गोष्ट अगदी महत्वाची बाब आहे आणि ती जपली पाहिजे, साठवली पाहिजे. हे मेंदू आणि मनाचे विज्ञान आहे.

तुमचे उत्तर Thanos देऊ शकतात शेवटची ओळ..

निःसंशय जिवनात काहितरी आपल्याकडून, इतरांकडून चुका झालेल्या असतात भलेही त्या हेतुपुरस्सर पणे, जाणीवपूर्वक असू शकतात परंतु तुम्हालाच हे ठरवावे लागणार की अपल्याला पुढं जायचं की तिथंच थांबायचं. Choice is yours.

👉इथून अधिक वाचा :  भूतकाळाचा पश्र्चाताप आणि दुःख कुरवाळत बसण्याची सवय कशी सोडवावी?



अभ्यासात संशोधन अगदी स्पष्ट आहे: अतिविचार करणे तुमच्यासाठी वाईट आहे आणि ते समस्या टाळण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी काहीही उपाकारक ठरत नाही उलट त्यामुळे अपायच अधिक होतात.   

 

·     ओव्हरथिंकिंगची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • डोक्यात सारखे लाजिरवाणे क्षण मनात आठवणे.
  • झोपेचा त्रास होणे. सारखं डोकंदुखणे.  
  • स्वतःला पुन्हा-पुन्हा प्रश्न विचारणे, असे झाले तर कायतसे झाले तर काय
  • भूतकाळातील घटना किंवा घटनांमधील दडलेला अर्थ शोधण्यात बराच वेळ घालवणे. 
  • लोकांजवळ शेअर केलेल्या जुन्या गोष्टींचा विचार करणे.  
  • मी हे केलंनसतं किंवा मी हे बोललो नसतो तर.... असा विचार वारंवार करणे. 
  • आपल्या चुकांचा सतत विचारकरणे. 
  • एखाद्याने सांगितलेली गोष्ट मनात धरून परत-परत त्यावर विचार करणे. 
  • आपल्या सभोवतालच्या प्रत्यक्ष गोष्टींकडे दुर्लक्ष करून, विचारांच्या गोंधळात राहणे. 
  • भूतकाळकिंवा भविष्याबद्दल खूप विचार करणे. 
  • ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाहीअशा गोष्टींचा विचार करणे. 
  • चिंता आणि तणाव मनातून काढण्यासाठी असमर्थठरणे. 

 

 

अतिविचार करण्याचे प्रकार

भूतकाळाबद्दल काळजी करणे
Thinking about Past.


भविष्याबद्दल काळजी करणे
Thinking about Future

 

अतिविचार करण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत, पहिला प्रकार म्हणजे भूतकाळाबद्दल काळजी करणे आणि दुसरा भविष्याबद्दल काळजी करणे. ही दोन्ही कारणे समस्या सोडवण्यापेक्षाआपल्याला अतिजास्त विचारात टाकणा-या बाबी आहेत. 

 

अतिविचार हे आत्म-चिंतन (Self Analysis) किंवा आत्म-प्रतिबिंबापेक्षा (Self Image) वेगळे आहे. निरोगी आत्म-चिंतन म्हणजे स्वतःबद्दल काहीतरी शिकणे किंवा परिस्थितीबद्दल नवीन दृष्टीकोन प्राप्त करणे.   

 

#🙋लक्षात ठेवा:
Over Analysis makes you Paralysis..!

 

अतिविचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्व गोष्टींबद्दल खूप वाईट वाटत असते. अतिविचार करणे आणि ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही त्याबद्दल विचार करणे अशा बाबी यामध्ये समाविष्ट आहेत.  

·  समस्या सोडवणे, आत्म-चिंतन करणे आणि अतिविचार करणे यातील फरक तुम्ही लक्षात घ्यायला हवा.  

यावर उपाय शोधण्यात किंवा एखादी नवीन गोष्ट किंवा वर्तन शिकण्यात घालवलेला वेळ रचनात्मक मानला जातो. परंतु जर तुम्ही विचारात जास्त वेळ घालवलात, मग ते 02 मिनिटे असो वा 02 तास, यामुळे तुमचे आयुष्य वाढणार नाही तर शारीरिक परिणाम होऊन यामुळे तुमचे आयुष्य घटेल.

 

#ट्रिगर पॉईंट् समजून घ्या:

आपला ट्रिगर पॉईंट् समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीचा ट्रिगर पॉईंट असतो. ज्यामुळे लोक ओव्हरथिंकींग करतात. अशावेळी ओव्हरथिंकींग टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.  

तर तुम्हाला लोकांकडून कोणताही त्रास होत असेल तर सकारात्मक वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. ओव्हरथिंकींग अशी समस्या आहे जी सोडवण्यात तुम्ही स्वत: तुमची मदत (#सेल्फ हेल्प) करू शकता.

 

आपल्या भाव-भावना, जाणीवा,  आणि आपल्या मेंदू-मनाचे अंतरंग जाणून घेऊन आपण देखील स्वस्थ-समृद्ध जीवन जगू शकतो. त्यासाठी तुम्हाला खालील पुस्तक सारांश किंवा लेख अवश्य वाचाल्यला हवीत, नक्कीच मदत होईल.

आपण पुस्तके वाचत आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपण इतरांचे अनुभव शिकत आहोत. आणि अनुभव हा उत्कृष्ट शिक्षक आहेत.

 

 

#हेही वाचा: भावनांच्या जगात 

 

#हेही वाचा: भावनिक बुद्धिमत्ता


 

#हेही वाचा: ईमोशनल इंटेलीजेन्स २.०

 
 

#हेही वाचा:आपले मन

 
#हेही वाचा:
मनात - मानवी मनाचा वेध -अच्युत गोडबोले

 

#हेही वाचा: आपले अन्न-आहार 

 

 

 

 #हेही वाचा: आपले तन-शरीर 

 


#हेही वाचा:   माणूस जसा विचार करतो तसा बनतो

 

#हेही वाचा:  विचार बदला आयुष्य बदला

 

#हेही वाचा:  सकारात्मक विचारांची शक्ती 

 

#हेही वाचा:  अंतर्मनाची शक्ती 

 

#हेही वाचा:  आपला दृष्टीकोन हेच सर्वकाही  

 

 #हेही वाचा:  आपला दृष्टीकोन बनण्याचे रंजक  गणित

 

 #हेही वाचा:
आपला दृष्टीकोन कसा बनतो?
दृष्टीकोन बनण्याचे त्रयक ? शिव खेरा

 
 
#हेही वाचा:  यश तुमच्याच हातात-शिव खेरा





 

जब भी मुसिबत आती है, तो वो अकेली नहीं आती,
अपने साथ मा मां-बाप, भाई-बहन
, पुरा खानदान साथ मे लाती है..!

किंवा

जब भी संकट आता है तो वो अकेला नही आता है,

वो अपने साथ पुरे खानदान को लेकर आता है.

 

आपल्या भारतामध्ये हिंदी मध्ये अशी एक मार्मिक म्हण आहे. म्हणजेच एखादे संकट किंवा समस्या आपल्या जीवनात येते तेव्हा त्यासोबत इतर संकटं,  समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत असते.

त्यावर आधारितच एक WhatsApp विश्वविद्यालयावर छोटासा व्हिडिओ बघण्यात आला त्यात एक छोटी मुलगी आपल्याला क्रोध-राग हा कसा येतो आणि त्यासोबत त्याचे (क्रोध-रागाचे) इतर नातेवाईक कसे संबंधित असतात हे सांगते.

नक्की वाचा किंवा व्हिडिओ बघा तुम्हाला कळून चुकेल कि खरच आपण क्रोध-रागाच्या भरात एक गोष्ट करून चुकतो परंतु त्याचे परिणाम म्हणजे क्रोधाच्या इतर नातेवाईकांना आपसूकच आवतान दिले जाते, आपल्याला वाटते आपण फक्त राग केला, केवळ क्रोध किंवा राग इतर गोष्टींद्वारे कसे जोडलेले, किंवा एकमेकांशी जुळलेल असतात ते समजून येईल.

 

#क्रोध-रागाचे कुटुंब ..!

काय तुम्हाला माहीत आहे क्रोध/राग याचा चक्क एक कुटुंब असतो.

क्रोधाची एक लाडकी बहिण असते जिचे नाव आहे #जिद्द

क्रोधाची एक पत्नी सुद्धा असते जिचे नाव आहे #हिंसा

क्रोधाचा एक भाऊ देखील असतो ज्याचे नाव आहे #अहंकार

क्रोधाचे वडील ज्यांना तो खूप घाबरतो त्याचे नाव आहे #भय

क्रोधाच्या दोन मुलीसुद्धा आहेत त्यांची नावे आहेत #निंदा आणि चुगली

क्रोधाचा एकमेव मुलगा ज्याचे नाव आहे #वैर

क्रोधाच्या कुटुंबातील एकमेव चिडचिड करणारी सून तिचे नाव आहे #इर्षा

क्रोधाची एक नात आहे जिचे नाव आहे #घृणा

क्रोधाची आई तिचे नाव आहे #उपेक्षा

आणि या कुटुंबाचे प्रमुख-क्रोधाचा आजोबा कुटुंबप्रमुख #द्वेष

या कुटुंबापासून नेहमी दूर राहा कारण जेंव्हा क्रोध येतो तेंव्हा तो त्याच्या सोबत संपूर्ण कुटुंब घेऊन येतो..! धन्यवाद.



#क्रोध-रागाचे कुटुंब ..!

 

 
 

#क्रोध-रागाचे कुटुंब ..!


आजोबा #द्वेष 

 

आई #उपेक्षा                 वडील #भय

 

बहिण #जिद्द                 भाऊ #अहंकार

 

पत्नी #हिंसा 

 २-मुली 

 

 #निंदा आणि #चुगली 

(चहाडी/लावालावी)

 

मुलगा #वैर

 

सून #इर्षा          नात #घृणा

 


 

 

 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी-समृद्ध जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल-समृद्ध बनवू शकता.

 

जीवनात पुस्‍तकं असतात आपली,
मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानीम्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानीम्‍हणून पुस्‍तकं वाचा. कारण, प्रचंड वेगाने बदलणारे जग, किचकट मानवी जीवन, त्यात माहिती चे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती-लेख सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी आवश्यक माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास (Self Development), वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔


 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 

Two Minute
📖 BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

 
 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



 

www.evachnalay.in

बदल हवा असेल तर दृष्टीकोन बदला, विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

#लक्षात ठेवा
बोलण्या अगोदर विचार करा
आणि
विचार करण्याअगोदर वाचन करा.

🕮 वाचत राहा, शिकत राहा, जीवन समृद्ध बनवा. 👍

 


 
💁🙏 ई-वाचनालयास भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद.

आशा आहे तुम्हाला इंटरनेट वरील आमचे मराठीतील ई-वाचनालय हे संकेस्थळ स्व-मदत, स्व-सुधार, स्व-विकास यावर आधारित या पुस्तकांच्या व्यासपीठावर आपल्याला काही मदत झाली असेल.

पुस्तकं आणि लोकं ह्या दोनच गोष्टींनी आपले दृष्टीकोन, विचार, पर्यायाने आयुष्य बदलू शकते, म्हणून आपण आपल्या अमूल्य वेळेला जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठीच्या प्रयत्नात यशाच्या वाटेवर आहोत असे दिसते.  योग्य दिशेने आहोत.


आजच्या धावत्या वेगवान गतिमान जगात 
#Direction ⬆️ ⬇️ is more important than the Speed.🚅 🚄 
या म्हणप्रमाणे "वेगापेक्षा दिशा महत्वाची असते" त्याप्रमाणेच #will is more important than the skill, "कौशल्यापेक्षा तीव्र इच्छाशक्ती महत्वाची असते".

आपण महाजलाच्या विचलित करणाऱ्या प्रचंड पसाऱ्यात वाचनाचा पर्याय निवडलोत यावरून आपण आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करून योग्य दिशा निवडली असे म्हणू शकतो.

याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन करतो.


#आ वा ह न : 

आपण जर लेखक किंवा पुस्तकं प्रेमी असाल किंवा. तुमच्या जळपास एखादे मित्र, नातेवाईक, सोबती, नेटकरी, वाचनप्रेमी असतील आणि तुम्हाला आवडलेली, निवडीच्या पुस्तकांबद्दल इतरांनाही सांगावे वाटल्यास, इतरांनीही पुस्तकांतून बोध घ्यावा, असे वाटले तर नक्कीच प्रतिउत्तर द्यावे.

आम्ही आपल्या लेखास, (पुस्तक सारांश, पुस्तक परिचय, पुस्तक समीक्षा) नावांसहित प्रसिध्दी नक्कीच देऊ.

अवश्य कळवावे.
टीम ई-वाचनालय

 

वाचत राहा, शिकत राहा, समृद्ध होत राहा.



टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive