मंटो मेरा दुश्मन - उपेन्द्रनाथ अश्क- पुस्तक परिचय-समीक्षा मराठी
सर्वात जास्त बदनाम साहित्यकार, स्वतःशी व बाहेरच्या जगाशी कधीच मेळ न जमलेल्या एका समर्थ लेखकाचे हे शब्दचित्र अस्वस्थ करणारे आहे. आयेशा जलालने लिहिलेल्या मंटोच्या चरित्राबरोबर उपेंद्रनाथ अश्क यांचे ‘मंटो मेरा दुश्मन’ हे पुस्तकही वाचायला हवे.
मंटो मेरा दुश्मन
लेखक-उपेन्द्रनाथ अश्क
मंटो मेरा दुश्मन
लेखक-उपेन्द्रनाथ अश्क
पुस्तक परिचय-समीक्षा
हिन्दी विभाग
स्वतःशी व बाहेरच्या जगाशी कधीच मेळ न जमलेल्या एका समर्थ लेखकाचे हे शब्दचित्र अस्वस्थ करणारे आहे. आयेशा जलालने लिहिलेल्या मंटोच्या चरित्राबरोबर उपेंद्रनाथ अश्क यांचे ‘मंटो मेरा दुश्मन’ हे पुस्तकही वाचायला हवे.
| ई-वाचनालय | www.evachnalay.in |
लेख साभारः रवींद्र कुलकर्णी (पुण्यनगरी, बुकशेल्फ) संपर्कः ९८१९२४७०९३
#Saadat Hassan Manto Marathi #Manto Mera Dushman Book Review in Marathi #Upendranath Ashk books Manto Mera Dushman
‘मित्र तारी मित्र मारी’/मित्र मित्राचा कैवारी/अन् मित्रासारखा नाही वैरी’ कुठे तरी वाचलेल्या या ओळी (मंटो मेरा दुश्मन वाचताना आठवत राहतात.)
मित्रासारखा वैरी नाही, हे खरे कारण मित्राला आपल्या स्वभावातल्या सगळ्या खाचाखोचा माहित असतात. कथाकार व संगीत नाटक अकादमी विजेते लेखक उपेंद्रनाथ अश्क यांनी, त्यांचा तथाकथित स्पर्धक व ज्याच्याशी त्यांचे आयुष्यभर खटके उडत राहिले, असा समकालीन श्रेष्ठ कथाकार सादात हसन मंटो या प्रख्यात कथा लेखकाचे शब्दचित्र मंटो मेरा दुश्मन या लहानश्या पुस्तकात उभे केले आहे.
अवघे 42 वर्षे लाभलेल्या व आयुष्याची शेवटची काही वर्षे पाकिस्तानात काढणा-या सादात हसन मंटोचे साहित्य भारतातल्या वाचकांना माहित आहे. तो व्यक्ती म्हणूनही अपरिचित नाही. त्याच्यावर २०१८ ला आलेला ‘’मंटो’’ हा सिनेमाही उत्तम होता.
Source: Google Images
कोणच्याही व्यक्तीच्या मृत्यूलेखात त्याचे केवळ गुणवर्णन करावे का, त्याचे गुणदोषसहीत व्यक्तिचित्र सांगावे? पहिली गोष्ट करणे अर्थातच सभ्यतेला धरून होईल., पण स्वतः मंटोला या कृत्रिम सभ्यतेचे आकर्षण नव्हते.
मृत व्यक्तीचे चारित्र्य लॉंड्रीत धुऊन त्याला दैवत्व अर्पण करावे अशा स्वभावाच्या समाजाचा मी निषेध करतो, अशा अर्थाच्या मंटोच्याच उद्गाराचा आधार लेखकाने त्याचे व्यक्तीचित्र रंगवताना घेतला आहे.
माणसातल्या माणुसपणाचे आकर्षण हा मंटोच्या कथांचा कायम विशेष राहिला आहे. या संदर्भात लेखकाने मंटोच्या ‘स्वराज के लिए आणि हतक’, म्हणजे ‘अपमान’ या दोन कथांचा वारंवार उल्लेख या पुस्तकात केला आहे.
हतकमध्ये एका वेश्येचा अपमान होतो आणि त्याला ती ज्या प्रकारची प्रतिक्रिया देते त्याचे चित्रण केवळ मंटोच करून जाणे. त्या त्याच्या सर्वश्रेष्ठ कथांपैकी आहे, याबद्दल दुमत हेाण्याचे कारणच नाही. त्याच्या इतर कथांचाही आदरपूर्वक उल्लेखही यात आहे.
त्यांची तक्रार ही आहे की, मनुष्यातल्या पशुत्वाचा त्याला त्रास होतो., पण त्याच्यातले चांगले बघणेच तो टाळतो. अलोक भल्ला यांनी ‘स्टोरिज ऑफ पार्टिशन’ म्हणून जे दोन खंड संपादित केले आहेत त्यात मंटोची बाजू समजून घेताना लिहिले आहे की,
‘’मी एवढे भीषण आणि बीभत्स पाहिले आहे की मंगल व चांगले काही दिसले तरी मला ते ओळखता येत नाही’. मनुष्यत्वाकडून लांब नेणारी कोणतीही गोष्ट त्याला पसंत नसे. तो म्हणे, ‘’मैं आदमी हॅूं. मुझे गुस्सा आया.’’
लेखक उपेंद्रनाथ अश्क व मंटोच्या ज्या शाब्दिक चकमकी होत राहिल्या त्याची सुरूवात अजाणतेपणे का हेाईना अश्क यांनी केली होती.
मंटोच्या एका कथेला त्यांनी, ‘‘दो कौडी की कहानी है.’’ असे म्हटले व ते शाब्दिक चकमकी शेवटपर्यंत चालू राहिल्या. जर आमच्या ओळखीची सुरुवात शत्रू म्हणून झाली नसती, तर आम्ही चांगले मित्र झालो असतो असे त्यांनी सुरुवातीलाच म्हटले आहे.
त्यांच्या नाटकाचा संग्रह त्यांनी मंटोला अर्पण केला आहे. दोघांच्या व्यक्तिमत्वात बराच फरक होता. मंटो बेफिकीर आणि बेहिशोबी होता तर अश्क अत्यंत हिशोबी होते. मंटोला असभ्य समजले जाणारे, कोणतेही ठिकाण वर्ज्य नव्हते. अश्क त्या वाटेलाही जाणे शक्य नव्हते.
मंटो कथा लिहिताना मनुष्य स्वभावाचे बारकावे अत्यंत कौशल्याने टिपे; पण समोरच्या व्यक्तीशी वागताना ते बारकावे त्याला दिसत नसत. त्याचे तुकडे पुस्तकभर पसरले आहेत. तो प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघे.
एकदा त्याने लिहिले,
‘‘माझ्या शेजारी राहणारी स्त्री जर नव-याकडून रोज मार खाते व तरीही सकाळी त्याचे बूट पॉलिश करते तर मला त्याचे फारसे काही वाटत नाही., पण जेव्हा स्त्री नव-याबरोबर भांडते व त्याला आत्महत्येची धमकी देऊन दोन तास सिनेमाला जाऊन बसते अशा वेळेला जेव्हा त्या नव-याची होणारी घालमेल मी पाहतो. तेव्हा मला त्या दोघांबद्दल वाईट वाटते.’’
अश्क लिहितात, ‘तुम्ही जर त्याला गांधी व जिना यांच्याबद्दल सांगाल तर तो कोप-यावरच्या मोच्याचा मोठेपणा तुम्हाला सांगेल. जर तुम्ही लग्नाच्या फायद्याबद्दल सांगितले तर तो तुम्हाला लग्न न करण्याचे फायदे सांगेल व जर तुम्ही लग्न न करण्याचे ठरवले असेल तर तो उलट युक्तिवाद करून तुम्हाला लग्न करायचा विचार करायला लावेल.
तुम्ही जर त्याला धन्यवाद दिलेत तर तो तुम्हाला उलट बोलेल. जर तुम्ही त्याला शिव्या घातल्यात तर तुमच्यासाठी तो नोकरी शोधेल.’ ‘’खाली बोतल, भरा हुआ दिल’’ हा कृष्ण चंदर यांचा मंटोवरचा चटका लावणारा मृत्यूलेख यात शेवटी दिलेला आहे.
त्यात एक घटना मंटोच्या स्वभावावर प्रकाश टाकतो. मन्टो व चंदरने दिल्लीतल्या काश्मिरी गेट जवळच्या मास्टर अब्दुल घनी नावाच्या शिंप्याकडे सूट शिवायला टाकलेला असतो, तो बरेच दिवस त्याच्याकडे पडलेला असतो कारण आणायला मंटोकडे पैसे नसतात. एक दिवस मास्टर अब्दुल घनी त्याला बाजारात पाहतो व त्याची कॉलर पकडतो व विचारतो,
‘हतक तू ने लिखी है? मन्टो म्हणतो, ‘लिखि है तो क्या हुआ? अगर तुमसे उधारी बाकी है, तो इसका मतलब ये नही कि तुम मेरे कहानी के अच्छे आलोचक भी हो सकते हो. यह कालर छोडो’.
अब्दुल घनीच्या चेह-यावर स्मित येते. तो त्याची कॉलर सोडतो व म्हणतो,
‘जा, तेरे उधार के पैसे माफ किये.’
आणि तो निघून जातो. एवढा चांगुलपणा पाहून मंटो स्तंभित होतो व नंतर म्हणतो,
‘साला क्या समझता है? मैं उसकी पै पै चुका दुंगा. हतक मेरी सबसे बुरी कहानी है.’
त्याचे पैसे नंतर न मंटोने दिले न कृष्ण चंदरने. पुढे फाळणीच्या वातावरणात त्या विरुद्ध उभा न राहता मंटो एक दिवस मुंबईतून पाकिस्तानला निघून गेला. त्याने पटकथा लिहिलेला ‘मिर्झा गालिब भारतात धो-धो चालत होता तेव्हा तो पाकिस्तानात दारूला शरण गेला होता.
खूप प्रयत्न करून देखील तो भारत आणि पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे काढू शकला नाही. मंटो गेल्याची बातमी येते तेव्हा दिल्लीत, कृष्ण चंदर टांग्यात बसून मंटोबद्दल शेजारच्या संपादकाला बराच वेळ काही सांगत असतो. पंजाबी टांगेवाला विचारतो,
‘क्या कहां? मंटो मर गया?’ ‘हो’ म्हणताच, तो टांगा थांबवतो व त्यांना सांगतो, ‘कुठला दुसरा टांगा करा मी आज पुढे जाणार नाही.’
हे पुस्तक वाचताना आपली थोडी तयारी हवी. मंटोचे साहित्य वाचलेले, वा निदान डोळ्याखालून गेलेले असले पाहिजे. कृष्ण चंदर, राजिंदर सिंग बेदी, कष्णा सोब्ती हे लेखक, तसेच तीस व चाळीसच्या दशकातले लाहोरमधले साहित्यिक वातावरण, त्या काळातले मुंबईतले फिल्मी जग व भारतातील राजकीय उलाघालीची थोडी कल्पना हवी.
या पुस्तकात बरेच उर्दू शब्द येतात., पण त्याचे हिंदी अर्थ खाली दिले आहेत. त्यामुळे ती अडचण सौम्य होते. स्वतःशी व बाहेरच्या जगाशी कधीच मेळ न जमलेल्या एका समर्थ लेखकाचे हे शब्दचित्र अस्वस्थ करणारे आहे. आयेशा जलालने लिहिलेल्या मंटोच्या चरित्राबरोबर हे पुस्तक वाचनात हवे.
वाचकांच्या सोयीसाठी ही पुस्तक ऑनलाईन ई-पुस्तक पीडीएफ & PDF स्वरूपात सुद्धा (ई-बुक) उपलब्ध आहेः पुढील दुव्यावरून (Link) वाचन करू शकता किंवा डाऊनलोड करू शकताः
प्रतिमा स्त्रोतः twitter
मंटो यांच्या जीवनावर आधारित सिनेमा निघाला. नवाजुद्दीन सिद्दीकी हे मध्यवर्ती भुमिकेमध्ये असलेला सिनेमा त्याची झलक येथून पाहता येईल.
मंटो सिनेमाः (Source YouTube)
Keep Reading, Keep Learning and Keep Growing.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
📗📘📖📘📙
पुस्तकं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कार्य करण्याची योग्य शिस्त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्वय, प्रयोजन...एक व्यवस्था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. |
टिप्पण्या