आवारा मसिहा -विष्‍णू प्रभाकर -पुस्‍तक परिचय-समीक्षा मराठी

शरत्‍चंद्रांच्‍यासारखे जीवन भारतातल्‍या कुठल्‍याही साहित्यिकाचे क्‍वचितच असेल.  ‘कुठल्‍याही गुंडाचे चरित्र लिहा शरतचंद्रांचे जीवन तसेच असेल’, असे काही लोक म्‍हणत.  रवींद्रनाथ टागोरांचे ते समकालीन होते, समाजाने त्‍यांना वा-यावर सोडले होते.  त्‍यांच्‍या भणंगपणाला कारूण्‍याची किनार होती.

आवारा मसिहा
बंगाली कादंबरीकार शरत्चंद्र चतर्जी यांचे चरित्र 


मूळ हिंदी पुस्‍तक 

आवारा मसिहा
विष्‍णु प्रभाकर एवं उनकी कृति 

विष्‍णू प्रभाकर 

बंगाली कादंबरीकार शरत्चंद्र चतर्जी यांचे चरित्र 

 

मराठी अनुवाद 

शरदिनी मोहिते

पुस्‍तक परिचय-समीक्षा मराठी 

awara masiha marathi | आवारा मसिहा मराठी
थोडक्‍यातः
  • थोर बंगाली साहित्यिक शरतचंद्र चतर्जी यांची ही जीवनगाथा आहे. लहानपणापासून उनाड असलेल्या शरत बाबूंचे आयुष्य विविधरंगी होते. 
  • त्यांच्या जीवनपद्धतीला अनेकांनी नवे ठेवली. पण त्यांच्या कादंब-या अतिशय उच्च प्रतीच्या आहेत. त्या काळात प्रत्यक्ष टागोरांनीही याबाबत त्यांचे कौतुक केले होते.
  • त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, त्रास प्रसिद्धी, स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग या सगळ्याचे वर्णन या पुस्तकात विष्णू प्रभाकर यांनी केले आहे.
  • या मूळ हिंदी पुस्तकाचा शरदिनी मोहिते यांनी मराठीत अनुवाद केला आहे.


यशस्‍वी लेखकाचे चरित्र लिहिणे अवघड असते.  त्‍याने त्‍याच्‍या कथा कादंब-या यात निर्माण केलेली पात्रे, प्रसंग व त्‍याचे स्‍वतःचे आयुष्‍य याची गुंतागुंत खूप असते.  ते सारे नाजूकपणे वेगळे काढावे लागते.  मोठ्या लेखकाचे साहित्‍य व त्‍याचे जीवन एकत्रच पुढे जाते.

हे काम विष्‍णू प्रभाकर यांनी ‘आवारा मसिहा’ हे श्रेष्‍ठ बंगाली कादंबरीकार शरत्चंद्र यांचे चरित्र लिहिताना यशस्‍वीरीत्‍या केले आहे.  शरत्चंद्रांसारख्‍या वादग्रस्‍त व्‍यक्तिमत्‍वाचे ते आधारभूत चरित्र मानले जाते.  हे चरित्र लिहिण्‍यासाठी विष्‍णू प्रभाकर हे १४ वर्षे शरतचंद्रांविषयी माहिती गोळा करत होते.  याची प्रथम आवृत्‍ती १९७४ मधील आहे.

शरत्चंद्रांच्‍यासारखे जीवन भारतातल्‍या कुठल्‍याही साहित्यिकाचे क्‍वचितच असेल.  ‘कुठल्‍याही गुंडाचे चरित्र लिहा शरतचंद्रांचे जीवन तसेच असेल’, असे काही लोक म्‍हणत.  रवींद्रनाथ टागोरांचे ते समकालीन होते.  पण त्‍यांच्‍या सारखा खानदानीपणा त्‍यांना लाभला नव्‍हता.  रवींद्रनाथांसारखे वसंतातल्‍या पहाटेचे त्‍यांना कौतुक नव्‍हते.  समाजाने त्‍यांना वा-यावर सोडले होते.  त्‍यांच्‍या भणंगपणाला कारूण्‍याची किनार होती. 

 

स्त्रि‍यांबद्दल अतीसंवेदनशील

त्‍यांचे मन समाजातल्‍या दुःखाविषयी, विशेषतः स्त्रि‍यांच्‍या दुःखाविषयी अतीसंवेदनशील होते.  कुमारवयीन असताना ते एकदा आपल्‍या मामा बरोबर पहाटे गंगेच्‍या घाटावर चालले असताना एका घरातून त्‍यांचा स्‍त्रीच्‍या रडण्‍याचा आवाज आला.  त्‍याचे मामा तिथे विचारपूस करावी म्‍हणून थांबले.

शरत्-चंद्र म्‍हणाले, ‘त्‍या स्‍त्रीने आपला आंधळा नवरा गमावला आहे.  तिचे दुःख सांत्‍वना पलीकडचे आहे आणि तिचे रडणे हे उच्‍चभ्रू वर्गातल्‍या स्‍त्रि‍यांच्‍या सरखे नियंत्रित नाही.  ते मनापासून आहे.

विष्‍णू प्रभाकारांनी लिहिलेले आहे की, शरत्चंद्रांना फार आधीपासून दुःखाची प्रत ओळखता येई.  लहान असल्‍यापासून त्‍यांना विधवा, नाचगाणे करणा-या स्‍त्रि‍या, निराधार स्‍त्रि‍या या सा-यांच्‍या जीवनाविषयी कारूण्‍यपूर्ण कुतुहल होते व ते व्‍यक्‍त करण्‍यात त्‍यांना कसलीही लाज वाटली नाही.  त्‍यामुळे बंगाली समाजातील बाबू लोग म्‍हणजे सभ्‍य समजले जाणारे लोक त्‍यांच्‍याशी अंतर राखून वागत.

त्‍यांच्‍या शेजारी राहत असलेल्‍या १४ वर्षांच्‍या निरुपमाच्‍या नव-याचे निधन झाले.  तिचे केशवपन चालू होते.  शरत्-चंद्रांना रहावले नाही.  नंतर ते सरळ तिच्‍याकडे गेले व विचारले, ‘निरु, कशी आहेस?’ हे त्‍यांचे वागणे त्‍या काळच्‍या चालीरितीला सोडून होते.  निरुने प्रतिसाद दिला नाही.  असे विचारणे बरोबर नसल्‍याचे ती म्‍हणाली. 

 

देवदास- चंद्रमुखी

शरत्-चंद्रांच्‍या कादंब-यातील पात्रे व घटना प्रत्‍यक्ष त्‍यांच्‍या अनुभवातून आलेली आहेत.  त्‍यांच्‍या ‘देवदास’ या गाजलेल्‍या कादंबरीतील चंद्रमुखीचे पात्र हे कालिदासी या नाच-गाणे करणा-या स्‍त्रीवरून स्‍फुरलेले आहे.  ते अनेकदा तिच्‍याकडे जात असत.  समाजाने टाकून दिलेल्‍या स्‍त्रि‍यांच्‍या अंत्‍यसंस्‍कारालीही कोणी पुढे येत नसे.  

 
शरत्-चंद्र या कामासाठी पुढाकार घेत.  हिंदू धर्म स्‍त्रि‍यांच्‍याबाबत अनुदार आहे
, असे त्‍यानी म्‍हटले.

त्‍यांच्‍या साहित्‍यातून स्‍त्र‍ियांची बाजू त्‍यांनी कायम मांडलेली आहे.  नातेवाईक व परिचितांनी पाठ फिरवल्‍यावर ते रंगूनला गेले व तिथे १३ वर्षे राहिले.  गरीब असलेल्‍या वडिलांनी टाकून दिलेल्‍या हिराण्‍यमयी नावाच्‍या मुलीशी त्‍यांनी लग्‍न केले.  दरम्‍यान, त्‍यांच्‍या कथा बंगालच्‍या साहित्यिक मासिकात प्रसिद्ध होऊ लागल्‍या.

ते कलकत्‍याला परत आले तेव्‍हा तिथल्‍या साहित्‍य जगतात त्‍यांचे बरेच नाव झाले होते.  रवींद्रनाथ टागोरांनी शरत्-चंद्रांचे वेगळेपण व मोठेपण मान्‍य केले.  त्‍यांनी निर्माण केलेली स्‍त्री पात्रे केवळ सुंदर नाहीत तर बुद्धिमान व धाडसी आहेत.  जणू त्‍यांनी त्‍यांच्‍या कल्‍पनेतल्‍या स्‍त्रि‍या निर्माण केल्‍या व पुस्‍तकाच्‍या पानांवर सुरक्षित जगात त्‍यांना मोकळे सोडून दिले. 

कलकत्‍त्‍यात स्‍त्रि‍यांनी त्‍यांचा सत्‍कार केला व त्‍यांना ‘नारी चरित्रके परमरहस्‍य ज्ञाता’ असे म्‍हटल्‍याचे विष्‍णू प्रभाककारांनी लिहिले आहे.

केवळ स्‍त्रि‍याच नाहीत तर संन्‍यास्‍यांचेही त्‍यांना आकर्षण होते.  अर्थात या दोघांच्‍याही आत्‍मसमर्पणाचे त्‍यांना कौतुक नव्‍हते.  बंकिमचंद्रांनी जसे संन्‍याश्‍यांचे रोमांटिक चित्र रंगवले तसे प्रत्‍यक्षात नसते याचा अनुभव शरत्-चंद्रांनी घेतला.  संन्‍याश्‍यांच्‍या बरोबर काही काळ फिरत होते.  एकदा गंगेच्‍या काठावर आपल्‍या ८० वर्षांच्‍या सहका-याला मरण्‍यासाठी, तसेच मागे टाकून त्‍याच्‍या बरोबरचे संन्‍यासी निघून गेलेले त्‍यांनी पाहिले.

गांधीजींचे ऋण मान्‍य करताना शरत्-चंद्रांनी म्‍हटले आहे.  स्‍त्रि‍या त्‍यांच्‍यामुळे स्‍वातंत्र्य लढ्यात आल्‍याव धीट झाल्‍या.  पण, त्‍यांना क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती होती. ‘मला तुमचे सूत कातणे आवडत नाही,’ असे गांधीजींना त्‍यांनी स्‍पष्‍ट सांगितले.  गांधीजी म्‍हणाले, ‘पण तू सूत चांगले काततोस!’

त्‍यांच्‍या पाथेर दाबी ‘योग्‍य मार्ग’ या कादंबरीत क्रांतिकारी मार्गाचे त्‍यांना असलेले आकर्षण स्‍पष्‍ट दिसते.   या कादंबरीचा काही भाग त्‍यांनी बदलावा नाही, तर ते अडचणीत येतील असे त्‍यांना सुचवण्‍यात आले तेव्‍हा त्‍यांनी, ‘यातला एकही शब्‍द बदलला जाणार नाही.’.  असे ठामपणे बजावले.  शरत्-चंद्रांनी जवळपास सारे जीवन भणंग अवस्‍थेत काढले.  पण, भारतातल्‍या स्‍त्री जीवनाची कहाणी ते मांडत राहिले.  त्‍यांनी लिहिले,

‘प्रतिष्‍ठि‍त समाजात ज्‍यांना स्‍थान नाही अशा अनेक स्‍त्र‍ियांच्‍या संगतीत मी आयुष्‍याचा बराच काळ काढलेला आहे.  सभ्‍य समाजात हीन समजली जाणारी कृत्‍ये मी केली आहेत.  पण, मानवतेला काळीमा लागेल असे एकही कृत्‍य माझ्याकडून घडलेले नाही.   माझ्या लिखाणातून अनैतिकपणाचे मी समर्थन करत नाही.  मी फक्‍त समाजाचे वेगवेगळे चेहरे दाखवतो.’  

रवींद्रनाथांनी त्‍यांना आत्‍मचरित्र लिहा, अशी विनंती केल्‍यावर ते म्‍हणाले, ‘गुरुदेव, मला जर माहित असते की मी एवढा मोठा माणूस होणार आहे, तर मी वेगळ्या प्रकारचे जीवन जगलो असतो.’ 

दखल

शरत्-चंद्रांच्‍या अनेक कथा कादंब-या भारतातल्‍या बहुतेक सर्व प्रमुख भाषेत भाषांतरित झाल्‍या आहेत.  त्‍यांच्‍यावर सिनेमे निघाले.  देवदासवर एकंदर २०-सिनेमे आहेत.  त्‍यातले दोन पा‍किस्‍तानमध्‍ये व दोन बांग्‍लादेशमध्‍ये काढलेले आहेत.  परिणिता कादंबरीवर चार सिनेमे निघाले आहेत.

गेल्‍या शतकातल्‍या महाराष्‍ट्रातल्‍या अनेक साहित्यिकांवर त्‍यांच्‍या साहित्‍याचा प्रभाव रहात आलेला आहे.

त्‍यांच्‍या कादंब-याही मराठी वाचकाला अप‍रिचित नाहीत.  पण, मराठीत त्‍यांचे विस्‍तृत चरित्र शरदिनी मोहिते यांनी अनुवाद केला  आहे. 

 लेख-साभारः रवींद्र कुलकर्णी, संपर्कः ९८१९२४७०९३ kravindrar@gmail.com  
(बुकशेल्‍फ
, पुण्‍यनगरी)

  • बिराज-बऊ, परिणीता, देवदास, श्रीकांत, चरित्रहीन, गृहदाह अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ कादंबर्‍या लिहिणारे प्रख्यात बंगाली साहित्यिक शरश्चंद चटर्जी यांचे अवघे आयुष्य हे एखाद्या कादंबरीपेक्षाही चित्तचक्षुचमत्कारी होते. 
  • वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षीच त्यांनी संन्यास घेतला; पण वडलांच्या अकाली निधनानंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारून प्रपंचाची जबाबदारीही घेतली. 
  • १९०३मध्ये ब्रह्मदेशात रंगून येथे ब्रिटिशांच्या बांधकाम खात्यात पत्करलेली नोकरी १४ वर्षं करून ते कोलकात्याला परतले आणि त्यांनी वयाच्या ४१व्या वर्षी लेखणी हातात घेतली. 
  • पण याच लेखणीनं त्यांना दिगंत कीर्ती दिली! कॉंग्रेसचे ते केवळ सक्रीय सदस्यच नव्हते, तर हावडा कॉंग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. 
  • कल्पितापेक्षाही अघटित अशी ही शरदबाबूंची जीवनकहाणी ज्येष्ठ लेखक विष्णू प्रभाकर यांनी एखाद्या कादंबरीसारखीच रंगवली. 
  • या 'आवारा मसीहा' या ग्रंथाचा शरदिनी मोहिते यांनी तितक्याच रसाळ शैलीत केलेला मराठी अनुवाद हा मूळातूनच वाचण्याजोगा आहे.

मराठी अनुवाद: शरदिनी मोहिते

 

मूळ हिंदी पुस्‍तक 

आवारा मसिहा

विष्‍णु प्रभाकर एवं उनकी कृति 

विष्‍णू प्रभाकर 

बंगाली कादंबरीकार शरत्चंद्र चतर्जी यांचे चरित्र

मराठी अनुवाद 

शरदिनी मोहिते

पुस्‍तक परिचय-समीक्षा मराठी 

awara masiha marathi


 ________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 ९.     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...! 

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive