ब्रायटर दॅन अ थाउजंड सन्‍स- रॉबर्ट जंग-पुस्‍तक परिचय मराठी

हे पुस्‍तक अणुबॉम्‍बची कहाणी तर सांगतेच, पण त्‍याही पलीकडे जाऊन, मानवी संस्‍कृतीत अविरत चालणा-या सत्ता व ज्ञान यांच्‍यातल्‍या संघार्षाची कहाणी सांगते.

ज्ञान आणि सत्‍ता यातला संघर्ष- सहस्‍त्रावधी सूर्यापेक्षा तेजस्‍वी असे काय आहे? अणुगर्भातली उर्जा!  शाळा-कॉलेजात केवळ काही पानात परिचय असलेल्‍या अणु संरचनेचे कोडे कसे उलगडले गेले, याची रंजक, भावगर्भ आणि त्‍याच बरोबर विषण्‍ण करणारी कहाणी ‘ब्रायटर दॅन अ थाउजंड सन्‍स’ या पुस्‍तकात आहे.

ब्रायटर दॅन अ थाउजंड सन्‍स

लेखक- रॉबर्ट जंग

पुस्‍तक परिचय मराठी 


 

Brighter Than the Thousand Suns

Author- Robert Jung

Book Review in Marathi

लेख साभार-रवींद्र कुलकर्णी-बुक शेल्‍फ-पुण्‍यनगरी

 

हे पुस्‍तक अणुबॉम्‍बची कहाणी तर सांगतेच, पण त्‍याही पलीकडे जाऊन, मानवी संस्‍कृतीत अविरत चालणा-या सत्ता व ज्ञान यांच्‍यातल्‍या संघार्षाची कहाणी सांगते.

सहस्‍त्रावधी सूर्यापेक्षा तेजस्‍वी असे काय आहे? अणुगर्भातली उर्जा!  शाळा-कॉलेजात केवळ काही पानात परिचय असलेल्‍या अणु संरचनेचे कोडे कसे उलगडले गेले, याची रंजक, भावगर्भ आणि त्‍याच बरोबर विषण्‍ण करणारी कहाणी ‘ब्रायटर दॅन अ थाउजंड सन्‍स’ या पुस्‍तकात आहे.

आइन्‍स्टाइनच्‍या तोडीचा शास्‍त्रज्ञ असलेल्‍या नील्‍स बोहरने तुमच्‍या तुमच्‍या खांद्यावर हात ठेवला तर तुम्‍हाला कसे वाटेल?

हॅन्‍स बॅथे या प्रसिद्ध गणितज्ञाबरोबर बोलताना तुमच्‍या मनात कोणत्‍या भावना येतात? ओपेनहॅमर या उत्‍तम संघटक असलेल्‍या शास्‍त्रज्ञाचे भाषण ऐकताना तुम्‍ही काय विचार कराल?

एन्रिको फर्मी, ज्‍याने प्रयोगशाळेत युरेनियमच्‍या अणुचे पहिल्‍यांदा विभाजन केले तो तुम्‍हाला लिफ्टमध्‍ये भेटला तर? आणि लिओ झीलार्द, ज्‍याने अणुबॉम्‍बच्‍या घडणीतली महत्‍वाची अशी साखळी प्रक्रिया शोधली, तो जर सतत न आवडणारे, बेचैन करणारे प्रश्‍न विचारू लागला तर तुम्‍ही त्‍याला काय सांगाल?

‘ब्रायटर दॅन थाउजंड सन्‍स’ वाचताना या सगळ्या प्रश्‍नांनी आणि भावनांनी माझ्या मनात गर्दी केली होती.  जणू काही मी त्‍यांच्‍याच पैकी एक होतो.

अणू हा कुठल्‍याही पदार्थाचा अविभाज्‍य घटक आहे.  असे मानण्‍यात येत होते., पण अणुचे विभाजन होऊ शकेल अशी शक्‍यता विसाव्‍या शतकाच्‍या दुस-या दशकात दिसू लागली.  वर उल्‍लेखलेले सर्व शास्‍त्रज्ञ  हे कोडे कायमचे सोडवण्‍याच्‍या प्रयत्‍नात होते.

ब्रिटिश शास्‍त्रज्ञ रूदरफोर्डला पहिल्‍या महायुद्धात एक्‍सपर्ट कमिटीच्‍या बैठकीला तो गैरहजर रहात असल्‍याबद्दल जाब विचारण्‍यात आला तेव्‍हा तो म्‍हणाला,

‘’माझ्याशी नम्रपणे बोलायचे.  अणुचे कृतित्रमरीत्‍या विभाजन करण्‍याच्‍या प्रयोगात मी व्‍यस्‍त आहे आणि युद्धापेक्षा हे जास्‍त महत्‍वाचे आहे.’’

हे प्रयोग युरोपभर चालू होते.  पहिल्‍या महायुद्धात यातली सर्व राष्‍ट्रे एकमेकांच्‍या जिवावर उठली होती., पण त्‍याच वेळेला या सर्व राष्‍ट्रातल्‍या शास्‍त्रज्ञांचे एकमेकांत उत्‍तम सहकार्य होते.   ऑस्ट्रिया आणि ग्रेट ब्रिटनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. 

पण व्हिएन्‍ना रेडियम इन्स्टिट्यूट ऑफ ऑस्‍ट्रि‍याने ग्रेट ब्रिटन मधल्‍या रुदरफोर्डला २५० मिलीग्राम रेडियम संशोधनासाठी वापरायला दिले.  यात कोणी कुणालाही देशद्रोही म्‍हटले नाही.  आज आपल्‍याकडे याची कल्‍पना करणेही अशक्‍य आहे.

पदार्थ विज्ञानाचे हे सोनेरी दिवस होते.  यात किती प्रतिभावान व्‍यक्‍ती गुंतलेल्‍या होत्‍या याबद्दल लिहिताना लेखकाने जी उदाहरणे दिली आहे.  त्‍यात,

मॅक्‍स बोर्न बद्दल तो लिहितो, ‘मॅक्‍स बोर्नला विविध विषयांत उत्‍तम गती होती.  तो पहिल्‍या दर्जाचा पियानो वादक वा लेखक होऊ शकला असता.’ त्‍याचे वडील श्रीमंत होते.  ते म्‍हणाले, ‘कुठलीही निवड करण्‍याच्‍या आधी तू सगळे विषय चाचपडून पहा.’

त्‍यामुळे मॅक्‍स कायदा, साहित्‍य, मानसशास्‍त्र, अर्थशास्‍त्र आणि खगोल विज्ञान निवडले कारण तो म्‍हणाला जिथे ते वर्ग भरत ती इमारत छान होती.

जगातल्‍या प्रख्‍यात विश्‍वविद्यालयांबद्दल संस्‍थांबद्दल विद्वानांबद्दल व त्‍यांच्‍या प्रतिभावान विद्यार्थ्‍यांबद्दल वाचणे मोहित करणारे आहे. आपल्‍याला पाठ्यपुस्‍तकात केवळ एखाद-दोन वाक्‍यात परिचय असलेल्‍या या व्‍यक्‍ती किती मोठ्या होत्‍या याचा अंदाज आपल्‍याला या पुस्‍तकात येतो.

जवळपास २५ वर्षे पदार्थविज्ञानाची ही नाव प्रसन्‍न प्रदेशातून सत्‍याच्‍या शोधात जात असताना अचानक एका खडकावर आपटून फुटली.  त्‍या खडकाचे नाव राजकारण असे होते.

जर्मनीत १९३२ साली हिटलर सत्‍तेवर आला.  त्‍याच्‍या आधी आणि नंतर राष्‍ट्रप्रेमाची धुंदी योजनाबद्धरित्‍या चढवली गेली.  गॉटिंग्‍टन विद्यापीठात नाझी पार्टीच्‍या यूथ विंगने आइन्‍स्‍टाइनचे भाषण बंद पाडले.  त्‍याला धक्‍काबुक्‍की करण्‍यात आली.  त्‍याचे शोध ‘ज्‍युईश विज्ञान’ म्‍हणून हिणवले गेले.

केवळ विज्ञानाला नव्‍हे, तर जर्मन या ‘आर्यन विज्ञानाला’ प्राधान्‍य द्यायचे ठरवून तथाकथित देशप्रेमी विद्वानांची नेमणूक विविध समित्‍यांवर करण्‍यात आली.

आइन्‍स्‍टाइन, विंगर, झिलार्द, जॉन न्‍यूमनसारखे अनेक शास्‍त्रज्ञ जर्मनी सोडून निघून गेले.  जर्मनीची वैज्ञानिक परंपरा खंडित झाली आणि त्‍याचे परिणाम त्‍या देशाला भोगावे लागते. 

अल्‍बर्ट आईन्‍स्‍टाईन

 

हे सगळे शास्‍त्रज्ञ युरोपभर विखुरले गेले आणि नील्‍स बोहरच्‍या मदतीने अमेरिकेत एकत्रित आले.  नंतर काही काळातच दुसरे महायुद्ध  सुरू झाले आणि हिटलरच्‍या जर्मनीने वेगाने काही देश पादाक्रांत केले.  ते पाहून हे सारे वैज्ञानिक अस्‍वस्‍थ झाले.  जर्मनीत चालू असलेल्‍या संशोधनाने हिटलरच्‍या हाती अणुबॉम्‍ब पडेल याची शक्‍यता त्‍यांना भेडसाऊ लागली.

बरीच भवती न भवती होऊन अखेर लिओ झिलार्दने अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्षांना एक पत्र लिहिले व त्‍या खाली आइन्‍स्‍टाइनने सही केली.

अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्ष रूझवेल्‍ट यांनी मान्‍यता दिल्‍याबरोबर अणुबॉम्‍ब बनवण्‍याच्‍या प्रकल्‍पाला लॉस अल्‍मोस येथे सुरुवात होते.  ओपेनहमरला त्‍याचा प्रमुख म्‍हणून नेमले जाते.  त्‍याच्‍या नेमणुकीची प्रक्रियाही वाचण्‍या जोगी आहे.  प्रकल्‍प पूर्ण भरात असताना त्‍यावर २५००० लोक काम करत होते.

त्‍यात नोबेल मिळालेले अनेक वैज्ञानिक व नामवंत इंजिनियर असतात.  या सगळ्यांना सांभाळणे सोपे काम नव्‍हते. व्‍यवस्‍थापनातला हा उत्‍तम धडा म्‍हणता येईल.

अणुबॉम्‍बची चाचणी झाली आणि अणुस्‍फोटाचा महाकाय अग्निकल्‍लोळ उठला.  तो पाहताना ओपेनाहेमरला भगवद्गीतेच्‍या ११ व्‍या अध्‍यायातला, ‘कालो-स्मि लोकक्षयकृत्‍प्रवृद्धो लोकान्‍समाहर्तुमिह प्रवृतः, ‘ मीच लोकांचा काळ आहे, असे सांगणारा हा श्‍लोक आठवला.

या यशस्‍वी चाचणीपाशी हे पुस्‍तक खरे तर संपायला हवे पण ते पुढेही चालू रहाते.  कारण ते एक तांत्रिक पुस्‍तक नाही.  त्‍या प्रयोगात गुंतलेल्‍या माणसांची ती कहाणी आहे.  ज्‍यावेळी हा प्रचंड विध्‍वंसक बॉम्‍ब जपानवर वापरण्‍याचे नक्‍की होते, त्‍यावेळी ज्‍या शास्‍त्रज्ञांनी व तंत्रज्ञांनी तो बनवलेला असतो तेच त्‍याला आता विरोध करू लागतात.

जे अस्‍त्र त्‍यांनी निर्माण केलेले असते त्‍याचा वापर आता त्‍यांच्‍या हातात रहात नाही.  अनेक शास्‍त्रज्ञ अमेरिकन सरकारला पत्रा मागून पत्रे लिहितात, ज्‍याकडे दुर्लक्ष कले जाते.

काही वर्षापूर्वी जर्मनीने शास्‍त्रज्ञांचा पराभव केलेला असतो.  आता ते अमेरिकन सत्‍तेपुढे परत हतबल ठरतात. यानंतर अनेक शास्‍त्रज्ञांनी पदार्थविज्ञानावर काम करणे सोडून दिले.   त्‍यांच्‍यासाठी या सुंदर शास्‍त्राचा अंत त्‍या बॉम्‍बने केला.  साखळी प्रक्रिया शोधाणारा लिओ झिलार्द नंतर जीवशास्‍त्राकडे वळला.

अणुबॉम्‍ब टाकल्‍याचे आइन्‍स्‍टाइनला समजले तेव्‍हा तो फक्‍त, ‘बापरे.!’ एवढेच म्‍हणाला.  त्‍याच्‍या मुलाखती नंतर त्‍याच्‍याबद्दल सी.पी. स्‍त्रोने लिहिले,

‘सारे जग ओळखत असताना त्‍याला घेरुन टाकणारे एकाकीपण फार विचित्र आणि असह्य आहे.’

हे पुस्‍तक अणुबॉम्‍बची कहाणी तर सांगतेच, पण त्‍याही पलीकडे जाऊन, मानवी संस्‍कृतीत अविरत चालणा-या सत्ता व ज्ञान यांच्‍यातल्‍या संघार्षाची कहाणी सांगते.  सत्‍ता प्रेरणा देते, अंमलबजावणी करते व ज्ञान दिशा दाखवते, पण सत्‍ता तिच्‍या सर्वभक्षी स्‍वभावानुसार ज्ञानाचा ताबा घेऊ पहाते तेव्‍हा शोकांतिकेला सुरुवात होते.

लिओ झिलार्दला कुणी म्‍हटले, ‘ही शास्‍त्रज्ञांची आणि त्‍यांच्‍या शोधांची शोकांतिका आहे.’
तो उत्‍तरला
, ‘नाही ती सा-या मानवतेची शोकांतिका आहे.’

 

संपर्कः ९८१९२४७०९३, kravindrar@gmail.com

 

 ________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 ९.     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...! 

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

 ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

 

 

 

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive