पहिली आठ वर्ष -सहज शिक्षणाची -श्रुती पानसे | Pahili Aath Varshe -Dr. Shruti Panse

  ज्या-ज्या पालकांसोबत मुलं असतात, त्या सर्वांनी वाचावं असं हे पुस्तक आहे

 पहिली आठ वर्ष
सहज शिक्षणाची 

श्रुती पानसे

Pahili Aath Varshe
Dr. Shruti Panse 

बाळ जन्माला येतं ते आनंद घेऊनच! जन्माला आल्यापासून ते जवळपास आठ वर्षांचा काळ हा एक सुंदर प्रवास आहे. आठव्या वर्षी मूल वाढ आणि विकासाच्या एका टप्प्यावर पोहोचलेलं असतं, स्वावलंबी झालेलं असतं. 

मेंदू संशोधनाच्या दृष्टीने ही 'पहिली आठ वर्षे' त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया पक्का करतात.  मुलं अनुवंशातून काय गुण घेऊन आलेली आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. मात्र, जसजसं ते मोठं होत जातं, त्याला जगाचे वेगवेगळे अनुभव येतात, त्यातून ते घडत जातं. त्यामध्ये त्याच्या विकसित होणान्या मॅटूबरोबरच त्याच्या भवतालाचाही संबंध असतोच, घर, शाळा, अंगणवाडी, पाळणाघर, मैदानं... जिथं कुठं मुलांचा वावर असतो, तिथं तिथं त्या काळापुरते त्याचे आईवडील, शिक्षक, पाळणाघरातील मावशी असे वेगवेगळे पालक असतात.  

या पुस्तकामध्ये मूल कसं वाढतं, विकासाची प्रक्रिया त्याच्या मेंदूत  कशी घडत असते, आणि या विकासाला आपण कशा प्रकारे साथ  द्यायला हवी, हे प्रामुख्यानं मांडलं आहे. ज्या ज्या पालकांसोबत मुलं असतात, त्या सर्वांनी वाचाव असं  हे पुस्तक आहे. मुलांच्या मेंदूशास्त्रीय विकासाला या पुस्तकामुळे  निश्चित दिशा मिळेल.

हे पुस्तक तुम्हाला मुलाच्या विकासाच्या पहिल्या 8 वर्षांची माहिती देते. लेखक सांगतात की ही मुलाची मुख्य मूलभूत वर्षे आहेत. भावी जीवनाचा पाय इथेच रचला जातो.  त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलाच्या या विकसनशील वर्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रत्येक मुलाच्या गरजा त्यांच्या बदलानुसार बदलत असल्याने मुलांच्या गरजांकडे विशेष लक्ष कसे द्यावे हे या पुस्तकात सांगितले आहे. 

उदाहरणार्थ,

2 महिन्यांच्या अर्भकाची गरज 3 वर्षांच्या मुलापेक्षा वेगळी असेल कारण 3 वर्षांचे मूल सांगू शकते की त्याला पाण्याची गरज आहे किंवा त्याला भूक लागली आहे इत्यादी, 2 महिन्यांच्या बाळाच्या विपरीत असेल.

त्यामुळे लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तिचे मुद्दे मांडण्यासाठी लेखक तुम्हाला काही संशोधन संदर्भ देखील देतात. आपण आपल्या मुलाचे पोषण आनंदी वातावरणात केले पाहिजे कारण ते त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे. हे आणि तुमच्या मुलाच्या सर्वांगीण घडामोडीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी लेखक तुम्हाला सांगतात. 

लहान मुलं:  वावरतात, खेळतात, बागडतात, बहरतात, पडतात,  ठेचाळतात, प्रत्येक  क्षणी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शिकतात, समजतात, वाढतात, विकसित आणि समृद्ध होतात.


तर हे पुस्तक
पालकांनी वाचा. या पुस्तकातून खरोखरच मौल्यवान माहिती मिळाली. या पुस्तकात एकूण २९ प्रकरणे आहेत. ते सर्व खूप चांगले संरचित आहेत. तुम्ही त्यांच्या शीर्षकावरून देखील सांगू शकता की या प्रकरणात काय आहे. 0-8 वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी खरोखर उपयुक्त. मुलांचे मानसशास्त्र आणि त्यांच्या कृतीमागील कारण स्पष्ट करते. त्यांची विचार प्रक्रिया आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढीच्या वेळेचा आनंद कसा घेऊ शकतो हे सांगितलं आहे.

पालकांना तर्क आणि वैज्ञानिक उपायांसह कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागेल याचे अतिशय छान वर्णन केले आहे. अशा युक्ती साठी डॉ श्रुती पानसे अधिक सुसज्ज आहेत. बाल मानसशास्त्राचा तपशीलवार अभ्यास करून खूप छान लिहिले आहे. प्रत्येक पालकाने ते वाचणे आवश्यक आहे. 

तुमच्या मुलाचे नेमके काय चुकते आहे आणि त्यावर उपाय काय हे तुम्हाला कळते. काय अपेक्षा करावी आणि आपल्या मुलाशी कसे वागावे. खरोखर चांगले पुस्तक आहे असे  वाटते की हे पुस्तक नवीन पालकांना भेट म्हणून देण्यास प्राधान्य देऊ शकता. अप्रतिम पुस्तक आणि पालकांना किरकोळ गोष्टी समजण्यास मदत करते !! सर्व नवीन पालकांनी हे नक्की वाचा!

नवीन काही सादर होत नाही. बर्‍याच गोष्टी फक्त बौद्धिक आहेत असे वाटू शकते परंतु शेवटी प्रत्येक नवं दाम्पत्य नव-पालकच असतात त्यामुळे मार्गदर्शन जरी मिळाले तरी पुरेसे असते, उर्वरित माहिती व अनुभव त्यांना स्वतःलाच घ्यावा लागतो.  पालकत्वाची शैली ही प्रत्येक पालकाची सापेक्ष असते पालनपोषण, घर-गृहस्ती, नोकरी, पाहुणे-संबंधी-नातेवाईक, सभोवताल, वातावरण, शिक्षण, मित्र, सोबती हे ठरवून, पालकांनि नेमून दिलेली नसतात तर ती स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती यानुसार बदलत असतात.  

भावी पालकांनी आणि शिक्षकांनी असे प्रत्येकाने ज्यांच्या जवळपास लहान मुलं असतात, वावरतात, खेळतात, बागडतात, बहरतात, पडतात,  ठेचाळतात, प्रत्येक  क्षणी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शिकतात, समजतात, वाढतात, विकसित आणि समृद्ध होतात.

कारण सांभाळायला, सांगायला, मार्ग दाखवायला, मार्गदर्शन करायला, मोठी स्वप्न पाहायला, ध्येय ठरवायला- गाठायला, नियोजन करायला, धैर्य, संय्यम, चिकाटी, सातत्य यांचे महत्त्व सांगायला आणि फायदे पटवून द्यायला, मेहनत-श्रम यांचे महत्त्व व किंमत करायला, प्रामाणिकपणा, शिस्त व सवयी लावायला, सकारात्मक-नकारात्मक दृष्टिकोन बनवायला, स्वावलंबी, परस्परावलम्बन इत्यादिसाठी आपण पालकच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आपणंच जबाबदार असतो.  

कल्पना, विचार यांना मुक्त करायला, नियमांचे बंधन परंतु निवड्ण्याचे स्वातंत्र्य देऊन, मातीच्या, चिखलाच्या ओल्या गोळ्याला आकार देऊन त्यांना व त्यांचे भविष्य घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य व कर्तव्य पालकांना मिळालेलं आहे. 

पाल्यांच्या मेंदूच्या व मनाच्या कोऱ्या पाटीवर आपण जे काही शिकवतो ते आजीवन बिंबवलं जाणार असतं आणि तीच मुलं उद्या नक्कीच यशस्वी होतील ज्यांना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन व पालक मिळतील.  कारण चूक कि बरोबर, योग्य कि अयोग्य, खरं-खोटं हेसुद्धा लहान मुलांना, पाल्यांना कोण शिकवतं? 

आपणच, पालकच किंवा आपले व सभोवताल, आणि त्यांना आलेले कटु-गोड, बरे-वाईट अनुभव, आणि त्यांना मिळाले शिक्षण.  कोणी म्हणू शकतं कि आम्हाला इतकं मिळालं असतं तर आम्ही इथं राहिलो असतो? असं काही नाही मिळालं मग आम्ही त्यांना कसं देऊ शकतो.  तर उत्तर, प्रयत्न तर करू शकता..! वरील सर्व गोष्टींना एक रुपयाचाही खर्च येत नाही..! 

कोणी असंही म्हणू शकतो की कोणीही परफेक्ट नसतं, सगळं काही आखीव-रेखीव, नेमकं-ठरलेलं-ठरवलेलं आयतं मिळत नसतं आयुष्य जसं मिळालं आहे त्यानुसार जीवन जगावं लागतं.  परंतु प्रामाणिक प्रयत्न  आणि जिद्द-चिकाटी अशा गोष्टी तरी आपणच शिकवू शकतो. सर्व पालकांना यावरून धडा घेता येईल, तयारी करता येईल, बालक-पालक-शिक्षक आणि नवं पालकांना सर्वासाठी उपयुक्त अशी पुस्तक.  

 

इतर संबंधित: 

प्राचीन काळातील पालकत्व कसे होत असे ? 
जाणून घ्या : सेपियन्स मानव जातीचा संक्षिप्त इतिहास

📑🔖📕📗📖📘📙

 

इतर संबंधितः 

 

 


 ________
ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

ई-वाचनालय संकेतस्‍थळ हे एक असे व्‍यासपीठ आहे जिथे तुम्‍ही स्‍वयंसुधार, व्‍यक्तिमत्‍व विकास यांची कौशल्‍ये आत्‍मसात करून, यांद्वारे आपले जीवन चांगले बनवून एक यशस्‍वी जीवन जगू शकता.

परंतू, यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गुरू मिळणे आजच्‍या घडीला अवघड, कठीण झालेले दिसून येईल. पुस्‍तकं ही आपली उत्‍तम मार्गदर्शक व गुरू ठरू शकतात.  यासाठी पुस्‍तकांचा सार आम्‍ही सारांश रुपाने आपल्‍यासाठी घेऊन येतो. ज्‍याद्वारे तुम्‍ही तुमचे जीवन सफल बनवू शकता.

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.
Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in


कारण, प्रचंड वेगाने बदलणारे अंतरजाल आणि दिवसेंदिवस किचकट, गुंतागुंतीचे होत जाणारे तंत्रज्ञान यामुळे माहितीचा प्रचंड स्‍फोट झालेला दिसून येईल. यामध्‍ये त्‍याबरोबरच भरमसाठ वाढत जाणारी माहिती यांच्‍या प्रचंड साठ्यातून आपल्‍यासाठी सोयीस्‍कर असे, सोप्‍या आणि सहज भाषेत पुस्‍तकांद्वारे मिळणारे ज्ञान, माहिती सारांश रूपाने ग्रहण करून, आत्‍मसात करू शकता.

उत्‍तम आणि यशस्‍वी जीवन जगू इच्छितात अशा लोकांना मदत व्‍हावी, आपले नेमके मार्गदर्शन व्‍हावे, योग्‍य दिशा मिळावी यासाठी अशा अनुभवी, लेखकांच्‍या दर्जेदार पुस्‍तकांद्वारे तुम्‍ही ते मिळवू शकता. 


 

जीवनमान उंचावून यशस्‍वी जीवन जगण्‍यासाठी लागणारी माहिती, कौशल्‍ये, मार्गदर्शन हे पुस्‍तकांद्वारे  मिळवून जीवन सार्थक, यशस्‍वी ठरवू शकता.  

जीवनात पुस्‍तकं असतात आपली, मित्र, मार्गदर्शक आणि तत्‍वज्ञानी. म्‍हणून पुस्‍तकं वाचा.

Books are our Friend, Philosopher and Guide in life. So, Read Books.

  ई-वाचनालय | www.evachnalay.in

स्‍वयंविकास, वैयक्तिक सुधार (Personality Development), स्‍वयंमदत (Self Help) यांवर हजारो वर्षापासून लेख-साहित्‍य, पुस्‍तकं उपलब्‍ध आहेत.

आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी स्‍वतःविषयी, स्‍वतःच्‍या भाव-भावनांविषयी, जाणीवांविषयी जाणून घेऊन आपणही जीवनात यशस्‍वी होऊ शकतो.  खास तुमच्‍यासाठी ह्या संकेतस्‍थळवर उपलब्‍ध उत्‍कृष्‍ट अशा पुस्‍तकांचे सारांश.  अवश्‍य वाच. 

👉वाचन करण्‍याचे फायदे : वाचन करा आणि श्रीमंत व्‍हा

👉वाचनाचे महत्‍व/फायदे : पुस्‍तकांचे महत्‍व 📖📙📘📗📕📔

 

जागतिक स्‍तरावर गाजलेले लेखक व दर्जेदार पुस्‍तकांची पुस्‍तकांची यादीः 

१.       सॅपियन्‍स- मानव जातीची संक्षिप्‍त कथा

२.       का-पासून सुरूवात-स्‍टार्ट विथ व्‍हाय- सायमन सिनेक

३.       अति-परिणामकारक लोकांच्‍या सात-सवयी

४.       हॅबिट्स- दैनंदिन सवयींचा सापळा

५.       गोल्‍स- ब्रायन ट्रेसी

६.       सर्वांत अवघड काम सर्वात आधी- ईट दॅट फ्रॉग-ब्रायन ट्रेसी

७.       हायपर फोकस- ख्रिस बेले 

८.       दृष्‍टीकोन हेच सर्वकाही-एटीट्यूड इज एव्‍हरीथींग 

 .     गेले करायचे राहून... द टॉप फाइव्‍ह रिग्रेट्स ऑफ डायिंग

Two Minute
📖
BOOK SHORTS

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...!

 📕📙📘📗

📖 दोन मिनिटात मॅगी तर मग, दोन मिनिटात पुस्‍तक...

खरेदी केलेली मॅगी दोन मिनिटात संपेल परंतू पुस्‍तक एकदाच खरेदी करा व परत-परत वाचून समजून घ्‍या. एकदाची गुंतवणूक करा.

दरवेळेस परतावा देणारे उत्‍तम आर्थिक साधन कोणते?

👉पुस्‍तक...! 📕📙📘📗 ..

जीवनात पुस्‍तकाचे ज्ञान उतरवा, चांगले आयुष्‍य जगा, यशस्‍वी व्‍हा. 

ई-वाचनालय | www.evachnalay.in

 

👉ई-वाचनालय या संकेतस्‍थळावरील आर्थिक विषयांवरील इतर लोकप्रिय, उत्‍कृष्‍ट अशी पुस्‍तक सारांश

 आर्थिक विषयावरील इतर उत्‍कृष्‍ट पुस्‍कांची यादी-क्‍लीक करून पाहा

  ई-वाचनालय | www.evachnalay.in



www.evachnalay.in

बदल हवा असेल तर विचार बदला, तेच तुमचं आयुष्‍य बदलतील. तसेच आपल्‍या सवयींचेदेखिल आहे, एरिस्‍टॉटलनेसुद्धा असे म्‍हटले आहे की, तुम्‍ही जे काही करता त्‍या तुमच्‍या सवयींचा भाग असतो.

टिप्पण्या

Please feel free to express your valuable comment जीवन पुस्‍तकांद्वारे समृद्ध करावे. दिसामाजी कांही तरी तें लिहावे। प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥

Archive