तीन हजार टाके-सुधा मूर्ती-मराठी अनुवाद पुस्‍तक परिचय

३००० टाक्‍यांची जन्‍मकथा- सुधाजींमुळे ३००० पेक्षा जास्‍त महिलांचे जीवन बदलले होते.  म्‍हणून त्‍या महिलांनी सुधाजींना ३००० टाके घातलेली गोधडी भेट दिली.  याच घटनेवरून सुधाजींनी ३००० स्‍टीचेसहे पुस्‍तक लिहिले आहे.

 तीन हजार टाके

सामान्‍य व्‍यक्‍ती... असामान्‍य जीवन...

सुधा मूर्ती


 

मूळ इंग्रजी पुस्‍तक
Three Thousand Stitches
by Sudha Murthy

 

मराठी अनुवाद
लीना सोहोनी

पुस्‍तक परिचय 

लेख साभारः निरेन आपटे (पुण्‍य नगरी, अमृता परी पैजा)  


 3000 Stitches

by Sudha Murthy

Book Review Marathi

#Marathi translation of the book 3000 Stitches by Sudha Murthy

#Marathi Book Review

 📑📘📙📔📗

सुधाजींमुळे ३००० पेक्षा जास्‍त महिलांचे जीवन बदलले होते.  म्‍हणून त्‍या महिलांनी सुधाजींना ३००० टाके घातलेली गोधडी भेट दिली.  याच घटनेवरून सुधाजींनी ३००० स्‍टीचेसहे पुस्‍तक लिहिले आहे. उमाणुसकीचं एक निराळं उदाहरण या पुस्‍तकातून दिसून येतं.

सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांनी इन्‍फोसिसद्वारे संपूर्ण जगभर आपले कार्य पोहोचवले आहे.  नारायण मूर्तींच्‍या इन्‍फोसिस कंपनीने जगभर व्‍यवसाय नेला तर सुधा मूर्ती यांनी त्‍यातून मिळणा-या नफ्यातून अनेकांना आर्थिक मदत केली, शाळांमधून संगणक वाटले, ग्रंथालय उभे केले.  कपडे-आवश्‍यक वस्‍तूंचे वाटप केले.  नैसर्गिक आपत्‍तीनंतर मदत कार्य केले.

सुधा मूर्ती लेखिकाही आहेत.  Wise and otherwise, dollar bahu, magic of lost temple, महाश्‍वेता अशी त्‍यांची अनेक पुस्‍तके लोकप्रिय झाली.  त्‍या पुस्‍तकांचे अनेक भाषांमध्‍ये भाषांतर झाले.  त्‍यांचे आणखी एक पुस्‍तक खूप लोकप्रिय झाले आणि त्‍याचे नाव आहे ३००० स्‍टीचेसमराठीमध्‍ये हे पुस्‍तक

 ३००० टाकेनावाने उपलब्‍ध असून, त्‍याचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.   देवदासी आणि वेश्‍या व्‍यवसाय करणा-या महिलांवर आधारित हे पुस्‍तक आहे.  या महिलांनी सुधाजींना ३००० टाके असलेली एक गोधडी भेट दिली.  सुधाजींनी या महिलांसाठी जे काम केले त्‍याची कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी ही गोधडी दिली आहे.

हे पुस्‍तक वाचनीय आहे आणि त्‍या पुस्‍तकाची जन्‍मकथाही खूप काही सांगणारी आहे.

सुधा मर्ती इंजिनिअर झाल्‍या; पण त्‍यांचा ओढा सामाजिक कामांकडे जास्‍त होता.  देवदासी प्रथा बंद व्‍हावी.  असे त्‍यांना मनापासून वाटे.  म्‍हणून त्‍या एकदा देवदासी महिलांच्‍या वस्‍तीत गेल्‍या.  त्‍यांना महिलांशी संवाद साधायचा होता.  त्‍यावेळी सुधाजी आधुनिक कपड्यात/पेहरावात होत्‍या.

देवदासीच्‍या वस्‍मतीत गेल्‍यावर तिथल्‍या महिलांना त्‍या आपल्‍यातल्‍या वाटल्‍या नाही.  सुधाजींनी त्‍यांच्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्‍न केला; पण त्‍या महिलांनी त्‍यांना चप्‍पल फेकून त्‍यांनर हाकलून दिले.  सुधाजींना वाईट वाटले; पणत्‍या हरल्‍या नाहीत.

दोन आठवड्याने त्‍या पुन्‍हा तिथे गेल्‍या.  त्‍यावेळी टोमॅटोचा हंगाम होता.  त्‍या बायका टोमॅटो निवडण्‍याचं काम करत होत्‍या. सुधाजी पुन्‍हा आल्‍या हे पाहून त्‍यांनी सुधाजींच्‍या अंगावर टोमॅटो फेकून मारले.  पुन्‍हा मागे फिरावे लागले. 

सुधाजी तहबल झाल्‍या.  त्‍यांनी हा किस्‍सा आपल्‍या वडिलांना सांगितला.  त्‍यांचे वडील डॉक्‍टर होते.  त्‍यांनी सुधाला सांगितले,

तू आधुनिक वेशभूषेत तिथे गेलीस, त्‍यामुळे त्‍या महिलांना तू परकी वाटलीस.  जर तू साडी नेसून गेलीस तर त्‍या तुला आपल्‍यातली एक समजतील.  तुझे बोलणे ऐकतील.

सुधाजींना हा सल्‍ला पटला.  त्‍या साडी नेसून पुन्‍हा देवदासींच्‍या वस्‍तीत गेल्‍या आणि मोठा फरक झाला.  त्‍या महिला सुधाजींशी बोलू लागल्‍या...

त्‍या महिलांपैकी काही जण वेश्‍या व्‍यवसाय करत होत्‍या.  त्‍या वस्‍तीमध्‍ये काहीच सुविधा नव्‍हत्‍या.   सुधाजींनी त्‍यांच्‍या मुलांना स्‍कॉलरशिप दिली.  बॅंक हा प्रकार त्‍या महिलांना माहित नव्‍हता.  मग तिथे एक बॅंक आणली.  एड्स आजाराची माहिती दिली.

एड्सपासून रक्षण करण्‍याचे उपाय सांगितले.  त्‍या महिलांचा सुधाजींवर विश्‍वास बसू लागला.  एक नातं तयार झालं.  त्‍यांचे अनेक प्रश्‍न सुटू लागले.  सुधाजी इन्‍फोसिस फौंडेशन चालवत या गोष्‍टी त्‍या महिलांना माहितही नव्‍हत्‍या.

आपली मुले शिक्षण घेत आहे.  परिवर्तन होत आहे हे त्‍यांना दिसू लागलं.  सुधाजींच्‍या चिकाटीला आणि कष्‍टाला फळ आलं.  त्‍या महिलांनी एक कार्यक्रम करायचं ठरवलं.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्‍हणून सुधाजींनी यावं इतकाच आग्रह करून त्‍या थांबल्‍या नाहीत, तर सुधाजींना बंगळुरूवरून येणं सोपं व्‍हावं म्‍हणून व्‍होल्‍वो एसी बसचं तिकीट पाठवलं.

सुधाजी त्‍या कार्यक्रमात गेल्‍या.  सुधाजींमुळे ३००० पेक्षा जास्‍त महिलांचे जीवन बदलले होते. म्‍हणून त्‍या महिलांनी सुधाजींना ३००० टाके घातलेली गोधडी भेट दिली.  याच घटनेवरून सुधाजींनी ३००० स्‍टीचेस हे पुस्‍तक लिहिले आहे.

माणुसकीचं एक निराळं उदाहरण या पुस्‍तकातून दिसून येतं.  म्‍हणून हे पुस्‍तक आपल्‍या संग्रही असायलाच हवं.

लेख साभारः निरेन आपटे (पुण्‍य नगरी, अमृता परी पैजा)  

 📑📘📙📔📗

 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 

Keep Reading,
Keep Learning
and
Keep Growing. 

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

 📗📘📖📘📙

पुस्‍तकं आपल्‍याला एखाद्या गोष्‍टीसाठी कार्य करण्‍याची योग्‍य शिस्‍त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्‍वय, प्रयोजन...एक व्‍यवस्‍था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.

________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

 ⏰ Two Minute 📖
Book Short 

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive