Butterfly Effect - बटरफ्लाय इफेक्ट- गणेश मतकरी
गणेश मतकरींच्या ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या लघुकथासंग्रहातील प्रत्येक व्यक्ती ही अशीच शहरी जीवनशैलीच्या गुंत्यामध्ये स्वतःचा शोध घेत आहे आणि म्हणून या कथांमधील प्रत्येक व्यक्ती आपल्याला जवळची वाटू लागते.
बटरफ्लाय इफेक्ट
लेखकः गणेश मतकरी
पुस्तक परिचय-समीक्षा -मराठी
गणेश मतकरींच्या कथा या केवळ गूढकथा नाहीत, तर त्या वास्तववादी कथा आहेत. आपल्या रोजच्या वास्तवात दडलेल्या गूढ घटनांना ते आपल्या समोर प्रकट करतात आणि तीच गणेश मतकरी यांची स्वतःची अशी स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि परिपक्व लेखनशैली आणि भाषाशैली आहे.
“Everything
has been figured out, except how to live”
‘कसं जगायचं? हे सोडून सगळ्या गोष्टींचा शोध लागला आहे.’
-जॉ पॉल सार्त्र
|
रोजचे कामाचे ओझे, डेडलाइन्स, रोजचा थकवून टाकणारा प्रवास या सगळ्यांत वाटणारी निरर्थकता आणि त्यातून येणारे नैराश्य, यात अडकलेल्या शहरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या अस्तित्वाबद्दल नेहमीच प्रश्न पडत असतात.
या यंत्रवत जीवनामुळे, आपण एका ‘डिस्टोपियन’ समाजाकडे वाटचाल करतो आहेात, असे वाटू लागते.
स्वतःला ‘सामाजिक प्राणी’ म्हणवून घेणारा मनुष्य, या नव्या शहरी जीवनशैलीमुळे अधिक एकलकोंडा होऊ लागतो. आपल्या स्वतःच्या आत्मनिरीक्षणाचा स्वतःच बळी होत जातो.
गणेश मतकरींच्या ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या लघुकथासंग्रहातील प्रत्येक व्यक्ती ही अशीच शहरी जीवनशैलीच्या गुंत्यामध्ये स्वतःचा शोध घेत आहे आणि म्हणून या कथांमधील प्रत्येक व्यक्ती आपल्याला जवळची वाटू लागते.
‘बटरफ्लाय इफेक्ट’ मधील कथा ह्या ‘एक-नायकी’ नसून, ‘बहु-नायकी’ आहेत आणि म्हणून ही चाकोरीबाहेरची लेखनपद्धती वाचकाला अधिक आकर्षक वाटते. मतकरींच्या कथा परंपरानिष्ठ कथाशैलीला छेद देतात. घडलेल्या प्रत्येक घटनेबद्दलचा, प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन आपल्या समोर उभा करतात.
पण हे सांगताना देखील मतकरी कोणता दृष्टिकोन योग्य हे सांगत नाहीत, ते फक्त वाचकाच्या विचारविश्वात त्यांच्या कथांना पोहोचवून अलगद निरोप घेतात. ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या लघुकथासंग्रहातील दहा कथा आपल्याच आजूबाजूला घडतात. सुरुवातीला अगदी साध्या वाटणा-या या कथा हळूहळू त्यांमागील आशय प्रकट करत जातात.
१९७२ ला अमेरिकन गणितज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांनी ‘अमेरिकन असोसिएशन फॉर एडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ च्या परिषदेत आपला एक प्रबंध मांडला. त्या प्रबंधाचे नाव होते-
‘अंदाजः ब्राझीलमधील फुलपाखरांच्या पंख फडफडण्याने, टेक्ससमधे वादळ येऊ शकेल का?’ (Predictability: Does the Flap of a Butterflies’ Wings in Brazil Set Off a Tornado in Texas?) (संदर्भः एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू). त्यात मांडलेल्या सिद्धांताला पुढे जाऊन नाव मिळालेः ‘बटरफ्लाय इफेक्ट’.
पुस्तकाच्या पहिल्या कथेत गणेश मतकरी, याच बटरफ्लाय इफेक्टचा आधार घेऊन, आपल्या आयुष्यात घडणा-या एका लहान घटनेचे देखील किती दूरगामी परिणाम असू शकतात, हे दाखवून देतात.
प्रथमदर्शनी एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या घटना, कशा एकानंतर एक घडत जातात, हे वाचून वाचक थक्क होतो.
दहा वर्षांपूर्वी आपल्या घराचे कोंदट वातावरण सोडून, सांगलीहून मुंबईला आलेला पांड्या, आपल्या कुत्र्याला घरीच सोडून आलेला असतो आणि जेव्हा त्यास लाल स्विफ्ट कार खाली आलेला आणि मरता मरता वाचलेला ‘बंटी’ दिसतो, तेव्हा त्याला त्याच्या कुत्र्याचीच आठवण येते, दुसरीकडे पार्किंग लॉटमध्ये आपल्या मित्राची नवीन लाल स्विफ्ट कार विकत घेतलेल्या पंकजवर अचानक हल्ला होतो.
या दोन अगदी वेगळ्या वाटणा-या घटना कशा जोडल्या गेल्या आहेत आणि त्या घटनांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे विचारविश्व सांगणारी शीर्षक कथा वाचकाला सुन्न करते. गूढ तरीही सहज अशी मतकरींची लेखनशैली, वाचकाला एका जागी खिळवून धरते.
आपले रोजचे जीवन जगताना, नवीन ओळखी बनवताना आपण कधीही मूळचे ‘स्वतः’ नसतो. आपण सतत एक मुखवटा लावून फिरत असतो आणि तो मुखवटा म्हणजेच आपली ओळख होऊन जाते आणि हा असाच मुखवटा आपल्या आजूबाजूला वावरणा-या प्रत्येकाने घतलेला असतो, हे सांगणारी ‘मास्क’ ही कथा आपल्याला डोळे मिळून विचार करायला भाग पाडते.
‘जगबुडी’ या कथेतील, महापालिकेच्या रस्तादुरूस्तीच्या विभागात काम करणारा आणि भर अतिवृष्टीत घराबाहेर पडणारा गायतोंडे, ‘युनिफॉर्म्स’ या कथेत आपल्या सोसायटीच्या गार्डला शंभर रुपये देणारा आणि ज्याला पैसे दिले तो कोण गार्ड होता, याचा नंतर शोध घेणारा श्री, आपली नोकरी जाईल म्हणून हताश झालेला सुमित.
तसेच, चारचौघांमध्ये नव-याने अपमान केल्यानंतर विचारचक्रात अडकलेली शिल्पा, आपल्या चुकीमुळे झालेला अपघात आणि त्यातून झालेला आपल्या बायकोचा मृत्यू, हे विसरू पाहणारा सब-इन्स्पेक्टर जावळे यांची ‘कौल’ ही कथा, आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला, हे माहिती नसताना त्याचा भुर्दंड इन्शुरन्स कंपनीला भरायला लावणं बरोबर आहे का? असा विचार करणारा ‘इन्स्टिन्क्ट’ कथेतील मंगेश, हे सगळे नायक-नायिका वाचकाला आपल्या आजूबाजूचेच आहेत असे वाटू लागते.
मतकरींची भाषाशैली वाचकाला मुग्ध करते. शहरातील कॉर्पोरेट लाइफस्टाइलपासून ते शहरातील बकाल वस्तीमधील जीवनशैलीपर्यंत मतकरी सर्व चित्र आपल्या डोळ्यांसमोर सहज उभे करतात.
आज समाजमाध्यमांच्या अधिक वापरामुळे एकीकडे आपण सगळे एकमेकांच्या खूप जवळ आलो, असे जरी वाटत असले, तरी प्रत्यक्षात आज माणूस एकलकोंडा होत चालला आहे. या लघुकथासंग्रहातील प्रत्येक नायकाचे-नायिकेचे विचार हे आजच्या शहरी लोकांच्या विचारांचे प्रतिबिंबच आहेत.
पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये जरी, ‘निवेदनामध्ये इंग्रजी शब्दांचा अतिरेकी वाटावा इतका वापर आहे’ अशी भारत सासणे यांनी टीका केली असली, तरी मुंबईसारख्या शहरातील मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय अशा प्रत्येकास केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कथांच्या नायकांच्या तोंडी अशी इंग्रजी मिश्रित मराठी सुसंगत वाटते.
गणेश मतकरी यांनी ‘मुडानुरूप’ अशा काही नव्या शब्दांचा शोध देखील लावला आहे, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या नव्या सर्वसमावेशक भाषाशैलीमुळे भाषा अधिक समृद्ध होण्यास तर मदत होईलच, परंतु मराठी पुस्तकांपासून दूर गेलेल्या नव्या पिढीला परत मराठी साहित्याकडे आणण्यासाठी देखील ही उपयोगी ठरेल.
गणेश मतकरींच्या कथा या केवळ गूढकथा नाहीत, तर त्या वास्तववादी कथा आहेत. आपल्या रोजच्या वास्तवात दडलेल्या गूढ घटनांना ते आपल्या समोर प्रकट करतात आणि तीच गणेश मतकरी यांची स्वतःची अशी स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि परिपक्व लेखनशैली आणि भाषाशैली आहे.
म्हणूनच सासणे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणेच ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हा लघुकथासंग्रह मराठीतील आधुनिकोत्तर कालखंडातील साहित्याची नांदी ठरेल.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
📗📘📖📘📙
पुस्तकं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कार्य करण्याची योग्य शिस्त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्वय, प्रयोजन...एक व्यवस्था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. |
टिप्पण्या