Ikigai (Marathi)- (इकिगाई) दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य -भाग-१ Part-1
नैसर्गिक कल, आवड-पॅशन शोधण्याची जापानी पद्धत
ईकिगाई
लेखक
हेक्टर गार्सिया आणि फ्रन्सिस मिरेलस
प्रल्हाद ढापरे
पुस्तक परिचय व सारांश-भाग-१ Part-1
IKIGAI
Marathi Translation of best seller book IKIGAI by the Author Hector Garcia & by Francess Mirellas
#पॅशन एवढे महत्त्वपूर्ण
का आहे? Why Passion is Important?
अधिक वाचाः पॅशन-आवड-नैसर्गिक कल आणि त्याचे महत्व
- जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक Act of staying Young.. while growing Old जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच.
- या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं.
- ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे.
- या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.
- शारीरिक स्वास्थ्यासाठी 80 टक्क्यांचं रहस्य.
- उत्साही शरीर, उत्साही मन.
- तणावाचा फायदा घेण्याची कला. स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम.
- लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.
भाग-१ Part-1
📑📘📙📔📗
(भाग-2 वाचन करण्यासाठी येथून जा )
📘📗📙📖📘📗📙
जापान देशाच्या एका द्विपावर राहणारी एक महिला आजारपणामुळे 'कोमा'मध्ये होती. ती मरणार होती, तेव्हा तिला एक स्वप्न आलं की ती मरण पावलेली असून तिला स्वर्गात प्रवेश मिळालेला आहे. स्वर्गात तिला तिच्या पुर्वजांचे आवाज येतात. ते तिला विचारतात की,
तू कोण आहेस?
ती उत्तर देते, मी नगराध्यक्षाची पत्नी आहे.
परत आवाज येतो की, आम्ही हे नाही विचारलं की तू कोणाची पत्नी आहेस, तर आम्ही विचारलं की तू कोण आहेस?
ती महिला म्हणते, मी चार मुलांची आई आहे.
परत आवाज येतो, आम्ही हे नाही विचारलं की तू कोणाची आई आहेस, तर आम्ही विचारलं की तू कोण आहेस? मग त्या महिलेने उत्तर दिले की,
मी एक शाळेतील शिक्षिका आहे.
मग परत आवाज आला की, आम्ही हे नाही विचारलं की तू काय काम करतेस, तर आम्ही विचारलं तू कोण आहेस?
अशाप्रकारे त्या महिलेने कित्येक उत्तरं दिली. तिने तिचे नाव सांगितले, धर्म सांगितले, कित्येक गोष्टी सांगितल्या. पण, ती हे सांगू शकली नाही की, “ती कोण आहे?”
शेवटी मग तिने असं सांगितलं की,
मी ती आहे जी दररोज आपल्या कुटूंबाची काळजी घेण्यासाठी सकाळी उठत असते.
मी ती आहे, जी मुलांना शिकवून त्यांच्या मनाला चांगल्यापद्धतीने घडवते.
त्या महिलेचे हे उत्तर स्वीकार करण्यात आले आणि ती कोमामधून बाहेर आली.
काही दिवसांनंतर ती बरी झाली. ह्या सर्व घटनेमधून तिला तिच्या आयुष्याचे कारण समजले.
ह्यानंतर ती तिच्या कुटूंबावर अधिक लक्ष द्यायला लागली, त्यांची देखभाल चांगल्या रितीने करू लागली. आणि मुलांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवू लागली.
त्या महिलेला तिचा ईकिगाई मिळाला होता.
👉COMA- Loss of Consciousness
कोमा-
शरिराची अशी अचेतन अवस्था जिथे
व्यक्ती जीवंत असतो परंतू शरिराला जाणिव नसते.
त्यानंतर त्या गावातील प्रत्येकाने आपले ईकिगाई माहित करून घेणे हे एक खूपच महत्वपूर्ण अशी गोष्ट समजू लागले. ही घटना जापान देशातील ओकिनावा द्विपावर झालेली होती. तिथे आजसुद्धा प्रत्येकजण आपल्या जीवनातील ईकिगाईला शोधूनच आपल्या आयुष्य जगत असतात.
आजही तेथील लोकं जगातील ईतर लोकांच्या तुलनेत अधिक निरोगी, सुखी, आनंदी आणि दीर्घायुष्य जगतात. ते खूप कमीवेळा आजारी पडतात आणि तेथील लोकांचे आयुर्मान जगातील इतर लोकांच्या तुलनेत जास्त आहे.
त्या गावातील कित्येक गोष्टी उर्वरित जगापेक्षा चांगल्या आहेत. तज्ञांच्यामध्ये याचे एक हे असू शकते की, तेथील लोकं आपल्या आयुष्याचे ईकिगाई शोधूनच आपले जीवन जगत असतात.
IKIGAI
Reason for Being
ईकिगाई
‘जगण्याचे कारण’
‘ईकिगाई’ एक जापानी शब्द आहे ज्याचा अर्थ होतो ‘जगण्याचे कारण’, जीवनाचे ध्येय, उद्देश्य, जगात येण्याचे कारण.
जापानी लोकं असं मानतात की जगामध्ये प्रत्येकाचा कमीत-कमी एक ईकिगाई असतोच, जो स्वतःला समजून घेतल्या नंतरच मिळत असतो. ईकिगाई मिळणे खूप कठीण आहे. लोकांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते याला शोधण्यात.
तुमचेदेखिल एक ईकिगाई आहे, आणि आज तुम्ही ते कसे शोधावे हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत, त्यासाठी पुस्तकाचे सारांश लक्षपुर्वक वाचा, समजून घ्या, पुनःपुन्हा वाचा.
सर्वांत अगोदर आपण ईकिगाईची आकृती पाहणार आहोत, ज्यामध्ये चार वर्तुळ आहेत. प्रत्येक वर्तुळ एकमेकांना छेदत आहेत आणि यामध्ये असतात चार प्रश्न ज्यांचे उत्तर (प्रामाणिकपणे) तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे.
चार चौकोन: FOUR SQUARES:
पहिला प्रश्नः तुम्हाला काय आवडते, पसंत आहे? What do you Love?
विचार करा की असं कोणतं काम आहे जे तुम्हाला ते करताना छान वाटतं. जो तुम्हाला उर्जा देतो, ज्यामुळे तुम्हाला मजा येते, आनंद येतो.
ते काहीही असू शकते, बागकाम करणे, रंगकाम करणे, छायाचित्रकारी करणे, व्यायाम करणे, स्वयंपाक करणे, गाडी चालवणे, प्रवास करणे, लिहिणे, वाचणे, जटील-कूटप्रश्न सोडविणे अगदी काहीही..ते असू शकतं.
कोणतेही असे काम जे तुम्हाला खूप आकर्षित करतं. मनापासून करणे आवडते.
मग ते तुमच्या कार्यालयातील काम असू शकतं, कौटुंबिक काम असू शकतं, असं एखादं काम ज्यामध्ये तुम्ही स्वयंसेवक म्हणून गेलेला असाल, किंवा ते तुमच्या वैयक्तिक रूची-आवडी-निवडी असू शकतात.
प्रश्न दुसराः तुम्ही कोणत्या कामामध्ये चांगले (उत्कृष्ट) आहात? What You are good at?
तुम्ही कोणत्या कामामध्ये तुम्ही चांगले आहात? कोणते कौशल्य तुम्हाला चांगल्यारितीने येतं? तुम्ही कोणत्या गोष्टीत तज्ञ आहात?
असे काम ज्याममध्ये आपण उत्कृष्ट आहोत, आपल्यासारखे आपणच असे काम.
प्रश्न तिसराः जगाला कशाची गरज आहे? What the World Needs?
तिसरा प्रश्न हे जाणून घेण्यासाठी आहे की, जगाला आजच्या तारखेत, कोणत्या गोष्टीची गरज आहे?
प्रश्न चौथाः तुम्हाला कशासाठी लोकांनी पैसे दिले पाहिजे? What you can get PAID FOR?
ह्या चौथ्या प्रश्नामध्ये अशा गोष्टी येतात ज्या करून तुम्ही पैसा कमावत असता. असे काम जे केल्याने लोकं तुम्हाला पैसा देत असतात. किंवा तुम्हाला असं वाटतं की असं काम जे केल्याने लोकं तुम्हाला पैसे देऊ शकतात.
लोकांनी आपण करत असलेल्या कामाबद्दल आपल्याला मोबदला म्हणून पैसा दिला पाहिजे, आर्थिक व्यवहार होत असेल असे काम. ते काम तुहाला शोधून काढले पाहिजे. लोकांना किंवा जगाताला किंवा समाजाला एखाद्या गोष्टीची किंवा कामाची गरज आहे आणि ती तुम्ही त्यांना करून देत असाल, तुम्ही त्यांचे मौल्यवान काम-गोष्ट करत असाल तर ते तुम्हाला पैसा देऊ शकतील.
PROFESSION
व्यवसाय
↓
MISSION
उद्देश
↓
VOCATION
↓
PASSION
कल-आवड
👉Mission- उद्देश (तुम्हाला काय आवडतं+ जगाला कशाची गरज)
पहिल्या आणि तिस-या म्हणजेच तुम्हाला काय आवडतं? आणि जगाला कशाची गरज आहे? या वर्तुळांच्या छेदणाच्या दरम्यान ज्या गोष्टी येतील त्या तुमच्या जीवनाचे उद्देश-Mission असेल. म्हणजेच, तुम्हाला काय आवडते? आणि जगाला कशाची गरज आहे? यांच्यामध्ये जे समान कामं किंवा गोष्टी आहेत ते तुमच्या आयुष्याचे उद्देश-Mission असेल.
👉Vocation: (ज्यांची जगाला गरजही आहे + तुम्हाला पैसेसुद्धा देऊ शकतात)
तिस-या आणि चौथ्या वर्तुळातील छेदून तयार झालेल्या जागेला ते म्हणतात Vocation-व्होकेशन-
अशी कामं ज्यांची जगाला गरजही आहे आणि ज्यासाठी ते तुम्हाला पैसेसुद्धा देऊ शकतात.
👉Profession-प्रोफेशन-व्यवसाय
चौथ्या आणि दुस-या वर्तुळाच्या छेदून तयार झालेल्या जागेला म्हणतात Profession-प्रोफेशन. म्हणजे अशी कामं ज्यामध्ये तुम्ही चांगले आहात आणि तज्ञदेखिल आहात. आणि ज्यासाठी जग म्हणजेच लोकं पैसे देण्यासाठीही तयार आहेत. किंवा पैसे द्यायला तयार असतील. अशी कामं असतील तुमचं प्रोफेशन म्हणजेच तुमचा व्यवसाय.
👉Passion-पॅशन-आवड (तुमची आवड + तज्ञता= सर्वोत्कृष्टता)
शेवटी, पहिला आणि दुसरा वर्तुळ छेदून जी जागा तयार होते त्याला म्हणतात Passion-पॅशन म्हणजेच अशी कामे ज्यामध्ये तुम्ही तज्ञ आहात आणि तुम्हाला ती कामं आवडतातही तो असतो तुमचा पॅशन.
एकदा का तुम्ही तुमचा पॅशन शोधून काढला, तुम्हाला तुमचा ईकिगाई शोधने सोपे होऊन जाईल. आणि यापुढे आपण पॅशनबद्दलच बोलणार आहोत.
तर सर्वांत अगोदर, तुम्हाला तुमचे पॅशन जाणून घेण्याअगोदर तुम्हाला स्वतःबद्दल जाणून घ्यावे लागेल. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला-Personality जाणून घ्यावे लागेल.
📗📘📙📖
वाचक मित्रांनो आपल्या जीवनाचे Purpose-उद्देश-कारण-ध्येय कसे शोधावे? पॅशन-प्रोफेशन-व्होकेशन आणि मिशन यांमधील फरक Mastery मास्टरी ह्या पुस्तकातून पुढील व्हिडीयोमध्ये अधिक सोप्यापद्धतीने समजावून सांगितलेलं आहे.
वाचनाचे महत्व व पुस्तकं वाचन करणे का गरजेचे आहे
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
अमृत देशमुख: मिशन-मेक इंडिया रीड नावाने बुकलेट नावाचे मोबाईल एप्प तयार करून वाचन चळवळ सूरू केली. अधिक जाणून घेण्यासाठी त्यांचे संकेतस्थळ
अमृत देशमुख जे एक 'सामाजिक उद्योजक' SOCIAL ENTREPRENEUR आहेत. त्यांच्याबद्दल पुढे पाहणारच आहोत. त्यांचे मेक इंडिया रीड हेच म्हणजेच भारतातील प्रत्येकाला विशेषकरून युवावर्गाला व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करणे व त्यांना वाचन करू घालणे-पुस्तकं वाचणे हेच त्यांच्या आयुष्याचे मिशन-उद्देश आहे. लवकरच पुढे जाणून घेवू.
📗📘📙📖
अयशस्वी लोकांची एक वाईट गोष्ट ही असते की ते स्वतःबद्दल जाणून नसतात, त्यांना स्वतःबद्दल फार काही माहित नसते.
आणि दुसरी गोष्टी अशी की तुम्हाला या गोष्टीवर लक्ष द्यावे लागेल की तुम्ही तुमचा अधिकतर महत्वाचा वेळ कुठं आणि काय करत व्यतित करता, दिवसभरातील महत्वाचा वेळ कुठं आणि कोणती कामे करण्यात घालवता.
पुन्हा, अयशस्वी लोकांची हीसुद्धा एक वाईट सवय असते की, त्यांना हे माहितच नसते की ते त्यांचा वेळ कुठं घालवत असतात. त्यांचा दिवस कसा निघून जातो इत्यादी. ह्याच दोन कारणांमुळे लोकं जीवनामध्ये पुढे जात नसतात.
सर्वच यशस्वी लोकं, खरे तर, महान लोकं पुर्वी होऊन गेलेले आणि जे आजही आहेत, त्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की,
‘’जोपर्यंत माणूस स्वतःला
जाणून घेत नाही,
तो पुढे जाऊ शकत नाही.‘’
वाचकांनो इथून पुढे तुम्ही एखादे पेन-कागद (चोपडी, डायरी, नोटपॅड किंवा स्मार्ट नोट) घेऊन बसा. इथून जे पाहणार आहोत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. तुम्ही लिहून घ्याल तर पुढील भाग सहज समजून घ्याल आणि स्वतःलादेखिल सहज समजून घ्याल.
आणि जे काही तुम्ही लिहिणार आहोत, ते लिहिणे एक चांगली सवय आहे. यशस्वी लोकांची सवय आहे.
पॅशन न भेटण्याचे सर्वांत मोठे एक कारण हेदेखिल आहे की, लोकं त्यांचा वेळ अशा कामात खर्च करतात ज्यामध्ये ते चांगलेही नसतात आणि त्यांना ते काम करणे आवडतही नाही.
तर हेच पाहण्यासाठी की तुम्ही तुमचा महत्वाचा अमूल्य वेळ कुठं घालवता, हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रश्नावली-कवायत करणार आहोत, आम्हाला आशा आहे की तुम्ही पेन-कागद घेऊन हे वाचत आहात आणि ही प्रश्नावली सोडवायला तयार आहात.
तर वाचकांनो, सर्वात आधी तुम्ही कागदावर लेखनीने एक मोठा चौकोन काढा. आणि त्या मोठ्या चौकोनाला चार समान चौकोनांमध्ये विभाजीत करा. चार एक समान छोटे चौकोन काढा.
पहिल्या चौकोनात खालील गोष्टी लिहाः
- I LOVE THESE WORKS
- I AM EXPERT AT TOO
- मला हे काम पसंत आहे, किंवा
मला हे काम आवडते आणि - मी ह्या कामात तज्ञपण आहे.
ह्या चौकोनात त्या सर्व गोष्टींचा उल्लेख करा ज्या करणे तुम्हाला मनापासून आवडत असते. तुम्ही त्या कामांना करण्यात तज्ञ आहात.
उदाहरणार्थः
असेही होऊ शकते की तुम्हाला फोटोग्राफी म्हणजेच छायाचित्रणाची आवड आहे. किंवा तुम्हाला स्वयंपाक करणे आवडते. किंवा संगणकावर कूटभाषेत प्रोग्रॅम लिहिण, बनवणे पसंत आहे. आणि त्यामध्ये तुम्ही तज्ञदेखिल आहात.
तरी अशा गोष्टी ज्यामध्ये तुम्ही तज्ञ आहात आणि ते तुम्हाला करणे आवडतेही, तुम्हाला अशा गोष्टी-कामे करण्यात मजा येते, आनंद होतो; अशा गोष्टींना ह्या पहिल्या चौकोनात लिहून काढा.
दुस-या चौकोनात खालील गोष्टी लिहाः
दुस-या चौकोनात वर लिहा,
- I LOVE THESE WORKS
- BUT, AM NOT GOOD AT IT
- हे काम किंवा गोष्ट मला पसंत आहे,
- आवडते परंतू ते मला उत्कृष्टरित्या करता येत नाही
म्हणजेच अशी कामं जी तुम्हाला खूप आवडतात परंतू, ती तुम्हाला करता येत नाही. येतही असतील तर चांगल्यारितीने येत नाहीत. परंतू तुमचे मन खूप म्हणते ते काम करण्यासाठी.
असेही होऊ शकते की तुम्हाला संगणकाच्या कूटभाषेतील आज्ञावली Coding लिहिणे खूपच आकर्षित करत असेल, परंतू तुम्ही त्यामध्ये चांगले नसाल, तुम्हाला ते योग्यरितीने करता येत नसेल.
कदाचित तुम्हाला गृहसजावट अथवा इंटेरियर डिझाईन करणे आवडत असेल, पण तुम्ही त्यामध्ये उत्तम नसाल,
असेही असू शकते की तुम्हाला एखादा वक्ता होण्याची ईच्छा असेल परंतू ते तुम्ही त्यात सामान्यच असाल
तिस-या चौकोनात खालील गोष्टी लिहाः
- I DON’T LOVE THESE WORKS
- BUT, I KNOW HOW TO DO
- मला ही कामं आवडत नाहीत.
- पण, ती कामं मला करता येतात.
तिस-या चौकोनात वरील प्रमाणे आपल्या मनातील गोष्टी कागदावर उतरवा, लिहा, मांडा.
अशी कामं जी तुमची ईच्छा नसतानाही तुम्हाला ती करावी लागतात.
उदाहरणार्थ,
समजा तुम्हाला संगणकाची आज्ञावली लिहिणे, कोडींग करणे येत असेल, त्यात तुम्ही चांगले असाल आणि ते तुम्हाला नोकरी म्हणून करावे लागते.
तर ह्या चौकोनात अशी कामं लिहून काढा जी तुम्हाला तुमच्या ईच्छेविरूद्ध, मनाविरूद्ध करावी लागतात. परंतू तुम्हाला ती आवडत नाहीत, पसंत नाहीत. अशी कामे करताना त्यात तुमचा रस नसतो.
चौथ्या चौकोनात खालील गोष्टी लिहाः
- NEITHER LOVE THESE WORKS,
- NOR KNOW HOW TO DO IT.
- मला ही कामं आवडतही नाहीत आणि
- मला ती करताही येत नाहीत.
म्हणजेच, अशा गोष्टी-कामं ज्या तुम्हाला पसंत नाहीत, आवडत नाहीत, आणि तुम्ही त्यात तज्ञपण नाहीत. तुम्हाला ती कामं करताही येत नाहीत, तरीही तुम्हाला ती कामं करावी लागतात, मनाविरूद्ध.
जसे की,
तुम्हाला तुमची खोली स्वच्छ करावी लागते..!
होऊ शकते की तुम्हाला खोली साफ-सफाई-स्वच्छ करणे आवडत नसेल, आणि ते तुम्हाला करताही येत नसेल..!
#तुमच्या सोईसाठी आम्ही (#Ikigai Book PDF in Marathi - PDFfile) पीडीएफ मध्ये तयार केले आहे येथून डाऊनलोड-प्रिंट करा व लिहा
👉 येथून डाऊनलोड करू शकता
PDF
WORD
📑🔖📕📖📙📗📘
तर वरील चारही चौकोनात निवांतपणे बसून, विचार करून-करून आपली उत्तरे लिहा, आपल्याला काही घाई नाही. पाहिजेच तर तुम्ही हे पुस्तक सारांश वाचणे येथे थांबवून विचार करू शकता, लिहू शकता.
जेव्हा तुम्ही हे लिहून घ्याल की, तुम्ही तुमचा अधिकतर वेळ कोणती कामं करण्यात व्यतित करता, हे बघा की कोणत्या कामांना करण्यात आपला दिवस, वेळ घालवता. असे कोणते काम आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले आहात आणि तुम्हाला ते करणेही आवडते. किती वेळ तुम्ही अशी कामं करता जी तुम्हाला करावीच लागतात परंतू तुम्हाला ती आवडत नाहीत.
अगोदर वर उल्लेख केल्याप्रमाणे, अधिकांश लोकं अशी कामं करण्यात आपला वेळ घालवतात जी त्यांना आवडत नासतात. ह्यामुळेच त्यांना त्यांचा पॅशन मिळत नाही. म्हणजेच ते खालील दोन चौकोनांमध्ये आपला अधिकतर वेळ खर्ची करत असतात, तिस-या आणि चौथ्या चौकानातील गोष्टी-कामं करण्यात जास्त वेळ घालवत असतात.
तुम्हाला जर तुमचे पॅशन माहित करून घ्यायचे असेल तर तुम्हाला वरील दोन पहिल्या व दुस-या चौकोनातील गोष्टी-कामांना अधिकचे, जास्तीचे वेळ द्यावे लागेल. आपली चालू असलेली नोकरी न सोडता, तुम्हाला हे वरील दोन चौकोनातील कामांना करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पहिल्या व दुस-या चौकोनातील कामांना करण्यासाठी जास्तीचा वेळ काढा व त्यावर विचार करा.
📖📕📑 📗📘📙
स्मार्ट फोन पासून आपले लक्ष कामावर कसे लावावे?
अधिक वाचाः हायपर फोकस- ख्रिस बेले
📖📕📑 📗📘📙
आता पहा, माझ्याजवळ वेळच नाही असे कारण देणे बरोबर नाही, कारण समाज माध्यमांवर, टी.व्ही पाहण्यात इत्यादी पाहणे थोडं कमी केलं तर आपल्याला खूपसारा वेळ मिळेल. तरी वर दिलेली पुस्तकं तुमच्या वेळेची समस्या सोडवण्यासाठी हायपर फोकस व नाऊ हॅबिट तुमची मदत अवश्य करतील एकदा नक्कीच वाचा
आपल वरील प्रमाणे नियोजन करण्यासाठी आपला जास्तीचा वेळ कोणती कामं करण्यात जात आहे हे जर तुम्हाला समजून-जाणून घ्यायचे असेल तर वरील पुस्तक- द नाऊ हॅबिट आणि हायपर फोकस यांचे सांराश एकदा नक्कीच वाचा.
आता असेही होऊ शकते की, तुम्ही वरील दोन चौकोनांमध्ये बरीचशी कामं लिहिलेली असतील, तुम्हाला त्या कामांपैकी फक्त अशाच गोष्टींवर, कामांवर लक्ष केंद्रित करायचे आहे जी करताना तुम्हाला आनंद होतो, मजा येते, जी तुम्हाला खूप आवडतात आणि पुढे चालून ज्याद्वारे तुम्ही पैसाही कमावू शकाल आणि तसे काम करून अगोदरच कोणीतरी पैसा कमावतही असेल.
मग तुम्हाला त्या गोष्टीवर-कामावर, त्या व्यक्तीची अधिक माहिती काढायला पाहिजे, चौकशी केली पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे की नेमकं तो हे सर्व कसं करत आहे? आणि तुम्हालाही तसेच करायला पाहिजे.
अगोदर उल्लेख केल्या प्रमाणे तुमचे पॅशन, तुमची आवड शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर, दुसरी कवायत आपण येथे करणार आहोत ती एक ‘व्यक्तिमत्व चाचणी’-Personality Test आहे. ही चाचणी दिल्यावर तुम्ही स्वतःला चांगल्यारितीने ओळखू शकाल, जाणून घेऊ शकाल.
वाचक मित्रांनो व्यक्तीमत्व चाचणीचे नांव आहे D I S C Test. नेमकं डिस्क टेस्ट काय आहे? आणि आपण त्याद्वारे आपले व्यक्तीमत्व कोणते ते जाणून घेणार आहोत.
त्याविषयी सविस्तरपणे ईकिगाई ह्या पुस्तकाच्या सारांश पुढील भागात-सारांश भाग-२ भाग दोन मध्ये पाहुया.
📗📘📙📖
👉 भाग दोन वाचन करण्यासाठी येथून जाः सारांश भाग-२ | For Part-2
इतर संबंधितः
ईकिगाई मराठीमध्ये मनोज अंबिके यांच्या शब्दांत समजून घ्या
असा ओळखा इकिगाई
How to find Passion l Manoj Ambike
इकिगाई म्हणजेच तुमच्या जगण्याचं कारण, तुमच्या अस्तित्वाच कारण
Reason for being
साभारः मनोज अंबिके यूट्यूब चॅनेल
पुस्तकातील सारांश पुरेसे वाटलं नसेल आणि अधिक तपशिलवार, सविस्तरपणे पुस्तक वाचन करून आपले व्यक्तीमत्व सुधारा, आपला विकास करा, यशस्वी व्हा.
वैयक्तिक विकास, स्वयंमदतीवर ही पुस्तक तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. तसेच, ई-वाचनालय ह्या संकेतस्थळावरील अशाच संवाद कौशल्यांवर, लोकव्यवहारावर, सवयींवर, मेंदूचे कार्य, यावर आधारित इतर पुस्तक सारांश अवश्य वाचा.
Communication Skills | संवाद कौशल्ये | स्वयंविकास-Self Development स्वयंमदत-Self Help वैयक्तिक विकास-Personality Development स्वयंसुधार-Self-Improvement
Keep Reading, Keep Learning and Keep Growing.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
|
📗📘📖📘📙
पुस्तकं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कार्य करण्याची योग्य शिस्त, माहिती, रीत, पद्धत, प्रथा, प्रक्रिया, आयोजन, नियोजन, संयोजन, समन्वय, प्रयोजन...एक व्यवस्था, प्रणाली (SYSTEM) समजावून सांगतात.
________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________
ई-वाचनालय संकेतस्थळ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही स्वयंसुधार, व्यक्तिमत्व विकास यांची कौशल्ये आत्मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्वी जीवन जगू शकता.
परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्तकं ही आपली उत्तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात. यासाठी पुस्तकांचा सार आम्ही सारांश रुपाने आपल्यासाठी घेऊन येतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात
आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून
पुस्तकं वाचा. ☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in |
कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्फोट झालेला दिसून येईल. यामध्ये त्याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्या प्रचंड साठ्यातून आपल्यासाठी सोयीस्कर असे, सोप्या आणि सहज भाषेत पुस्तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्मसात करू शकता.
उत्तम आणि यशस्वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्हावे, योग्य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांद्वारे तुम्ही ते मिळवू शकता.
जीवनमान उंचावून यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती, कौशल्ये, मार्गदर्शन हे पुस्तकांद्वारे मिळवून जीवन सार्थक, यशस्वी ठरवू शकता.
जीवनात पुस्तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी. म्हणून पुस्तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
स्वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्य, पुस्तकं उपलब्ध आहेत.
आपले जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःविषयी, स्वतःच्या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. खास तुमच्यासाठी ह्या संकेतस्थळवर उपलब्ध उत्कृष्ट अशा पुस्तकांचे सारांश. अवश्य वाच.
👉वाचन करण्याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्हा
👉वाचनाचे महत्व/फायदे : पुस्तकांचे महत्व 📖📙📘📗📕📔
जागतिक स्तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्तकांची पुस्तकांची यादीः
१. सॅपियन्स- मानव जातीची संक्षिप्त कथा
२. का-पासून सुरूवात-स्टार्ट विथ व्हाय- सायमन सिनेक
३. अति-परिणामकारक लोकांच्या सात-सवयी
४. हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा
६. सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी
८. दृष्टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्हरीथींग
९. गेले करायचे राहून... द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ डायिंग
⏰ Two Minute 📖
Book Short
📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्तक...!
खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्या. एकदाची गुंतवणूक करा.
दरवेळेस परतावा देणारे उत्तम आर्थिक साधन कोणते?
👉पुस्तक...! 📕📙📘📗 ..
जीवनात पुस्तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्य जगा, यशस्वी व्हा.
- व्यक्तीमत्व विकास | Personality Development
- बड़ी सोच का बड़ा जादू | The Magic of Thinking Big
- एकावेळी एकच काम The One Thing
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
👉ई-वाचनालय या संकेतस्थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्कृष्ट अशी पुस्तक सारांश
- रिच
डॅड-पुअर डॅड
- रिच डॅड्स- गाईड टू इन्वेस्टींग
- रिच डॅड्स कॅशफ्लो क्वाड्रंट- गाईड टू फायनान्शियल फ्रिडम
- रिच किड स्मार्ट किड
- हाऊ टू अट्रक्ट मनी
- द पैरेबल ऑफ़ द पाइपलाइन
- गुजराती धंदो की बात.!-दि धंधो इन्व्हेस्टर मराठी पुस्तक सारांश
- पैश्याने पैसा कमावण्याची आधुनिक पद्धत - फॅल्कन मेथड
- आर्थिक स्वातंत्र्य-फायनान्शियल फ्रिडम-ग्रॅन्ट सबेटिअर-Financial Freedom
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्य बदलतील. तसेच आपल्या सवयींचेदेखिल आहे, एरिस्टॉटलनेसुद्धा असे म्हटले आहे की, तुम्ही जे काही करता त्या तुमच्या सवयींचा भाग असतो. |
farach chan aahe
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक, प्रथमतः ई-वाचनालयावर आपले स्वागत, आणि वाचनासाठीच्या या संकेतस्थळावर भेट दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद. अमूल्य टिप्पणीमुळे आमचा उत्साह वाढतो.
हटवाpdf link not working to download
उत्तर द्याहटवाप्रिय वाचक, ई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. तुम्हाला झालेला वाचनात व्यत्यय यास प्रथमत: क्षमस्व.. तुमची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. कृपया वाचनाची आवड जपा. भेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.
उत्तर द्याहटवाpdf link not working to download
उत्तर द्याहटवाई-वाचनालयास वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
हटवाभेट देत रहा. वाचत रहा. शिकत रहा.